निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 858/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः- 11/07/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 07/08/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/08/2009
श्री.रामकृष्ण कथ्थु जोशी,
वय-सज्ञान,धदा- सेवानिवृत्त,
रा.शंकर नगर, प्लॉट नं.19, पिंपळे रोड,
ता.अंमळनेर, जिल्हा जळगाव .......... तक्रारदार
विरुध्द
1. दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा
2. श्री.सुनिल दत्तात्रय चोपडे
वय-सज्ञान,धंदा-चेअरमन,
राहणार दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा संभाजी चौक,सावदा तालुका
रावेर जिल्हा जळगाव
3. श्री.नंदकीशोर हिरालाल अकोले,
वय-सज्ञान,धंदा- व्हा. चेअरमन,
राहणार संभाजी चौक,सावदा तालुका रावेर,
जिल्हा जळगाव
4. सुनिल शांताराम बारी,
वय-सज्ञान,धंदा-मॅनेजर,
दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, शाखा कार्यालय अमळनेर,
5. श्री.रविंद्र रमेश वाणी,
वय-सज्ञान,धंदा’
जनरल मॅनेजर,
दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा संभाजी चौक,सावदा तालुका
रावेर जिल्हा जळगाव
6. सक्रेटरी,
वय-सज्ञान,धंदा-नोकरी,
दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा संभाजी चौक,सावदा तालुका
रावेर जिल्हा जळगाव.
7. श्री.भाऊलाल गंभीर चौधरी,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
8. श्री.अरुण रघुनाथ कासार,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
9. श्री.शेखर गजानन वानखेडे,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
10. श्री.विनोद मधुकर अकोले,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
11. श्री.विकास अविनाश अकोले,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
12. श्री.नितीन रामचंद्र खरे,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
13. सौ.लिलाबाई रमेश वाणी,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
14. सौ.अलका नंदकिशोर अकोले,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
15. श्री.योगेश अशोक वाणी,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
16. श्री.अरुण शंकर ठोसरे,
वय- सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/08/2009 )
( निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री.बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.आर.बी.कुळकर्णी वकील हजर
सामनेवाला क्रं. 1 व 5 तर्फे श्री. दत्तात्रय विनायक भोकरीकर वकील हजर
सामनेवाला क्र. 3,8,14 व 16 तर्फे श्री.दिपक एस.कासार वकील हजर.
सामनेवाला क्रं. 2,4,6,7,9,10 ते 13 व 15 गैरहजर
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | बचत खाते क्रमांक | शिल्लक रक्कम रुपये |
1. | 1312 | 78,455/- |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या बचत खात्यामधील शिल्लक रक्कमेची तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची बचत खात्यातील रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे बचत खात्यातील रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या बचत खात्यातील रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रं. 2,4,6,7,9,10 ते 13 व 15 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केला. तसेच सामनेवाला क्रमांक 3,8,14 व 16 हे वकीलामार्फत हजर झाले तथापी मुदतीत लेखी म्हणणे सादर न केल्याने सामनेवाला क्र.3,8,14 व 16 यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करण्यात आले.
3. सामनेवाला क्रमांक 1 व 5 यांनी वकीलामार्फत हजर होऊन प्रस्तुत प्रकरणी त्यांचे लेखी म्हणणे सादर केलेले आहे. तक्रारदाराचा अर्ज व त्यातील संपुर्ण मजकुर चुकीचा व लबाडीचा असुन सामनेवाला यांना कबुल नाही. तक्रारदाराचे सांगणेवरुनच अल्प व दिर्घ मुदतीच्या रक्कमा देय तारखेनंतर बचत खात्यात वर्ग करण्यात आलेल्या आहेत. सद्य परिस्थितीत सहकार क्षेत्रात उद्भभवलेल्या अडचणींमुळे सहकारी पतसंस्थांना मोठया आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. सामनेवाला संस्था कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करीत असुन कर्ज वसुलीतुन जशी जशी रक्कम प्राप्त होईल तशी तशी तक्रारदारास अदा करण्यास सामनेवाला तयार आहेत. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य करण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 5 यांनी केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच उभयतांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या बचत खात्याचे पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, बचत खात्यावरील शिल्लक रक्कमेची ठेवीदाराने मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यावरील शिल्लक रक्कम त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील बचत खात्यातील रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्र दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची बचत खात्यावरील शिल्लक रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असे निर्देशित करण्यात येते की, बचत खाते क्रमांक 1312 मध्ये जमा असलेली एकुण रक्कम बचत खात्यावरील प्रचलीत व्याज दरानुसार तक्रारदारास देण्यात यावी.
( क ) सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 ते 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कम तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावी अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव