Maharashtra

Nagpur

CC/182/2017

Shri Sunil Santoshrao Gite - Complainant(s)

Versus

SBI General Insurance Co.Ltd., - Opp.Party(s)

Adv. M.V.Gangwal

02 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/182/2017
( Date of Filing : 10 Apr 2017 )
 
1. Shri Sunil Santoshrao Gite
R/o. Sant Tukaram Marg, Savitribai Fule Nagar, Walekar Nagar, Parvati Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SBI General Insurance Co.Ltd.,
Office- 101, 201 and 301, Genshan of Wester Experss Highway, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 069
Mumbai
Maharashtra
2. SBI General Insurance Co.Ltd.,
Branch Office- 148, 3rd floor, Near SBI Bank, Thapar Enclave, Maharajbag Road, Ramdaspeth, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Adv. M.V.Gangwal, Advocate
For the Opp. Party: Adv. Sachin Jaiswal, Advocate
Dated : 02 Jun 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,   तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन ट्रक क्रं. MH 49, 0403 चा विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून दि. 20.08.2014 च्‍या 15.49 पासून ते 19.08.2015 च्‍या मध्‍यरात्री पर्यंतचे कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 0000000002007372 अन्‍वये रुपये 7,00,000/- करिता विमाकृत केले होते. तक्रारकर्त्‍याने सदर वाहनावर श्रीराम ट्रान्‍सपोर्ट फायनान्‍स कंपनीकडून कर्ज घेतले होते. तक्रारकर्त्‍याचा माल वाहतुकिच्‍या कामाचा व्‍यवसाय आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनावर कुशल व अनुभवी वाहन चालक रणजीत रामअभिलास पाल काम करतो. तक्रारकर्त्‍याने दि. 17.08.2015 रोजी संध्‍याकाळी 7.00 वाजता भिवंडी येथून निघून ट्रक मध्‍ये बॅटल (ड्रम) व इतर इलेक्‍ट्रीक सामान अस्‍तराचे कापड इत्‍यादी माल घेऊन नागपूर येथे येत असतांना रस्‍त्‍यात औरंगाबाद ते नागपूर रोडवर मौजा- नांदगाव खंडेश्‍वर पोलिस स्‍टेशन हद्दीत वेंबळा नदीच्‍या पुलावरुन गाडी नदीत कोसळली. ट्रॅक मध्‍ये ब-याच उंचीपर्यंत माल असल्‍यामुळे ट्रक बॅटलच्‍या आधारावर उलटा उभा  राहिला, त्‍यामुळे कॅबिन मध्‍ये असलेल्‍या ड्रायव्‍हरला किरकोळ मार लागला. सदरच्‍या घटनेची माहिती वाहन चालकाने दुस-याच्‍या फोनवरुन तक्रारकर्त्‍याला दिली, त्‍यावेळी तक्रारकर्ता नागपूर येथे नव्‍हता. वाहन चालकाने नेर येथे डॉ. पांडे यांच्‍याकडे उपचार केले व त्‍याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले व औषधी घेतली.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो पंचमढीवरुन नागपूरला परत आला असता त्‍याने विमाकृत वाहनाच्‍या अपघाताची माहिती विरुध्‍द पक्षाला दिली,  तसेच नांदगांव पोलिस स्‍टेशनला ही कळविले.  परंतु त्‍यात चुकिने घटना दि. 18.08.2015 चे सकाळी 4.00 वाजता घडल्‍याचे नमूद केले असता संबंधित पोलिस स्‍टेशनने स्‍थळ परीक्षण करुन गुन्‍हा नोंदवून घेतला. परंतु सदरची चुक लक्षात आल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुनश्‍च नांदगांव पोलिस स्‍टेशनला जाऊन सदरची घटना दि. 19.08.2015 चे 4.00 वाजताचे असल्‍याचे सांगून पंचनाम्‍यात योग्‍य ती दुरुस्‍ती करुन घेतली. त्‍यानंतर दि. 19.08.2015 ला पोलिस ट्राफीक इनचार्ज एस.सी.अशोक पळसगावकर ब.नं. 1176 व पोलिस कॉन्‍स्‍टेबल विलास चव्‍हान ब. न. 1903 हे  घटना स्‍थळावर गेले असता तिथे कुणीही नव्‍हते व त्‍याबाबतची नोंद पोलिस स्‍टेशनला दि. 16.03.2016 रोजी असल्‍याचे कळविले व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना दि. 11.08.2016 ला पत्राद्वारे कळविले होते. तरी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा ट्रक ड्रायव्‍हरचा अपघातात मृत्‍यु झाला  नाही, तसेच घटनेच्‍या तारखेबाबत घेतलेल्‍या आक्षेपावरुन नाकारलेला आहे. करिता तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन अपघातग्रस्‍त ट्रकचा विमा दावा रुपये 7,00,000/- व  ट्रक उचण्‍याकरिता आलेला खर्च व नुकसान भरपाईकरिता रुपये 40,000/-  देण्‍याचा विरुध्‍द पक्षाला आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश व्‍हावा अशी मागणी केली.
  3.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने आपला लेखी जबाब नि.क्रं. 10 वर दाखल केला असून त्‍याने तक्रारकर्त्‍याचा ट्रक क्रं. MH 49, 0403 चा दि. 20.08.2014 ते 19.08.2015 च्‍या मध्‍यरात्री पर्यंतचे कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 0000000002007372 अन्‍वये रुपये 7,00,000/- करिता विमाकृत केले होते हे मान्‍य केले असून तक्रारकर्त्‍याचा वाहन चालक हा भिवंडी ते नागपूर या मार्गावर दि. 17.08.2015 ला गाडी चालवित असल्‍याचे अमान्‍य केले आहे. तसेच सदरचा ट्रक हा औरंगाबाद ते नागपूर या मार्गावर असतांना मौजा- नांदगांव खंडेश्‍वर वेंबळा पोलिस स्‍टेशन हद्दीत पुलावरुन नदीत पडलेला नाही व ट्रकचे कोणतेही नुकसान झाले नसून ड्रायव्‍हरला कोणतीही इजा झालेली नाही.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाने भिवंडी ते नांदगांव खंडेश्‍वर सुमारे 650 कि.मी. हे अंतर अवघ्‍या 9 तासात कसे पूर्ण केले. तसेच वाहन चालक यांच्‍यावर अपघाता दरम्‍यान झालेल्‍या जखमेवर उपचार केलेल्‍या डॉक्‍टरचे उपचाराचे कागदपत्राची मागणी केली. तसेच तक्रारकर्ता हा पंचनाम्‍यातील  चुकिने नोंदविलेल्‍या तारीख व वेळेच्‍या दुरुस्‍तीकरिता नांदगांव खंडेश्‍वर पोलिस स्‍टेशनला गेलेला नाही. पोलिस ट्राफिक पोलिस इनचार्ज एस.सी.अशोक पळसगावकर ब.नं. 1176 व पोलिस कॉन्‍स्‍टेबल विलास चव्‍हान ब.न. 1903 हे घटना स्‍थळावर गेले असता तिथे कुणीही नव्‍हते व त्‍याबाबतची नोंद पोलिस स्‍टेशनला आहे हया सर्व बाबी अमान्‍य केलेल्‍या आहेत. तसेच विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ    होय
  3. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा ट्रक क्रं. MH 49,  0403 चा दि. 20.08.2014 ते 19.08.2015 च्‍या मध्‍यरात्री पर्यंतचे कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 0000000002007372 अन्‍वये रुपये 7,00,000/- करिता विमाकृत केले होते, याबाबत उभय पक्षात वाद नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत वाहनाचा दि. 19.08.2015 च्‍या सकाळी 4.00 वाजता अपघात झाल्‍याबाबतचे पोलिस निरीक्षक, पोलिस स्‍टेशन नांदगांव खंडेश्‍वर, अमरावती ग्रामीण यांनी दिलेला पंचनामा दुरुस्‍ती पत्र दि. 16.03.2016 अभिलेखावर नि.क्रं. 15 (1) वर दाखल आहे. तसेच वाहन चालक रामजीत रामअभिलाष पाल यांच्‍यावर अपघाता दरम्‍यान झालेल्‍या किरकोळ जखमांवर दि. 19.08.2015 ला उपचार केलेल्‍या डॉक्‍टर पी.डी.पांडे यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नि.क्रं. 15(2) वर दाखल केलेले आहे. त्‍याचप्रमाणे दि. 19.08.2015 ला घटनेची माहिती पोलिस स्‍टेशनला मिळाल्‍यानंतर पोलिस स्‍टेशनचे ट्राफिक इनचार्ज अशोक पळसपगार ब.नं. 1106 व पोलिस कॉन्‍स्‍टेबल विलास चव्‍हान, बक्‍कल नं. 1903 हे घटना स्‍थळावर गेले असता तिथे कुणी हजर नसल्‍याचे आढळून आले व वाहन चालक हा नेर गावाला उपचार करण्‍याकरिता गेले होते अशी नोंद स्‍टेशन डायरीला असल्‍याबाबतचे दस्‍तऐवज नि.क्रं. 2(6) वर दाखल आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने वाहन अपघाताबाबतचे फोटोग्राफ अभिलेखावर दाखल केले आहे. यावरुन असे निदर्शनास येते की, दि. 19.08.2015 रोजी सकाळी 4.00 वाजता तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा अपघात झाला व अपघाता दरम्‍यान वाहन चालक श्री.रामजीत रामअभिलाष  पाल यांना किरकोळ जखम झाली होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा तक्रारकर्त्‍याच्‍या वाहन चालकाचा अपघातात मृत्‍यु न झाल्‍याच्‍या कारणाने व अपघाताच्‍या तारखेबाबत आक्षेप घेऊन अतार्किक (illogical) कारणांसाठी नाकारलेला असल्‍याचे आढळून येते व ही विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांची सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

    

करिता खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या अपघातग्रस्‍त ट्रकचा विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 7,00,000/- व त्‍यावर दि. 11.08.2016 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.