जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 200/2008. प्रकरण दाखल तारीख - 04/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 09/09/2008 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. लक्ष्मण पि. संतका सरकाळे वय 70 वर्षे धंदा काहीच नाही. अर्जदार. रा. दापका राजा ता. मूखेड जि. नांदेड. विरुध्द. 1. मा. सचिव, सेवा सहकारी सोसायटी, दापका राजा ता. मुखेड जि. नांदेड. 2. मा. व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. गूरु कॉम्प्लेक्स, जि.जि.रोड, नांदेड. गैरअर्जदार 3. युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. प्रादेशिक कार्यालय, तिसरा माळा, अंबिका हाऊस, 19, धर्मपेठ विस्तार, शंकरनगर चौक, नागपूर – 440 010. अर्जदारा तर्फे वकील - अड. भुरे बी.व्ही. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - अड.आय.एम.शेख गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड. जी.एस. औढेंकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्य ) अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 यांचे सभासद आहेत, त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पॉलिसी नंबर 230600/47/51/841 हा जनता वैयक्तीक अपघात विमा उतरविला आहे. विम्याचा कालावधी दि.30.8.2000 ते 29.8.2005 हा आहे. दि.25.10.2002 रोजी दुपारी दोन वाजता झाडावरुन पाय घसरुन अपघाती पडल्याने त्यांचा उजव्या डोळयाला मार लागला व गंभीर दूखापत झाली. अंकूश रुग्णालय उदगीर येथे शरीक केले. पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व संरपंच यांनी अपघाताबाबत दिलेले पञ मंचात दाखल केले आहे. अपघातामूळे अर्जदारांला 75 टक्के आंधळेपण आल्याचे प्रमाणपञ दिले ते दाखल केले आहे. घटना घडल्यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांचे मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे दि.31.12.2005 रोजी क्लेम फॉर्म व सर्व आवश्यक कागदपञे दाखल केली व विमा रक्कमेची मागणी केली परंतु त्यांनी नूकसान भरपाईची रक्कम दिली नाही. दि.4.4.2008 रोजी पून्हा लेखी पञ देऊन विनंती केली पण त्यांनी नूकसान भरपाई दिली नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.7.1.2003 रोजी सेवा सहकारी सोसायटी दापका राजा यांना एक पञ देऊन कागदपञाची मागणी केली पून्हा अर्जदारानी त्यांच्या मागणीन नुसार सर्व कागदपञे दि.25.4.2003 रोजी दाखल केली. परंतु अद्यापपावेतो अर्जदाराला नूकसान भरपाई दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदारानी ञूटीच्या सेवेबददल रु.50,000/- सन 2002 पासून 12 टक्के व्याजासह व शारीरीक व मानसिक ञासापोटी रु.25,000/- मिळावेत व दावा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे हजर झाले त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला आहे. अर्जदार त्यांचा सभासद आहे हे त्यांना मान्य आहे, तसेच अर्जदाराचा अपघात झाला व उजव्या डोळयाला दुखापत झाली हे त्यांना मान्य आहे. अर्जदाराने विमा दावा फॉर्म दिल्यानंतर तो गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठविला आहे. त्यामूळे त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही. दावा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य नाही, ते फक्त मध्यस्थीची भूमिका करतात. अर्जदाराने दिलेले सर्व कागदपञे त्यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे दिलेले आहेत त्यामूळे त्यांच्या सेवेत कोणतीही ञूटी नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे वकिलामार्फत हजर झाले, त्यांनी लेखी जवाब दाखल केला आहे. अर्जदाराचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. अर्जदाराचा अपघात दि.25.10.2002 रोजी झाला व क्लेम त्यांने दि.3.6.2008 रोजी दाखल केला आहे, जवळजवळ सहा वर्षानी तक्रार दाखल केली आहे म्हणून तक्रार वेळेत दाखल केलेली नाही म्हणून तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी त्यांची पॉलिसी घेतली होती हे त्यांनी मान्य केले आहे. अपघातामध्ये अर्जदाराचा डोळा निकामी झाला हे म्हणणे त्यांनी अमान्य केले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना घटनेबददल कागदपञाची मागणी केली पण त्यांनी कागदपञ दाखल केले नाही. वरील पञ पाठविल्यानंतर 15 दिवसांचे आंत कागदपञ मिळावयास पाहिजे होते पण ते मिळाले नाही. परत गैरअर्जदार क्र. 2 यांनी दि.7.4.2003 रोजी कागदपञाबददल पञ पाठविले पण त्यांनी कागदपञ दाखल केले नाही. म्हणून गैरअर्जदार नंबर 2 यांनी दि.15.03.2004 रोजी पञ देऊन दावा नामंजूर केला आहे असे कळविले. यापञावरुन गैरअर्जदार यांच्या सेवेमध्ये कोणतीही ञूटी नाही हे सिध्द होते. गैरअर्जदार यांनी श्री.मडडे श्रीनिवास यांना अपघाताबददल सर्व्हे करण्यासाठी नियूक्त केले होते. त्यांचे म्हणण्याप्रमाणे ज्या डॉक्टरचे प्रमाणपञ अर्जदाराने दाखल केलेले आहे तेच डॉक्टर स्वतः कबूल करतात की अर्जदार हा दोन वर्षापासून डोळयाच्या ञासापासून आजारी आहे. म्हणजे अर्जदार हा अपघातापूर्वीपासून त्यांस डोळयाचा आजार होता. साक्षीदाराने स्वतः कबूल केले आहे की, अर्जदार हा पाच ते सहा वर्षापासून डोळयाचा आजार होता. अर्जदार हा खोटा अपघात दाखवून विम्याचा खोटा लाभ मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्जदाराने एफ.आय.आर. ची प्रत, घटनास्थळ पंचनामा, मेडीको लिगल प्रमाणपञ, व इतर कागदपञे दाखल केलेली नाहीत. पॉलिसीच्या करारानुसार 100 टक्के डोळयाचे नूकसान झाले असेल तर नूकसान भरपाई मिळते,त्यामूळे अर्जदाराने स्वतःच दाखल केलेल्या प्रमाणपञानुसार त्यांचा डोळा 75 टक्के निकामी झाला आहे. पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार त्यांला नूकसान भरपाई मिळू शकत नाही. वरील सर्व बाबी वरुन गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई न देऊन कोणतीही सेवा ञूटी केलेली नाही त्यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार यांनी केली आहे. अर्जदार यांनी स्वतःची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली, तसेच त्यांने पॉलिसीची प्रत, दि.31.12.2002 चे व दि.25.4.2003 चे पञ, गैरअर्जदार क्र. 2 यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना दि.7.1.2003 रोजीच्या पञाने कागदपञाची मागणी केली ते पञ, सोसायटीचे, संरपचांचे, पोलिस पाटलाचे प्रमाणपञ, ओळखपञ व रहिवाशी प्रमाणपञ, डॉक्टराचे प्रमाणपञ, अंकूर रुग्णालयाच्या पावत्या, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. गैरअर्जदार यांनी श्री.भगवान रामजी कोठाळे यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली व त्यांनी अर्जदारास दि.7.1.2003, 31.1.2003, 7.4.2003, 28.4.2003, 7.7.2003, 23.8.2003, 15.9.2003, 8.10.2003 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना दिलेले पञे, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, साक्षीदाराची साक्ष, शासकीय मेडीकल आफीसर नांदेड यांचे प्रमाणपञ, शर्ती व अटीची पॉलिसी, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. अर्जदारातर्फे वकिलानी यूक्तीवाद केला, गैरअर्जदार तर्फे कोणीही हजर नाही दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदाराचा अर्ज मूदतीत आहे काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांचा दि.25.10.2002 रोजी झाडावरुन अपघाती पडून डोळयास मार लागून गंभीर दूखापत होऊन डोळा निकामी झाला, त्यांची नूकसान भरपाई मागण्यासाठी गैरअर्जदार यांच्याकडे वारंवार मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना क्लेमची रक्कम दिली नाही. त्यामूळे अर्जदार यांना सदरची विमा क्लेमची रक्कम मिळण्यासाठी प्रस्तूतचा अर्ज या मंचासमोर दाखल करावा लागला. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेले कागदपञे तसेच गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यासोबत दाखल केलेल कागदपञ यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचा अपघात दि.25.10.2002 रोजीच झालेला आहे. त्यानंतर अर्जदार यांनी दि.31.12.2002 रोजी क्लेम फॉर्म सोबत आवश्यक लागणारी कागदपञ गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे दिलेली आहेत. त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना पञ देऊन कागदपञाची मागणी केलेली आहे. व त्या मागणीप्रमाणे अर्जदार यांनी पून्हा दि.25.4.2003 रोजी आवश्यक ती सर्व कागदपञे गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांनी दि.15.3.2004 रोजी अर्जदार यांना आवश्यक त्या कागदपञाची मागणी केली परंतु ती पूर्ण केली नाही म्हणून नो क्लेम/फाईल बंद केली असे पञ गैरअर्जदार क्र. 2 यांनी दिलेले आहे सदर पञानंतर गैरअर्जदार क्र.2 यांचेशी अर्जदार यांनी कोणताही पञ व्यवहार केला नसल्याचे स्पष्ट होते. अर्जदार यांनी त्यांच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे व अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपञाप्रमाणे सप्टेंबर 2005 मध्ये गैरअर्जदार क्र.3 यांनी प्रलंबित दावे व रक्कम मिळणे बाबत वर्तमान पञात जाहीरात दिलेली होती त्या बददल अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे आवश्यक ती कागदपञे रजिस्ट्रर पोस्टाने पाठविली होती. त्यांची पोहच पावती अर्जदार यांनी या मंचामध्ये दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी सन 2005 मध्ये गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे कागदपञ दाखल केल्यानंतर त्यांचा कोणत्याही प्रकारे पाठपूरावा केलेला नाही व त्या बाबत कोणताही कागदोपञी पूरावा या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी दि.4.4.2008 रोजी शेवटचा विनंती अर्ज देऊन विम्याच्या रक्कमेची मागणी केली. त्यामूळे अर्जदार यांनी दि.4.4.2008 रोजी पासून सदरचे प्रकरण मूदतीत आहे. म्हणून पॉलिसीनुसार नूकसान भरपाई मिळण्यास पाञ आहेत असे म्हटले आहे. अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, त्यांनी दाखल केलेले कागदपञ, गैरअर्जदाराचे जवाब, प्रतिज्ञापञ, व दाखल केलेले कागदपञ यांचे अवलोकन केले असता अर्जदार यांचा अपघात दि.25.10.2002 रोजी झालेला आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम दि.15.3.2004 रोजी नाकारला आहे असे असताना अर्जदार यांनी क्लेम नाकारल्याचे दिनांकापासून कोणत्याही प्रकारचा अर्ज या मंचात दाखल केलेला नाही. म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 (A) नुसार अर्जदाराचा प्रस्तूतचा अर्ज मूदतीत दाखल केलेला नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत उशीरा तक्रार दाखल केल्याबददल माफी अर्ज, शपथपञ, उशिराचा वेळ माफ होऊन मिळणे बाबत कोणताही अर्ज, शपथपञ व त्या बाबत कोणताही पूरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. वरील सर्व विवेचनावरुन अर्जदार यांचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 (A) नुसार मूदतीत दाखल केलेला नाही. यास्तव तक्रार नामंजूर करण्यास पाञ आहे असे या मंचाचे मत आहे. यास्तव खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2. दोन्ही पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. दोन्ही पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक |