Maharashtra

Nagpur

CC/96/2015

Shamrav Shalikram Bisan Kadhav - Complainant(s)

Versus

Sawan Automobiles - Opp.Party(s)

Tousif Khan

28 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/96/2015
( Date of Filing : 18 Feb 2015 )
 
1. Shamrav Shalikram Bisan Kadhav
r/o At Kati Post Hardoli Tah Mohadi
Bhandara
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Sawan Automobiles
At post Main Road Kodamedi Tah Mouda
Nagpur
Maharastra
2. Worth Capital Finance Pvt Ltd
6/ab,1st Floor,Pushpakunj Complex Ramdaspeth Nagpur 10
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Nov 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-सुभाष रा. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडुन हिरो मोटोकॉर्प (जुने नाव हिरो हॉन्‍डा) व यामाहा कंपनीचे अधिकृत विक्रेता यांचेकडुन दुचाकी वाहन रुपये ४१,२१५/- इतक्‍या रकमेमध्‍ये खरेदी केले व त्‍याकरीता रुपये १७,०००/- नगदी विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांचेकडे जमा केले व उर्वरीत रक्‍कम रुपये २४,५००/- विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडुन फायनान्‍सवर घेतले व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला अदा केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन रुपये २४,५००/- इतक्‍या रकमेचे कर्ज घेतले होते व त्‍याची परतफेड रुपये १,३०७/- चे एकूण २४ मासिक हप्‍त्‍यामध्‍ये करावयाची होती. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने मार्च २०१० पासुन कर्जाची रक्‍कम भरावयास सुरवात केली. तक्रारकर्ता यांनी सुरवातीपासुन सर्व हप्‍ते विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍या सांगण्‍यावरुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या कार्यालयात खालिलप्रमाणे नगदी जमा केले.
  1.  
  •  

रक्‍कम रुपये

पावती क्रमांक

  1.  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
 

 

  1. तक्रारकर्त्‍याने वाहनाच्‍या कर्जाची रक्‍कम माहे २०१० ते डिसेंबर २०१० दरम्‍यान विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍या कडे रुपये ३१,६३३/- नगदी भरली आहे. अशा प्रकारे तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना वाहन खरेदीपोटी वाहनाची व कर्जाची एकूण रक्‍कम रुपये ५१,६३३/- अदा केली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे जमा केलेली रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यानी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍याकडे जमा केली नाही. तक्रारकर्ता यांनी कर्जाची रक्‍कम मार्च २०१० पासुन २ वर्ष म्‍हणजे २०१२ पर्यंत अदा करावयाची होती परंतु तक्रारकर्त्‍याने संपूर्ण रक्‍कम मुदत संपण्‍यापूर्वीच भरलेली आहे. तक्रारकर्ता यांनी वाहन क्रमांक एम.एच. ३१/डी.डी./८६५६ चे अस्‍सल वाहन नोदनी प्रमाणपञ (Registration Certificate) व वाहनावरील फायनान्‍स केलेल्‍या बॅंकेचे नाव (Hyphothecation) कमी करण्‍याकरीता ना हरकत प्रमाणपञ मागण्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ला भेटला परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी फायनान्‍स चा २ वर्षाचा कालावधी संपल्‍यानंतर वाहन क्रमांक एम.एच. ३१/डी.डी./८६५६ चे अस्‍सल वाहन नोंदणी प्रमाणपञ उपलब्‍ध करुन देण्‍याचे आश्‍वासन तक्रारकर्त्‍याला दिले. तक्रारकर्ता एप्रिल २०१२ ला विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे कार्यालयात गेला तेव्‍हा त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी दिलेल्‍या कर्जाची उर्वरीत रक्‍कम रुपये २०,०००/- परतफेड केल्‍याशिवाय ना हरकत प्रमाणपञ देण्‍यास नकार दिला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला सही करुन दिलेले कोरे धनादेश परत करण्‍याची विनंती केली परंतू विरुध्‍द पक्षाने धनादेश परत केले नाही करीता तक्रारकर्त्‍याने संबंधीत पोलिस स्‍टेशन ला फसवणूकीची तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांच्‍या सूचनेनूसार प्रत्‍येक महिण्‍याला मार्च २०१० ते डिसेंबर २०१० या कालावधीमध्‍ये वाहनाची पूर्ण किंमत फायनान्‍स सह रुपये ५१,६३३/- जमा केली आहे. तक्रारकर्ता यांना पूर्ण रक्‍कम भरेपर्यंत कसलाही उर्वरीत हप्‍ता किंवा दंड भरण्‍यासंबंधी कोणतेही लेखी किंवा तोंडी सूचना विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी दिली नाही. तसेच उर्वरीत रकमेच्‍या वसुलीकरीता कधीही नोटीस दिली नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन रुपये २४,५००/- एवढे कर्ज घेतले होते व व्‍याजासह तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे कडे रुपये ३१,६३३/- जमा केले आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना अस्‍सल वाहन नोंदनी प्रमाणपञ व वाहनावरील फायनान्‍स केलेल्‍या बॅंकेचे नाव कमी करण्‍याकरीता ना हरकत प्रमाणपञ व कोरे धनादेश यांची मागणी करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्ता यांनी दिनांक १९/१२/२०१४ ला विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना कायदेशीर नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना दिनांक १९/१२/२०१४ व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला दिनांक २४/१२/२०१४ ला नोटीस प्राप्‍त झाली. परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी नोटीस ची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्त्‍याने मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना एम.एच. ३१/डी.डी./८६५६ चे अस्‍सल वाहन नोंदणी प्रमाणपञ व वाहनावरील फायनान्‍स केलेल्‍या बॅंकेचे नाव कमी करण्‍याकरीता ना हरकत प्रमाणपञ व कोरे धनादेश तक्रारकर्ता यांना परत करण्‍याचे आदेश द्यावे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे फायनान्‍स चे उरलेले रुपये २०,०००/- किंवा अतिरीक्‍त जमा करण्‍याचे आदेश द्यावे.
  3. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ४०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- देण्‍याचे आदेशित करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे कथनानूसार सदर तक्रारीतील ग्राहक वाद हा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व तक्रारकर्ता यांचेमधील आहे. जोपर्यंत तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडुन कर्जापोटी घेतलेल्‍या रकमेची परतफेड करत नाही तोपर्यंत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हा ना हरकत प्रमाणपञ देणार नाही. विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांनी कोणत्‍याही प्रकारे दोषपूर्ण सेवा तक्रारकर्त्‍याला दिली नाही आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रमांक १ यांचेविरुध्‍द मेंटेनेबल नाही. सदर तक्रार मुदतीनंतर दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खारीज करण्‍यात यावी.
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ कडुन दुचाकी गाडी बजाज डिस्‍कव्‍हर गाडी खरेदी करण्‍याकरीता दिनांक ३०/०१/२०१० रोजी रक्‍क्‍म रुपये २४,५००/- कर्ज घेतले आहे त्‍या कर्जाची परतफेड रुपये १,३०७/- प्रमाणे दिनांक २८/०२/२०१० पासुन नियमीतप्रमाणे एकुण २४ महिण्‍यात परतफेड करायची होती. त्‍याकरीता तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेमध्‍ये करारपञ क्रमांक WCMVSN/2010/2802 करुन घेण्‍यात आले. पण तक्रारकर्त्‍याने करारपञाचे उल्‍लंघन केले आहे. करारणाम्‍याचे अटी व शर्ती नुसार तक्रारकर्त्‍याने नियमीतपणे कर्जाच्‍या रकमेचा भरणा केला नाही व मासिक किस्‍तेचा दरमहा २८ तारखेच्‍या आत भरणा केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा व्‍याज व दंडाचा भागीदार आहे. तक्रारकर्त्‍याला वारंवार मागणी करुन सुद्धा व्‍याज व दंडाची रक्‍कम जमा केली नाही. तक्रारकर्त्‍याने करारात ठरल्‍यानुसार रकमेचा व्‍याजासह भरणा विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांच्‍याकडे वेळोवेळी केला आहे. याची विरुध्‍द पक्ष क्रमांक २ सहमत नाही व हे तक्रारकर्त्‍याने केलेले विधान खोटे आहे. वस्‍तुस्थिती अशी आहे की, दिनांक ३०/०१/२०१० रोजी करारात कबुल केल्‍याप्रमाणे कर्जाचा पहिला हप्‍ता रुपये १३०७/- हा दिनांक २८/०२/२०१० पासुन भरावयाचा होता. परंतु तक्रारकर्त्‍याने कर्जाऊ रकमेचा पहिला हप्‍ता करारात ठरल्‍याप्रमाणे रकमेचा पहिला हप्‍ता वेळीच न भरता कराराचे उल्‍लंघन केले. त्‍यामुळे करारात ठरल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी तक्रारकर्त्‍याला व्‍याज व दंडाची आकारणी केली आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना तक्रारकर्त्‍याकडुन जुर्ले २०१५ पर्यंत रुपये ५०,२९४/- घेणे बाकी आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे  बकाया रक्‍कम व व्‍याज व दंडाचा भरणा करावा व तसे केल्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक २ तक्रारकर्त्‍याचे दुचाकी वाहनाचे ना हरकत प्रमाणपञ देण्‍यास तयार आहे. तक्रारकर्त्‍याने लावलेल्‍या आरोपाप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे त्‍याच्‍या दुचाकी वाहनाचे मुळ कागदपञे, कोरे धनादेश व आगाऊ भरणा केलेली रक्‍कम संबंधीत कुठलीही विचारणा व रितसर अर्ज सुद्धा केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने मुदतबाह्रय कालावधीनंतर विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला दिलेली नोटीस दिनांक १९/१२/२०१४ बेकायदेशीर आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ त्‍यांच्‍या ग्राहकांना त्‍यांच्‍या कर्ज संबंधात सर्व माहिती उपलब्‍ध करते व परिपूर्ण मदत करण्‍यास तयारही राहते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये  लावलेले आरोप पूर्णपणे निराधार आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची कुठलीही व कोणतीही फसवणूक केली नाही व ग्राहकांच्‍या सेवेत कोणतीही ञुटी निर्माण केलेली नाही किंवा अनुचित व्‍यापार पद्धतीचा सुध्‍दा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने केलेली तक्रार व त्‍याने केलेली मागणी खोटी निराधार व गैरजबाबदार असल्‍यामुळे ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक ५ वर दाखल दस्‍तावेज, प्रतिउत्‍तर व लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी दाखल केलेला लेखी जबाब व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी दाखल केलेला लेखी जबाब तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निशानी क्रमांक २७ वर दाखल दस्‍ताऐवज तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्द उपस्थित केले.                                                                        मुद्दे                                                                     उत्‍तर
  4. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                    होय
  5. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                                                                             होय
  6. काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रमांक १ कडुन दुचाकी वाहन रुपये ४१,२१५/- इतक्‍या रकमेत खरेदी केले व त्‍याकरीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना वाहन खरेदीपोटी रुपये १७,०००/- नगदी अदा केले व उर्वरीत रक्‍कम रुपये २४,५००/- विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे मार्फत नागपूर महिला विकास को-ऑपरेटीव्‍ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कडुन वाहन खरेदी करण्‍याकरीता कर्ज उपलब्‍ध करुन घेतले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ५ वर व विरुध्‍दपक्ष क्रमांक २ यांनी निशानी क्रमांक २७ वर दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचे दरम्‍यान नागपूर महिला विकास को-ऑपरेटीव्‍ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कडुन कर्ज उपलब्‍ध करुन देतांना दिनांक ३०/०१/२०१० ला करारणामा करण्‍यात आला. करारणाम्‍यानूसार विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे तक्रारदाराचे गॅरेंटर आहे. तक्रारकर्ता यांना विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी नागपूर महिला विकास को-ऑपरेटीव्‍ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कडुन दुचाकी वाहन खरेदीकरीता कर्ज उपलब्‍ध करुन दिले. तक्रारकर्त्‍याला दुचाकी वाहन खरेदीपोटी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेमार्फत बॅंकेकडुन घेतलेल्‍या कर्जाची रक्‍कम रुपये २४,५००/- ची परतफेड एकूण २४ मासिक हप्‍त्‍यात प्रतिमहा रुपये १,३०७/- प्रमाणे मार्च २०१० ते फरवरी २०१२ या कालावधीमध्‍ये करावयाची होती. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ५ (३,६,९,११,१४ व १५) वर दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे रुपये ३०,९९४/- जमा केले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी निशानी क्रमांक २७ वर दाखल लेख्‍याचे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे रुपये १,३०७/- प्रतिमहा प्रमाणे एकूण रुपये २७,३८८/- इतकी रक्‍कम जमा केली आहे असे एकूण रुपये ५८,३८२/- इतकी रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांच्‍याकडे जमा केली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २  यांच्‍याकडे जमा केलेली रक्‍कम त्‍याला देय असलेल्‍या रक्‍कम रुपये ३१,३६८/- (१३०७×२४) पेक्षा जास्‍त आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या पावतीमध्‍ये रक्‍कम कर्ज हप्‍त्‍यापोटी स्विकारली असे नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने दुचाकी वाहनापोटी उचल केलेल्‍या कर्जाची परतफेड विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांच्‍याकडे केली आहे. कर्ज हप्‍त्‍यापोटी स्विकारलेली रक्‍कम संबंधीत फायनान्‍सरकडे पोहचवण्‍याची संयुक्‍तीक जबाबदारी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांची होती असे दिसून येते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडे तक्रारकर्त्‍याने कर्ज हप्‍तापोटी जमा केलेली रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे जमा केली नसल्‍याचे निदर्शनास येते व त्‍या रकमेचा वापर स्‍वतः केलेला आहे म्‍हणून न्‍यायाच्‍या कारणास्‍तव सदरहु रकमेवर योग्‍य दराने व्‍याज देण्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ जबाबदार आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञास झाला. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या दोषपूर्ण सेवा करीता मानसिक व शारिरीक ञासापोटी भरपाई देण्‍यास विरुध्‍द पक्ष क्रमांक १ जबाबदार आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे वाहन क्रमांक एम.एच.३१४/डी.डी./८६५६ चे अस्‍सल वाहन नोंदणी प्रमाणपञ (रजीस्‍ट्रेशन सर्टीफीकेट) व वाहनावरीत फायनान्‍स केलेल्‍या बॅंकेचे नाव (हायपोथिकेशन) कमी करण्‍याकरीता ना हरकत प्रमाणपञ व कोरे धनादेश तक्रारकर्ता यांना परत करावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडुन वादातील वाहनाचे कर्जापोटी स्विकारलेली रक्‍कम विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांचेकडे तात्‍काळ जमा करावी आणि सदरहु रकमेवर द.सा.द.शे. १० टक्‍के दराने दिनांक २१/१२/२०१० पासून आदेशाच्‍या दिनांकापर्यंत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ला व्‍याज  द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्ता यांना दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेकरीता व त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरीक ञासाकरीता रुपये २०,०००/- द्यावे. तसेच तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावा.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.