(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांनी अर्जदार यांचेविरुध्द दाखवलेली रक्कम रु.581/- व त्यावरील आर्थीक चार्जसह होणारी रक्कम रु.29,040.पैसे 25 ची नोंद रद्द होणेबाबतचा हुकूम व्हावेत, यापुढे जास्तीची होणारी रकमेची नोंद रद्द होणेबाबत हुकूम व्हावेत, मानसिक आर्थीक शारिरीक त्रासापोटी रु.2,00,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु.15,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
या कामी सामनेवाला यांनी पान क्र.51 लगत लेखी म्हणणे व पान क्र.52 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
तक्रार क्र.129/2011
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून क्रेडीट कार्ड अकाऊंट मधून रक्कम वजावट
होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश? ?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
विवेचनः
या कामी अर्जदार यांनी पान क्र.47 लगत युक्तीवादाबाबत पुरसीस दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी पान क्र.54 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे.
अर्जदार हे सामनेवाला यांचे क्रेडीट कार्ड धारक आहेत व अर्जदार यांचा क्रेडीट कार्ड क्र.0004317575026532086 असून बँक खाते क्र.0004317575021784484 असा आहे ही बाब सामनेवाला यांनी स्पष्टपणे नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.8 व पान क्र.9 लगत सामनेवाला यांनी दिलेले स्टेटमेंट दाखल केलेले आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.8 व पान क्र.9 चे स्टेटमेंटस् यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी दि.20/07/2006 रोजी टाटा टेलिकम्युनिकेशन लि. रक्कम रु.580/- भरणा केली असून या ऑगस्ट महिन्याचे बिल रु.1160/- होते, त्याचा भरणा नोंदीतून दि.08/09/2006 रोजी झालेला आहे. दि.22/07/2006 रोजी टाटा कम्युनिकेशन लँण्ड लाईन फोन बिलाची रक्कम रु.581/- इतकी आहे तसेच त्याच बिलामध्ये टाटा कम्युनिकेशन यांचे बिलाची रक्कम रु.760/- आहे, ती रक्कम दि.01/09/2006 रोजी भरणा केली आहे, परंतु दि.26/07/2006 रोजीचे बिलामधील रु.581/- ही रक्कम अर्जदार यांनी बिलात भरणा केलेली नाही त्यामुळे नियम व अटीचे उल्लंघन झालेले आहे व त्यामुळे व्याज भरावे लागत आहे. सप्टेंबर 2006 मधील रु.581/- नोंदीसंदर्भात चौकशी सुरु आहे, थकीत रक्कम रु.581/- त्वरीत जमा करण्यासाठी वारंवार अर्जदार यांना कळविले होते परंतु रक्कम न भरल्यामुळे बोजा वाढत आहे, सेवा देण्यात कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
अर्जदार यांनी पान क्र.17 लगत सामनेवाला यांनी दिलेली रक्कम रु.581/- ची दि.26/07/2006 ची पावती हजर केलेली आहे. या पान क्र.17 चे पावतीचा विचार
तक्रार क्र.129/2011
होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे दि.26/07/2006 रोजी रु.581/- जमा केलेले आहेत असे दिसून येत आहे. यामुळे पुन्हा सामनेवाला यांना अर्जदार यांचेकडून रक्कम रु.581/- ही रक्कम मागणी करता येणार नाही, असे असूनही सामनेवाला यांनी अर्जदार यांचेकडून रक्कम रु.581/- व त्यावरील दंड व्याज अर्जदार यांचेकडून मागणी केलेले आहेत असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
पान क्र.17 चे पावतीनुसार अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.581/- इतकी रक्कम दि.26/07/2006 रोजी जमा केलेली असल्यामुळे ही रक्कम व त्यावरील दंड, व्याज तसेच इतर चार्जेस पुन्हा सामनेवाला यांना अर्जदार यांचेकडून वसूल करता येणार नाहीत. रक्कम रु.581/- या रकमेची व या रकमेवरील दंड व्याज व इतर चार्जेसच्या रकमेची वजावट करुन मिळण्यास अर्जदार हे पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडे रक्कम रु.581/- बाबत योग्य ती दाद न मिळाल्यामुळे अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचाकडे दाद मागावी लागलेली आहे व त्यासाठी तक्रार अर्ज दाखल करावा लागलेला आहे. यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.500/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, युक्तीवादाबाबतची पुरसीस, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत
आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे काळात अर्जदार यांचे क्रेडीट कार्ड स्टेटमेंट अकाऊंटमधून
सामनेवाला क्र.1 व 2 यांनी रक्कम रु.581/- ची वजावट करावी तसेच रक्कम
रु.581/- या रकमेवर कसल्याही प्रकारे दंडव्याज व इतर चार्जेस याची आकारणी
तक्रार क्र.129/2011
करु नये.
3) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना
पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यात
3अ) मानसिक त्रासापोटी रु.500/- दयावेत.
3ब) अर्जाचे खर्चापोटी रु.500/- दयावेत.