निकालपत्र:- (दि.28/01/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्तीवाद ऐकला. सदरची तक्रार तक्रारदारास सामनेवाला यांनी स्विच ओव्हर ऑप्शन चुकीच्या कारणास्तव नाकारलेने दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार हे इचलकरंजी येथील नामवंत दंतवैद्य असून त्यांचा इचलकरंजी येथे दवाखाना आहे. यातील सामनेवाला ही एस.बी.आय.लाईफ इन्शुरन्स कंपनीची कोलहापूरची शाखा असून त्यांचा मुख्य व्यवसाय व उद्देश हा लोकांकडून वेगवेगळया योजनांमध्ये रक्कमा गुंतवणेबाबत मार्गदर्शन करणे व रक्कमा स्विकारुन विमा उतरविणे तसेच सदर योजनेमधील फायदे मिळवून देणे असा असून यातील सामनेवाला हे शाखाधिकारी या नात्याने सर्व व्यवहार ते पाहतात. ब) यातील तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीचे इचलकरंजी येथील इन्शुरन्स अॅडव्हायझर श्री वर्धमान गेबीसे यांनी सामनेवाला कंपनीचे प्लॅनबाबत दिले माहितीवरुन तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीचे ग्रोथ फंडामध्ये दि.30/0/2006 रोजी गुंतवणूक केली. याचा कालावधी तक्रारदार यांचे वय वर्षे 99 पर्यंत असा असून सामनेवाला कंपनीच्या नियमानुसार वार्षिक हप्ता पहिले दोन वर्षे रु.1,50,000/- प्रमाणे व नंतर रु.38,000/- प्रति वर्ष असा आहे. त्याप्रमाणे सामनेवाला यांचे Unit Plus Regular ग्रोथ फंडमध्ये असलेल्या सर्व त्या फायदयाचा व दिले अधिकाराचा वापर करण्याचा अधिकार तक्रारदार यांना आहे. तक्रारदार यांचा कस्टमर आय.डी.नं.10832075 व त्याचा पॉलीसी नं.19008395607 असा असून तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक आहेत. सामनेवाला कंपनीने Unit Plus Regular या प्लॅनमध्ये नमुद केलेप्रमाणे गुंतवणूक केलेली रक्कम युनिट/ग्रोथ फंडमधून इतर फंडमध्ये कधीही(ट्रान्सफर)Swith over करणेबाबत एक वर्षामध्ये चार वेळा मोफत Swith करणेचा अधिकार तक्रारदारास सामनेवाला कंपनीने दिला आहे. तक्रारदार यांनी त्याप्रमाणे कंपनीचे नियमानुसार दि.30/06/2006 रोजी रु.1,50,000/- व दि.05/09/2007 रोजी रु. 1,50,000/- अशी एकूण रक्कम रु.3,00,000/- ग्रोथ फंडमध्ये गुंतवणूक केली होती. शेअर बाजारात चढउतार पाहता सदरची रक्कम ज्याची फंड व्हॅल्यू दि.10/03/2008 रोजी रु.3,37,841/- इतकी होती ती संपूर्ण रक्कम बॉन्ड फंडमध्ये Swith करणेसाठी सामनेवाला कंपनीचे नियमाप्रमाणे असलेला फॉर्म भरुन सदरचा फॉर्म दि.10/03/2008 रोजी सामनेवालांकडे फॅक्सने पाठविला आहे. त्याप्रमाणे फॅक्सही सामनेवालास मिळालेला आहे. त्याप्रमाणे सामनेवालांनी तक्रारदार यांची गुंतवणूक ग्रोथ फंडमधून बॉन्डमध्ये Swith करणे आवश्यक होते. परंतु सामनेवाला यांनी जाणीवपूर्वक तक्रारदार यांची सदर प्लॅनमध्ये असलेली रक्कम ग्रोथ फंडमधून बॉन्ड फंडमध्ये Swith (ट्रान्सफर) केली नाही. क) तक्रारदार यांना सामनेवाला कंपनीचे वार्षिक स्टेटमेंट दि.15/08/2008 रोजी मिळालेनंतर तक्रारदाराची स्विचींग फॉर्मप्रमाणे रक्कम बॉन्ड फंडमध्ये स्विच केली नसलेचे तक्रारदारांना समजून आले. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांना ताबडतोब दि.23/08/2008 रोजी परत कळवूनही त्यास सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर दिले नाही अगर दि.10/03/08 चे स्विचींग फॉर्मप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही. दि.10/3/08 रोजी ग्रोथ फंडचा NAV per Unit रु.20.23 इतका होता व तो दि.07/01/2009 रोजी रु.12.31 इतका झाला. त्याचप्रमाणे दि.10/03/08 रोजी बॉन्ड फंडचा NAV 12.72 होता व तो आज दि.07/1/2009 रोजी रु.14.40आहे. त्यामुळे तक्रारदार यांची रक्कम ग्रोथ फंडात स्विचिंग न केल्यामुळे रु.1,55,211.15 पै. व बॉन्ड फंड न मिळाल्याने रु.44,620.40पै. इतके तक्रारदार यांचे अतोनात नुकसान झाले असून एकूण युनिट व NAV च्या संदर्भात तक्रारदार यांची एकूण रक्कम रु.1,99,831.55पै. इतके आजतागायत नुकसान झालेले आहे. त्यास सामनेवाला हे जबाबदार आहेत. त्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवालांना दि.25/09/2008 रोजी वकीलांमार्फत रजि.नोटीस पाठवली. सदर नोटीसला सामनेवालांनी दि.20/11/2008 रोजी खोटया व बेकायदेशीर मजकूराचे उत्तर दिलेले आहे. सामनेवाला यांनी जाणीवपूर्वक तक्रारदार यांना सेवा देणेत कसूर केला आहे. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. सामनेवालांच्या या कृत्यामुळे तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत मंजूर करुन ग्रोथ फंडात स्विच न केलेमुळे तक्रारदारास झालेले नुकसानीची रक्कम रु.1,55,211.15पै., बॉन्ड फंड न मिळालेमुळे झालेले नुकसानीची रक्कम रु.44,620.40पै. मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- व नोटीस खर्च रु.1,000/- असे एकूण रक्कम रु.2,30,831.55पै. सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ सामनेवाला यांना पाठविलेला स्विचिंग फॉर्म, सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठविलेले नफ्याचे स्टेटमेंट, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेले पत्र, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेची पोच पावती, सदर नोटीसला सामनेवाला यांनी दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.25/01/2010 रोजी डाके किराणा स्टोअर्स यांनी सामनेवाला यांना दिलेले पत्र व सामनेवाला यांनी त्यांना दिलेले लेखी रेकॉर्ड याच्या सत्यप्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. (4) सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार मान्य केले कथनाखेरीज अन्य मजकूर परिच्छेद निहाय नाकारलेला आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात, तक्रारदाराने एस.बी.आय. लाईफ युनीट प्लस पॉलीसी नं.19008395607 घेतलेली होती व ती दि.31/07/2006 पासून प्रभावीत आहे. नमुद पॉलीसी ग्राहकाला त्याचा फंड स्विच करणेचा ऑप्शन होता. सदर ऑप्शननुसार तो ग्रोथ इक्वीटी ऑर बॉन्डमध्ये गुंतवणूक करु शकत होता. मात्र त्यासाठी सामनेवालांना लेखी विनंती करणे जरुरीचे होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने त्याचा फंड स्विच करणेसाठी सामनेवालांच्या कोल्हापूर येथील शाखेस दि.10/03/2008 रोजी फॅक्स पाठविलेला होता. मात्र प्रस्तुतचा फॅक्स (Not legible& Visible) वाचण्यायोग्य नव्हता. त्यामुळे त्याचा अचुक पॉलीसी नंबर व अन्य तपशील सामनेवालांना कळू शकला नाही. त्यामुळे सामनेवाला तक्रारदाराचा फंड स्विच करु शकले नाहीत. त्याची माहिती एजंट वर्धमान गेबीसे यांना कळवली. अशा परिस्थितीत पॉलीसीचा अचुक नंबर व स्विच करणारे व्यक्तीचा ओळख न पटलेने प्रस्तुत फंड सामनेवाला स्विच करु शकले नाहीत. प्रस्तुत फॅक्सची कॉपी दाखल केलेली आहे. यासाठी तक्रारदार जबाबदार आहे. तक्रारदाराने स्विच करणेबाबतची विंनती हार्ड कॉपीमधून दिलेली नाही अथवा स्पष्ट असा फॅक्स पाठवला नाही. सबब प्रस्तुतची तक्रार फेटाळणेस पात्र आहे. यामध्ये सामनेवालांची सेवात्रुटी नाही. सामनेवालांनी स्विच विनंतीची वस्तुस्थिती तक्रारदारास एजंट वर्धमान गेबीसे यांचेमार्फत दिलेली आहे. नमुद अटी व शर्तीप्रमाणे ग्राहकाच्या लेखी विनंती प्राप्त झालेनंतरच फंड स्विच केला जातो. मात्र ग्राहकाच्या सोईसाठी फॅक्समार्फत आलेल्या लेखी विंनती जी स्पष्ट व वाचण्यायोग्य असेल तिचाही विचार केला जातो. मात्र पॉलीसी नंबर अचुक कळला नसलेने फंड स्विच करता आला नाही यासाठी तक्रारदार जबाबदार आहे. तक्रारदाराने दि.23/08/2008 रोजी केलेल्या तक्रारीस दि.25/08/2008 चे पत्राने सामनेवालांनी उत्तर दिलेले आहे. तक्रारदाराने झालेल्या नुकसानीची केलेली मागणी ही शास्त्रीय आधारावर नसून तारखेच्या आधारावर आहे. फंडाची एनएव्ही ही स्थिर नसून बाजारातील परिस्थितीनुसार बदलत राहते. सबब तक्रारदाराने केलेली नुकसानीची मागणी ही चुकीची आहे. सामनेवालांना ती मान्य नाही. सामनेवालांकडून पैसे उकळण्याच्या हेतूने प्रस्तूतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराची कोणतीही आर्थि, मानसिक व शारिरीक नुकसानी झालेली नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वकील नोटीसला दि.25/09/2008 रोजी उत्तर दिलेले आहे. तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही. तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही. सबब प्रस्तुतची तक्रार दाखल करणेचा अधिकार तक्रारदारास नाही. प्रथम दर्शनीच तक्रार फेटाळणेस पात्र आहे. तसेच प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(जी) च्या संज्ञेस पात्र नाही. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नसलेने प्रस्तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ शपथपत्र दाखल केले आहे. त्याचबरोबर पॉलीसी बॉन्ड, तक्रारदाराने फंड स्विच ऑफ करणेसाठी विनंती केलेल्या फॅक्सची सत्यप्रत, तक्रारदाराचे दि.28/08/2008 चे पत्रास दिलेले उत्तर, तसेच टर्म व कंडिशन इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. काय आदेश? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी तक्रारदाराने एस.बी.आय. लाईफ युनीट प्लस पॉलीसी नं.19008395607 घेतलेली होती व ती दि.31/07/2006 पासून प्रभावीत आहे. नमुद पॉलीसी ग्राहकाला त्याचा फंड स्विच करणेचा ऑप्शन होता. सदर ऑप्शननुसार तो ग्रोथ इक्वीटी ऑर बॉन्डमध्ये गुंतवणूक करु शकत होता. मात्र त्यासाठी सामनेवालांना लेखी विनंती करणे जरुरीचे होते. त्याप्रमाणे तक्रारदाराने त्याचा फंड स्विच करणेसाठी सामनेवालांच्या कोल्हापूर येथील शाखेस दि.10/03/2008 रोजी फॅक्स पाठविलेला होता. मात्र प्रस्तुतचा फॅक्स (Not legible& Visible) वाचण्यायोग्य नव्हता. त्यामुळे त्याचा अचुक पॉलीसी नंबर व अन्य तपशील सामनेवालांना कळू शकला नाही. त्यामुळे सामनेवाला तक्रारदाराचा फंड स्विच करु शकले नाहीत. त्याची माहिती एजंट वर्धमान गेबीसे यांना कळवले असलेचे प्रतिपादन केलेले आहे. वादाचा मुद्दा येथेच उपस्थित होतो. सामनेवाला कंपनीने वर नमुद कारणास्तव तक्रारदाराचा फंड स्विच ओव्हर केलेला नाही ही सामनेवालांची कृती योग्य आहे किंवा कसे? याचा विचार करता सामनेवालांनी तक्रारदाराने दि.10/03/2008 रोजी त्याचा फंड स्विच करणेबाबत नियमाप्रमाणे असलेला फॉर्म भरुन सदरचा फॉर्म फॅक्सव्दारे कंपनीस मिळालेला आहे व सदर फॉर्ममध्ये तक्रारदाराने त्याचा आयडी नंबर व पॉलीसी नंबर,स्वत:चे नांव एजंटचा नांव इत्यादी तपशील योग्यरित्या भरला असलेचे नमुद केले आहे. प्रस्तुतचा फॉर्म तक्रारदाराने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. सदर फॉर्मवर वर नमुद माहिती अचुकरित्या भरली असलेचे तसेच नमुद फंड ग्रोथ फंड 100 टक्के बॉन्डफंडमध्ये स्विच करणेचा होता हे निदर्शनास येते. तो फंड स्विच ओव्हर केले नसलेचे तक्रारदारास दि.31/07/2008चे सामनेवालांनी पाठविलेल्या स्टेटमेंटवरुन प्रथमत: समजले. प्रस्तुत स्टेटमेंट दाखल आहे. त्याबाबत तक्रारदाराने दि.23/08/2008 रोजी रितसर सामनेवालांकडे तक्रार दिलेली आहे. सदरची तक्रार मिळालेबाबत दि.25/08/2008 सामनेवालांची कोल्हापूर येथील शाखेचा शिक्का आहे.तसेच दि.25/09/2008 रोजी तक्रारदाराने वकील नोटीस पाठविलेली आहे. प्रस्तुतची नोटीस ही सामनेवालांना मिळाली असलेची पोच प्रस्तुत कामी दाखल आहे. सदर नोटीसला दि.20/11/2008 रोजी सामनेवालांनी उत्तर दिलेले आहे. सदर उत्तरी नोटीसमध्ये वर नमुद केलेप्रमाणे फॅक्स मिळालेचा मजकूर व फंड स्विच ओव्हर केले नसलेचे कारण तसेच त्याची माहिती एजंट वर्धमान गेबीसे यांना दिलेचा मजकूर नमुद केलेला आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराने पुराव्यादाखल स्वत:चे तसेच वर्धमान गेबीसे यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. वर्धमान गेबीसे यांनी तक्रारदार तर्फे साक्षीदार म्हणून दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये ते सामनेवाला कंपनीचा इनशुरन्स अडव्हाईझर म्हणून काम करत असताना त्यांचा इन्शुरन्स अडव्हाईझर नंबर 10165364 असा होता. त्यांनी दिले माहितीवरुन तक्रारदाराने दि.30/06/2006 रोजी गुंतवणूक केली. तक्रारदाराचे वय 99वर्षे असलेने सामनेवाला कंपनीच्या नियमानुसार पहिले दोन वर्ष रु.1,50,000/- व तदनंतर रक्कम रु.38,000/- प्रतिवर्ष असा प्लॅनचा कालावधी होता. दि.31/07/2006 रोजी तक्रारदाराचा अर्ज मंजूर करुन दि.03/06/2006 चे नियमानुसार तक्रारदारास प्लॅन दिला आहे. त्याप्रमाणे युनिट प्लस रेग्युलर ग्रोथ फंडामध्ये असलेल्या सर्व फायदयांचा व अधिकाराचा वापर करणेचा अधिकार तक्रारदारास प्राप्त झालेल आहे. तक्रारदाराचा आय.डी.नं.10832075 असून त्याचा पॉलीसी नंबर19008395607 असा असून तक्रारदार सामनेवालांचा ग्राहक आहे. तक्रारदारास नमुद प्राप्त अधिकारानुसार ज्यांनी सामनेवालां कंपनीस गुंतवलेली रक्कम रु.3,00,000/- व त्याची फंड व्हॅल्यू रु.3,37,841/- दि.10/03/2008 ची होती. त्यानुसार संपूर्ण रक्कम बॉन्ड फंडमध्ये स्विच करणेसाठी तक्रारदाराने फॉर्म भरला व सदरचा फॉर्म फॅक्सने सामनेवाला कंपनीस पाठवला. सदर फॉर्ममध्ये वर नमुद तपशील नोंद केलेला होता. सदरचा फॉर्म सामनेवालांना मिळालेला आहे. सदर फंड स्विच करणेची जबाबदारी सामनेवाला कंपनीची होती. मात्र सामनेवालांनी ती जबाबदारी पार न पाडलेने दि.10/03/2008 रोजी ग्रोथ फंडचा एनएव्ही पर युनीट 20.23 इतका होता व तो दि.07/01/2009 रोजी 12.31 इतका झालेला आहे. तर बॉन्ड फंडचा एनएव्ही 12.72 इतका होता तो 14.40 झालेला आहे. त्यामुळे नमुद रक्कम बॉन्ड फंडात स्विच न केलेमुळे रक्कम रु.1,55,211.15पै; व बॉन्ड फंड न मिळालेमुळे रक्कम रु.44,620.40पै. इतक्या रक्कमेचे नुकसान झालेले आहे. आजतागायत रु.1,99,831.55पै. इतके नुकसान झालेले आहे. त्याची सर्व कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केलेली आहेत तसेच संबंधीत सर्व रेकॉर्ड सामनेवालांकडे उपलब्ध आहे. तक्रारदाराने दि.15/8/2008रोजी मिळालेल्या स्टेटमेंटबाबत दि.23/08/2008 रोजी त्यांचेकडे विचारणा केली होती. त्यावेळी गेबीसे यांनी स्वत: सामनेवाला यांचेशी पत्रव्यवहार केलेला आहे. सामनेवाला कंपनी स्विचींग फॉर्मबाबत दि.11/03/2008 रोजी लेखी पत्राने नंबर अपूर्ण, चुकीचा, न दिसणारा असा असलेचे बोगस पत्र तयार करुन सदरचे पत्र दि.11/03/2008 रोजी गेबीसे यांना पाठवलेचे त्यांना तक्रारदाराची वकील नोटीस मिळालेनंतर प्रथमत: माहिती झाली. अशाप्रकारचे कोणतेही पत्र सामनेवाला कंपनीने श्री गेबीसे यांना दिलेले नव्हते अगर नाही. सदर पत्रामध्ये सामनेवाला कंपनीने संदर्भीय घेतलेले तक्रारदार यांचे दि.31/03/2008 चे विनंती बाबत सदरचे पत्र दि.11/03/2008 रोजी पाठविलेचे दिसून येते. यावरुनच प्रस्तुतचे पत्र हे बोगस, बनावट व खोटे तयार केले असलेचे स्पष्ट दिसून येते. सामनेवाला कंपनीस जरी पॉलीसी नंबर न दिसणारा असला तरी नावावरुन तसेच कस्टमर आयडी तसेच आयए नंबरवरुन सुध्दा संपूर्ण माहिती घेता आली असती मात्र सामनेवाला कंपनीने सदर माहिती न घेता हेतूपुरस्सरपणे तक्रारदार यांचा पॉलीसीमधील 8 क्रमांकाच्या अंकात 5 ऐवजी 6 असा बदल करणेचा प्रयत्न केला असलेचे झेरॉक्स प्रतीवरुन दिसून येते इत्यादी प्रकारचा मजकूर शपथपत्रामध्ये घातलेला आहे. तक्रारदाराने दि.25/01/2010 रोजी दाखल केलेल्या डाके किरणा स्टोअर्स यांनी दि.20/08/2009 रोजी सामनेवाला कंपनीस पाठविलेल्या पत्राचे अवलोकन केले असता पॉलीस हरवल्यामुळे केवळ नावांवरुन डुप्लीकेट कागदपत्रे मागणी केलेली होती व त्याप्रमाणे केवळ नावांवरुन सामनेवालांनी प्रस्तुत डाके यांना सदर माहिती दिलेली आहे हे दाखल सामनेवाला यांनी डाके किराणा स्टोअर यांना दिलेल्या लेखी रेकॉर्डवरुन निदर्शनास येते. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रे तसेच वर्धमान गेबीसे यांचा शपथपत्राचा विचार करता तक्रारदाराने त्यांचा फंड स्विच ओव्हर करणेबाबतचा फॅक्स पाठविलेला होता. मात्र प्रस्तुतचा फॅक्स हा सपष्ट व वाचण्यायोग्य नसलेने नमुद फंड स्विच ओव्हर केला नसलेचे सामनेवालाचे प्रतिपादन तसेच दाखल पत्र विचारात घेता नमुद सामनेवाला कंपनीचे व्यवहार हे संगणीकृत आहेत. सामनेवाला कंपनी इन्शुन्स अॅडव्हाइझर नंबरवरुन तसेच केवळ नावावरुनही नमुद इन्शुरन्स पॉलीसी, आयडी नंबर घेऊ शकली असती व त्याप्रमाणे माहिती उपलब्ध होत असलेचे मे. मंचाचे निदर्शनास आलेले आहे. प्रस्तुत फॅक्स हा स्पष्ट व वाचण्यायोग्य नसलेचे सामनेवाला कंपनीने तक्रारदारास अथवाव इन्शुरन्स अॅडव्हाईझर यांना ताबडतोब कळवलेचे दिसून आलेले नाही. तसेच सामनेवाला यांनी प्रस्तुत फॅक्सची मूळ प्रत दाखल न करता त्याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सामनेवालांवर प्रस्तुतची फॅक्स स्पष्ट वाचण्यायोग्य नसलेचे सिध्द करणेची जबाबदारी होती व त्याप्रमाणे त्यांनी मूळ फॅक्सची प्रत दाखल करावयास हवी होती ती त्यांनी दाखल केलेली नाही. दि.31/07/2008 च्या तक्रारदारास त्याचे स्टेटमेंटवरुन नमुद फंड स्विच ओव्हर केला नसलेचे प्रथमत: माहित झाले. तयानंतर दि.23/08/2008 रोजी सामनेवालांचे कोल्हापूर येथील शाखेमध्ये तक्रारदाराने तक्रार दिलेली आहे ती दि.25/08/2008 रोजी सामनेवालांना प्राप्त झालेली आहे. सदर तक्रारीस तसेच दि.25/09/2008 चे वकील नोटीसला उत्तर दिलेले आहे. सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्येही उत्तर दिलेचे मान्य केलेले आहे. दि.20/11/2008 रोजी सामनेवालांनी तक्रारदारास उत्तर दिलेचे कागद प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सदर उत्तर वकील नोटीसला दिलेले आहे. सदर उत्तरामध्ये दि.11/03/2008 रोजी फॅक्स हा स्पष्ट व वाचण्यायोग्य नसलेचे श्री वर्धमान गेबीसे यांना कळवलेचे नमुद केले आहे. मात्र वर्धमान गेबीसे यांना याबाबत कळवलेचा कोणताही कागद प्रस्तुत प्रकरणी दाखल नाही. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले दि.25/08/2008चे पत्रामध्येही ही बाब नमुद केलेली आहे. मात्र खरोखरच गेबीसे यांना कळवले असते तर त्यांना कळवलेचे पत्र सामनेवालांना दाखल करणे क्रमप्राप्त होते. ते दाखल केलेले नाही. तसेच श्री गेबीसे यांनी असे पत्र पाठवलेचे शपथपत्रात नाकारलेले आहे. याचा विचार करता सामनेवाला हे धांदात खोटे प्रतिपादन करत असलेचे निदर्शनास येते. सामनेवाला हे दि.11/05/2009 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेनंतर तदनंतर दि.10/08/09 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तदनंतर एक दोन तारखा वगळता अन्य तारखांना सामनेवाला सातत्याने गैरहजर आहेत. सामनेवाला यांनी हजर होऊन प्रस्तुत पुरावा खोडून काढणे क्रमप्राप्त असतानाही सामनेवालांनी ते केलेले नाही. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या नमुद फॅक्सचे अवलोकन केले असता प्रस्तुत फॅक्सची मूळ प्रत दाखल केलेली नाही. तर त्याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. तक्रारदाराचे नांव स्पष्ट दिसून येते. तसेच कस्टमर आयडी नंबरही दिसून येतो. सदर नावांवरुन सामनेवाला माहिती घेऊ शकले असते तसेच श्री गेबीसे यांचेकडूनही माहिती घेऊ शकले असते. सामनेवालांनी तसे प्रयत्न केलेचे निदर्शनास आले नाही. सबब तक्रारदाराने नमुद फंड स्विच ओव्हर करणेसाठी लेखी मागणी करुनही सामनेवाला नमुद फंड स्विच ओव्हर न करुन सेवेत गंभीर त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदाराने आपल्या तक्रारीत दि.10/03/2008 रोजी ग्रोथ फंडचा एनएव्ही पर युनीट 20.23 इतका होता व दि.07/01/2009 रोजी तो 12.31 इतका झालेला आहे. तर बॉन्ड फंडचा एनएव्ही अनुक्रमे 12.72 व 14.40 असा आहे. त्याअनुषंगीक प्रस्तुत रक्कम रु.1,55,211.15पै.व रु.44,620.40पै. ची मागणी केलेली आहे. मात्र प्रस्तुत एनएव्ही व्हॅल्यू प्रभावीत असलेबाबत त्यादिवशीची कागदोपत्री पुरावे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले नाहीत. त्यामुळे केवळ तक्रारदाराने केलेल्या कथनावर प्रस्तुत मागणी निश्चित करणे अवघड आहे. सबब त्यादिवशी प्रभावीत असणा-या एनएव्ही व्हॅल्यू प्रमाणे तक्रारदारास रक्कम अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवालांनी दि.10/3/2008 रोजी प्रभावित असणा-या एनएव्ही व्हॅल्यूप्रमाणे रक्कम अदा करावी. 3)सामनेवालांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2,000/-( रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(एक हजार फक्त)
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |