5. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व वि.प. यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व वि. पक्षांच्या तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हा वि.पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय 2. वि.पक्षांनी तक्रारकर्त्यास सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? होय 3. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 व 2 बाबत :- 6. तक्रारकर्त्याने वि.प. पतसंस्थेत दैनीक आवर्ती बचत ठेव खाते क्र.2810 मध्ये दिनांक 1/5/2014 पासून दिनांक 31/10/2014 पर्यंत व दुसरे खाते क्र.2810 मध्ये दिनांक 1/11/2014 पासून दिनांक 31/12/2015 पर्यंत आणी तिसरे खाते क्र.3280 मध्ये दिनांक 1/1/2015 पासून दिनांक 7/1/2016 पर्यंत अशा रकमा जमा केल्याचे निदर्शनांस येते. यासंदर्भात तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वर दैनीक बचत खाते पुस्तीका अ-1 ते अ-3 वर दाखल केली आहे. यावरून तक्रारकर्ता विरूध्दपक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. 7. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की, तक्रारकर्त्याने वि.प. पतसंस्थेत दैनीक आवर्ती बचत ठेव खाते अनुक्रमे क्र.2810 मध्ये दिनांक 1/5/2014 पासून दिनांक 31/10/2014 पर्यंत व दुसरे नवीन खाते क्र.2810 मध्ये दिनांक 1/11/2014 पासून दिनांक 31/12/2015 पर्यंत आणी तिसरे खाते क्र.3280 मध्ये दिनांक 1/1/2015 पासून दिनांक 7/1/2016 पर्यंत अशा रकमा जमा केल्याचे निदर्शनांस येते. यावरून तक्रारकर्त्याने खात्यांमध्ये रकमेचा भरणा केला व वि.पक्षांकडे सदर रकमा जमा आहेत हे तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.अ-1 ते अ-3 बचत ठेव खाते पुस्तीकेवरून सिध्द होते. 8. तक्रारकर्त्याने खाते क्र.क्र.2810 मध्ये दिनांक 1/5/2014 पासून दिनांक 31/10/2014 पर्यंत या सहा महिन्यापर्यंतच रकमेचा भरणा केला असून उर्वरीत उपरोक्त दोन खात्यांमध्ये 12 महिन्यांच्या मुदतीपर्यंत रकमेचा भरणा केला आहे. उपरोक्त रकमेची परिपक्वता तिथी ही 12 महिन्यांची होती, व परिपक्वता तिथीला वि.प. हे तक्रारकर्त्याला रक्कम देणे लागतात. परंतु तक्रारकर्त्याने उपरोक्त खात्यातील रकमेची मुदतीनंतर मागणी करूनही वि.प.ने सदर रक्कम परत न करून तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दर्शविली आहे हे दस्तावेजांवरून सिध्द होते. 9. वि.प. संस्थेच्या बचत खाते पुस्तीकेमध्ये श्री. दत्तु येलुरवार यांचे नांव अभिकर्ता म्हणून नमूद आहे व त्या खातेपुस्तीकेवर वि.प.च्या व्यवस्थापकांनीदेखील स्वाक्षरी केलेली आहे. तसेच वि.प.क्र.2 यांनी नि.क्र.21 वर दाखल दस्त क्र.2 ठरावाच्या प्रतीमध्ये दत्तु येल्लूरवार अभिकर्ता असे नमूद आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर रकमा वि प. यांचे अभिकर्ता श्री. दत्तु येलुरवार यांचेमार्फत संस्थेकडे जमा केल्या हे तक्रारकर्त्याचे कथन ग्राहय धरण्यायोग्य आहे. 10. तक्रारकर्त्याने वि.प.कडे दिनांक 1/5/2014, 1/11/2014 व 1/1/2015 या कालावधीमध्ये खातेपुस्तीकेनुसार उपरोक्त खात्यांमध्ये रकमेचा भरणा केला व त्यावेळी वि.प.क्र.1 व 2 हे संस्थेचे अध्यक्ष होते व त्यामुळे ते संस्थेच्या सदर व्यवहाराकरीता जबाबदार ठरतात. 11. मात्र उपरोक्त खात्यांच्या दाखल पुस्तीकेतील नियम व अटी क्र.3 व 8 मध्ये उपरोक्त खात्याची मुदत 12 महिने असताना तक्रारकर्त्याने खाते क्र.2810 मध्ये केवळ 6 महिन्यापर्यंत रक्कम जमा केल्याने तक्रारकर्ता हा वि.प.च्या दैनीक बचत ठेव खातेपुस्तीकेतील नियम व अटींनुसार केवळ मुद्दल बिनव्याजी परत मिळण्यांस पात्र आहे परंतु उर्वरीत 2 खात्यांमध्ये तक्रारकर्त्याने 12 महिन्यांपर्यंत रक्कम भरल्याने त्यावर ते नियमानुसार 5 टक्के व्याज मिळण्यांस तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- 12. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश |