Maharashtra

Nanded

CC/09/33

Ramesh Ramkishanji Sarda - Complainant(s)

Versus

Shairkhan Limited.A-206,Mumbai. - Opp.Party(s)

Adv.Purshotum S.Bhakkad

25 Sep 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/33
1. Ramesh Ramkishanji Sarda R/o Lahoar Galli Tq.and Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Shairkhan Limited.A-206,Mumbai. 2nd Flower,S.B.Marge,Lower paral,Mumbai-13.NandedMaharastra2. Anjalli Sequritige Through,Mahash VadavaSthakrupa Market,NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 25 Sep 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र. 2009/33
                                                     प्रकरण दाखल दिनांक  28/01/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 25/09/2009.
                                                   
समक्ष         -    मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील           अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,          सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते,                 सदस्‍य.  
 
रमेश पि. रामकीशनजी सारडा
वय, 55 वर्षे, धंदा व्‍यापार
रा. लोहार गल्‍ली, नांदेड.                                   अर्जदार
विरुध्‍द
1.   शेरखान लि.
अ-206, फिनोलिक्‍स हाऊस,
दुसरा मजला, एस.बी.मार्ग,
लोहर परेळ (पश्चिम) मुंबई -400013.                 गैरअर्जदार
2.   अंजली सेक्‍यूरिटीज,
तर्फे महेश वाधवा,
संतकृपा मार्केट, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे.               - अड.पी.एस.भक्‍कड
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे      - अड.उमेश जी. मेगडे.
                            निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
               गैरअर्जदारांनी   सेवेत अनूचित प्रकार केला म्‍हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 शेरखान लि. हे नॅशनल स्‍टॉक एक्‍सचेंज इंडिया लि. यांचे मूख्‍य ब्रोकर आहेत व गैरअर्जदार क्र.2 हे त्‍यांचे सबब्रोकर आहेत. गैरअज्रदार क्र. 2 च्‍या मार्फत अर्जदार हे स्‍वतःसाठी शेअर घेत असत व विकत असते. गैरअर्जदाराचा ग्राहक आयडी नंबर 188942 असा होता. अर्जदाराने रिलायन्‍स इंडस्‍टी या कंपनीचे 300 शेअर्स गैरअर्जदार क्र.2 यांस दि.17.10.2007 रोजी सकाळी 9.56 व 1 सेकंद असताना शेअर्स विक्री करण्‍याचा अधिकार दिला होता. असे असताना त्‍यांची वेळेवर विक्री करणे गैरअर्जदारावर बंधनकारक आहे. कारण  त्‍यावेळेस शेअर्सचा भाव रु.2721/- असा होता. शेअर्स मार्केट दि.17.10.2007 रोजी 9.55 वाजता चालू होते व यानंतर शेअर्सचा निर्देशांक सेनसेक्‍सच्‍या अंदाजे 10 टक्‍के कमी झाला होता. त्‍यामूळे शेअर्स मार्केट बंद केले. परत त्‍यानंतर 9.55 ला सूरु झाले. गैरअर्जदाराने अर्जदारास Contract Note no.680370 Date 17.10.2007  रोजी दिला. यावरुन गैरअर्जदारांनी अर्जदाराचे शेअर्स 10.10.45 वाजता प्रति शेअर्स रु.2371/- प्रमाणे विक्री केले. वास्‍तविक पाहता 10.10.45 वाजता शेअर्स मार्केट बंद होते. त्‍यामूळे प्रती शेअर्स रु.2371/- प्रमाणे शेअर्स विक्री करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. गैरअर्जदारांनी शेअर्स मार्केट बंद केल्‍यानंतर विक्री करु शकत नाही. गैरअर्जदाराने खोटे कॉन्‍ट्रक्‍ट नोट नंबर 680370 तयार करुन 10.10.45 वाजता विक्री केल्‍याचे दाखविले आहे. त्‍यांच दिवशी 9.56.01 वाजता शेअरचा भाव रु.2721/- प्रमाणे धरल्‍यास 300 शेअर्सचे रु.8,16,000/- एवढी रक्‍कम त्‍यांना मिळावयास पाहिजे होती परंतु गैरअर्जदारांनी अर्जदाराचे शेअर्स 10.10.45 वाजता प्रति शेअर रु.2371/- प्रमाणे विक्री केल्‍याचे दाखवीले व अर्जदाराच्‍या खात्‍यामध्‍ये रु.7,11,300/- जमा केले. त्‍यामूळे अर्जदाराचे रु.1,05,000/- चे नूकसान झाले. यानंतर दि.17.10.2007 रोजी प्रत्‍यक्ष शेअर्सचाभाव रु.2880/- होता. अर्जदाराने गैरअर्जदारांना दि.10.12.2007 रोजी नोटीस दिली व वरील दराने रु.1,53,100/- चे नूकसान व त्‍यावर 21 टक्‍के प्रमाणे व्‍याजाची मागणी केली.त्‍यांला गैरअर्जदाराने दि.27.12.2007 रोजी वकिलामार्फत उत्‍तर पाठविले व अर्जदाराची मागणी अमान्‍य केली. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. प्रत्‍येक कॉन्‍ट्रक्‍टला अर्जदार हा गैरअर्जदार यांना 0.1 टक्‍के कमीशन देतात. त्‍यामूळे गैरअर्जदाराचे कर्तव्‍य आहे की, त्‍यांनी अर्जदारास चांगली सर्व्‍हीस दयावी. अर्जदाराचे प्रकरण हे अनूचित व्‍यापार पध्‍दतीचे आहे. अर्जदाराची मागणी आहे की, नूकसान भरपाई बददल रु.1,53,100/- व त्‍यावर 21 टक्‍के व्‍याज व मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ते एक स्‍टॉक शेअर्स ब्रोकर कंपनी आहे.  ते नॅशनल स्‍टॉक रजिस्‍ट्रर ब्रोकर आहेत. गैरअर्जदार हे Depository participant  असून ते सेबीकडे नोंदणी करतात. शेअर्स देणे घेणे ट्रान्‍सफर अशा प्रकारची सर्व्‍हीस ते त्‍यांचे ग्राहकाला देतात. ग्राहकाचा आयडी नंबर यासाठी त्‍यांना दिलेला असतो. त्‍यांचे सूचनेप्रमाणे शेअर्स खरेदी व विक्री करीत असतात. गैरअर्जदार क्र.1 हे S.S. Kantilal Ishwarlal /securities Pvt. Ltd. यांचेशी संबंधीत असून गैरअर्जदार क्र.2 हे त्‍यांचे फ्रान्‍चायजी नांदेड येथे कार्यरत आहेत. अर्जदार हे त्‍यांचे सदस्‍य आहेत व त्‍या दोघामध्‍ये करार केलेला आहे याप्रमाणे अर्जदाराने त्‍यांना सांगितलेले शेअर्स खरेदी व विक्री करण्‍याचे अधिकार दिलेले आहेत. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार यांला कोणताही आधार नाही. अर्जदारांना कोणतेही ट्रेडींग व ट्रान्‍जेक्‍शन करावयाचे असल्‍यास त्‍यांनी दिलेल्‍या सूचना द्वारेच व कागदपञाच्‍या आधारे हा व्‍यवहार होत असतो. यात अर्जदाराची तक्रार ही मूख्‍य वेळेवीषयीची आहे. ज्‍यावेळेस ऑर्डर दिली त्‍यावेळेस जो रेट होता त्‍या रेट प्रमाणे ऑर्डर घेतली आहे. कोणत्‍याही वेळेस ऑर्डर दिली व कोणत्‍याही वेळेस विक्री करु नका यांचा पूरावा त्‍यांने दिला पाहिजे. गैरअर्जदार हे अर्जदार यांचे सूचनेचे पालन करीत असतात. त्‍यामूळे जो काही व्‍यवहार झाला त्‍यांची जबाबदारी त्‍यांचेवर येत नाही. यात markets and speculative trade always involves a high risk factor, no assurance of return on investment is given by any company to any trader.  त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही मान्‍य करता येणार नाही. यात त्‍यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत. अर्जदाराची तक्रार ही मेन्‍टेनेबल नाही. कारण ही पैसे उकळण्‍याचे उददेशाने दाखल केलेली आहे. त्‍यावेळेस दोघातील करारनामा म्‍हणजे मेंबर क्‍लान्‍ट करारनामा यावर सही केली आहे. त्‍यावेळेस disclosure document were brought to the notice  असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे. ही सर्व सूचना अर्जदाराने वाचून समजून घेतल्‍या होत्‍या. यात गैरअर्जदाराचा आक्षेप आहे की, अर्जदार हे सी. पी. अक्‍ट 1986 प्रमाणे ग्राहक या व्‍याखेत बसत नाहीत. कारण त्‍यांनी जी वस्‍तू विकत घेतली किंवा हायर केली यास consideration  दिले पाहिजे  but hires any services for any commercial purpose. म्‍हणून ते ग्राहक कायदा 2(1)(ड) प्रमाणे ग्राहक होत नाहीत. अर्जदार यांनी 9.56.01 वाजता त्‍यांचे 300 शेअर्स रिलायन्‍स इंडस्‍ट्री ज्‍यांची व्‍हल्‍यू पर शेअर्स  रु.2721/-  होती हे पूराव्‍या‍नीशी  सिध्‍द केले पाहिजे. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार यांना मान्‍य नाही. Market was closed down by SEBI for an hour due to sudden 10% fall in the market.  ग्राहकाला यांची पूर्णतःकल्‍पना असते. या व्‍यवहारावीषयी व शेअर्सच्‍या रेटवीषयी ऑर्डर देताना पूर्ण कल्‍पना होती. त्‍यामूळे गैरअर्जदार यांना जी कॉन्‍ट्रक्‍ट नोट दिली त्‍यात टाकलेला वेळ हा कॉम्‍प्‍यूटर  जनरेटेड असल्‍यामूळे बरोबर आहे. त्‍यावेळेस रु.2721/- पर शेअर्स रेट होता.त्‍यांची किंमत रु.8,16,300/- होती हे गैरअर्जदार अमान्‍य करतात. गैरअर्जदार कंपनीने रु.7,11,300/- ला पर कॉन्‍ट्रक्‍ट नोट नंबर 680370 दि.17.10.2007 अर्जदार यांचे खात्‍यात जमा केलेले आहेत. समजा अर्जदार यांची तक्रार असती तर सतत हे ट्रान्‍जेक्‍शन बघत असेल व त्‍यांनी ताबडतोब गैरअर्जदार यांचेकडे येऊन तक्रार नोंदविण्‍यास पाहिजे होते परंतु अर्जदार हे विलंबाने गैरअर्जदार यांचेकडे दि.10.12.2007 रोजी आले. त्‍यामूळे हे सर्व कल्‍पना पैसे उकळण्‍यासाठीची आहे. यावर गैरअर्जदार हे रु.1,05,000/- देणे लागत नाहीत. गैरअर्जदार यांचेकडे जवळपास  1,00,000 त्‍यांचे सदस्‍य आहेत व अशा प्रकारचा फ्रांडचा व्‍यवहार त्‍यांचेकडून  होत नाही. विनाकारण अर्जदार हे गैरअर्जदार यांना बदनाम करीत आहेत. अर्जदार यांनी मार्केट बंद असतानाची दाखल केलेली आहे. त्‍यामूळे ही कॉन्‍ट्रक्‍ट नोट करेक्‍ट आहेत.  अर्जदाराची तक्रार खोटी आहे. सर्व Transaction were carried out as per the instructions of the complainant. The opposity parties further state that they had also replied the notice of the complainant dated 10.12.2007  ही अर्जदाराची सर्व तक्रार विचारानंतर केलेली आहे. अर्जदाराच्‍या मागणीप्रमाणे  रु.1,53,100/- या बददलचा स्‍पष्‍ट पूरावा त्‍यांनी दिलेला नाही. त्‍यामूळे त्‍यांचे मानसिक ञासाबददल रु.25,000/- ची मागणी ही खोटी आहे. क्‍लॉन्‍ट व कंपनीतील असलेला वाद यासाठी हे प्रकरण आरबिट्रेटर कडे रेफर करावयास पाहिजे होते असे अर्जदाराने केले नाही. या अर्थी गैरअर्जदार हे अर्जदाराचे काही देणे लागत नाहीत. त्‍यामूळे त्‍यांची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्‍हटले आहे.
 
                अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                   उत्‍तर
 
   1. अर्जदार गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय           होय
      2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार
      सिध्‍द करतात काय  ?                           नाही.
   3. काय आदेश ?                        अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                        कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे रिलायन्‍स इंड्रस्टिज (एफयूटी) कंपनीचे 300 शेअर्स घेतले होते. अर्जदार हे रिलायन्‍स इंड्रस्टिज यांचेकडून शेअरच्‍या पैशाची मागणी करीत नसून त्‍यांची तक्रार गैरअर्जदार क्र.1 जे नॅशनल स्‍टाक एक्‍सचेजचे ब्रोकर आहेत व गैरअर्जदार क्र.2 हे त्‍यांचे नांदेड येथील फ्रॅन्‍चायजी आहे. यांनी या कंपनीचे ट्रेडींग करण्‍यासाठी गैरअर्जदार यांचेकडून कमीशन घेतले आहे व त्‍यांनी दिलेल्‍या सूचनेप्रमाणे अर्जदाराने स्‍वतःसाठी खरेदी कलेल्‍या शेअरचे ट्रेंडीग त्‍यांनी करावयास हवे होते. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराच्‍या  सूचनेप्रमाणे न वागून स्‍वतःचे मर्जीने त्‍यांचे शेअरचे ट्रान्‍जेक्‍शन केले म्‍हणून त्‍यांनी सेवेतील अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला म्‍हणून ही तक्रार नोंदविली आहे. ज्‍याअर्थी ब्रोकर या नात्‍याने कमीशन घेतले आहे त्‍यामूळे त्‍यांनी अर्जदाराच्‍या मर्जीनुसार ट्रेडींग करणे आवश्‍यक होते. सीपीअक्‍ट 1986 कलम 2(1)(ड) याप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारास अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करुन सेवा दिल्‍यामूळे ही तक्रार या मंचात ग्राहक या नात्‍याने चालू शकते. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
 
मूददा क्र.2 व 3 ः-
              अर्जदाराची मूख्‍य तक्रार दि.17.10.2007रोजी सकाळी 9.55 वाजता नॅशनल स्‍टाक एक्‍सचेंज सूरु झाले व त्‍यावेळेस त्‍यांनी गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना त्‍यांचे रिलायन्‍स इंड्रस्‍टीजचे 300 शेअर्स विक्री करण्‍यासाठी 9.56.01 ने विक्रीची सूचना केली परंतु त्‍यांची तक्रार अशी आहे की, त्‍यांनी त्‍यावेळेस हे शेअर्स न विकता त्‍यांचे शेअर्स 10.10.45 वाजता विक्री केले. ऑर्डर दिली त्‍यावेळेस शेअर्सचा रेट रु.2721/- होता व ज्‍यावेळेस अर्जदाराचे शेअर्स ट्रेंडीग झाले त्‍यावेळेस प्रति शेअर्स रु.2371/- होता. म्‍हणजे गैरअर्जदाराने कमी भावाने शेअर्स विक्री केले. त्‍याअर्थी अर्जदाराचे 10 टक्‍के नूकसान झाले. गैरअर्जदाराने सेबी ने शेअर्स मार्केट बंद केल्‍यानंतर शेअर्स विकू शकत नाहीत. अर्जदाराने कॉन्‍ट्रक्‍ट नोट दाखल केलेली आहे त्‍यांचा नंबर 680370  दि.17.10.2007 रोजीचा आहे व या कॉन्‍ट्रक्‍ट नोट मध्‍ये 10.10.45 वाजता शेअर्स विक्री केल्‍याचे दाखवलेले आहे. ही कॉन्‍ट्रक्‍ट नोट गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेली आहे. यापोटी ब्रोकर म्‍हणून रु.711.30 सर्व्‍हीस टॅक्‍स रु.85.36 सह घेतलेले आहेत. व रु.7,11,300/- एवढी रक्‍कम मधून कमीशन वजा जाता रु.7,10,503.34 रक्‍कम अर्जदार यांचे खात्‍यात जमा केली आहे. नॅशनल स्‍टाक एक्‍सचेंज यांचे नियमाप्रमाणे तसेच ब्रोकरने घालून दिलेल्‍या अटीप्रमाणे  ट्रेडींग झाल्‍याचे नंतर  जर अर्जदाराची काही तक्रार असेल तर ती ताबडतोब गैरअर्जदाराकडे लेखी दिली पाहिजे व या प्रकरणात असे केलेले दिसते की गैरअर्जदाराने ताबडतोब या ट्रॅजेक्‍शनवीषयी तक्रार तर दिलीच नाही परंतु त्‍यांने जी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. ती देखील दि.10.12.2007 रोजीची आहे म्‍हणजे ट्रेडींग झाल्‍याचे नंतर दोन महिने सात दिवसांनी दिलेली आहे. येथे अर्जदार जेव्‍हा एक-एक मिनिटाचा हिशोब लावतात तेव्‍हा गैरअर्जदाराकडे तक्रार देण्‍यास दोन महिन्‍यापेक्षा जास्‍त दिवसांचा अवधी लागणे हे संयूक्‍तीक तर वाटत नाही परंतु  विचारानंतर नीर्णय केलेला दिसतो. दूसरी गोष्‍ट अर्जदार जेव्‍हा आपले नूकसान झाले म्‍हणतात ज्‍यावेळेस त्‍यांनी शेअर्स विक्री करण्‍यासाठी ऑर्डर दिली होती त्‍यावेळेस  त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे रु.2721/- एवढा रेट होता असे म्‍हटले आहे. त्‍यावेळेस तो रेट होता या बददलचा कोणताही पूरावा उपलब्‍ध नाही. गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे शेअर्स मार्केट हे अर्जदाराची ऑंर्डर घेतल्‍या बरोबर बंद झाले. नंतर ते 10.10.45 वाजता सूरु झाले. स्‍टाक एक्‍सचेंज बंद असल्‍याकारणाने ट्रेडींग होणे शक्‍य नव्‍हते जेव्‍हा परत स्‍टाक एक्‍सचेंज सूरु झाले त्‍या बरोबर ट्रेडींग होऊन रु.2371/- पर शेअर्स प्रमाणे हे शेअर्स विक्री केल्‍या गेले. शेअर्स मार्केटच बंद असल्‍याकारणाने शेअर्सचा रेट कमी झाला व अर्जदाराचे रु.1,05,000/- चे नूकसान झाले हे त्‍यांचे म्‍हणणे खोटे दिसते. अर्जदाराकडे शेअर्स मार्केट बंद असल्‍या बददल त्‍यांनी कबूल केलेले आहे परंतु ते परत 9.55.01 वाजता चालू झाले होते या बददल कोणताही पूरावा त्‍यांनी दिलेला नाही. कॉन्‍ट्रक्‍ट नोट दिल्‍याचेनंतर त्‍यावर ताबडतोब आक्षेपही घेतलेला नाही. स्‍टाक एक्‍सचेंज चे काम हे संगणकीय असून अडजेस्‍टमेंट किंवा हाताने चालत नाही. त्‍यावर एक एक मिनिटाचा हीशोब असतो व इंटरनेटवर हे ट्राजेक्‍शन चालू असते असे असताना गैरअर्जदार त्‍यामध्‍ये काही छेडछाड करतील व शेअर्सचा रेट बदलतील असे होणे शक्‍य नाही. अर्जदाराचे ट्रेडींग एक तास भर झाले नसते यावर अर्जदार यांचे वॉच असणे व एक तास जर ट्रेडींग उशिरा होत असेल तर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे  ताबडतोब ट्रेडींग न करण्‍यावीषयी ऑर्डर देणे आवश्‍यक होते परंतु अर्जदार हे ऑर्डर देऊन मोकळे झाले व ट्रेडींग वीषयी कोणतीही खबरदारी त्‍यांचेकडून घेतली गेली नाही. त्‍यामूळे त्‍यांचे सूचनेप्रमाणेच ट्रेडींग झाले असे म्‍हणावे लागेल. अर्जदार यांना सेबीकडे तक्रार करता आली असती परंतु त्‍यांनी ते ही केले नाही ? तसेच नॅशनल स्‍टाक एक्‍सचेंज मध्‍ये कोणाचीही तक्रार असेल तर अर्जदाराला अरबिट्रेटर मध्‍ये जाता आले असते परंतु ते अरबिट्रेटर मध्‍ये ही गेलेले
नाहीत ? अर्जदार हे काही तरी लपवित आहेत व ते स्‍वच्‍छ हेतूने मंचात आलेले नाहीत. गैरअर्जदारांनी यावीषयी सेनसेक्‍स बिजीनेस लाईन Sensex tumbles, triggers trading halt, recovers 1400 हा डाटा दाखल केलेला आहे. याप्रमाणे मार्केट in early trade to their circuit breaking thresholds, leading to temporary suspension of trading itself on Wednesday असे म्‍हटले आहे. तसेच Stock market players on Wednesday woke up to trade at 9.55 am, fully resigned to a day of declines.  Mumbai, Oct. 17.
 
But even they were taken by surprise when - even before the clock could strike 10 – the very ground moved from under their feet, and a landslide happened, triggering circuit breakers that suspended trading altogether for an hour on both NSE and BSE.
 
When the markets opened an hour later, they ground back their way upwards, the BSE closing at 1.76 per cent and the NSE 1.92 per cent below their previous close.
 
यांचा अर्थ 9.55 वाजता सूरु झाले व त्‍यावेळेस मार्केट खाली गेलेले होते. अशा परिस्थितीत एसएमएस किंवा इलेक्‍ट्रानिक मेडिया यावरुन यानंतरच्‍या सूचना अर्जदारानी गैरअर्जदार यांना दिल्‍या असे कूठेही आलेले नाही.
 
National Stock Exchange
Regulations F & O segment
3.4             Trade operations
Trading member shall ensure that appropriate confirms order on NEAT system.
3.4             order management.
3.5.1        Order type
3.5.2        Order attribute
3.5.3        Modifications & Cancellation
3.5.4        Order validation
 
5.1                  S. Arbitration
                            Panal.
 
यातील नियम नंबर 3.5.3 मॉडीफिकेशन अन्‍ड कॅन्‍सलेशन  या रुल प्रमाणे अर्जदारानी त्‍यांची ऑर्डर रदद ही केली नाही व मॉडीफाईड देखील केली नाही. रुल नंबर 5.1 याप्रमाणे ते अरबीट्रेटर पॅनल कडे त्‍यांचा वाद घेऊन गेलेले नाहीत. दोन महिने सात दिवसांनी कायदेशीर नोटीस पाठविली व सरळ या मंचात आलेले आहेत. ट्रेडींग झाल्‍या बरोबर ताबडतोब तक्रार न करणे त्‍यामूळे जे शेअर्सची ट्रेडींग झालेली आहे ती विक्री कन्‍फार्म झाली व त्‍यावीषयी अर्जदारांना काही आक्षेप नव्‍हता असा त्‍यांचा अर्थ घ्‍यावा लागेल. जे शेअर्स वीषयीचे रेट येथे दाखल केलेले आहेत ते दि.28.12.2007 रोजीचे आहेत व दूस-याच कंपनीचे आहेत. रिलायन्‍स फॅटो व रिलायन्‍स फयूट  यांचे दि.27.09.2007 चा म्‍हणजे ट्रेडींगच्‍या अगोदरचे रेट दाखवलेले आहेत. गैरअर्जदारांनी दि.27.12.2007 रोजी अर्जदाराच्‍या नोटीसीस उत्‍तर दिलेले असून त्‍यांनी सर्व आरोप अमान्‍य केले आहेत. नोटीसमध्‍ये शेअर्सचा रेट हा जास्‍तीचा होता यांला देखील नकार  दिलेला आहे. Merge Debtors Ledger  याप्रमाणे दि.17.10.2007 रोजी ट्राजेक्‍शन झाल्‍याचे दर्शवलेले आहे. एकंदर प्रकरणात खोलवर गेल्‍यानंतर हे स्‍पष्‍ट होते की, करारनामा व स्‍टाक एक्‍सचेंजच्‍या नियमाप्रमणे ट्रेडींगवीषयी अर्जदारातर्फे कोणतीही तक्रार केली गेली नाही व जी तक्रार केली ती फार उशिराने केलेली आहे तसेच ऑर्डर दिल्‍याचे नंतर परत ऑर्डर मॉडीफाईड करण्‍यासाठी अर्जदाराकडून कोणतीही सूचना दिल्‍या गेली नाही. ट्रेडींग वरती आक्षेपही घेतलेला नाही. त्‍यामूळै सदरची तक्रार ही उशिराने व विचाराअंती केली गेलेली आहे. यात त्‍यावेळेसचा रेट यांचा देखील सबळ पूरावा नाही. म्‍हणून केलेली कृती ही विचारात घेण्‍याजोगी नाही.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                        आदेश
 
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)     (श्रीमती सुजाता पाटणकर)   (श्री.सतीश सामते)
         अध्यक्ष.                                   सदस्‍या                      सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर
लघूलेखक