Maharashtra

Nagpur

CC/12/520

Ashok Bhaurao Khamankar - Complainant(s)

Versus

Shailesh R. Gajbhiye Prop Sakhi Developers - Opp.Party(s)

Adv. Linge

05 Jul 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/12/520
 
1. Ashok Bhaurao Khamankar
Q.12/c,T-4,S-5,Difennce Tah.Bhadravati
Chandrapur
...........Complainant(s)
Versus
1. Shailesh R. Gagbhiye,Prop.Sakhi Develop[ers
601-K,Bodakhe Nivas,Dhantol;i
Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:Adv. Linge, Advocate
For the Opp. Party:
ORDER

सौ. मंजुश्री खनके, सदस्‍या यांचे कथनांन्‍वये.

 

 

- आदेश -

 (पारित दिनांक – 05/07/2014)

 

1.                तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात असा की, तक्रारकर्त्‍याने परिवाराच्‍या भविष्‍यात राहण्‍याच्‍या दृष्‍टीने नागपूर येथे प्‍लॉट विकत घेण्‍याचे ठरविले. वि.प. हे प्रापर्टी खरेदी विक्रीचा व्‍यवसाय सखी डेव्‍हलपर्स यां नावाने करीत असल्‍याने, त्‍यांचेकडून मौजा-खडकी येथे सर्व्‍हे क्र. 41, ता.हिंगणा, प्‍लॉट क्र. 24, एकूण क्षेत्रफळ 1593.07 चौ.फु. हा रु.1,91,000/- मध्‍ये प्‍लॉट खरेदी करण्‍याचे निश्चित केले. त्‍यानुसार दि.02.05.2008 रोजी बयानापत्र स्‍टॅम्‍प पेपरवर लिहून करार पूर्ण करण्‍यात आला. त्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने अग्रीम रक्‍कम रु.60,500/- वि.प.ला दिले व उर्वरित रक्‍कम रु.1,30,500/- मुदतीत देण्‍याचे ठरले होते. त्‍यावेळी प्‍लॉटचे डायव्‍हरशन होणे बाकी होते. वि.प.ने करार करतांना विक्रीपूर्वी डायव्‍हरशन करण्‍याचे मंजूर केले व त्‍याबद्दलची लेखी सुचना तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे कबूल केले होते. तक्रारकर्त्‍याने दि.02.05.2008 च्‍या कराराप्रमाणे वेळोवेळी एकूण रु.1,28,500/- वि.प.ला दिलेले आहे व त्‍याबाबतच्‍या पावत्‍या अभिलेखावर दाखल आहेत.

 

                  परंतू वि.प.ने 11.03.2012 रोजी पत्र पाठवून, तक्रारकर्त्‍यास कळविले की, त्‍यांना प्‍लॉट क्र. 24 ऐवजी 20 लोकेशन बदलल्‍यामुळे देण्‍यात येत आहे. परंतू ही बाब तक्रारकर्त्‍यास अमान्‍य असल्‍याने आणि हा निर्णय वि.प.ने एकतर्फी घेतलेला असल्‍याने तक्रारकर्त्‍यास जबरदस्‍तीने प्‍लॉट क्र. 20 घेण्‍यास भाग पाडत असल्‍याने त्‍यांनी दि.30.03.2012 रोजी वकिलांमार्फत नोटीस पाठविली व प्‍लॉट क्र. 24 चीच विक्री करुन ताबा देण्‍याची विनंती केली. परंतू नोटीस वि.प.ने न स्विकारता परत पाठविला. तक्रारकर्त्‍याच्‍या मते वि.प.ने सेवेत त्रुटी केल्‍यामुळे, शेवटी तक्रारकर्त्‍याने मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन, प्‍लॉट क्र. 24 चे विक्रीपत्र करुन ताबा देण्‍याची मागणी केलेली आहे. तसेच शारिरीक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई व तक्रारीच्‍या खर्चाची मागणी केलेली आहे. आपल्‍या तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने बयानापत्र, रक्‍कम अदा केल्‍याच्‍या पावत्‍या, वि.प.ने पाठविलेले पत्र, कायदेशीर नोटीसची प्रत दाखल केलेली आहे.

 

2.                सदर तक्रारीची नोटीस वि.प.वर बजावली असता वि.प. नोटीस प्राप्त होऊनही मंचासमोर हजर न झाल्‍याने मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश दि.25.08.2013 रोजी पारित केला व प्रकरण युक्‍तीवादाकरीता नेमले. तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद मंचाने ऐकला. तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंचाचे विचारार्थ मुद्दे, निष्‍कर्ष व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे आहे.

 

मुद्दे                                                   निष्‍कर्ष

1) वि.प.चे सेवेतील त्रुटी व अनुचित व्‍यापार प्रथा दिसून येते काय                  होय.

 

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मागण्‍यास पात्र आहे काय       होय.

3) आदेश                                        तक्रार अंशतः मंजूर.

 

-कारणमिमांसा-

 

3.          मुद्दा क्र. 1 बाबत – वि.प. हे प्‍लॉटचे विक्री करणारे व विकासक आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍यांचेकडून प्‍लॉट विकत घेण्‍याचे ठरवून दि.02.05.2008 रोजी बयाना पत्रानुसार प्रस्‍तुत योजनेतील प्‍लॉट क्र. 24 रु.1,91,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरविल्‍याचे निदर्शनास येते आणि त्‍यानुसार वेळोवेळी वि.प.ला एकूण रक्‍कम रु.1,28,500/- दिल्‍याचे पावत्‍यांवरुन स्‍पष्‍ट होते. परंतू अचानकपणे दि.11.03.2012 रोजी वि.प.ने पत्र पाठवून तक्रारकर्त्‍याला आवंटीत केलेला प्‍लॉट क्र. 24 बदलवून प्‍लॉट क्र. 20 हा लोकेशन बदलल्‍या मुळे आवंटीत करण्‍यात येतो असे कळविले. वि.प.ची सदर कृती ही अनुचित व्‍यापार प्रथेत मोडते असे मंचाचे मत आहे. तसेच प्‍लॉट क्र. 24 देण्‍याचे कबूल करुन नंतर प्‍लॉट क्र. 20 देत असल्‍याबद्दल कळविले. तसेच त्‍याचे क्षेत्रफळही बदलविले आणि त्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास विश्‍वासात घेतले नाही व प्‍लॉट क्र. 20 जबरदस्‍तीने देत असल्‍याबद्दल कळविले. ही वि.प.ची सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. करीता तक्रारकर्ता प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये दाद मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.

 

4.    मुद्दा क्र. 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने सदर प्रकरणी प्‍लॉट क्र. 24 चे विक्रीपत्र व ताबा मिळण्‍याची मागणी केलेली आहे. प्रत्‍यक्षात जर वि.प.कडे सदर प्‍लॉट क्र. उपलब्‍ध आहे किंवा नाही याबाबत वि.प.ने कुठलेही दस्‍तऐवज मंचासमोर सादर केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रारकर्ता मागणीप्रमाणे निश्चितच दाद मागण्‍यास पात्र आहे. वि.प.च्‍या सदर कृतीमुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास झाल्‍याने, तो सदर त्रासाच्‍या नुकसान भरपाईदाखल रक्‍कम व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व दाखल दस्‍तऐवजांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

-आदेश-

 

1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)    वि.प.ने त्‍यांच्‍याकडे प्‍लॉट क्र. 24 उपलब्‍ध असल्‍यास, तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट क्र. 24      बाबत घेणे असलेली उर्वरित रक्‍कम घेऊन, त्‍याचे विक्रीपत्र व प्रत्‍यक्ष ताबा द्यावा.   विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

 

-किंवा-

 

      वि.प. जर प्‍लॉट क्र. 24 चे विक्रीपत्र करुन देण्‍यास असमर्थ असतील तर त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून प्‍लॉटच्‍या किंमतीबाबत घेतलेली रक्‍कम रु.1,28,500/- ही    दि.11.03.2012 म्‍हणजेच वि.प.ने प्‍लॉट क्र. 24 न देण्‍याबाबत पाठविलेल्‍या   पत्राच्‍या दिनांकापासून तर रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के    व्‍याजासह द्यावी.

3)    वि.प.ने तक्रारकर्त्‍याला शारिरीक व मानसिक नुकसान भरपाईदाखल रु.5,000/- व      तक्रारीच्‍या खर्चादाखल रु.3,000/- अदा करावे.

4)    सदर आदेशाची पूर्तता वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत करावी.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.