- निकाल पञ -
(आदेश निशाणी क्र.1 वर)
(मंचाचे निर्णयान्वये, मा.श्री सादीक मो. झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 27 नोव्हेंबर 2015)
1. अर्जदाराचे तक्रारीत थोडक्यात हकीकत अशी आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून मस्त्य व्यवसायाकरीता सन 2015 ते 2016 या कालावधीकरीता तलाव 1 वर्षासाठी लिज पध्दतीने/ ठेका पध्दतीने घेतला आहे. सदर तलावाचा करारनामा अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये दि.14.7.2015 रोजी झाला आहे. त्याकरीता अर्जदाराने गैरअर्जदाराकडे ठेक्याची रक्कम दि.13.7.2015 रोजी जमा केली आहे. शेतक-यांनी सदर तलावाचे पाणी जबरदस्तीने मोटार लावून शेतीकरीता वापरुन घेतले आहे, त्यामुळे अर्जदाराचे व्यवसायाचे नुकसान झाले आहे व अर्जदाराला मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागत आहे. सबब, सदर तक्रार मंचासमक्ष नुकसान भरपाईसाठी दाखल करण्यात आली आहे.
2. अर्जदाराची तक्रारीची पडताळणी व त्यासोबत नि.क्र.4 वर दाखल दस्ताऐवजाची पडताळणी, अर्जदार तर्फे अधिवक्ताने केलेला प्राथमिक युक्तीवाद ऐकूण मंचाचे असे मत ठरले आहे की, अर्जदार व गैरअर्जदारांमध्ये ठेक्याचे करार होते. सदर करारामुळे काही शर्ती व अटी भंग झाले असेल किंवा त्या व्यावसायीक करारात कोणत्याही पक्षाला नुकसान झाले असेल तर ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये नमूद असलेल्या तरतुदी प्रमाणे तो वाद ग्राहक वाद नाही. तसेच कलम 2(ड) ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे या संज्ञेत मोडत नाही. सबब, खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करुन खारीज करण्यात येते.
(2) अर्जदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(3) अर्जदारास आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(4) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 27/11/2015