जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्र. 165/2008. प्रकरण दाखल तारीख. – 02/05/2008. प्रकरण निकाल तारीख. – 23/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) श्रीमती सुजाता पाटणकर, - सदस्या पोतन्ना लिंगन्ना दगलेवाड (धनगर) अर्जदार. वय, 76 वर्षे, धंदा शेती रा. वेताळा ता. धर्माबाद जि.नांदेड. विरुध्द. 1. सेवा सहकारी सोसायटी गैरअर्जदार शाखा वेताळा ता. बिलोली जि. नांदेड. 2. सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय, बिलोली ता. बिलोली जि. नांदेड. 3. मा. जिल्हा निबंधक सहकारी संस्था कार्यालय, नांदेड. ता. जि. नांदेड अर्जदारा तर्फे वकील – अड.के.जे.कवटीकवार गैरअर्जदार क्र.1 तर्फे - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - स्वतः निकालपत्र (द्वारा - मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष (प्र ) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. गैरअर्जदार क्र.1 हे सेवा सहकारी सोसायटी असून त्यांच्याकडे अधिकृत भागभांडवल रु.75,000/- व त्या भागात विभागलेले रु.10/- प्रमाणे रक्कम अर्जदार यांने गैरअर्जदार क्र.1 यांना देऊन भागभांडवल घेतले होते. अर्जदार हे आज वयोवृध्द झाले आहेत. व त्यांच्या आवश्यक बाबी पूर्ण होण्याकरिता ही रक्कम त्यांना वापस हवी आहे. त्यामुळे अर्जदाराची मागणी आहे की, अधिकृत भागभांडवल रु.75,000/- व त्याभागात रु.10/- प्रमाणे रक्कम गैरअर्जदाराकडून देण्याचे आदेश व्हावेत तसेच मानसिक ञासाबददल रु.3,000/- व खर्चापोटी रु.1,000/- हे त्यांना मिळावेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरशीस देऊन गैरअर्जदार क्र.2 यांचे जे लेखी म्हणणे आहे तेच त्यांचेही म्हणणे गृहीत धरावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी संयूक्तीकरित्या आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2हा गैरअर्जदार क्र.1 या सहकारी सस्थेचा निबंधक तथा नोंदणी अधिकारी आहे. गैरअर्जदार क्र.1 हे प्राथमिक कर्ज पूरवठा सहकारी संस्था असून या संस्थेने दि.13.12.1963 पासून भागधारक सभासद केलेले आहेत. संस्थेचा उपलब्ध अभिलेखाप्रमाणे अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 संस्थेचे रु.2200/- या दर्शनिय किंमतीचे भागधारण केलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 या संस्थेचे अधिकृत भागभांडवर रु.75,000/- आहे असे संस्थेने वितरीत केलेल्या छापील भाग प्रमाणपञावर नमूद केलेले आहे. यामूळे भाग प्रमाणपञावर नमूद केलेले रु.75,000/- ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 सहकारी संस्थेच्या संपूर्ण 282 सभासदाकडून एकञितरित्या उभारली जाऊन शकणारी महत्तम रक्कम मर्यादा आहे. गैरअर्जदार क्र.1 या संस्थेने 282 सभासदाद्वारे रु.2,69,278/- भागभांडवल गोळा केलेले आहे व त्यापैकी अर्जदार यांचे फक्त रु.2200/- दर्शनीय किंमतीचे भाग आहेत.अर्जदार यांनी फक्त भागामध्ये गुंतवलेली रक्कम परत देण्याची मागणी न करता चूकीची मागणी केलेली आहे. सहकारी संस्थेने भाग परत करण्याची किंवा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे नियम 23 व 24 अन्वये पूर्ण केली जाते. सद्य परिस्थितीत संस्थेचा तोटा रु.11,09,695/- आहे. त्यामुळे उक्त संस्थेच्या भागाचे मूल्य काही असले तरी उक्त मूल्य उणे आहे. त्यामुळे अर्जदार यांच्या सहकारी संस्थेच्या कोणत्याही सभासदास भागाची रक्कम परत मिळणे सद्य स्थितीत शक्य नाही. त्यामुळे अर्जदार यांची तक्रार ही नियमबाहय असून फेटाळणी जाण्यास पाञ आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. तसेच दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन व केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार या प्रकरणात ग्राहक आहे काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात काहीशी संभ्रमात टाकणारी तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी भागभांडवल रु.75,000/- व त्या भागातील वीभागलेले म्हणजे थोडक्यात रु.75,000/- वापस मिळावेत अशी मागणी केली आहे, जे की चूक आहे. अर्जदार यांचे शेअर्स प्रमाणपञ पाहिले असता त्यांनी गैरअर्जदार क्र.1 या संस्थेने नंबर 1456 ते 1470 पर्यतचे भाग दिलेले आहेत. म्हणजे एकूण 15 शेअर्स ज्यांची किंमत रु.150/- होते. एवढीच रक्कम त्यांची जमा आहे. म्हणजे अर्जदार यांनी सन 1969 रोजी रु.150/- चे 15 शेअर्स घेतले आहेत. भाग यांचा अथ अर्जदार हे या संस्थेचे भागधारक मालक आहेत, ग्राहक नाहीत व गुंतवलेले भाग त्यांना मागायचे असेल तर नियमाप्रमाणे त्यांना सहकारी न्यायालयात दाद मागावी लागेल, हे ग्राहक न्यायालय आहे. येथे जे ग्राहक होतात त्यांनाच सेवेच्या ञूटीबददल किंवा अनूचित व्यापार पध्दती बददल रक्कम मागता येईल. म्हणून या प्रकरणात अर्जदार हे ग्राहक होणार नाहीत. शिवाय गैरअर्जदार क्र.1 ही संस्था तोटयात असल्या कारणाने अर्जदार यांची गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्यप्रमाणे जे रु.2200/- त्यांच्याकडे जमा आहेत त्या देखील भागाची किंमत संस्थेने तोटयात असल्या कारणने शून्य झाली आहे म्हणून त्या भागाची रक्कम ते वापस करु शकत नाही. वरील सर्व बाबीवरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. खर्चाबददल आदेश नाही. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती सुजाता पाटणकर ) ( श्री.सतीश सामते ) सदस्या अध्यक्ष (प्र.) जे.यू.पारवेकर लघूलेखक |