Maharashtra

Nanded

CC/10/234

Gayabai Vithalrao Suryawanshi - Complainant(s)

Versus

Seva Sahakari Society Ltd - Opp.Party(s)

A.N.Chauhan

11 Feb 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/234
1. Gayabai Vithalrao SuryawanshiHaradhaf Tq.Hadgoan NandedMaharahstra ...........Appellant(s)

Versus.
1. Seva Sahakari Society LtdHardaf Tq.Handgaon NandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 11 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/234,
                          प्रकरण दाखल तारीख - 23/09/2010
                          प्रकरण निकाल तारीख 11/02/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
        मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
 
प्रकरण क्र.234/2010
सौ.गयाबाई भ्र.विठठलराव सूर्यवंशी
वय 50 वर्षे, धंदा घरकाम/शेती                                          अर्जदार         
 रा.हरडफ ता.हदगांव जि. नांदेड.    
     विरुध्‍द.
1.     सेवा सहकारी सोसायटी लि. हरडफ
      ता.हदगांव जि. नांदेड
2.    नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि.
      शाखा हदगांव ता.हदगांव जि. नांदेड
      मार्फत शाखाधिकारी/तपासणीक अधिकारी               गैरअर्जदार
3.    महाराष्‍ट्र शासन मार्फत
      तालुका सहायक निबंधक, स.स.हदगांव.   
 
अर्जदारा तर्फे वकील            - अड.ए.एन.चौहाण
गैरअर्जदार क्र.1   तर्फे           -  स्‍वतः
गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील       - अड.एस.डी.भोसले
गैरअर्जदार क्र.3 तर्फे             - स्‍वतः
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्‍या )
 
                गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून  अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
           थोडक्‍यात  अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदाराने घेतलेले सेवा सहकारी सोसायटी लि. हरडफ ता.हदगांव यांचेकडून पिक कर्ज घेतलेले आहे. त्‍यामूळे अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे. अर्जदाराने सेवा सहकारी सोसायटी मार्फत घेतलेले कर्जाची परतफेड गैरअर्जदार क्र.2 बँकेला रु.33,000/- रोख भरणा केलेला आहे व तसेच बेबाकी प्रमाणपञ देखील गैरअर्जदार क्र.1 कडून घेतलेले आहे. सर्व अर्जदार यांची भरणा केलेली रक्‍कम वेगवेगळी आहे. मध्‍यंतरी शासनाने कर्ज माफी पूर्वीचे थकबाकीदारास व चालू बाकीदारास जाहीर केली. अर्जदाराने रोखीने बँकेत भरलेल्‍या कर्जाचा संस्‍थेतील अर्जदाराचे खाती जमा न करता कर्ज बाकी जैसे थी दाखवून कर्ज माफी योजनेत रु.37,676/- शासनाकडून प्राप्‍त करुन घेतली ? (अशी कर्ज माफी योजनेची प्रत्‍येक अर्जदाराची रक्‍कम वेगवेगळी आहे) व ज्‍यांच्‍या जमा खर्च झालेला नाही व त्‍यांनी रोखीने भरणा केला त्‍या रक्‍कमा काही सभासदांना परत केल्‍या आहेत हे संस्‍थेचे व बँकेचे रेकॉर्ड पाहिल्‍यास लक्षात
 
 
येईल. त्‍यामूळे अर्जदारांची मागणी आहे की, कर्ज मार्फीपूर्वी रोखीने कर्ज भरणा केलेला जमाखर्च न केल्‍यामूळे कर्ज माफी पोटी पूर्ण रक्‍कम प्राप्‍त झालेली त्‍यामधून जमाखर्च न केलेल्‍या रोखीने कर्ज भरलेल्‍या रक्‍कमा व्‍याजासह परत कराव्‍यात असे म्‍हटले आहे.
                  गैरअर्जदार क्र.1 हे स्‍वतः हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारांनी पिक कर्ज संस्‍थेकडून दि.20.05.2000 रोजी घेतलेले आहे  व कर्जाची काही रक्‍कम व व्‍याज भरलेले आहे. काही बाकी आहे. तसेच संस्‍थेचे माजी (मयत) सचिव सिंगणवाड यांनी सदर सभासदांचे कर्ज ,खात्‍यावर जमा खर्च केला नसल्‍यामुळे सदर सभासदास जून 2008 मध्‍ये केंद्र शासनाची चूकीची कर्जमाफी झाली. सदर सभासदाचे कर्ज वसूलीची व कर्ज माफीची रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 यांनी संस्‍थेचे कर्ज व व्‍याज खाती टाकली. तसेच सभासदाचा कर्ज भरणा दि.1.4.2007 ते 29.2.2008 या पूर्वीचा असलयामूळे महाराष्‍ट्र शासन कर्ज माफी योजना 2009 माफी नसल्‍यामूळे सभासदाची संस्‍थेत वा सहकारी बँकेत अनामत जमा झाली नाही ? चूकीचे कर्जमाफीची रक्‍कम शासनास परत करणेसाठी दि.17.2.2010 रोजी संस्‍थेने बँकेस कळविले आहे व संस्‍थेत जमा खर्च केला आहे. त्‍यामूळे सभासदांची रक्‍कम परत करता येत नाही ? त्‍यामूळे सदर सभासदांची कर्ज माफीची रक्‍कम अनामत खाती जमा नसल्‍यामूळे परत करता येत नसल्‍याचे कळविले आहे. असे करुन गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्‍हणून अर्जदाराची तक्रार फेटाळावी असे म्‍हटले आहे.
                  गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार हा सोसायटीचा सभासद असल्‍यामूळे तो ग्राहक या व्‍याखेत बसत नाही. सदरची तक्रार ही या मंचात चालू शकत नाही ती तक्रार ही सहकारी न्‍यायालयात चालवावी असा आक्षेप घेतला आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी सभासदाच्‍या कर्ज व वसूलीची व कर्ज माफीची रक्‍कम ही गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडे कर्ज व व्‍याजखाती घेतली आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.2 शी अर्जदाराचा काहीही संबंध नाही. त्‍यामूळे सदर तक्रार ही फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. अर्जदारयांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे मार्फत कर्जाची रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 कडे भरणा केलेली आहे त्‍या बाबत गैरअर्जदार क्र.2 यांनी पावती सूध्‍दा दिलेली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी नोंद घेतली नाही हे म्‍हणणे चूकीचे आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या चूकीमूळे अर्जदाराच्‍या खाती चूकीची रक्‍कम जमा झाली ?  तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी ती रक्‍कम स्‍वतःकडे न ठेवता कर्ज माफीची व कर्ज वसूलीची रक्‍कम गैरअर्जदार क्र.1 कडे वर्ग केली ?  बेबाकी प्रमाणपञ दिले हे म्‍हणणे बरोबर आहे व काही माहीती खोटी आहे ? शासनाकडून प्राप्‍त झालेली रक्‍कम काही सभासदांना परत केली हे म्‍हणणे खोटे आहे. अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांचा काहीही संबंध नसल्‍यामूळे रक्‍कम देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. कायदेशीर परिस्थिती व कार्यक्षेञ पाहून अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्‍द खर्चासहीत नामंजूर करावी असे म्‍हटले आहे.
                  गैरअर्जदार क्र.3 हे स्‍वतः हजर झाले व आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांना कर्ज देण्‍यात आले व त्‍यांनी काही रक्‍कम कर्जापोटी भरणा केली हे मान्‍य आहे. गैरअर्जदार क्र.1 या संस्‍थेचे सचिव शिंगणवाड यांनी अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यावर वसूलीची रक्‍कम जमा खर्च केला नसल्‍यामूळे अर्जदारास जून 2006 मध्‍ये केंद्र शासनाची चूकीची कर्ज माफी झाली होती ? परंतु अर्जदाराच्‍या केंद्र शासनाच्‍या रक्‍कम
 
 
माफी धोरणापूर्वीच वसूली झालेली असल्‍याने ते कर्ज माफीस पाञ झाले नाहीत. अर्जदार यांनी केंद्र शासन व महाराष्‍ट्र शासन यांनी कर्ज माफी धोरण जाहीर करण्‍यापूर्वीच रक्‍कमेचा भरणा केलेला असल्‍यामूळे ते कर्ज माफीस पाञ होऊ शकत नाही. म्‍हणून अर्जदाराचा दावा फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
                 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात.
            मूददे                                                                                     उत्‍तर
1.     अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ?                         होय          
2.    अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्‍यास
      गैरअर्जदार बांधील आहेत काय ?                                                     होय.                                 
3.    काय आदेश ?                                                             अंतिम आदेशाप्रमाणे 
                        कारणे
मूददा क्र.1 व 2 ः-
                  अर्जदार ही शेतकरी असून तिने सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ ता.हदगांव या संस्‍थेकडून पिक कर्ज घेतले होते. त्‍यामूळे जिल्‍हा बँक शाखा हदगांव  यांचेकडे तिचे खाते असल्‍यामुळे ती गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे ग्राहक आहे म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात आले.
                  अर्जदार ही व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांनी शेतक-यासाठी पिक कर्ज घेतले होते. सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ या संस्‍थेकडून तिने कर्ज घेतले होते. त्‍यांची परतफेड नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक शाखा हदगांव येथे रु.33,000/- रोख भरणा केलेला आहे. त्‍याबददल अर्जदार हिने बँकेत भरलेल्‍या चलनाची काऊटंर स्‍लीप दाखल केलेली आहे. दि.5.3.2006 रोजी रु.5,000/- व दि.23.3.2006 रोजी रु.28,000/- अर्जदार हिने नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक शाखा हदगांव यांचेकडे भरलेले आहेत असे स्‍पष्‍ट होते. या संस्‍थेने अर्जदार हिला बेबाकी प्रमाणपञ देखील दिलेले आहे. शासनाचे कर्ज माफी धोरणामध्‍ये अर्जदार हिला कर्ज माफी रु.37,676/- मंजूर होऊन शासनाकडून ती भरण्‍यात आली ? अर्जदार हिने भरलेले रु.33,000/- ची नोंद सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ त्‍यांचे हीशोबात दाखवलेले नाही व त्‍यामूळे ती थकबाकीदार असे दाखवल्‍या गेली व त्‍यामूळे ती कर्ज माफी झाली तरी तिला कर्ज माफी नव्‍हती अशा प्रकारचे म्‍हणणे गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहे. एकतर अर्जदाराकडूनही सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ पैसे भरुन घेतले व दूसरीकडे शासनाकडून कर्ज माफीचे पैसेही मिळाले ? असेही लिहीतात की, ते हरडफ ता. हदगांव जि. नांदेड येथील रहवासी असून त्‍यांचे खाते सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ या संस्‍थेशी संलग्‍न असणा-या नांदेड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंक शाखा हदगांवची खातेदार असून त्‍यांनी सोसायटीकडून घेतलेले पिक कर्ज व्‍याजासहीत तारखेच्‍या अगोदर बँकेत निरंक केले अशा प्रकारचे कर्ज माफी पञ बॅकेने दिले. हे पञ बँकेने देण्‍यापूर्वी अर्जदाराने संपूर्ण रक्‍कम याआधीच भरलेली होती. अर्जदार थकबाकीदार नव्‍हते मग अशा परिस्थितीत बँकेने कर्ज माफीचे पञ देण्‍याचा प्रश्‍न येतो कूठे ?  आणि जर बँकेने अशा प्रकारचे पञ देऊन कर्ज माफ केले तर यापूर्वी अर्जदाराने भरलेली रक्‍कम रु.33,000/- कूठे गायब झाले ? या सर्व प्रकारात सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ असे लिहीते की, अर्जदाराने भरलेली कर्ज रक्‍कम यांची नोंद
 
 
किर्द रजिस्‍ट्ररवर न झाल्‍यामूळे अर्जदार हे थकबाकीदाराच्‍या यादीमध्‍ये समाविष्‍ठ झाले व त्‍यांना त्‍यामूळे कर्ज माफीची सवलत मिळाली ? असा जर विचार केला तर याआधी अर्जदाराकडून कर्ज बाबतची रक्‍कम जमा करुन घेतली ती कूठे गेली ? हा प्रश्‍न समोर येतो. गैरअर्जदार यांनी कर्ज माफी अर्जदारास मिळाली याबददल कबूली दिलेली आहे परंतु त्‍यांचे किर्द रजिस्‍ट्ररमध्‍ये त्‍यांची सचिवाकडून नोंद न झाल्‍यामूळे हा प्रकार घडला असे स्‍पष्‍ट होते ? वेळोवेळी अर्जदाराने घेतलेल्‍या कर्जाची मध्‍यम मूदतीमध्‍ये रुपांतर झाले व त्‍यांचे नूतनीकरण झाले त्‍यामूळै त्‍यांचे हप्‍त्‍याची शेवटची तारीख पाहिल्‍यास अर्जदार हा कर्ज माफीस पाञ होता असे स्‍पष्‍ट होते. अर्जदार यांच्‍या कर्ज खात्‍याचे रु.37,676/- शासनाने कर्ज माफ करुन त्‍यांच्‍या वतीने भरलेले आहे. ही गोष्‍ट स्‍पष्‍ट झाल्‍यामूळे अर्जदार यांने भरलेले रु.33,000/- सेवा सहकारी सोसायटी लि.हरडफ ता.हदगांव यांनी तिला व्‍याजासह वापस करावेत या निर्णयास्‍तव हे मंच आलेले आहे.
                 गैरअर्जदार क्र.1 चे म्‍हणणे आहे की, माजी सचिव (मयत) श्री.संगनवार यांनी किर्द न लिहील्‍यामूळे अर्जदाराने कर्जाचा भरणा करुन देखील ती रक्‍कम किर्दीमध्‍ये नोंदविल्‍या गेली नाही ?  महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या कल्‍याणकारी सरकारने कर्ज माफी जाहीर केलेली असली तरी कर्मचा-याच्‍या गलथानपणामुळे व निष्‍काळजीमुळे अनेक शेतक-यांना कर्ज माफी योजनेच्‍या फायदयापासून मुकावे लागल्‍याचे दिसते.  कर्मचा-यांच्‍या निष्‍काळजीपणाची जिम्‍मेदारी ही सोसायटीवर व बँकेवर येते व ते ही जिम्‍मेदारी टाळू शकणार नाहीत.
                  गैरअर्जदार लिहीतात की, अर्जदार हिने सदरील केस ही सहकार न्‍यायालयात चालवावी परंतु अर्जदार ही ग्राहक म्‍हणून या न्‍यायालयात तिची तक्रार मांडू शकते म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिला रु.33,000/- दि.5.2.2006 पासून 9 टक्‍के व्‍याजाने एक महिन्‍यात दयावेत, तसेच दाव्‍याचा खर्च म्‍हणून रु,2,000/- एक महिन्‍यात दयावेत असे आदेश हे मंच पारीत करीत आहे. वरील रक्‍कम एक महिन्‍याचे आंत न दिल्‍यास त्‍या संपूर्ण रक्‍कमेवर रक्‍कम फिटेपर्यत 10 टक्‍के व्‍याज दयावे लागेल.
                  वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                                                             आदेश
1.                                          अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.1.
2.                                          गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना निकाल कळाल्‍यापासून एक महिन्‍याचे आंत रु.33,000/- व त्‍यावर दि.5.3.2006 पासून 9 टक्‍के व्‍याज दयावेत तसेच दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात, असे न केल्‍यास संपूर्ण रक्‍कमेवर रक्‍कम फिटेपर्यत 10 टक्‍के व्‍याज दयावे लागेल.2.
3.                                          संबंधीताना निर्णय कळविण्‍यात यावा.3.
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                    श्रीमती सुवर्णा देशमूख          
                 अध्‍यक्ष                                                            सदस्‍या   
 
जयंत पारवेकर
लघुलेखक

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT