Maharashtra

Beed

CC/10/99

Alka Popat Chitale - Complainant(s)

Versus

Shakha Vyavasthapak,Reliance General Insurance Company Ltd. & Other - Opp.Party(s)

A.S.Pavse.

07 Dec 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/99
 
1. Alka Popat Chitale
R/o.Dhirdi,Tq.Ashti,Dist.Beed
Beed
Mahaarashtra.
...........Complainant(s)
Versus
1. Shakha Vyavasthapak,Reliance General Insurance Company Ltd. & Other
19,Reliance Centre,Walchand Heerachand Marga,Bellard Estate,Mumbai.
Mumbai.
Maharashtra
2. Vibhag Pramukh,Kabal Insurance Broking Service Pra.Ltd.
Shop No.Disha Alankar Complex,Towon Centre,Cidco,Aurangabad
Aurangabad
Maharashtra.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  Sou. M. S. Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                               तक्रारदारातर्फे    – वकील – ए.एस.पावसे,
                                सामनेवाले 1 तर्फे – वकिल - ए.पी.कुलकर्णी.
                                सामनेवाले 2 तर्फे – प्रतिनिधी           
                              ।। निकालपत्र ।।
                ( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्‍वरुपे – सदस्‍या )
तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार ही रहाणार धिर्डी (शिराळा) ता. आष्‍टी जि. बीड येथील असुन तक्रारदारांचे पती पोपट बन्‍सी चितळे हे व्‍यवसायाने शेतकरी होते. त्‍यांचे मालकीची गट नं.159 (इ) 3 मौजे शिराळा ता.आष्‍टी जिल्‍हा बीड येथे 0.48 आर एवढी जमिन आहे. तक्रारदारांचे पतीचे मृत्‍यू नंतर सदर शेतीवरच उदरनिर्वाह चालवते.
      दुर्दैवाने तक्रारदारांचे पती पोपट बन्‍सी चितळे यांना लाईटचा शॉक लागल्‍याने ता.20.1.2008 रोजी मृत्‍यू पावले. सदर घटनेची माहिती कडा आष्‍टी पोलीस स्‍टेशन ता.बीड यांना दिली. पोलीसांनी अकस्‍मीक मृत्‍यूची नोंद करुन मरणोत्‍तर पंचनामा केला. पोपट बन्‍सी चितळे यांचे प्रेत पोस्‍टमार्टमसाठी पाठविण्‍यात आले.
      तक्रारदारांनी मयत पोपट बन्‍सी चितळे यांचा अपघाती मृत्‍यू बाबतची नुकसान भरपाईचा दावा शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकारी, आष्‍टी जिल्‍हा बीड मार्फत सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे ता.5.1.2009 रोजी दाखल केला. सोबत गट नं.59 (इ) 3 चा 7/12, 8-अ, 6-क तलाठी प्रमाणपत्र, तहसिलदार प्रमाणपत्र फेरफार नक्‍कल सादर केलेली आहे. तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव कृषिअधिकारी कार्यालया मार्फत आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह सामनेवाले नं.1, 2 यांचेकडे पाठविण्‍यात आला आहे. परंतु सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदारांचा विमा दावा मंजूर केलेला नाही. या कारणास्‍तव तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.
तरी तक्रारदारांची विनंती की, तक्रारदारांना सदर योजनेअंतर्गत देय असलेल्‍या विमा लाभाची रक्‍कम रु.1,00,000/- त्‍यावर द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह सामनेवाले यांचेकडून वसुल होवून मिळावे. सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे विमा दावा पाठवून त्‍वरीत निर्णय द्यावा असा आदेश व्‍हावा. तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- सामनेवाले यांचेकडून वसुल होवून मिळावेत.
      सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 व 2 हजार झाले असुन ता.3.1.2010 रोजी व ता.8.6.2010 रोजी अनुक्रमे लेखी खुलासा न्‍यायमंचात दाखल केला आहे.
सामनेवाले नं.1 यांचा थोडक्‍यात खुलासा की, सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला मजकुर स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेला मजकुर पुराव्‍यानिशी सिध्‍द करणे आवश्‍यक असल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारदारांनी विमा प्रस्‍ताव प्रोफार्मा ए ते जी या प्रमाणे दाखल केलेला नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव योग्‍य मार्गाने ( थ्रो प्रॉपर एजन्‍सी ) दाखल नाही. तक्रारदारांनी तक्रारदाराचा प्रस्‍ताव कबाल इंश्‍युरन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीसेस यांचे मार्फत दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी प्रत्‍यक्ष अपूर्ण कागदपत्रासह नुकसान भरपाईचा दावा सामनेवाले यांचेकडे दाखल केलेला आहे. सामनेवाले न.1 यांनी तक्रारदारांचा विमाप्रस्‍ताव नाकारलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार अपरिपक्‍कव ( प्रिमॅच्‍यूअर ) स्‍थीतत आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी, असे सामनेवाले नं.1 विमा कंपनीने नमुद केले आहे.
      सामनेवाले नं.2 हे शासनाने नेमणुक केलेली विमा सल्‍लागार समिती असुन विमा- धाकर (शेतकरी) यांचा विमा प्रस्‍ताव विमा कंपनीकडे दाखल करण्‍यापूर्वी आवश्‍यकत्‍या कागदपत्राची पूर्तता वेळेत करण्‍याचे काम करते. सामनेवाले नं.2 या संबंधात कोणत्‍याही प्रकारचे मानधन/वेतन शासनाकडून स्विकारत नाही. सदर योजनेअंतर्गत सामनेवाले नं.2 मार्फत विधारकाचे कागदपत्रांची तपासणी करुन त्रूटी आढळल्‍यास संबंधीत तहसिलदार यांना सुचना देवून आवश्‍यक कागदपत्राची पूर्तता करुन विमा प्रस्‍ताव शासनाने नेमणुक केलेल्‍या संबंधीत विमा कंपनीकडे पाठविण्‍याची जबाबदारी आहे. सामनेवाले नं.2 सदर योजनेअंतर्गत कोणत्‍याही प्रकारचे प्रिमियम/हप्‍ता स्विकारत नाही. सानेवाले नं.2 या संदर्भात शासनाचे परिपत्रक सोबत जोडले आहे.
      पोपट बन्‍सी चितळे मौजे धिर्डी ता.आष्‍टी जि.बीड यांचा ता.20.11.2008 रोजी अपघातात मृत्‍यू झाला. मृत्‍यूचा विमा प्रस्‍ताव ता.20.3.2009 रोजी प्राप्‍त झाला. सदरचा प्रस्‍तावात कांही कागदपत्रे म्‍हणजेच तलाठी प्रमाणपत्र, इंनक्‍वेस्‍ट पंचनामा राहिलेली होती. सदरची आवश्‍यक कागदपत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव सामनेवाले नं.1 विमा कंपनीकडे ता.7.9.2009 रोजी पाठविण्‍यात आला. वारंवार चौकशी करुनही तक्रारदारांचा विमा प्रस्‍तावा बाबत अद्यापपर्यन्‍त निर्णय झालेला नाही.
      न्‍याय निर्णयासाठी मुद्दे.                                    उत्‍तरे.
1.     तक्रारदारांचे मयत पती श्री.पोपट बन्‍सी चितळे यांचा       सामनेवाले नं.1                
शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजनेअंतर्गत विमा       बाबत होय.                
रक्‍कम न देवून सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे     सामनेवाले नं.2                
सेवेत कसूरी केल्‍याची बाब तक्रारदारांनी सिध्‍द केली       बाबत नाही.               
आहे काय ?
2.    तक्रारदार दाद मिळण्‍यास पात्र आहे काय ?              होय.
3.    अंतिम आदेश काय ?                               निकालाप्रमाणे.
      तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्‍याचे शपथपत्र, सामनेवाले न.1 यांचा लेखी खुलासा, शपथपत्र, सामनेवाले नं.2 यांचा लेखी खुलासा यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल ए.एस.पावसे सामनेवाले नं.2 यांचे विद्वान व‍कील ए.पी.कुलकर्णी यांचा युक्‍तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांचे मयत पती श्री पोपट बन्‍सी चितळे यांचा मालकीची शेतजमिन मौजे शिराळा ता.आष्‍टी जि.बीड येथे गट नं.59(इ)3 मध्‍ये 0.48 आर असुन त्‍यावरच त्‍यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. दुर्दैवाने श्री.पोपट बन्‍सी चितळे यांचा ता.20.11.2008 रोजी लाईटचा शॉक लागुन मृत्‍यू झाला. सदर घटनेची माहिती कडा आष्‍टी पोलीस स्‍टेशन, यांचेकडे दिल्‍यानंतर त्‍यांनी सदर घटनेची चौकशी करुन तपास केला, आकस्‍मीक मृत्‍यूची नोंद केली, मरनोत्‍तर पंचनामा करुन प्रेत पोस्‍टमार्टमसाठी पाठविले.
      तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍यूनंतर सदर शेतकरी वैयक्‍तीक अपघात योजनेअंतर्गत विमा प्रस्‍ताव आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह तालुका कृषीअधिकारी यांचेकडे ता.5.1.2009 रोजी दाखल केला. अद्यापपर्यन्‍त तक्रारदारांना विमालाभ रक्‍कम प्राप्‍त झाली नसल्‍याबाबत तक्रारदारांची तक्रार आहे.
सामनेवाले नं.1 यांचे खुलाशात नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव ए ते जी प्रपत्रात दाखल नाही. तसेच कांही कागदपत्राची परिपूर्तता करणे आवश्‍यक आहे. तसेच तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव सामनेवाले यांनी नाकारलेला नसल्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार अपरिपक्‍कव ( प्रिमॅच्‍यूअर ) स्‍थीतत आहे.
      सामनेवाले नं.2 कबाल इंश्‍युरनस ब्रोकिंग सर्व्हिसेस यांचा खुलाशा प्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव ता.20.3.2009 रोजी त्‍यांचेकडे प्राप्‍त झाल्‍यानंतर कांही कागदपत्राची तलाठी प्रमाणपत्र, इंनक्‍वेस्‍ट पंचनामा वगैरे कागदपत्राची पूर्तता करुन तक्रारदारांचा विमाप्रस्‍ताव सामनेवाले नं.1 विमा कंपनीकडे ता.7.9.2009 रोजी पाठविण्‍यात आले. अनेकवेळा स्‍मरण पत्र देवूनही सदर प्रस्‍तावाबाबत निर्णय झालेला नाही.
      तक्रारदारांचा परिपूर्ण विमा प्रस्‍ताव आवश्‍यक त्‍या कागदपत्रासहीत सामनेवाले नं.1 विमा कंपनीकडे सामनेवाले नं.2 यांनी ता.7.9.2009 रोजी पाठविलेले आहे. सामनेवाले नं.1 विमा कंपनीचे खुलाशात नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव ए ते जी प्रपत्रात व योग्‍य मार्गाने म्‍हणजेच सामनेवाले नं.2 कबाल इंश्‍युरन्‍स कंपनी मार्फत दाखल केले नसल्‍या बाबत नमुद केले आहे. परंतु सामनेवाले नं.2 कबाल इंश्‍यरन्‍स कंपनीने खुलाशात नमुद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांचा विमाप्रस्‍तावाची पडताळणी करुन, कागदपत्राची पूर्तता करुन सामनेवाले नं.1 यांचेकडे पाठविण्‍यात आल्‍या बाबत नमुद केले आहे. सामनेवाले नं.1 विमा कंपनी कबाल इंश्‍युरन्‍स कंपनीचा खुलासा दाखल झाल्‍यानंतर सदरील विधानास आक्षेप घेतलेला नाही. त्‍यामुळे सामनेवाले नं.2 कबाल इंश्‍युरन्‍स कंपनी यांचे खुलाशातील मजकुर ग्राहय धरणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
अशा परिस्थितीत तक्रारदारांचा विमाप्रस्‍ताव आवश्‍यक त्‍या कागदपत्राची परिपूर्तता करुन सामनेवाले नं.1 विमा कपंनीकडे सामनेवाले नं.2 यांनी पाठविलेला असल्‍याचे दिसून येते. सामनेवाले नं.2 यांनी सदर योजनेअंतर्गत शासनाने काढलेल्‍या परिपत्रकातील निर्देशानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्‍तावाबाबत कार्यवाही केले असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे सामनेवाले नं.2 यांचे सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट होत नाही, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
 त्‍याचप्रमाणे तक्रारदारांचे विमा प्रस्‍तावात कांही कागदपत्राची त्रुटी असल्‍याबाबत सामनेवाले नं.1 विमा कंपनीने नमुद केले आहे, परंतु याबाबत तक्रारदारांना अथवा कबाल इंश्‍युरन्‍स कंपनीला सदर त्रुटीबाबत कळविण्‍यात आल्‍या बाबत कोणताही पुरावा न्‍यायमंचात दाखल नाही.या कारणास्‍तव सामनेवाले नं.1 विमा कपंनीच्‍या कागदपत्राचे त्रुटी बाबतचा मजकूर ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्‍यायमंचाचे मत आहे.      तक्रारीत आलेल्‍या पूराव्‍यावरुन तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव सामनेवाले नं.1 विमा कंपनीकडे आवश्‍यक कागदपत्रासह ता.7.9.2009 रोजी पाठविण्‍यात आल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍याच प्रमाणे सामनेवाले विमा कंपनी तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव नाकारलेला नाही. तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांचे पतीचा मृत्‍यू वीज धकक्‍याने झाला आहे. त्‍याबाबत सामनेवाले नं.1 चा गंभीर असा कोणताही आक्षेप नाही. सदर मृत्‍यू हा अपघाती असल्‍याने तक्रारदार सदर योजनेअंतर्गत लाभ मिळण्‍यास पात्र असल्‍याचे दिसून येते. तक्रारदार हे सदर योजनेअंतर्गत लाभ मिळण्‍यास पात्र असुन सामनेवाले न.1 विमा कंपनीने तक्रारदारांचा विमाप्रस्‍तावा बाबत ता.7.9.2009 पासून आजपर्यन्‍त कुठल्‍याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही, त्‍यामुळे तक्रारदारांना विमालाभ रक्‍कम मुदतीत मिळूशकली नाही. सदरची योजना शेतक-यांरीता कल्‍याणकारी योजना शासनाने राबवलेली असल्‍यामुळे सामनेवाले नं.1 यांनी शासनाने सदर योजनेअंतर्गत काढलेल्‍या परिपत्रकातील निर्देशानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव प्राप्‍त झाल्‍यानंतर एकमहिन्‍याचे कालावधीत विमालाभ रक्‍कम अदा करणे बंधकानकारक असतानाही तक्रारदारांना विमालाभ रक्‍कमेपासुन वंचित रहावे लागले. सामनेवाले नं.1 विमा कंपनीची सदरची कृती सेवेत कसूरीची असल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते.
      सामनेवाले नं.1 विमा कंपनीची सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झाल्‍यामुळे तक्रारदारांना विमालाभ रक्‍कम रु.1,00,000/- सामनेवाले नं.1 विमा कंपनीने देणे उचित होईल, असे न्‍यायमंचाचे मत आहे. सदर रक्‍कम तक्रारदारांना मुदतीत न मिळाल्‍यामुळे निश्चितच मानसिकत्रासास तोंड द्यावे लागले आहे. त्‍यामुळे मानसिक त्रासाची रक्‍कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.2,000/- देणे उचित होईल, असे न्‍यायमंचाचे मत आहे.
सबब, न्‍यायमंच खालील आदेश देत आहे.
                           ।। आ दे श ।।
1.    तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.      
2.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना  त्‍यांचे मयत पती श्री.
पोपट बन्‍सी चितळे यांचे शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजनेअंतर्गत देय असलेली विमा लाभ रक्‍कम रु.1,00,000/- ( अक्षरी रक्‍कम रुपये एक लाख फक्‍त ) आदेश मिळाल्‍या पासून एक महिन्‍याचे आत अदा करावी.
3.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना वरील आदेशातील                           रक्‍कम वि‍हित मुदतीत अदा न केल्‍यास त्‍यावर तक्रार दाखल केलेल्‍या तारखेपासुन म्‍हणजेच ता.3.5.2010 पासुन द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज देण्‍यास सामनेवाले नं.1 जबाबदार राहतील.
3.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- ( अक्षरी रक्‍कम तीन हजार फक्‍त ) आदेश मिळाल्‍या पासून एक महिन्‍याचे आत अदा करावी.
4.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना सदर तक्रार खर्चापोटी  रक्‍कम रु.2,000/- ( अक्षरी रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त ) आदेश मिळाल्‍या पासून एक महिन्‍याचे आत अदा करावी.
5.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे  
तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
                              ( सौ.एम.एस.विश्‍वरुपे )     ( पी. बी. भट )
                                     सदस्‍या,               अध्‍यक्ष,
                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,बीड जि. बीड           
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ Sou. M. S. Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.