Maharashtra

Nagpur

CC/10/775

Mahendra Bhaskarrao Juware - Complainant(s)

Versus

SBI Cards and Payments Services Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Smita Deshpande

31 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/775
 
1. Mahendra Bhaskarrao Juware
Plot No. T-3, Plot No. 49, Narayan Apartment, Bajajnagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Smt. Vandana Mahendra Juware
Flat No. T-3, Plot No. 49, Narayan Apartment, Bajaj Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SBI Cards and Payments Services Pvt. Ltd.
Tower C, D.F. Infity Towers, Block 2, Building-3, DLF Cyber City, Gurgaon
Gurgaon
Hariyana
2. Manager, Manish Bhasin, SBI Cards
Zanshi Rani Chowk, Sanskrutik Sankul, Sitabuldi
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Smita Deshpande, Advocate for the Complainant 1
 ADV.P.R.WAGH, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 31/12/2011)
1.           तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे व मागण्‍या केल्‍या आहे की,  क्रेडीट कार्ड रद्द करुन सर्व देयके रद्द करावी, मानसिक त्रास व आलेला खर्च याबाबत नुकसान भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा.
 
2.          तक्रारकर्त्‍यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांचे गैरअर्जदार यांचे बँकेत पती-पत्‍नी संयुक्‍त खाते असून, तक्रारकर्ते क्र. 1 यांचे अनुपस्थितीमध्‍ये, गैरअर्जदारांचे प्रतिनीधीने तक्रारकर्ती क्र. 2 यांची भेट घेऊन त्‍यांची क्रेडीट कार्डचे आवेदन पत्रावर सही घेऊन दोन एस बी आय क्रेडीट कार्ड निर्गमित केले. तसेच नंतर तक्रारकर्त्‍यांची काहीही मागणी नसतांना रु.6,400/- चा धनाकर्ष पाठविला, त्‍याचे रोखीकरण केले असता, गैरअर्जदारांनी एक वर्षामध्‍ये रु.2,263/- अतिरिक्‍त आकारुन, रु.8,863/- रकमेची वसुली केली. कुठलीही विमा पॉलिसी काढली नसतांना त्‍याबाबत प्रीमीयमची रक्‍कम वळती करीत आहेत. तक्रारकर्त्‍यांनी कधीही क्रेडीट कार्डचा वापर केला नसला तरीही वेगवेगळया रकमेची देयके त्‍यांचेवर आकारण्‍यात आली. याबाबत निवेदन, कायदेशीर नोटीस व विनंत्‍या करुन सदर क्रेडीट कार्ड रद्द करण्‍याबाबत व देय नसलेल्‍या रकमेची मागणी न करण्‍याबाबत कळविले. परंतू या निवेदनांचा कोणताच परिणाम झाला नाही. गैरअर्जदारांनी देयके पाठविणे सुरु ठेवले. तक्रारकर्त्‍यावर यांचा मानसिक त्रास झाला, म्‍हणून त्‍यांनी सदर तक्रार मंचासमोर दाखल केली.
 
3.                     सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 बजावली असता गैरअर्जदार क्र. 1 यांना मागणीनुसार संधी देऊनही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचे उत्‍तराशिवाय कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला. तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नाही व मंचासमोर हजर झाले नाही, म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला.
 
4.          सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आले असता तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. गैरअर्जदार क्र. 1 व 2 गैरहजर. तक्रारकर्त्‍यांनी प्रकरणात जेव्‍हा युक्‍तीवाद सुरु होता, तेव्‍हा मुळ क्रेडीट कार्ड जे गैरअर्जदाकडून त्‍यांना प्राप्‍त झालेले आहे, ते मंचास दर्शविले, त्‍याचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्‍याने सदर क्रेडीट कार्ड हे अद्यापही जसेच्‍या तसे बंद स्थितीत व कार्ड चिकटलेल्‍या अवस्‍थेत होते. तक्रारकर्त्‍याने कार्डचा वापर केला नाही हे त्‍यावरुन स्‍पष्‍ट होते. तसेच तक्रारीत दाखल दस्‍तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता मंचाचे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.
 
 
-निष्‍कर्ष-
5.          तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारातर्फे क्रेडीट कार्डची सेवा प्राप्‍त केल्‍यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदाराचा ग्राहक ठरतो. गैरअर्जदारांना पूरेपूर संधी देऊनसुध्‍दा गैरअर्जदाराने आपले लेखी म्‍हणणे मंचासमोर दाखल केले नाही. त्‍यामुळे मंचाचा असा निष्‍कर्ष आहे की, तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विषद केलेल्‍या परिस्थितीमध्‍ये पूर्णतः तथ्‍य असल्‍यामुळे व ते त्‍यांना मान्‍य असल्‍यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारीला लेखी उत्‍तर दाखल केले नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याची मागणी नसतांना सुध्‍दा क्रेडीट कार्डच्‍या खात्‍यात विमा प्रीमीयम पॉलिसीची रक्‍कम व प्रशासकीय फी रु.3,642/- त्‍यांच्‍या खात्‍यातून वळती केली आहे. प्रत्‍यक्षात तक्रारकर्त्‍याने अशी कुठलीही पॉलिसी गैरअर्जदारातर्फे घेतली नव्‍हती ही गैरअर्जदाराची चूक गैरअर्जदाराच्‍याच निदर्शनास आल्‍यानंतर गैरअर्जदाराने विलंबाने रु.3,642/- ची नोंद मागे घेतली. यावरुनसुध्‍दा हे स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदारांच्‍या सेवेत गंभीर स्‍वरुपाची त्रुटी असून त्‍यांनी अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे व तक्रारकर्त्‍याने वेळोवेळी केलेल्‍या पत्रव्‍यवहारानंतर सुध्‍दा 15.02.2010 ला रु.25,682/- देयक पाठविले. वरील नमूद गैरअर्जदाराच्‍या कृतीवरुन हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्त्‍यास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला आणि तक्रारकर्त्‍याने आपली तक्रार सिध्‍द केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची मागणी मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. उपरोक्‍त नमूद कृतीवरुन गैरअर्जदाराच्‍या कामकाजातील निष्‍काळजीपणा व अरेरावी वर्तन स्‍पष्‍ट होते असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराची सेवेतील त्रुटी व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा केलेला अवलंब या गैरकायदेशीर कृतीला पायबंद घालण्‍यासाठी व सामान्‍य ग्राहकांना गैरअर्जदारांच्‍या कृतीमुळे त्रास होऊ नये म्‍हणून मा. राष्‍ट्रीय आयोगाचे निवाडयानुसार Exemplary cost लावणे संयुक्‍तीक होईल असे मंचाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.25,000/- Exemplary cost गैरअर्जदारांनी देणे संयुक्‍तीक व न्‍यायोचित होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून खालील आदेश.
 
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी एसबीआय कार्ड निर्गमित केल्‍याचे दिनांकापासूनची सर्व देयके तक्रारकर्त्‍यास पुरवावी.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारकर्त्‍याने क्रेडीट कार्डचा       प्रत्‍यक्ष वापर न केल्‍यामुळे क्रेडीट कार्ड अविलंब रद्द करावे.
4)    गैरअर्जदार 1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, गैरअर्जदाच्‍या ग्राहक सेवेतील  त्रुटी व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍यामुळे झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासाकरीता रु.25,000/- Exemplary cost नुकसान भरपाई म्‍हणून द्यावे व      तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.2,000/- गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला द्यावे.
5)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी संयुक्‍तरीत्‍या वा     पृथ्‍थकरीत्‍या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.
 
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.