जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 512/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-17/04/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 21/08/2013.
श्री.शशिकांत प्रभाकर चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यवसाय,
रा.टिळकनगर, प्लॉट नं.10, गुजराल पेट्रोल पंपाचे मागे,
जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. श्री.गुजराथी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि,जळगांव,
ता.जि.जळगांव व इतर 13 ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
निकालपत्र
नि.क्र. 1 खालील आदेश व्दाराः श्री.विश्वास दौ.ढवळे, अध्यक्षः तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीकामी जुन,2011 पासुन कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. तक्रारदार व त्यांचे वकील मागील तारखांना सतत गैरहजर. यावरुन तक्रारदारास तक्रार चालविण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार अंतीमरित्या निकाली काढण्यात येते.
ज ळ गा व
दिनांकः- 21/08/2013.
(श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.