Dated the 30 Nov 2015
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.माधुरी विश्वरुपे...................मा.सदस्या.
1. तक्रारदार यांनी गोदरेज कंपीनीमधुन निवृत्त झाल्यानंतर ता.20.09.2005 रोजी रक्कम रु.6,00,000/- ची सहा वर्षाकरीता मासिक प्राप्ती योजनेमध्ये सामनेवाले यांचेकडे गुंतवणुक केली. सदर योजनेप्रमाणे ता.20.09.2011 रोजी दरमहा रु.4,000/- व्याजाची रक्कम व बोनस सहित एकूण रु.9,99,500/- एवढी रक्कम मिळणार होती.
2. तक्रारदार यांनी दरमहा मिळणारी रक्कम रु.4,000/- सामनेवाले यांचेकडे तक्रारदाराच्या बचत खात्यामध्ये सहावर्षात जमा केली होती. सदर जमा असलेल्या रकमेवर सामनेवाले यांनी रु.49,635/- एवढया व्याजाची रक्कम देणे आवश्यक होते. परंतु सामनेवाले यांनी ता.20.09.2011 रोजी फक्त रु.9,49,925/- एवढीच रक्कम तक्रारदारांना अदा केली.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सन-2005 मध्ये दरमहा मिळणारी रु.4,000/- व्याजाची रक्कम काढण्याबाबत किंवा सदरची रक्कम रिकरिंग डिपॉझिट खाते उघडून सदर खात्यात जमा करण्याबाबतची माहिती दिली नाही. त्यामुळे तक्रारदारांना रु.79,882/- एवढी रक्कम कमी मिळाली अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
4. सामनेवाले यांचे लेखी कैफीयतीनुसार तक्रारदारांनी ता.19.08.2005 रोजी रक्कम रु.6,00,000/- मासिक प्राप्ती योजनेमध्ये गुंतवणुक केली होती. तक्रारदारांना प्रती महिना रु.4,000/- व्याजाची रक्कम बोनस समवेत तसेच मॅच्युरिटी नंतर ता.22.09.2011 रोजी रु.9,49,925/- एवढी रक्कम सदर योजनेच्या नियमानुसार खालील प्रमाणे अदा केली आहे.
Principal Amount …………………………….Rs.6,00,000/-
Bonus…………………………………………….Rs.60,000/-
Interest (6 Years)…………………………..…Rs.2, 88,000/-
Post Maturity Interest ……………………....Rs.1,925/-
Total Amount…………………………………...Rs.9,49,925/-
तक्रारदार यांनी दरमहा मिळणारी व्याजाची रक्कम रु.4,000/- प्रतिमहा घेतली नाही तसेच सदर रकमेची पुर्नगुंतवणुक रिकरिंग डिपॉझिटमध्ये करण्याबाबत तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मागणी केली नव्हती. अशा परिस्थितीत तक्रारदारांना रक्कम रु.49,635/- नुकसान झाल्याची जबाबदारी सामनेवाले यांचेवर येत नाही. सामनेवाले यांनी सेवेमध्ये कसुरी केली नाही.
5. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांची लेखी कैफीयत / शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. यावरुन खालील प्रमाणे निष्कर्ष मंच काढीत आहे.
अ. तक्रारदारांनी एमआयएस स्किममध्ये रक्कम रु.6,00,000/- ता.20.09.2005 रोजी गुंतवणुक केल्याची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांना ता.22.09.2011 रोजी मुदतपुर्ती नंतर मिळणारी रक्कम रु.9,49,925/- अदा केली आहे.
ब. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार सदर स्किममध्ये दरमहा प्राप्त होणारी व्याजाची रक्कम रु.4,000/- ची पुर्नगुंतवणुक न केल्यामुळे तक्रारदारांना सदर रकमेवर व्याज मिळाले नाही.
क. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांनी दरमहा प्राप्त होणारी रक्कम रु.4,000/- प्रतिमहा Withdraw केली नाही अथवा सदर रकमेची पुर्नगुंतवणुकीबाबत सामनेवाले यांचेकडे सुचना दिली नाही.
ड. वरील परिस्थीतीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी दरमहा प्राप्त होणारी रक्क्म रु.4,000/- रिकरिंग डिपॉझीटमध्ये पुर्नगुंतवणुक करण्याबाबत निर्देश दिल्याबाबतचा पुरावा मंचासमोर नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदर व्याजाचे रकमेवर कंपाऊंड इंटरेस्ट सामनेवाले यांनी दिले नाही. परंतु तक्रारदार यांची दरमहा सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.4,000/- जमा झाले आहेत तरी सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या जमा रकमेवर Simple Interest देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-262/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दरमहा रक्कम रु.4,000/- प्रमाणे त्यांच्या बचत
खात्यामध्ये जमा होणा-या रकमेवर सरळ व्याज (Simple Interest) न देऊन त्रुटीची सेवा
दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ता.20.09.2005 ते ता.20.09.2011 या कालावधीत
प्रतिमहा रु.4,000/- जमा झालेल्या रकमेवर दरसाल दर शेकडा 6 टक्के व्याजदराने
होणारी रक्कम ता.15.01.2016 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्यास
ता.16.01.2016 पासुन दरसाल दर शेकडा 9 टक्के व्याज दरासहित दयावी.
4. खर्चाबाबत आदेश नाहीत.
5. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
6. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.30.11.2015
जरवा/