तक्रार अर्ज क्र. सीसी /293/2015
तक्रार दाखल दि. 16/12/2015
तक्रार निकाली दि. 30/09/2016
निकाल कालावधी 9 महिने 30 दिवस
नंदकुमार कंपनी तर्फे मुखत्यार
श्री. स्वप्नील बाबाजी कदम
रा. कृषि दौलत अपार्टमेंट, सोनगीरवाडी,
वाई, ता. वाई, जि. सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया
शाखा - सातारा.
अॅक्सिस बँकेसमोर, राधिका रोड, सातारा .... जाबदेणार.
************************************************************************
तक्रारदारांतर्फे – अँड. जगदाळे
जाबदार – अँड. भोसले
************************************************************************
// निकालपत्र //
(पारीत दिनांक : 30/09/2016)
(द्वारा- श्री. मिलींद पवार (हिरुगडे),अध्यक्ष यानी पारित केला)
1) तक्रारदाराने जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
प्रस्तुतची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे :
नंदकुमार कंपनी ही एक भागीदारी संस्था असून तक्रारदारांना सदर कंपनीचे मुखत्यार असून ते सदर संस्थेत काम करतात. गोकुळ अन्न धान्य औद्दयोगिक प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. ही मिल तक्रारदार यांचे कंपनीने भाडे तत्वावर घेतली आहे. प्रस्तुत मिलमध्ये गव्हापासून मैदा, आटा, रवा आणि भुसा तक्रारदार हे तयार करतात. तक्रारदार यांचेकडून श्री साई गणेश बेकरी प्रॉडक्टस् यांनी दिनांक 29/04/2015 रोजी बिल नं. 33 द्वारे मैदा विकत घेतला. प्रतुतचा मैदा रक्कम रु. 49,300/- चा होता. सदर खरेदी केलेल्या मालाचे बिलापोटी त्यांनी तक्रारदार यांना जाबदेणार यांनी त्यांचे खाते असलेल्या पार्श्वनाथ को ऑ. बँक लि., कोल्हापूर या बँकेचा चेक क्र. 003245 रक्कम रु. 49,300/- दिनांक 30/05/2015 रोजीचा दिला. प्रस्तुतचा चेक व त्याचा रिटर्न मेमो अद्दयापपर्यंत बँकेने तक्रारदाराला दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदारास श्री साई गणेश बेकरी प्रॉडक्टस् यांचेविरुध्द आजपर्यंत कोणतीही कारवाई करता आली नाही. चेक व रिटर्न मेमोची वारंवार मागणी करुनही जाबदेणार बँकेने न दिल्याने दिनांक 12/09/2015 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवूनही चेक व रिटर्न मेमो दिलेला नाही. म्हणून सदरील तक्रार दाखल केली असून जाबदेणार यांच्या गैरकृत्यामुळे जो मानसिक व शारीरिक त्रास झाला त्याची नुकसानभरपाई रु. 1,00,000/-,
तक्रारीचा खर्च रु. 20,000/- देणे बाबत आदेश करण्यात यावेत अशी मागणी तक्रारदार करतात.
तक्रारदारांनी आपल्या तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ निशाणी – 2 कडे शपथपत्र, निशाणी – 5/11 कडे चेकची झेरॉक्स, निशाणी – 5/3 कडे जाबदारांना पाठवलेली वकिलांची नोटीस, निशाणी – 5/4 कडे पोहच, निशाणी – 5/2 कडे तक्रारदाराने जाबदेणारांना दिलेले पत्र, आणि निशाणी – 5/5 कडे मुखत्यारपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
जाबदेणार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाले नंतर जाबदेणार यांनी त्यांचे वकीला मार्फत त्यांची लेखी कैफियत शपथपत्र स्वरुपात दाखल केली आहे. त्यांचे म्हणण्यामध्ये जाबदेणार यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदार यांचे जाबदेणार बँकेत व्यावसायिक अकाऊंट आहे. तक्रारीमध्ये नमूद केलेला व्यवहार हा व्यावसायिक स्वरुपाचा असून त्यावर तक्रारदारांचा कोणत्याही प्रकारचा उदरनिर्वाह नाही. स्कायलार्क एक्सप्रेस पुणे ही कुरीयर कंपनी या कामात आवश्यक पक्षकार असून सदर कुरीयर कंपनीस तक्रारदार यांनी सामिल केलेले नाही. त्यामुळे तक्रारीस नॉन जॉईन्डर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाचा बाद येत नाही. तक्रारदार याने त्यांचे सदर खात्यामध्ये पाश्वनार्थ को ऑ बँक लि. शाखा – कोल्हापूर या बँकेचा चेक नं 003245 रु. 49,300/- चा भरलेला होता. सदर चेक हा कोल्हापूर येथील असल्याने जाबदेणार बँकेन सदरचा चेक कोल्हापूर येथील जाबदेणार यांचे शाखेकडे क्लिअरींगसाठी पाठविलेला होता. तसेच सदर जाबदेणार यांचे कोल्हापूर येथील शाखेने सदर चेक पाश्वनार्थ को. ऑ. बँक लि. यांचेकडे वटण्यासाठी पाठविलेला होता. सदरचा चेक न वटता परत कोल्हापूर शाखेकडे आलेनंतर जाबदेणार यांचे कोल्हापूर शाखेने सदरचा चेक व चेक रिटन मेमो स्कायलार्क एक्सप्रेस या कुरीयर कंपनीचे कुरीयरने जाबदेणार यांचे सातारा शाखेकडे दिनांक 23/6/2015 रोजी पाठविलेले होते. सदर कुरीयर जाबदेणार बँकेचे सातारा शाखेस अद्दयापही मिळालेले नाही. त्याबाबत जाबदेणार बँकेने स्कायपार्क कुरीयर कंपनीशी पत्रव्यवहार केलेला आहे. जाबदेणार बँकेने तक्रारदारास चेकची छायांकीत प्रत, चेक रिटर्ण मेमोची छायांकीत प्रत दिलेली होती त्याप्रमाणे तक्रारदारांना श्री साई गणेश बेकरी प्राडक्ट यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यास अडचण नव्हती. जाबदेणार यांनी पुढे असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी श्री साई गणेश प्रोडक्ट यांचेकडून सदरची रक्कम अद्दयाप मिळालेली नसल्याचे शाबीत करावे व तसा कागदोपत्री पुरावा दाखल करावा. तक्रार अर्जात नमूद केलेले कथने व मागणी बेकायदेशीर असून सदर तक्रार खर्चासह रद्द होणेस पात्र असल्याचे जाबदेणार यांनी कथन केले आहे. जाबदेणार यांनी निशाणी – 20 कडे स्कायलार्क एक्सप्रेस कुरिअरने दिलेले पत्र, चेक रिटन मेमो इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदार यांची तक्रार, जाबदेणार यांचे लेखी उत्तर, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता, तसेच उभय विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाच्या निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ‘ग्राहक’ आहेत काय ? होय.
2. तक्रारदारांतर्फे मुखत्यार यांना तक्रार दाखल
करण्याचा अधिकार आहे का ? होय.
3. जाबदेणारांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिल्याचे सिध्द होते काय ? होय.
4. जाबदारांकडून तक्रारदार हे नुकसानभरपाई
मिळण्यास जबाबदार आहेत काय ? होय.
5. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
// कारणमिमांसा //
(6) मुद्दा क्र. 1 व 2 :- तक्रारदार यांचे विरुध्द पक्ष बँकेमध्ये करंट खाते क्र. 5793010050220 असल्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही. श्री. साई गणेश यांनी तक्रारदार यांना दिलेला रु..49300 /- चा धनादेश क्र.003245 विरुध्द पक्ष बँकेतील खाते मध्ये जमा केल्याचे उभय पक्षकारांना मान्य आहे. तक्रारदार नंदकुमार कंपनी ही सदर खात्यामधून दैनंदीन व्यवहार करत होते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक ठरतात. जाबदेणार यांनी तक्रारदारांतर्फे मुखत्यार स्वप्नील कदम यांना तक्रार दाखल करणेचा अधिकार नाही असा आक्षेप घेतला आहे. मात्र निशाणी – 5/5 कडील मुखत्यार पत्राचे अवलोकन करता भागिदारी फर्मसाठी कोणतेही न्यायालयीन कामकाज करण्याचे अधिकार हे मुखत्यार श्री. कदम यांना भागीदारी फर्म ने दिले आहेत. त्यामुळे जाबदेणार यांचा सदर आक्षेप तथ्यहिन ठरतो. म्हणून मुद्दा क्र. 1 व 2 यांचे उत्तर होकारार्थि देण्यात येते.
मुद्दा क्र. 3 व 4 : तक्रारारांची तक्रार, जाबदेणार यांचा प्रतिवाद याचे अवलोकन करता तक्रारदार यांचे जाबदेणार बँकेमध्ये करंट खाते क्र5793010050220 असल्याबाबत उभय पक्षांमध्ये विवाद नाही. श्री. साई गणेश यांनी तक्रारदार यांना दिलेला रु.. 49300 /- चा धनादेश क्र.003245 विरुध्द पक्ष बँकेतील खाते मध्ये जमा केल्याचे उभय पक्षकारांना मान्य आहे. त्यानंतर धनादेशाप्रमाणे रक्कम रु. 49300 /- तक्रारदार यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, ही वस्तुस्थिती उभयतांना मान्य आहे. तक्रारदार यांच्या वादकथनाप्रमाणे धनादेशाची रक्कम त्यांना मिळालेली नाही किंवा मुळ धनादेश व त्याचा मेमो त्यांना मिळाला नाही. त्यामुळे संबंधीत श्री साई गणेशवर कोणतीही कारवाई करता आली नाही त्यामुळे जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी, असे तक्रारदार यांचे कथन आहे. उलटपक्षी जाबदेणार यांच्या प्रतिवादाप्रमाणे स्कायपार्क एक्सप्रेस कुरिअर . यांचेमार्फत धनादेश वटण्याकरिता कोल्हापूर येथे जाबदेणार यांचे शाखेला पाठवला असता गहाळ झालेला आहे.
5. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी दिलेला धनादेश वटण्याकरिता जाबदेणार यांचे कोल्हापूर येथील संबंधीत शाखेकडून पाठवला असता स्कायलार्क एक्सप्रेस कुरिअर सेवेकडून गहाळ झाल्याचे निशाणी – 20/1 वरील सदर कुरीयर यांचे पत्रावरुन स्पष्टपणे निदर्शनास येते.
6. उभय विधिज्ञांचा युक्तिवादानंतर निर्विवादपणे तक्रारदार यांनी भरणा केलेला धनादेश गहाळ झालेला आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी प्रस्तुत वस्तुस्थिती श्री साई गणेश यांना सांगून दुसरा धनादेश किंवा रक्कम मिळण्यासाठी काय प्रयत्न केले ? हे उचित पुराव्याद्वारे सिध्द केलेले नाही. आमच्या मते, धनादेश गहाळ झाल्यानंतर तक्रारदार यांना श्री साई गणेश यांच्याकडून नवीन व दुसरा धनादेश किंवा त्याची रक्कम मिळू शकली असती. तसेच श्री साई गणेश यांनी तक्रारदार यांना रक्कम किंवा दुसरा धनादेश देण्याकरिता नकार दिल्याचे किंवा तक्रारदार यांनी तो मागितल्याचे कागदोपत्री सिध्द होत नाही. धनादेश गहाळ झाल्याची वस्तुस्थिती ज्ञात असताना ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे क्रमप्राप्त आहे, त्या व्यक्तीकडे रक्कम मागण्याऐवजी ती रक्कम बँकेकडून मिळावी, असा आग्रह धरणे उचित व संयुक्तिक नाही. तक्रारदार यांनी श्री साई गणेश यांच्याकडून नवीन धनादेश किंवा रक्कम मिळवण्याऐवजी बँकेविरुध्द तक्रार दाखल करण्यास अग्रक्रम दिलेला आहे. तक्रारदार यांचा गहाळ झालेला धनादेश एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने वटवून रक्कम उचललेली नाही. आमच्या मते, तक्रारदार यांना श्री साई गणेश यांच्याकडून येणे असलेली रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे पूर्ण तक्रारीमध्ये फक्त नुकसानभरपाई रु. 1,00,000/- ची मागणी केली. मात्र धनादेशाची रक्कम रु.49300/- मिळण्याकरिता तक्रारदार यांची विनंती नाही. केवळ ढोबळ मानाने रु. 1,00,000/- नुकसानभरपाईची मागणी केलेली आहे. गहाळ चेकमुळे नेमके काय नुकसान झाले याचा पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे ढोबळ मनाने केलेली नुकसानभरपाईची मागणी योग्य नाही, किंबहुना ती संयुक्तिक व न्यायोचित ठरु शकत नाही.
8. जरी उपरोक्त विवेंचनामध्ये धनादेश गहाळ झाल्यामुळे तक्रारदार यांना दुसरा धनादेश किंवा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते किंवा यदाकदाचित धनादेश किंवा रक्कम न मिळाल्यास रककम वसूलीपोटी संबंधीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करणे, गरजेचे होते असे नमूद असले तरी सदर उपद्याप करणेस कोण जबाबदार आहे हे पाहणे सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. निश्चित जाबदेणार यांचे गलथान कारभारामुळे तक्रारदार यांना अनेक त्रासांना सामोर जावे लागणार आहे. बँकेनेही धनादेश गहाळ करणा-या कुरिअर सेवेविरुध्द कायदेशीर कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास येते किंवा तसा कोणताही पुरावा जाबदेणार यांनी दाखल केला नाही. केवळ बँकेचे सदर कुरियर सेवेवर विसंबून राहवे लागल्यामुळे तक्रारदार यांना पुन्हा नव्याने सदर रक्कम वसूलीसाठी इतर न्यायालयात जाण्यास लागणारा खर्च करावा लागणार आहे व स्वतःच्या हक्काच्या रक्कमेसाठी मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत आहे. धनादेश गहाळ होण्याकरिता विरुध्द पक्ष यांचा दोष नसला तरी तक्रारदार यांना झालेल्या त्रासाचे अनुषंगाने त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी असल्याचे ग्राह्य धरावे लागते. तक्रारदार यांना निश्चितच आर्थिक नुकसान व मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. तक्रारदार हे धनादेशाची रक्कम मिळण्यास पात्र नसले तरी धनादेश गहाळ झाल्यामुळे दूषित व त्रुटीच्या सेवेपोटी होणा-या त्रास व खर्चाकरिता उचित नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
9. प्रस्तुत प्रकरणामध्ये आम्ही मा. राष्ट्रीय आयोगाने ‘कार्पोरेशन बँक /विरुध्द/ एन.सी.एस. फिल्मस्’, 2007 एन.सी.जे. 619 (एन.सी.) या निवाडयाचा संदर्भ विचारात घेत आहोत. त्यामध्ये मा. आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की,
Complaint under C.P. Act, 1986 can be filed only for compensation based on deficiency in service arising out of loss of cheque in transit but not for recovery of the entire cheque amount.
तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने ‘ए.पी. बोपन्ना /विरुध्द/ कोडगू डिस्ट्रीक्ट को-ऑप. सेंट्रल बँक’, 2009 सी.टी.जे. (सीपी) (एनसीडीआरसी) या निवाडयामध्ये असे म्हटले आहे की,
Para. 7 : It is not disputed before us that the cheque of Rs.21,000/- deposited by the petitioner has not been enchased. The cheque was lost in transit somewhere and was not traced. If the cheque sent for encashment is not traced or not honored, there cannot be any liability on the respondent for the cheque amount. The liability, if any, can be limited to the deficiency in service.
Para. 9. : Although, we are of the opinion that respondent could not be held liable to pay the cheque amount but the respondent was certainly deficient in service to some extent. It cannot escape its liability for payment of reasonable compensation to the petitioner, which we assess at Rs.5,000/-. To the same effect, is a view taken by this Commission in State Bank of Patiala v. Rajender Lal & anr, reported in IV (2003) CPJ 53 (NC).
मा. राष्ट्रीय आयोगाने Suresh Kumar V/s. Manager, State Bank of Bikaner and Jaipur and ors., IV (2010) CPJ 72 (NC) RP No. 2357 of 2006, Decided on 19.7.2010 या निवाडयात असे नमूद केले आहे की….
The draft was lost at the level of the bank which, itself amounts to deficiency in service. The complainant was not at fault. Keeping in view the amount of draft and the fact that the draft was lost by the bank, the bank should not have insisted on indemnity bond and should have found out ways and means to refund the amount of the draft. In fact, rather than contesting the matter, Respondent Nos. 1 and 2 should have at least come forward for the refund of the said amount, but it appears that the Respondent contested the case on the ground that the payment could not be made since Indemnity Bound had not been furnished. Therefore, the complainant would be entitled not only to refund of the draft amount, but also interest thereon from the date of issue of demand draft till the payment of draft amount of Rs. 1500 is made and also the cost of litigation
तसेच मा. राष्ट्रीय आयोगाने Sunil Mittal V/s. Vijaya Bank and Anr., III (2016) CPJ 386, Decided on 12.02.2016 या निवाडयात….
Consumer Protection Act, 1986 Section (2) (1) (g), 14 (1) (d), 21 (b) Banking and Financial Institions Service Bank Draft 37 drafts deposited 14 drafts lost in transit deficiency in Service Compensation District Forum allowed complaint State Commission partly allowed appeal Hence revision Petitioner suffered loss as money involved in those drafts could not be credited to account of petitioner though money was paid to concerned bank draft issuing branches by person in whose favour bank drafts were issued Bank failed to prove that those persons have taken out money after canceling drafts Bank is responsible to compensation for lost drafts Impugned order modified Directions issued to pay Rs. 1,00,000.
जाबदेणार यांनी AIR 2009 SC (Supp) 2842, Branch Manager, Federal Bank Ltd. V/s. N.S. Sabastian हा निवाडा दाखल केला आहे. मात्र प्रस्तुत तक्रार व सदर निवाडयामधील वस्तुस्थिती विसंगत असल्याने सदर निवाडा या प्रकरणास लागू पडत नाही.
10. तक्रारीची वस्तुस्थिती व उपरोक्त सर्व निवाडयामधील न्यायिक तत्व पाहता, तक्रारदार हे जाबदेणार यांनी दिलेल्या केवळ सेवेतील त्रुटीकरिता नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत. तक्रारदार यांना धनादेशाची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीसह मानसिक व शारीरिक त्रासास सामोरे जावे लागल्याचे मान्य करावे लागेल. त्याकरिता तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र ठरतात. योग्य विचाराअंती तक्रारदार हे रु.10,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत, या मतास आलो आहोत. तसेच तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु. 3,000/- मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत.
11. जाबदेणार यांच्या प्रतिवादाप्रमाणे स्कायलार्क एक्सप्रेस कुरिअर यांना आवश्यक पक्षकार न केल्यामुळे Non-joinder of necessary party चा बाध येतो. वास्तविक पाहता, तक्रारदार यांनी स्कायलार्क एक्सप्रेस कुरिअर यांच्यामार्फत कोणतीही सेवा घेतलेली नाही. तक्रारदार यांनी कुरिअर सेवा मिळण्याकरिता स्कायलार्क एक्सप्रेस कुरिअर यांना मोबदला दिलेला नाही. विरुध्द पक्ष व बँक यांच्यामध्ये कुरिअर सेवा निर्माण झालेली आहे त्यामुळे सदर कुरिअर आवश्यक पक्षकार होत नसून विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद व युक्तिवाद अमान्य करण्यात येतो.
12. उपरोक्त विवेचनावरुन जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दूषित व त्रुटीची सेवा दिलेली आहे म्हणून मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवेतील त्रुटीकरीता, व मानसिक
शारीरिक त्रास व आर्थिक नुकसान भरपाईकरिता रु.10,000/- द्यावेत.
3. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.
3,000/- दयावेत.
4. जाबदेणार यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून
30 दिवसाचे आत करावी.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क पुरवण्यात यावी.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री. श्रीकांत कुंभार) (श्री.मिलींद पवार (हिरुगडे) )
सदस्य सदस्य अध्यक्ष
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, सातारा
ठिकाण : सातारा
दिनांक :30/09/2016