Maharashtra

Jalgaon

CC/10/1207

Satishchandra Ingle - Complainant(s)

Versus

Sawada Merchant Co.Society - Opp.Party(s)

Adv.Hemant Bhangale

24 Mar 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/10/1207
 
1. Satishchandra Ingle
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sawada Merchant Co.Society
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:Adv.Hemant Bhangale, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

ग्राहकतक्रारअर्जक्र. 1207/2010
दाखल तारीख 26/08/2010
अंतिम आदेश दि. 24/03/2014
कालावधी 04 वर्ष 06 महिने 26  दिवस
नि. 19                            
 अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहकतक्रारनिवारण न्‍यायमंच,  जळगाव.
 
1. सतिशचंद्र भोजराज इंगळे,                           तक्रारदार 
   उ.व. 67, धंदा – सेवानिवृत्‍त,                       (अॅड.हेमंत अ.भंगाळे)
2. सौ.शकुंतला सतिशचंद्र इंगळे,
   उ.व. 60, धंदा – सेवानिवृत्‍त,
   रा. बुधवार पेठ, साळीवाडा, मु.पो.सावदा,
   ता. रावेर, जि. जळगांव.
                       
                    विरुध्‍द
             
1. सावदा मर्चंट को-ऑप.क्रे.सो.मर्या.                     सामनेवाला
 संभाजी चौक, सावदा,ता.रावेर,जि.जळगांव.              (एकतर्फा)
2. भाऊलाल गंभीर चौधरी  (चेअरमन)
 रा.रायपूर, ता.रावेर, जि.जळगांव.
3. अरुण रघूनाथ कासार, (व्‍हा.चेअरमन)              
 रा.संभाजी चौक, सावदा,ता.रावेर,जि.जळगांव
4. शेखर गजानन वानखेडे,(संचालक)  
  रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
5. नंदकि शोर हिरालाल अकोले, (संचालक) 
   रा. संभाजी चौक, सावदा,ता.रावेर,जि.जळगांव,
6. विनोद मधूकर अकोले,(संचालक) 
   रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
7. विकास अविनाश अकोले, (संचालक) 
 रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
8. श्रीमती लिलाबाई रमेश वाणी, (संचालक)  
   रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
9. सुनिल दत्‍तात्रय चोपडे, (संचालक) 
   रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
10. अरुण शंकर ठोसरे, (संचालक) 
    रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
11. सौ. अलका नंदकिशोर अकोले, (संचालक) 
    रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
12. योगेश अशोक वाणी, (संचालक) 
    रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.
13. रविंद्र रमेश वाणी, (संचालक) 
    रा. संभाजी चौक,सावदा, ता.रावेर, जि. जळगांव.      
 
निकालपत्र अध्‍यक्ष, श्री. मिलींद सा. सोनवणे  यांनी पारीत केले
निकालपत्र
प्रस्‍तुत तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये, दाखल केलेली आहे. 
2.    तक्रारदाराचे म्‍हणणे थोडक्‍यात असे की,  त्‍यांनी सामनेवाला क्र. 1 या पतसंस्‍थेत
मुदत ठेवीत खालील प्रमाणे रक्‍कमा ठेवलेल्‍या आहे.

अ.क्र.
पावती नं.
ठेव दिनांक
रक्‍कम
मुदत
देय दिनांक
व्‍याजदर
1
1790
06/11/2006
45,500/-
1 वर्ष   
02/11/07
12
 
 
एकूण
45,500/-
 
 
 

वरील मुदतठेवीतील रक्‍कमां व्‍यतिरिक्‍त त्‍यांनी सामनेवाल्‍यांकडे बचत खात्‍यात खालीलप्रमाणे रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत.

अनु.क्र.
बचत खाते क्र.
पावेतो
रक्‍कम
1
अे/639
22/02/2010
46,995/-
2
अे/630
22/03/2010
15,852/-

 
3.    तक्रारदारांचे असेही म्‍हणणे आहे की, वरील मुदत ठेवीची मुदत संपल्‍या नंतर त्‍यांनी सामनेवाला क्र. 1 यांच्‍या कडे पैशांची मागणी केली.  मात्र सामनेवाल्‍यांनी त्‍यांना पैसे दिले नाहीत.   सामनेवाला क्र. 2 ते 13  हे सामनेवाला क्र. 1 या पतसंस्‍थेचे चेअरमन व व्‍हा. चेअरमन व संचालक  असल्‍याने सर्व सामनेवाले वरील पैशांच्‍या परताव्‍यासाठी वैयक्‍तीक  व संयुक्तिक  रित्‍या जबाबदार आहेत. त्‍यामुळे वरील मुदत ठेवीतील व बचत खात्‍यामधील रक्‍कमा  व्‍याजासह मिळाव्‍यात. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 10,000/- मिळावा, अशा मागण्‍या तक्रारदारांनी मंचाकडे केलेल्‍या आहेत
4.    तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ नि. 3 लगत मुदतठेवीच्‍या पावत्‍या, बचत खाते क्र. ऐ 639 व ऐ 630 यांच्‍या पासबुकाच्‍या झेरॉक्‍स, सामनेवाल्‍यांकडे मुदत ठेवीतील रक्‍कमा परत मिळण्‍या बाबत केलेला  अर्ज, इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 
5.    सामनेवाला क्र. 1 ते 13 यांना नोटीस मिळूनही ते हजर न झाल्‍याने आमच्‍या पुर्वाधिकारी मंचाने दि. 23/11/2010 रोजी, नि. 18 वर सामनेवाल्‍यांविरुध्‍द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्‍यात यावा असे आदेश केलेले आहेत. 
6.    निष्‍कर्षांसाठीचे मुद्दे व त्‍यावरील आमचे निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत.
            मुद्दे                                            निष्‍कर्ष
1)    सामनेवाल्‍यांनी तक्रारदारांना मुदत ठेव व बचत
खात्‍यातील पैसे परत न करुन सेवेत कमतरता केली काय ?     होय.
2)    प्रस्‍तुत केस मध्‍ये सामनेवाला क्र. 2 ते 13  यांना
चेअरमन, व्‍हा. चेअरमन व संचालक म्‍हणून जबाबदार
धरता येईल काय ?                                            होय.
3)    आदेश काय ?                                       अंतिम आदेशाप्रमाणे
 
                              कारणमिमांसा
7. मुद्दा क्र.1   तक्रारदारांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ठयर्थ दस्‍तऐवज यादी नि. 3 लगत मुदत ठेव पावत्‍यांच्‍या प्रती व बचत खाते क्र. ऐ 639 व ऐ 630 यांच्‍या पासबुकाच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. सदर मुदत ठेवीतील व बचतखात्‍यातील रक्‍कमा सामनेवाल्‍यांनी मुदत संपल्‍यावर मागुनही व्‍याजासह परत केलेल्‍या नाहीत, ही बाब त्‍यांनी सत्‍यप्रतिज्ञेवर सांगितलेली आहे. सामनेवाल्‍यांनी ती बाब नाकारलेली नाही. कोणतीही बँक अथवा पतसंस्‍था मुदत ठेवीत व बचत खात्‍यात ठेवलेल्‍या रक्‍कमा  मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर व मागितल्‍यावर परत करण्‍यास कायदेशीररित्‍या जबाबदार आहेत.  त्‍यामुळे प्रस्‍तुत केस मध्‍ये तक्रारदार ठेवीदारांना वर प्रमाणे नमूद रक्‍कमा न देवून सामनेवाल्‍यांनी सेवेत कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्‍तव मुद्दा क्र. 1 चा निष्‍कर्ष आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
8.  मुद्दा क्र.2 :  प्रस्‍तुत केस मध्‍ये आता सामनेवाला क्र. 2 ते 13 यांची काय जबाबदारी ठरते असा आमच्‍या समोरील प्रश्‍न आहे. नोंदणीकृत प‍तसंस्‍था ही कायदेशीर व्‍यक्‍ती आहे. तिचे सभासद व संचालक हे पतसंस्‍था या कायदेशीर व्‍यक्‍ती पेक्षा भिन्‍न असतात म्‍हणजेच पतसंस्‍थेने केलेल्‍या अनाधिकृत/बेकायदेशीर कृती साठी सभासद व संचालक यांना जबाबदार धरता येत नाही. त्‍यामुळे पतसंस्‍था व सभासद यांच्‍यात एक संरक्षणात्‍मक पडदा (Corporate Or Co-Operative Veil) असतो, असे कायदयाच्‍या परिभाषेत समजले जाते. अशा प्रकारचे संरक्षण मिळण्‍यासाठीच नोंदणीकृत कंपनी अथवा सहकारी संस्‍था स्‍थापन केल्‍या जातात. मात्र सभासद व संचालक यांना वरील संरक्षण ते जर संस्‍थेच्‍या हितासाठी काम करीत असतील तरच मिळत असते. ज्‍यावेळी त्‍यांच्‍या पतसंस्‍थेने दिलेल्‍या संरक्षणचा गैरवापर सभासद अथवा संचालकांकडून केला जातो, त्‍यावेळी हा संरक्षणात्‍मक पडदा दूर सारुन त्‍यांना पतसंस्‍थेच्‍यासाठी वैयक्‍तीक रित्‍या जबाबदार धरण्‍याचे अधिकार न्‍यायालयांना असतात. मा.उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांच्‍या व्दिसदस्‍यीय पीठाने मंदाताई पवार वि. महाराष्‍ट्र शासन व इतर. रिट पिटीशन क्र. 117/2011, दि. 03/05/2011, यात देखील सदर संरक्षाणत्‍मक पडदा ग्राहक न्‍यायालय दूर सारुन संचालक/चेअरमन/व्‍हा.चेअरमन यांना योग्‍य अशा परिस्‍थीतीत जबाबदार धरु शकतील असा निर्वाळा दिलेला आहे. 
9.    तक्रारदारांचे वकील अॅड. श्री. भंगाळे यांनी युक्‍तीवादा दरम्‍यान आशिष बिर्ला वि. मुरलीधर राजधर पाटील, I (2009) C.P.J. 200 N.C.  या केस मध्‍ये मा. राष्‍ट्रीय आयोगाने जिल्‍हा मंचाने संरक्षणात्‍मक‍ पडदा दूर सारत संचालकांना दोषी धरण्‍याचा जळगांव मंचाचा आदेश उचित ठरविलेला आहे, याकडे आमचे लक्ष वेधले. त्‍याचे अवलोकन करता, त्‍यातील निर्वाळा प्रस्‍तुत केसला लागू होतो, असे आमचे मत आहे. त्‍यामुळे पतसंस्‍थेमध्‍ये संचालक मंडळाने केलेल्‍या अफरातफरी, गैरव्‍यवहार व घोटाळे या मुळे जर ठेवीदारांना त्‍यांचे हक्‍काचे पैसे मुदत ठेवीची मुदत उलटल्‍यानंतरही परत मिळत नसतील तर संरक्षणात्‍मक पडदा बाजुस सारुन संचालक मंडळ जबाबदार ठरते, असे आमचे मत आहे.                                                                                                                                                                                                                                             यास्‍तव मुद्दा क्र. 2 चा निष्‍कर्ष आम्‍ही होकारार्थी देत आहोत.
10. मुद्दा क्र. 3 ः  मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्‍कर्ष स्‍पष्‍ट करतात  की, सामनेवाल्‍यांनी तक्रारदारांना मुदत ठेवीतील पावत्‍यांची मुदत संपल्‍यानंतर त्‍या ठेव पावत्‍यातील रक्‍कमा परत केलेल्‍या नाहीत. त्‍याचप्रमाणे बचत खाते क्र. ऐ 639 व ऐ 630 यातील रक्‍कमा देखील त्‍यांनी तक्रारदारांना परत केलेल्‍या नाहीत. सदर बाब सेवेतील कमतरता ठरते. त्‍यामुळे तक्रारदार या सर्व रक्‍कमा व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदारांना त्‍यांच्‍या हक्‍काचे पैसे न मिळाल्‍यामुळे झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी तक्रारदार रु.20,000/- मिळण्‍यास देखील पात्र आहेत, असे आमचे मत आहे. त्‍याचप्रमाणे तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रु. 10,000/- मिळण्‍यासही तक्रारदार पात्र आहेत. यास्‍तव मुदा क्र. 3 च्‍या  निष्‍कर्षापोटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.                   
 
 
आदेश  
  1. सामनेवाल्‍यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीक रित्‍या परिच्‍छेद क्र. 2 मधील तक्‍ता क्र.1 यात नमूद मुदत ठेव रक्‍कमा त्‍यात नमूद तारखेपासून नमूद व्‍याजदराने प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळे पावेतो होणा-या व्‍याजासह अदा कराव्‍यात.
  2. सामनेवाल्‍यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीक रित्‍या परिच्‍छेद क्र. 2 मधील तक्‍ता क्र. 2 यात नमूद बचत खात्‍यातील रक्‍कमा आदेश दिनांकापासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळे पावेतो तत्‍कालीन व्‍याज व्‍याजदराने व्‍याजासह अदा कराव्‍यात.  
  3. सामनेवाल्‍यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना मानसिक व शारिरीक  त्रासापोटी रक्‍कम रु. 20,000/- व अर्जखर्चापोटी रक्‍कम रु. 10,000/-  वैयक्‍तीक व संयुक्‍तीक रित्‍या अदा करावेत.
  4. मुदत ठेवीच्‍या रक्‍कमेपैकी काही रक्‍कम अगर व्‍याज या पुर्वी दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरीत रक्‍कम अदा करावी.
  5. निकालाच्‍या प्रती उभय पक्षांना विना मुल्‍य देण्‍यात याव्‍यात.
 
  गा 
दिनांकः-  24/03/2014.  (श्री. सी.एम.येशीराव)            (श्री.एम.एस.सोनवणे)
                                                  सदस्‍य                                           अध्‍यक्ष   
 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.