निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1322/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः -18/10/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/07/2009
1. श्री.हेमचंद भोजराज बेंडाळे,
2. सौ.सुशिला हेमचंद बेंडाळे,
रा.मु.पो.वरणगांव, ता.भुसावळ, जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.सावदा,
शाखा-वरणगांव, ता.भुसावळ,
सदरील अर्जाची नोटीस मॅनेजर यांच्यावर बजवावी.
2. मॅनेजर, दि.सावदा मर्चंट को.ऑप क्रेडीट सोसायटी मर्या.सावदा,
शाखाः वरणगांव, ता.भुसावळ.
3. श्री.गंगाधर नामदेव वाणी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
4. श्री.हरी शंकर परदेशी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
5. श्री.राजेंद्र मोतीलाल वाणी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
6. श्री.उल्हास पंडीत गजऋषी,
रा.मु.पो.वरणगांव, ता.भुसावळ, जि.जळगांव.
7. श्री.चारुदत्त गजानन वानखेडे,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
8. श्री.प्रमोदकुमार दामोदर वाणी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
9. श्री.प्रशांत अविनाश अकोले,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
10. श्री.देविदास महादु टोके,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
11. श्री.प्रविण भागतराव दुसाने,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
12. श्री.अरविंद झेंडु वंजारी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
13. श्री.वसंत उखर्डू वाणी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
14. श्री.प्रल्हाद शंकर ठोसरे,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
15. श्री.देवेंद्र पांडुरंग नारखेडे,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
16. श्री.मुरलीधर मोतीलाल वाणी,
रा.मु.पो.वरणगांव, ता.भुसावळ, जि.जळगांव.
17. श्री.अरविंद त्रबंक अकोले,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
18. सौ.सुलोचना प्रदीप वाणी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
19. सौ.वंदना रविंद्र वाणी,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
20. दिपक पंडीतराव रावेरकर,
रा.मु.पो.सावदा, ता.रावेर, जि.जळगांव ............ सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/07/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.पी.ई.नेमाडे वकील हजर.
सामनेवाला क्रं.1,3,6,7,11 ते 13 व 17 ते 19 तर्फे
श्री. दत्तात्रय विनायक भोकरीकर वकील हजर
सामनेवाला क्र.4,5,8,9,14,15 व 20 एकतर्फा.
सामनेवाला क्र.4,5,8,9,14,15 व 20 सामनेवाला यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून त्याचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. तसेच सामनेवाला क्र. 1,3,6,7,11 ते 13 व 17 ते 19 यांनी मुदतीत लेखी म्हणणे सादर न केल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करण्यात आला.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. सदरील सामनेवाला यांचे जळगाव जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी शाखा आहेत. वेगवेगळया प्रकारच्या ठेवी स्विकारणे, त्यावर व्याजदेणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. सामनेवाला ही एक नामांकीत पतसंस्था असल्याने इतर ठेवीदारांप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 6383 | 25.01.2008 | 25,657/- | 11.02.2008 |
2 | 6084 | 25.01.2008 | 4,008/- | 06.02.2008 |
3 | 6085 | 25.01.2008 | 45,761/- | 16.02.2008 |
4 | 6086 | 25.01.2008 | 6,767/- | 07.02.2007 |
5 | 6087 | 25.01.2008 | 47,096/- | 26.02.2008 |
6 | 6088 | 25.01.2008 | 41,405/- | 07.02.2008 |
7 | 6089 | 25.01.2008 | 41,405/- | 07.02.2008 |
8 | 007487 | 21.03.2005 | 25,000/- | 21.04.2008 |
9 | 007488 | 21.03.2005 | 25,000/- | 21.04.2008 |
10 | खाते क्र.321 | 21.03.2005 | 542/- | 21.03.2008 |
11 | खाते क्र.561 | 31.03.2008 | 2,259/- | -- |
वरील ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांच्या रक्कमेची तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम तसेच आर्वतक व बचत खात्यावरील रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करण्यात आल्यानंतर , सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. त्याप्रमाणे सामनेवाला क्रं. 20 हे तक्रारीत हजर होऊन त्यांनी आपला लेखी खुलासा दाखल केलेला आहे .
3. सामनेवाला हे सामनेवाला क्र. 1 व 2 संस्थेचे कधीही संचालक नसल्याचे प्रतिपादन करुन तक्रार अर्जात नमुद व्यवहाराशी त्यांचा काहीएक संबंध नसल्याने तसेच त्यांना प्रस्तुत तक्रारीकामी विनाकारण सामनेवाला क्र.20 म्हणुन सामील केलेले असल्याने तक्रार अर्जातुन वगळण्याची विनंती केलेली असुन सहायक निबंधक, सहकारी संस्था, रावेर यांनी दि.12/6/2009 चे पत्रानुसार सामनेवाला क्र. 20 हे सामनेवाला संस्थेत 1997 मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते तथापी आज अखेर वसुली अधिकारी या पदावर कार्यरत असुन संचालक या पदावर नाहीत असे पत्र दिलेले आहे. सबब मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- तक्रारदाराकडुन नुकसान भरपाई दाखल देऊन सदरील तक्रार रद्य करण्याची विनंती सामनेवाला क्र. 20 यांनी केलेली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे व सामनेवाला यांचा खुलासा याचे अवलोकन केले असता तसेच उभयपक्षकार यांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्कम सामनेवाला यांचे पतसंस्थेत ठेव म्हणून तसेच आर्वतक व बचत खात्यात रक्कम ठेवलेल्या आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
6. मुद्या क्रमांक 2 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे हा ग्राहकाचा वाद आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहेतसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्रा दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे.
7. तसेच सामनेवाला क्र. 20 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यासोबत सहायक निबंधक, सहकारी संस्था, रावेर यांचेकडील दि.12/6/2009 रोजीचे पत्र सादर करुन सामनेवाला क्र. 20 हे आजअखेर संस्थेचे वसुली अधिकारी म्हणुन कार्यरत होते तथापी ते संचालक या पदावर कार्यरत नव्हते असे पत्र सादर केलेले आहे. सबब सामनेवाला क्र. 20 विरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते.
8. उचित सेवा न देणे किंवा सेवेतील त्रुटी / कुचराई याबाबतीत सामनेवाला यांचा विचार करावयाचा झाल्यास , सामनेवाला किंवा त्यांचे कार्यकारी संचालक मंडळ यांची प्राथमिक जबाबदारी ठरते की, त्यांनी तक्रारदार काय किंवा इतर ठेवीदारांच्या ठेवी, संबंधीतांच्या ठेवीच्या मुदती संपल्यानंतर किंवा संपण्याआधी मागणी केल्यास त्या वेळचेवेळेवर परत करणे हे सामनेवाला यांचे नैतिक किंवा आवश्यक कर्तव्य आहे. कारण ठेवीदारांनी सदरील ठेवी हया सामनेवाला किंवा त्यांचे कार्यकारी संचालक मंडळ यांचेवर विश्वास ठेऊन ठेवलेल्या असतात. म्हणून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहेत की, सामनेवाला किंवा त्यांचे कार्यकारी संचालक मंडळ हे स्वतंत्ररित्या व संयुक्तरित्या तक्रारदार यांच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासह परत करणेस जबाबदार आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 20 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने तसेच आवर्तक व बचत खात्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं. 1 ते 20 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1 ते 20 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1 ते 20 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) सदरील तक्रारीच्या आदेशाची पुर्तता मुदतीत न केल्यास सामनेवाला क्रं. 1 ते 20 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986चे कलम 25 व 27 प्रमाणे कार्यवाहीस पात्रा ठरतील.
( ग ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/07/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव