Maharashtra

Washim

CC/2/2015

Nasrula Kha Alam Kha Pathan - Complainant(s)

Versus

Senior Officer-The Oriental Insurance Company Ltd.-Branch -Washim - Opp.Party(s)

Avd.V.M.Khandelwal

27 Oct 2015

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/2/2015
 
1. Nasrula Kha Alam Kha Pathan
At.Muslim Chowk, Ramnagar, Ansing
Washim
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Senior Officer-The Oriental Insurance Company Ltd.-Branch -Washim
Patni Chowk,Parasnath Building Washim
Washim
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. A.C.Ukalkar MEMBER
 HON'BLE MRS. J.G.Khandebharad MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

:::    आ दे श   :::

(पारित दिनांक  : २७/१०/२०१५)

आदरणीय सदस्‍य, ए.सी.उकळकर, यांचे अनुसार  : -

 

१.       ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्‍वये, सादर करण्‍यात                        

आलेल्‍या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्‍यात आढळून येतो तो येणे प्रमाणे,

तक्रारकर्ता वरील ठीकानचा रहिवासी असुन, त्‍याच्‍या मालकीचे इंडीका विस्‍टा कार रजीस्‍ट्रेशन नं.एम एच ३७, जी २२९४ हे आहे. सदर वाहणाचे चेसीस

 

                        ..२..                       तक्रारक्र.०२/२०१५

नं.MAT ६०८५३५ CPC २४५४३, इंजिन नं.४७५१ DT१ ४C XYP २२२६३  हे आहे. सदर वाहन २०१२ चे मॅन्‍युफॅक्‍चरींगचे असुन विस्‍टा रीफ्रेश मॉडेल आहे.

     सदर वाहन तक्रारकर्ता स्‍वत:च्‍या वैयक्‍तीक वापरसाठी करीत होता. तक्रारकर्त्‍याचे वाशिम येथील रहीवासी असलेले मित्र श्री.रामेश्‍वर भवरलाल जांगीड हे दि.२४.०५.२०१३ रोजी त्‍यांच्‍या इतर मित्रासह वर नमुद वाहनाने इंदौर येथे गेले. इंदौर येथुन दि.२५.०५.२०१३ रोजी रात्री वाशिम येथे येण्‍याकरीता निघाले. सदर रात्री अंदाजे २.०० ते २.३० दरम्‍यान इंदौर-ईच्‍छापुर मार्गावर चमाटी फाटया जवळ एक बोलेरो वाहण क्रं. MH१८,  T-०२३३ च्‍या चालकाने वाहन भरधाव वेगाने, निष्‍काळजीपणे चालवुन तक्रारकर्त्‍याच्‍या नमुद वाहनास जबर धडक दिली.  त्‍यामुळे वाहणामधील लोकांना गंभीर दुखापत झाली व वाहनाचे भयंकर नुकसान झाले. श्री.रामेश्‍वर भवरलाल जांगीड यांनी घटनेचा रिपोर्ट पोलिस स्‍टेशन छेगांव माखन जिल्‍हा खंडवा येथे दिला. संबंधीत तपास अधिका-यांनी घटनास्‍थळ पंचनामा केला व ईतर बाबी बद्दल तपास केला. तसेच अपघात वेळी अर्जदाराच्‍या वाहनावर गणेश उगले नामक वाहन चालक होता. त्‍याच्‍याजवळ वाहन चालविण्‍याचा आवश्‍यक परवाना होता.   

      तक्रारकर्त्‍याने वाहनाचा विमा विरुध्‍दपक्ष यांच्‍या कंपनीकडुन काढण्‍यात आला होता त्‍याचा पॉलिसी नं.१८२२०२/३१/२०१४/४ असा आहे. सदर विम्‍याचा कार्यकाळ  दि.१४.०४.२०१३ ते १३.०४.२०१४ पर्यंत होता.  

     तक्रारकर्त्‍यानी विरुध्‍दपक्षाकडे दि.३०.०५.२०१३ रोजी नुकसान भरपाई करीता दावा (क्‍लेम) दाखल केला, त्‍यासोबत सानिया मोटर्स हिंगोली यांचे अंदाजपत्रक (ईस्‍टीमेट)जोडले होते. तसेच विरुध्‍दपक्षा तर्फे अरविंद लखदिवे

                        ..३..                       तक्रारक्र.०२/२०१५

यांच्‍या कडुन नुकसानीचे अंदाज पत्रक व नुकसान आकरणी करण्‍यात आली आहे. परंतु त्‍यामध्‍ये कमी रक्‍कम दाखविण्‍यात आलेले आहे. असे असले तरीही तक्रारकर्त्‍याला आपला दावा रु.४,००,०००/- पर्यंत सिमीत ठेवत असुन त्‍याकरीता प्रस्‍तुत दावा दाखल करीत आहे.

     विरुध्‍दपक्षाने दि.२६.०८.२०१४ रोजीच्‍या पत्रान्‍वये चुकीचे कारण दाखवित तक्रारकर्त्‍यालाच स्‍पष्‍टीकरण मागीतले. तक्रारकर्ता वारंवार विरुध्‍दपक्षाच्‍या कार्यालयात जावून संबंधीत अधिका-यांना भेटले परंतु त्‍यांनी कोणतेही लक्ष न देता परत पाठविले, व असे सांगण्‍यात आले की, अर्जदाराचा दावा विविध कारणावरुन असमर्थनीय आहे.विरुध्‍दपक्षाच्‍या अशा वागणुकीमूळे व तक्रारकर्त्‍याला कामधंदा सोडून वारंवार चक्रा मारायचे काम पडले त्‍यामुळे त्‍याला शारीरीक व मानसीक त्रास झाला आहे.

     तक्रारकर्त्‍याची विनंती कि, तक्रार पुर्णत: मंजुर करुन वाहनाची   रु.४,००,०००/- नुकसान भरपाई तसेच त्‍यावर दि.३०.०५.२०१३ पासुन रु.१८% द.सा.द.शे. व्‍याजासह देण्‍यात यावे. तसेच शारीरीक व मानसिक, आर्थिक त्रासाबद्दल रु.५०,०००/- व तक्रार खर्च रु.१०,०००/- विरुध्‍दपक्षाकडून देण्‍याचा आदेश व्‍हावा. 

सदर तक्रार तक्रारकर्ता यांनी शपथेवर दाखल केलेली असुन त्‍या सोबत एकुण ६ दस्‍ताऐवज पुरावे म्‍हणून दाखल केलेले आहे.

२)   विरुध्‍द पक्षाचा लेखी जबाब :- सदर तक्रारीची नोटिस मंचा तर्फे प्राप्‍त  झाल्‍या नंतर विरुध्‍द पक्षाने त्‍यांचा लेखी जबाब  (निशाणी 11 ) दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली आहे. त्‍याचा थोडक्‍यात आशय असा,

                        ..४..                       तक्रारक्र.०२/२०१५

     तक्रारकर्त्‍याची गाडी एमएच-३७ जी २२९४ ही खाजगी वाहन म्‍हणून नोंदणीकृत असुन सदरहू वाहनाचा उपयोग हा स्‍वत:च्‍या उपयोगासाठीच करावा लागतो. सदरहू वाहन हे व्‍यावसायीक कारणाकरीता उपयोगात आणले जाऊ शकत नाही. तक्रारकर्ता यांनी विम्‍याचा हप्‍ता सुध्‍दा खाजगी वाहन म्‍हणूनच भरलेला आहे. तसेच या विरुध्‍दपक्षाचे असे हि म्‍हणने आहे कि, दि.२४.०५.२०१३ रोजी रामेश्‍वर भवरलाल जांगिड यांनी खंडवा येथे तक्रारकर्त्‍याची गाडी बोलावली. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार गाडी ही खंडवा येथे रिकामी गेली व तेथून विठ्ठल ठाकरे, रामेश्‍वर जांगिड, मोहनदास जांगिड, रोशन कुमावत व ईतर यांना घेउन वाशिम येथे येण्‍याकरीता निघाले. तक्रारकर्त्‍याच्‍या जबाबानुसार हे स्‍पष्‍ट होते कि, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन व्‍यावसायीक कारणाकरीता उपयोगात आणले ही बाब तक्रारकर्त्‍याने सदरहु तक्रार दाखल करतेवेळी वि.न्‍यायमंचा पासून लपवून ठेवली. तसेच विठ्ठल ठाकरे, यांनी दिलेल्‍या बयाणानुसार सदरहू गाडी ही भाडयाने   घराच्‍या वास्‍तू करीता अनसिंग येथून इंदौर जाण्‍याकरीता केली होती. तसेच रामेश्‍वर जांगिड यांनी दिलेल्‍या बयाणानुसार सुध्‍दा सदरहू गाडी ही अनसिंग वरुन इंदौर जाण्याकरीता भाडयाने केली होती. या सर्व बाबी पोलीस बयाणावरुन तसेच विरुध्‍दपक्षाने केलेल्‍या सर्व्‍हे निरीक्षणावरुन स्‍पष्‍ट होते. विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला  दि.२६.०८.२०१४ रोजी पत्र देउन विस्‍तृतमध्‍ये  कळविले होते कि, तक्रारकर्त्‍याचे वाहन हे खाजगी वाहन असून त्‍यानुसारच विमाहप्‍ता हा तक्रारकर्त्‍याने भरला होता व पोलीस पेपर तसेच बयाणाचे अवलोकन केले असता, सदरहू वाहन हे व्‍यावसायीक कारणाकरता उपयोगात आणल्‍यामुळे

 

                        ..५..                       तक्रारक्र.०२/२०१५

पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा भंग झाला. त्‍यामुळे सदरहू दावा खर्चासह खारीज करण्‍यात यावा. 

३)   कारणे व निष्कर्ष ः-

     या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्‍दपक्षाचा लेखी जबाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, तक्रारकर्ता यांचे प्रतिउत्‍तर व उभयपक्षांचा तोन्‍डी युक्‍तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन मंचाने केले व खालील निष्‍कर्ष कारणे देवुन नमुद केला.

     प्रकरणात उभयपक्षाला मान्‍य असलेल्‍या बाबी अशा आहे कि, तक्ररकर्त्‍याचे  मालकीचे  वाहन  इंडिका विस्‍टा कार याची पॉलिसी, प्रिमीयम, वैधता या बाबत विरुध्‍दपक्षाला वाद नाही. तसेच सदरहु वाहनाचा दि२५.०५.२०१३ रोजी अपघात झाला या बद्दल विरुध्‍दपक्षाला वाद नाही. त्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने विमा दावा रक्‍कम मिळण्‍याकरीता वेळेत सुचना देवून आवश्‍यक ते दस्‍तऐवज  विरुध्‍दपक्षाकडे जमा केले, याबद्दलही विरुध्‍दपक्षाला वाद नाही. तसेच तक्रारकर्ता ग्राहक आहे, हे देखील विरुध्‍दपक्षाला मान्‍य आहे. उभयपक्षात मुख्‍य वाद विषय असा आहे कि, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा वाहन नोंदणी प्रमाणपत्रा नुसार, विमा पॉलिसी नुसार, खाजगी वाहन म्‍हणून नोंदणीकृत असतांना तक्रारकर्त्‍याने त्‍याचा उपयोग व्‍यावसायीक उद्देशासाठी केला व म्‍हणून हे पॉलिसीच्‍या आटी व शर्तीचे उल्‍लंघन आहे, असे म्‍हणत विरुध्‍दपक्षाने तो दावा नाकारला, हे योग्‍य आहे का ?  हे मंचाला पाहणे आहे. त्‍याकरीता विरुध्‍दपक्षाने व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवज जसेकी, तक्रारकर्त्‍याच्‍या F.I.R. , तक्रारकर्त्‍याचे बयाण, गाडीवाहकाचे बयाण, गाडीमधील प्रवासी यांचे बयाण व

                        ..६..                       तक्रारक्र.०२/२०१५

प्रतिज्ञापत्र यांच्‍या प्रतिचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, असा बोध होतो कि, तक्रारकर्त्‍याने सदरहु वाहन हे रामेश्‍वर जांगीड यांच्‍या सांगण्‍यावरुन भाडयाने इंदौर येथे जाण्‍याकरीता दिले होते. तक्रारकर्त्‍याच्‍या मते पोलिसानसमोरील दिलेले बयाण व तसेच विरुध्‍दपक्षाच्‍या चौकशी अधिकारी यांना दिलेले बयाण हे कायद्यानुसार वाचता येत नाही. परंतु वरिष्‍ठ न्‍यायालयाने दिलेल्‍या न्‍याय निवाडयावरुन व मार्गदर्शक तत्‍वानुसार सदरहु बयाण हे मंचाला वाचता येतात असे आहे. वाहनाच्‍या पॉलिसी नुसार तक्रारकर्त्‍याचे वाहन खाजगी म्‍हणून नोंदणीकृत होते. त्‍यामुळे वाहनाचा, व्‍यावसायीक उद्देशासाठी उपयोग करुन, तक्रारकर्त्‍याने सदरहू पॉलिसीच्‍या अटी व शर्तीच्‍या भंग केलेला आहे. त्‍यामुळे अशा प्रकरणामध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने व मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, यांनी  दिलेल्‍या न्‍याय निवाडयानुसार विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या विमा पॉलिसी पोटी नियमाप्रमाणे देय असलेल्‍या आय.डी.व्‍ही. (I.D.V) रक्‍कम रुपये ३,५०,०००/- या विम्‍याच्‍या रक्‍कमे ऐवजी या विम्‍याच्‍या दाव्‍याला नॉन स्‍टँडर्ड बेसीस (Non Sandard Basis) तत्‍वावर मंजूर करुन, तक्रारकर्त्‍याला या रक्‍कमेपैकी ७५ % रक्‍कम देणे न्‍यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे. म्‍हणून विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या वाहनाच्‍या विमा पॉलिसीबाबत रुपये ३,५०,०००/- च्‍या ७५ % रक्‍कम  म्‍हणजेच रुपये २,६२,५००/- रक्‍कम देण्‍याचा, आदेश पारित करण्‍यात येतो. मात्र विरुध्‍दपक्षाने देखील योग्‍य त्‍या संशयामुळे  तक्रारकर्त्‍याला विम्‍याचा दावा देण्‍याचे नाकारले असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष हे या रक्‍कमेवर इतर कोणतेही व्‍याज व नुकसान भरपाई देण्‍यास बाध्‍य नाही, असे मंचाचे मत आहे. सबब,अंतिम आदेश पारित केला तो पुढील प्रमाणे.  

                          ..७..                    तक्रारक्र.०२/२०१५

अंतिम आदेश

१.        तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

२.        विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍याचा विम्‍याचा दावा नॉन स्‍टँडर्ड  बेसीस

          या आधारावर मंजूर करुन, तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या विम्‍याची

          ७५ % रक्‍कम रुपये २,६२,५००/- (दोन लाख बासष्‍ट हजार,

         पाचशे केवळ) दयावी. विरुध्‍दपक्ष या रक्‍कमेवर कोणतेही व्‍याज

          देण्‍यास बाध्‍य  नाही.

३.        न्‍यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.        

४.        विरुध्‍दपक्ष यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत

          मिळाल्‍यापासून ४५ दिवसाचे आत करावे.

५.        उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

                   

 मा.श्री.ए.सी.उकळकर,  मा.श्रीमती.जे.जी.खांडेभराड,   मा.सौ.एस.एम.उंटवाले,  

        सदस्‍य             सदस्‍या                 अध्‍यक्षा

                       

दि�.२७.१०.२०१५

स्‍टेनो/गंगाखेडे

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. A.C.Ukalkar]
MEMBER
 
[HON'BLE MRS. J.G.Khandebharad]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.