जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. बाबुराव पिता मारोतराव शिंदे . अर्जदार वय 65 वर्षे धंदा शेती रा.वांगी, अड.डि.यू.दराडे ता.जि.परभणी. विरुध्द स्टेट बॅक आफ हैद्राबाद गैरअर्जदार. व्दारा शाखा व्यवस्थापक अग्रीकल्चर डेव्हलपमेंट बॅक अड बी.एन.जोशी नवा मोढा, परभणी. नि.1 वरील आदेश ( दिनांक 19.04.2010 ) राज्यातील शेतक-यानी वित्तीय संस्थाकडून शेती व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीला कर्जमाफी देण्याचे दिनांक 29.05.2008 च्या परिपत्रकातून शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार बॅकेकडे कर्जमाफीची मागणी केली असता कर्जमाफीचा लाभ देण्याचे बाबतीत गैरअर्जदाराने नकार देवून सेवा त्रूटी केली त्याची कायदेशीर दाद मागण्यासाठी अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर दिनांक 30.09.2009 रोजी त्याने लेखी जबाब ( नि.14) सादर करुन अर्जदाराचे कर्जमाफीच्या निर्णयासाठी वरिष्ठाकडे त्याचा प्रस्ताव पाठविलेला असल्याचे लेखी जबाबात नमूद केले आहे. त्याअनुषंगाने अर्जदारातर्फे अड. दराडे यानीही त्यानंतर प्रकरणात नि. 16 चा अर्ज देवून गैरअर्जदाराकडून कर्जमाफीच्या निर्ण्ंयासंबंधी निर्णय होइपर्यंत प्रस्तूत प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती केली होती तो अर्ज मंजूर केल्यानंतर दिनांक 17.12.2009 पासून प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित होते. दरम्यानच्या काळात 24.02.2010 रोजी अर्जदारातर्फे पुरशीस दाखल करुन तडजोडीची बोलणी चालू असल्यामुळे प्रकरणाच्या आदेशासाठी मुदत वाढवून मागितली होती. त्यानंतर गैरअर्जदार बॅकेने प्रकरणात 09.04.2010 रोजी पत्र ( नि.20/1) दाखल करुन अर्जदाराला कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे त्याचेकडे कोणतीही थकबाकी राहीलेली नाही. खाते बंद केले आहे असे पत्रात नमूद केले आहे. त्याची माहिती अर्जदारातर्फे अड. दराडे याना मंचातर्फे दिल्यानंतर अर्जदाराचे सहीने प्रकरण काढून घेत असल्याचे मंचापुढे सांगितले होते परंतू अर्जदार अथवा त्याचे वकिला दोंघापैकी कोणीही आजपर्यंत मंचापुढे हजर झाले नाहीत त्यामुळे नि. 20/1 वरील गैरअर्जदाराच्या पत्रातील वस्तूस्थितीमुळे अर्जदाराला कर्जमाफीचा लाभ गैरअर्जदाराकडून मिळाला असल्यामुळे प्रस्तूतचे प्रकरण निकाली काढण्यात येत आहे. संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. Complaint is disposed of without cost. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |