जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 456/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 05/04/2010
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 15/02/2014
रुपचंद औंकार कोळी,
वयः सज्ञान, धंदाः शेती,
रा.भालशिव, पोष्ट निमगांव,
ता.यावल,जि.जळगांव (व्हाया भालोद) ........ तक्रारदार
विरुध्द
1. सेक्रेटरी विविध कार्यकारी सोसायटी,बोरावल खुर्द,
ता.यावल,जि.जळगांव व इतर 3. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या
--------------------------------------------------
नि.क्र. 1 वरील आदेश व्दाराःश्रीमती पुनम नि.मलीक,सदस्याः तक्रारदार व त्यांचे वकील तसेच विरुध्द पक्ष व त्यांचे वकील आज नेमलेल्या तारखेस हजर. तक्रारदार व विरुध्द पक्षात मे.मंचाबाहेर आपसात तडजोड झाल्याने सदरचा अर्ज चालविणे नाही अशी विनंती पुरसीस दाखल केली. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 15/02/2014.(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.