जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, भंडारा
ग्रा.सं.कायदा कलम 25 खालील दरखास्त प्र.क्रं-EA/17/19
(मूळ ग्राहक तक्रार क्रं-CC/13/49 )
श्री राजु वासुदेवराव राऊत +01 –विरुध्द– शैलेश श्रीराम जांभूळकर
नि.क्रं-1 वरील आदेश
(पारीत दिनांक- 23 ऑगस्ट, 2018)
श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष.
01. अर्जदारांनी ग्राहक संरक्षण कायद्दाचे कलम-25 खालील दरखास्त प्रकरण हे गैरअर्जदार शैलेश श्रीराम जांभूळकर, प्रोप्रायटर मे. शैल बोअरवेल याचे विरुध्द मंचाने मूळ ग्राहक तक्रार क्रं-सीसी/13/49 मध्ये दिनांक-15/12/2014 मध्ये पारीत केलेल्या मूळ निकालपत्रातील आदेशा प्रमाणे आदेशित रकमेच्या वसुलीसाठी दाखल केलेले आहे.
02. दरम्यानचे काळात मंचा समक्ष दरखास्त चालू असताना उभय पक्षकार आणि त्यांचे अधिवक्ता यांचे स्वाक्षरींसह दिनांक-23.08.2018 रोजीची संयुक्त पुरसिस मंचा समक्ष दाखल करुन त्यात असे नमुद करण्यात आले की, उभय पक्षांमध्ये आपसी समझोता हा रुपये-90,000/- (अक्षरी रुपये नव्वद हजार फक्त) (Full and Final Settlement) मध्ये झालेला असून त्यापैकी गैरअर्जदाराने अर्जदारांना नगदी रुपये-65,000/- दिलेले आहेत. तसेच गैरअर्जदाराने मा.राज्य ग्राहक आयोग, परिक्रमा खंडपिठ, नागपूर यांचे समोर अपिल दाखल करताना मा. राज्य ग्राहक आयोगाचे आदेशा नुसार मंचा मध्ये पावती क्रं-1437747, दिनांक-18.02.2015 अन्वये जमा केलेली रक्कम रुपये-25,000/- अर्जदारांना देण्या करीता गैरअर्जदाराने नाहरकत दिलेली आहे अशा आशयाची पुरसिस दाखल करुन पुढे नमुद केले की, उभय पक्षां मधीलां या 8.2018 आपसी समझोत्या नुसार गैरअर्जदाराने पुर्तता केलेली असल्याने अर्जदारांना कलम -25 खाली दरखास्त प्रकरण पुढे चालवावयाचे नसल्याचे नमुद केले. उभय पक्षांचे संयुक्त पुरसिस वरुन आपसी समझोता झालेला असल्याने व पुर्तता होत असल्याने दरखास्त प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. आदेशाची नोंद उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी घ्यावी.