Maharashtra

Pune

CC/10/145

Swaran Masih - Complainant(s)

Versus

SBI - Opp.Party(s)

N N Bagul

11 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/145
 
1. Swaran Masih
Lohegaon pune 32
pune
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SBI
viman nagar branch pune 14
pune
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्‍य
                                                      निकालपत्र*
                           दिनांक 12/10/2011
 
1.         तक्रारदारांचे जाबदेणार बँकेच्‍या विमाननगर शाखेमध्‍ये बचत खाते क्र.30941512722 असून ATM कार्डधारक होते. तक्रारदार दिनांक 14/1/2010 रोजी  विमाननगर शाखेच्‍या ATM मध्‍ये सकाळी 10 वा. पैसे काढण्‍यासाठी गेले असता कार्ड स्‍वॅप केल्‍यानंतर रुपये 10,000/- ची मागणी करुनही पैसेही आले नाहीत व 15-20 मिनीटे थांबूनही ट्रानझॅक्‍शन स्‍लीपही आली नाही. नंतर ATM च्‍या जवळील बँकेच्‍या शाखेत जाऊन तक्रारदारांनी श्रीमती योगिता खांडेकर, अकाऊंटंट यांना सर्व हकीकत सांगितली. ATM मशिनमध्‍ये काही प्रॉब्‍लेम असू शकतो असे श्रीमती खांडेकरांनी तक्रारदारांना सांगितले व पासबुक अपडेट करुन मॅन्‍युअली पैसे काढण्‍यास सांगितले. पासबुक अपडेट केले असता रुपये 25,000/- काढल्‍याची नोंद त्‍यात आली.  तक्रारदारांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. शाखाधिकारी यांनी तक्रारदारांना सात दिवसांच्‍या आत पैसे मिळतील असे आश्‍वासन दिले. हेड ऑफिस मधील श्रीमती कांबळे यांच्‍याशी संपर्क साधल्‍यानंतर   खात्‍यातून रुपये 25,000/- काढण्‍यात आलेले आहेत व त्‍या काहीही मदत करु शकत नाहीत असे तक्रारदारांना सांगण्‍यात आले. तक्रारदारांनी दिनांक 27/1/2010 रोजी लेखी तक्रार दिली.  शारदा सेंटर, स्‍वारगेट येथील श्री. बर्डे अथवा श्री. मोरे यांनी तक्रारदारांची तक्रार घेण्‍यास नकार दिला. त्‍यांच्‍या सांगण्‍यावरुन तक्रारदार श्री. कांचन यांना भेटले. नंतर तक्रारदारांनी दिनांक 5/2/2010 रोजी विमानतळ पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार नोंदविली. परत दिनांक 13/2/2010 रोजी जाबदेणारांकडे लेखी तक्रार दिली. दिनांक 14/2/2010 रोजी पोलिसांनी तक्रारदारांना व्हिडीओ क्‍लीप्‍स दाखविल्‍या. परंतू त्‍यात तक्रारदारांनी पैसे काढल्‍याचे दिसून आले नाही. तक्रादारांनी अनेक वेळा जाबदेणारांकडे रकमेची मागणी केली परंतू जाबदेणारांनी रक्‍कम देण्‍याची टाळाटाळ केली. तक्रारदारांना जाबदेणारांचा दिनांक 25/2/2010 चे पत्र मिळाले व तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्‍याचे जाबदेणारांनी आश्‍वासन दिले. पोलिसांनी तक्रारदारांना ए.टी.एम सेंटर मधील दिनांक 14/1/2010 रोजीची व्हिडीओ क्‍लीप्‍स असलेली सी.डी दिली. सदर सी.डी मध्‍ये एका ठिकाणी तक्रारदार ए.टी.एम सेंटर मध्‍ये सकाळी 10.32 वा. गेल्‍याचे दिसते व दुस-या क्‍लीप मध्‍ये तक्रारदारांनी ए.टी.एम सेंटर 10.33 वा. सोडल्‍याचे दिसते. दोन्‍ही क्‍लीप्‍स मधील फुटेज नसल्‍याचे दिसून येते. व्हिडीओ क्‍लीप्‍स स्‍पष्‍ट व पुर्ण नसल्‍याने तक्रारदारांना मान्‍य नाहीत. तक्रारदारांना पैसे मिळाल्‍याचे देखील त्‍यात दिसून येत नाही. जाबदेणा-यांनी दिलेल्‍या ट्रान्‍झॅक्‍शन स्‍लीप मध्‍ये दिनांक 14/1/2010 रोजी 10.28 वा. पैसे काढल्‍याचे दिसून येते. परंतू व्हिडीओ क्‍लीप मध्‍ये 10.28 वा ची क्‍लीपींग नाही. व्हिडीओ क्‍लीपींग वरुन तक्रारदार ए.टी.एम सेंटर मध्‍ये सकाळी 10.32 वा गेल्‍याचे दिसून येते. यावरुन तक्रारदारांना पैसे मिळालेले नाहीत असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे. जाबदेणा-यांनी दिलेली उत्‍तरे तक्रारदारांना मान्‍य नाहीत. म्‍हणून प्रस्‍तूत तक्रार दाखल करुन तक्रारदार जाबदेणारांकडून रुपये 25,000/- परत मागतात, तसेच रुपये 50,000/- नुकसान भरपाई पोटी व इतर अनुषंगिक रकमा मिळून एकूण रुपये 87,750/- व्‍याजासह मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
 
2.    जाबदेणार SBI बँकेनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार दिनांक 14/1/2010 रोजी विमाननगर ए.टी.एम सेंटर मध्‍ये पैसे काढण्‍यासाठी गेले होते, कार्ड स्‍वॅप केले, पासवर्ड एन्‍टर केला हे जाबदेणारांना मान्‍य आहे. परंतू ए.टी.एम मशिनमधून काहीच आले नाही, हे अमान्‍य आहे. तसेच तक्रारदार 10 ते 15 मिनीटे तेथे थांबले होते हे देखील अमान्‍य आहे. तक्रारदार काही सेकंदातच बाहेर आले हे व्हिडीओ फुटेज वरुन दिसून येते असे जाबदेणारांचे म्‍हणणे आहे. बँकेच्‍या शाखाधिकारींनी तक्रारदारांना पैसे परत मिळतील अथवा समस्‍येचे निराकरण करण्‍याबाबत आश्‍वासन दिले नव्‍हते. तक्रारदारांनी स्‍वत:हून खात्‍यातून रक्‍कम काढली होती, त्‍यामुळे ती परत करण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही, जर रक्‍कम त्रयस्‍थ व्‍यक्‍तीने काढली असती तर जाबदेणारांनी तक्रार केलीच असती. जाबदेणारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार श्री.बर्डे अथवा श्री. मोरे, श्री.कांचन यांना भेटलेच नाहीत. तक्रारदारांनी विमाननगर पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार केल्‍याचे जाबदेणार मान्‍य करतात. तक्रारदारांनी दिनांक 13/2/2010 रोजी केलेल्‍या तक्रारीस दिनांक 25/2/2010 रोजी उत्‍तर देण्‍यात आले होते. पोलिसांना व्हिडीओ क्‍लीपींग्‍स दाखविण्‍यात आल्‍या होत्‍या, तक्रारदारांनी काही सेकंदाच ए.टी.एम मशिन सोडले ही त्‍यांची चुक होती. जाबदेणारांच्‍या सेवेत त्रुटी नाही, निष्‍काळजीपणा नाही, मशिन मध्‍ये तांत्रिक बिघाड नाही. जाबदेणारांकडे तक्रारदारांनी रक्‍कम कार्ड मधून काढल्‍याचा कागदोपत्री पुरावा आहे असे नमूद केले. जाबदेणार तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करीत होते परंतू त्‍यास तक्रारदारांनीच काही प्रतिसाद दिला नाही. जाबदेणारांच्‍या सेवेत त्रुटी नाही, म्‍हणून तक्रार नामंजुर करण्‍यात यावी, अशी मागणी जाबदेणार करतात.  
3.    तक्रारदारांनी रिजॉईंडर अॅफिडेव्‍हीट दाखल करुन लेखी जबाब नाकारला.
4.    उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे मंचाने अवलोकन केले. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते दिनांक 14/1/2010 रोजी विमाननगर शाखेच्‍या ATM मध्‍ये सकाळी 10.32 वा. पैसे काढण्‍यासाठी गेले असता कार्ड स्‍वॅप करुनही पैसे आले नाही व त्‍यांनी ATM सेन्‍टर सकाळी 10.33 वा. सोडले. या पुराव्‍यासाठी सी.डी.ची प्रत पोलिसांनी तक्रारदारांना दिलेली आहे. सदर सी.डी तक्रारदारांनी मंचासमोर दाखल केलेली आहे. सदर सी.डी मंचाने पाहिली असता असे दिसून येते की सकाळी 10.24 मि. नंतर 10.33 यावेळेतील रेकॉर्डींग सुस्‍पष्‍ट दिसून येत नसल्‍यामुळे दरम्‍यानच्‍या कालावधीतील व्‍यवहार झाले किंवा कसे काय याबाबत काहीही स्‍पष्‍ट होत नाही. जाबदेणा-यांनी जरी लेखी जबाबाच्‍या पान क्र.5 मध्‍ये मुद्या क्र.25 मधे त्‍यांच्‍याकडे कागदोपत्री पुरावा असल्‍याचे नमूद केलेले असले तरी प्रत्‍यक्षात तशा प्रकारचा पुरावा, अथवा कुठलाही लेखी पुरावा जाबदेणा-यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच जाबदेणार बँकेने त्‍यादिवशी विमाननगर ए.टी.एम सेन्‍टरमध्‍ये किती पैसे भरण्‍यात आले, किती पैसे विड्रॉवल झाले, किती शिल्‍लक राहिले याचा उतारा/स्‍टेटमेंट दाखल केले नाही, कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. जाबदेणारांनी लेखी जबाबात तक्रारदारांना त्‍यांच्‍या समस्‍येचे निराकरण करण्‍यासंदर्भात पाठपुरावा केल्‍याचे नमूद केले आहे, परंतू तसा पुरावा दाखल केलेला नाही. यावरुन जाबदेणारांच्‍या सेवेतील त्रुटी, निष्‍काळजीपणा दिसून येतो. जाबदेणा-यांच्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारदारांना निश्चितच आर्थिक, शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला असणार. म्‍हणून तक्रारदार नुकसान भरपाई पोटी रक्‍कम रुपये 5,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. जाबदेणारांनी जरी लेखी जबाब दाखल केला असला तरी त्‍यावर स्‍वाक्षरी फक्‍त त्‍यांच्‍या वकीलांचीच आहे, वकीलांचा वकालतनामा दाखल करण्‍यात आलेला नाही. बँकेच्‍या अधिकारी/कर्मचारी यांची लेखी जबाबावर स्‍वाक्षरी नाही. लेखी जबाबासोबत कुठलाही कागदोपत्री पुरावा जाबदेणा-यांनी दाखल केलेला नाही. दिनांक 1/9/2010 च्‍या अर्जाद्वारे लेखी जबाबासोबतचे व्‍हेरिफीकेशन व प्रतिज्ञापत्र दाखल करण्‍यास मुदत मागूनही ते दाखल करण्‍यात आलेले नाही. सबब जाबदेणा-यांनी दाखल केलेला लेखी जबाब विचारात घेता येणार नाही असे मंचाचे मत आहे. 
      वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो-
                              :- आदेश :-
1.     तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येते.
2.    जाबदेणार बँकेने नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रुपये 1000/-तक्रारदारांना आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयांच्‍या आत दयावेत.
3.    आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.