Maharashtra

Nagpur

CC/118/2017

Mr. Dharmendra Bansilalji Jain - Complainant(s)

Versus

SBI Card - Opp.Party(s)

Adv. Mahendra Limaye

31 Oct 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/118/2017
( Date of Filing : 01 Mar 2017 )
 
1. Mr. Dharmendra Bansilalji Jain
R/o. 44, Prasad Nagar, Near Raviraj Bazar, Mangalmurti Square, Jaytala Road, Nagpur 440036
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. SBI Card
Office- DLF Infinity Towers, Tower C, 10-12th floor, Block -2, Bldg. 3, DLF Cyber City, Gurgaon, Haryana 122002
Gurgaon
Haryana
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:Adv. Mahendra Limaye, Advocate
For the Opp. Party:
Dated : 31 Oct 2018
Final Order / Judgement

(मा. सदस्‍य , श्री. नितिन एम. घरडे यांच्‍या आदेशान्‍वये)

आदेश

 

  1.       तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष  यांच्‍याकडून प्‍लॅटेनियम क्रेडिट कार्डची सेवा घेतली असून त्‍याचा क्रं. 4377 4856 5465 0027 असा आहे. तक्रारकर्ता हा क्रेडिट कार्डच्‍या मदतीने स्‍वतःच्‍या गरजेचे सर्व व्‍यवहार करीत असे. परंतु दि. 02.02.2017 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या वापरत असलेल्‍या मोबाईलवर तसेच त्‍याच्‍या ई-मेल आय.डी.वर एकूण 3 व्‍यवहार रुपये 43,620/- चे झाल्‍याबाबतचा मॅसेज मोबाईल व ई-मेलवर दिसून आले. मुख्‍यतः ते सर्व व्‍यवहार तक्रारकर्त्‍याने स्‍वतः केलेले नव्‍हते व संपूर्ण व्‍यवहार हा भारता बाहेरुन  झाल्‍याबाबतचे आढळले. त्‍यामुळे तक्रारकर्ता यांनी दिनांक 02.02.2017 रोजी सकाळी 8.00ताबडतोब विरुध्‍द पक्ष यांच्‍या टोल फ्री क्रमांक 18001801290 या वर तक्रारकर्त्‍याचा क्रेडिट कार्ड वरील व्‍यवहार थांबविण्‍याकरिता माहिती दिली व त्‍या तक्रारीबाबतचा तक्रार क्रमांक सुध्‍दा तक्रारकर्त्‍याला दि. 02.02.2017 रोजी प्राप्‍त झाला.
  2.       तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, सदर बाबत तक्रारकर्त्‍याने प्रतापनगर पोलिस स्‍टेशन नागपूर येथे दि. 07.02.2017 रोजी तक्रार सुध्‍दा दाखल केली व विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक 14.02.2017 रोजी तक्रारकर्त्‍याचे क्रेडिट कार्ड वरील व्‍यवहार तात्‍पुरते बंद केले. तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या तक्रारीप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्ड संबंधी असणारी गोपनीय माहिती विरुध्‍द पक्ष यांनी दुस-याला पुरविली व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्डच्‍या आधारावर भारता बाहेर पैशाबाबतचा व्‍यवहार करण्‍यात आला ही विरुध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार घडला आहे. करिता तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचात दाखल करुन मागणी केलेली आहे की, विरुध्‍द पक्षानां आदेशित  करण्‍यात यावे की, तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्डच्‍या सहाय्याने झालेला अवैध व्‍यवहाराची रक्‍कम  रुपये 40,000/- त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्षाने वळती करावी. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च  रुपये 90,000/- मिळावे अशी विनंती केलेली आहे.  
  3.      तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीच्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्षाला नोटीस बजाविण्‍यात आली. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी नि.क्रं. 7 वर आपला लेखी जबाब दाखल करुन त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याची सदरची तक्रार ही मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही तसेच तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षा मध्‍ये करारनामा झालेला असून जर एखादा वाद उद्भवल्‍यास त्‍याबाबतचे निराकरण करण्‍याकरिता लवादाकडे प्रकरण दाखल करावे लागते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदरची तक्रार ही खोटी व निराधार आहे. तक्रारकर्त्‍याने मुद्दाम खोटी व बनावट तक्रार विरुध्‍द पक्षाची गनिमा मलीन करण्‍याच्‍या उद्देशाने टाकलेली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या क्रेडिट कार्डवरुन दि.02.02.2017 रोजी झालेला भारता बाहेरील व्‍यवहाराचे एस.एम.एस. त्‍याच्‍या नोंदणीकृत मोबाईल वर व त्‍यांच्‍या ई-मेल आयडीवर ताबडतोब व्‍यवहार हस्‍तांतरण झाल्‍याची माहिती देण्‍यात आली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून कोणतीही सेवेतील त्रुटी अथवा अनुचित व्‍यापार प्रथेचा अवंलब झालेला नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने त्‍याचे क्रेडिट कार्ड तात्‍पुरते बंद करण्‍याकरिता केलेल्‍या विनंतीवरुन ताबडतोब त्‍यांचे क्रेडिट कार्डवरील व्‍यवहार थांबविण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे त्‍यांना उत्‍तम सेवा दिलेली आहे करिता तक्रारकर्त्‍याची खोटी तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी.        
  4.       तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या तक्रारी बरोबर 1 ते 11 दस्‍तावेज दाखल केलेले असून त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यावर झालेल्‍या व्‍यवहाराबाबतची ई-मेलवर पाठविलेल्‍या माहितीची प्रत, अवैध व्‍यवहार झाल्‍याबाबतचा पोलिस स्‍टेशन प्रतापनगर येथे दाखल केलेली तक्रारीची प्रत, बॅंकेत खाता असल्‍याबाबतचा पुराव्‍याची प्रत तसेच खात्‍यावरील झालेल्‍या व्‍यवहाराची प्रत इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले.   
  5.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद इत्‍यादीचे अवलोकन केले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.

                           मुद्दे                                                                   उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?            होय.
  2.  विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी व अनुचित व्‍यापार प्रथेचा

अवलंब केला असल्‍याचे दिसून येते काय ?                नाही  

  1.  काय आदेश?                                  अंतिम आदेशाप्रमाणे  

 

                                                                                                कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ही त्‍याने वापरत असलेल्‍या प्‍लॅटेनियम क्रेडिट कार्डवरील झालेल्‍या अवैध व्‍यवहाराबाबतची आहे व तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष एस.बी.आय.कार्ड यांच्‍याकडून खात्‍यासंबंधी व क्रेडिट कार्ड बाबत गोपनीय माहिती दुस-याला पुरविल्‍याबाबत  दोषारोपन केलेले आहे. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तरात ही बाब नाकारली असून त्‍यांनी नमूद केले आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यावरील क्रेडिट कार्डच्‍या सहाय्याने भारता बाहेरील झालेल्‍या व्‍यवहाराबाबत त्‍याची सूचना ताबडतोब तक्रारकर्त्‍याच्‍या मोबाईलवर व ई-मेलवर दिली. तसेच तक्रारकर्त्‍याने क्रेडिट कार्ड वरील व्‍यवहार थांबविण्‍याची विनंती केल्‍यावर ती सुध्‍दा क्रेडिट कार्डवरील सेवा थांबविली.
  2.       तक्रारकर्त्‍याने दाखल दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाच्‍या एस.बी.आय.क्रेडिट कार्डची सेवा घेत होते. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तसेच दाखल दस्‍तावेजाचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्ता हा क्रेडिट कार्डच्‍या सहाय्याने स्‍वतः भारतात व परदेशी व्‍यवहार नेहमी करायचे असे दिसून येते. मंचाच्‍या सद्सद्विवेकबुध्‍दी प्रमाणे असे लक्षात येते की, क्रेडिट कार्डच्‍या सहाय्याने कोणतेही व्‍यवहार करण्‍याकरिता क्रेडिट कार्ड धारकाचा बॅंक खात्‍यात नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आय.डी.  तसेच व्‍यवहार करतांना क्रेडिट कार्डचा नंबर,सी.व्‍ही.व्‍ही. नंबर व त्‍याचा पिन कोड नबंर नमूद केल्‍या शिवाय व त्‍याचप्रमाणे व्‍यवहार करतांना  ओ.टी.पी. प्राप्‍त झाल्‍या शिवाय व त्‍या ओटीपीचा व्‍यवहारात वापर केल्‍याशिवाय व्‍यवहार पूर्ण होत नाही. परंतु सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीच्‍या अनुषंगाने त्‍यांनी सदरचा व्‍यवहार हा स्‍वतः केला नाही असा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सदर व्‍यवहारात विरुध्‍द पक्ष यांनी कोणत्‍याही प्रकारे त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केल्‍याचे दिसून येत नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच क्रेडिट कार्डच्‍या सहाय्याने भारताबाहेर झालेल्‍या व्‍यवहारापोटी साधारणतः रुपये 43,626/- ही रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात वळती करुन घेण्‍यास पात्र ठरत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येते.

अंतिम आदेश

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2.  उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4.  तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्‍याला परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.