(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाले यांच्याकडून बुकिंगप्रमाणे तक्रारीत नमूद मॉडेलची गाडी(कार) डिलीवरी (गाडीचा ताबा) अर्जदार यांचेकडून उर्वरीत रक्कम भरुन मिळावा, विकल्पेकरुन बुकींग ऑर्डर रक्कम रु.5000/- व प्रत्यक्ष बुकींग तारखेपासून द.सा.द.शे.24% दराने अर्जदारास मिळावा, अर्जाचा खर्च रु.20,000/- मानसिक आर्थीक त्रासापोटी रु.20,000/- मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी याकामी पान क्र.13 लगत लेखी म्हणणे व पान क्र.14 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?-होय. 2) सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-नाही. 3) अंतिम आदेश?-- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. विवेचन याकामी अर्जदार व त्यांचे वकिल व सामनेवाला व त्यांचे वकिल हे युक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. सामनेवाले यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचेकडे अर्जदार यांनी गाडीचे बुकींग केलेले आहे ही बाब स्पष्टपणे नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत बुकींग ऑर्डरची प्रत व पान क्र.6 व 7 लगत सामनेवाला यांनी दिलेल्या पत्राची प्रत दाखल केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 लगत बुकींग ऑर्डरची प्रत व पान क्र.6 व 7 लगतचा पत्रव्यवहार यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदाराची असलेली मागणीची सामनेवाला यांनी कायदेशीररित्या पुर्तता केलेली असून सामनेवाला यांनी त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडलेली आहे. सध्यातरी अर्जदार यांची कोणतीही मागणी उर्वरीत राहीलेली नाही. पुर्तता केल्याबाबतचा पुरावा मंचात सादर केलेला आहे. सेवा देण्यात कोणताही कसूर केलेला नाही.” असा उल्लेख केलेला आहे. पान क्र.5 चे ऑर्डरबुकिंग फॉर्ममध्ये टेन्टेटीव्ह डिलीवरी डेट दि.09/03/2011 अशी दिलेली आहे व टेन्टेटीव्ह वेटींग पिरीयड 150 दिवस दिलेला आहे. म्हणजेच सामनेवाला यांनी अर्जदार यांना नक्की दि.09/03/2011 रोजी किंवा 150 दिवसाचे आत गाडीची डिलीवरी देणार आहोत असे नक्की कळविलेले नाही. सामनेवाला यांनी अर्जदार यांना नक्की किती दिवसात किंवा कमीतकमी किती दिवसात वाहन ताब्यात द्यावयाचे होते याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. पान क्र.5 चे बुकिंग ऑर्डर फॉर्मचा विचार होता कमीतकमी 150 दिवसात किंवा संभाव्यतः दि.09/03/2011 पुर्वी गाडीची डिलीवरी मिळणार होती. परंतु या दोन्ही गोष्टी अर्जदार व सामनेवाला यांचेमध्ये नक्की ठरलेल्या नव्हत्या. सामनेवाला यांनी पान क्र.13 चे लेखी म्हणण्यामध्ये “अर्जदाराची असलेली मागणी सामनेवाला यांनी कायदेशीर रित्या पुर्तता केलेली असून जबाबदारी योग्य रितीने पार पाडलेली आहे.” असा उल्लेख केलेला आहे. याबाबत सामनेवाला यांनी पान क्र.14 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. पान क्र.16 लगत दि.29/09/2011 रोजीचा गेटपास, पान क्र.17 लगत दि.29/09/2011 रोजीचा डिलीवरी मेमो व पान क्र.18 लगत विमा पॉलिसी अशी कागदपत्रे सामनेवाला यांनी दाखल केलेली आहेत. पान क्र.13 ते पान क्र.18 लगतचे कागदपत्रांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना वाहनाची डिलीवरी दि.29/09/2011 रोजी दिलेली आहे हे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दि.30/08/2011 रोजी दाखल केलेला आहे म्हणजेच तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर 30 दिवसातच सामनेवाला यांनी अर्जदार यांना वाहनाची डिलीवरी दिलेली आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी जाणूनबुजून निष्काळजीपणा केलेला आहे व मुद्दाम उशीराने वाहनाची डिलीवरी अर्जदार यांना दिलेली आहे ही बाब अर्जदार यांनी शाबीत केलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
|