निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 17/10/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 18/10/2011
तक्रार निकाल दिनांकः- 04/05/2013
कालावधी 01वर्ष 06 महिना 16 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नागनाथ पिता गंगाधर भुमर, अर्जदार
वय 33 वर्षे. धंदा.मजुरी अड.आवटे.जे.एस.
रा.शिवराम नगर,परभणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 शैलेश पिता जयकिशोर दोडीया गैरअर्जदार.
वय 30 वर्षे.धंदा. नोकरी. अड.जी.एच.दोडीया.
रा.इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कं.,
रिलेशनशिप एक्झीकेटिव्ह,दुकान नं.33,
स्टेडीयम कॉम्प्लेक्स,परभणी ता.जि.परभणी.
2 व्यवस्थापक, अड.ए.जी.व्यास.
इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कं.लि.
पहिला मजला,इमानी बिल्डींग,लातुर साडी सेन्टरच्या वर,
जुनी कपडा गल्ली,लातूर ता.जि.लातूर.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार अपघातग्रस्त आटोचा विमा दावा नुकसान भरपाई नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दल गैरअर्जदार विमा कंपनी यांच्या विरुध्द आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार हा Auto No.MH-22/U-0340 चा मालक आहे. त्याने हा आटो स्वतःच्या खाजगी वापरासाठी विकत घेतला होता सदर आटोचा विमा हा गैरअर्जदार यांच्याकडे उतरवला होता दिनांक 26/05/2010 रोजी सदरील आटो चा अपघात झाला त्याची माहिती कंपनीचे एजंट शैलेश दोडीया यांना दिली होती व त्याच्या म्हणणे प्रमाणे आटो नांदेडला नेवुन दुरुस्तीस टाकला. तत्पुर्वी अर्जदाराने अपघाताच्या फोटो काढून ठेवले गैरअर्जदार यांचे श्री तोतला यांनी आटोची शहानिशा केली व फोटो काढले नंतर दुरुस्ती चालू केली.दुरुस्तीसाठी 23,075/- रुपये खर्च आला अर्जदाराने विमा दावा गैरअर्जदार यांच्याकडे दाखल केला असता आटोचा रंग काळा पिवळा केलेला होता म्हणजेच तो प्रायव्हेट वापरण्यासाठीचा नव्हता तर भाडयाने वापरण्याचा आटोचा होता व Breach of Terms & Condition of Policy म्हणून विमा दावा नाकारला.
अर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केले आहे व तसेच आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 5 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीस पाठवल्यानंतर त्याचा जबाब आला नाही, म्हणून त्याचे विरुध्द एकतर्फा केस चालवण्याचा आदेश झाला.
नंतर गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्ज दिल्यावर व तो मंजूर झाल्यावर त्याचे म्हणणे दाखल केले आहे. जे की, नि.क्रमांक 15 वर आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा उतरवला होता हे बरोबर आहे, पण त्याचे म्हणणे आहे की, विमा “ Private Car Package Policy ” प्रमाणे काढली होती. सदरील Auto या R.T.O. Registration हा प्रायव्हेट Use चा आहे व म्हणून Auto ला पांढरा रंग दिलेला होता.आणि जेव्हा Accident झाला तेव्हा Auto चा रंग काळा पिवळा म्हणजेच भाडयाने चालवण्याचा आटोचा रंग होता म्हणून Policy Terms & Condition चे Breach करुन गाडी खाजगी ऐवजी भाडयासाठी वापरली व म्हणून अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी असे म्हंटले आहे की, इतर कोठल्याही मुद्या बाबत वाद नाही गैरअर्जदाराने आपले शपथपत्र नि.क्रमांक 16 वर दाखल केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 याने नि.क्रमांक 20 वर सबब पुर्शिस दिली आहे की, गैरअर्जदार कमांक 2 यांनी दाखल केलेला लेखी जबाब हा गैरअर्जदार क्रमांक 1 याचाही तोच समजण्यात यावा, अर्जदाराने सर्व्हेअर कडून सदरील आटोचा सर्व्हे केला होता त्या सर्व्हेअरचे शपथपत्र नि.क्रमांक 16 वर आहे व त्याप्रमाणे आटो रिपेअरचा खर्च 13,000/- रुपये आहे गैरअर्जदाराने आपल्या म्हणनेचे पुष्टयर्थ नि.क्रमांक 18 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्र दाखल केली आहेंत.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
गैरअर्जदार व अर्जदार यांत वादाचा मुद्दा फक्त गाडीचा खाजगी वापर अथवा भाडयासाठी झालेला वापर एवढाच मर्यादित आहे.इतर कोठल्याही मुद्यावर फारसा वाद नाही.
अर्जदाराचे म्हणणे असे आहे की, त्याने सदर अटोचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केलेला नाही.सदर अटोचा रंग हा कंपनीतून विकत घेतानाच काळा, पिवळा होता व नंतर R.T.O. Registration च्या वेळी त्याला पांढरा रंग देण्यांत आला व ते कालांतराने निघुन गेले व परत काळा पिवळा रंग दिसत होता, व तसेच Accident झाल्यानंतर दुरुस्तीच्या वेळी त्याने अटोला काळा पिवळा ( म्हणजेच प्रवासी वाहतुकी साठीचा ) रंग दिला. अर्जदाराचे सदरचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही कारण जेंव्हा Accident झाला होता त्यावेळी अर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे अटोचे Photo काढले होते आणि त्यांत अटोचा कलर काळा पिवळा होता.सदरचे अर्जदाराचे म्हणणे नि.क्रमांक 5/5 वर दाखल केलेल्या निवेदनांत आलेले आहे.ह्या वरुन असे सिध्द होते की, अटोचा रंग Accident झाला तेव्हा काळा पिवळाच होता व म्हणजेच तो प्रवासी वाहतुकीसाठी वापरला होता.तसेच गैरअर्जदाराने नि.क्रमांक 22 वर दाखल केलेल्या यादी नुसार फोटो वरुन हे सिध्द होते की, सदरचा अटोचा वापर काळा पिवळा रंग देवुन प्रवासी वाहतुकीसाठी वापरला होता.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने अटोचा विमा प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी अंतर्गत घेतले होते त्याचा पुरावा म्हणून नि.क्रमांक 18/1 वर Policy ची प्रत दाखल केलेली आहे.ज्यावर Private Car Certificate of Insurance Cum Schedule असे स्पष्ट लिहिलेले आहे. या वरुन हे सिध्द होते की, सदरची विमा पॉलिसी ही खाजगी वाहन वापरा करीताच होती व त्या पॉलिसीच्या Terms & Condition मधील Limitation is to use या Clause मध्ये hire & reward साठी वापरु नये असा स्पष्ट उल्लेख आहे.
यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने पॉलिसीत दिलेल्या अटीचे उल्लंघन करुन खाजगी वापरावयाच्या अटोचा वापर हा प्रवासी वाहतुकीसाठी केला जे की, मंचास बेकायदेशिर वाटते. अर्जदार त्याची तक्रार अर्ज सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे.
म्हणून वरील मुद्याचे नकारार्थी उत्तर देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात येते.
2 दाव्याचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष