ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1065/2009
दाखल दिनांक. 14/07/2009
अंतीम आदेश दि. 24 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
1. श्री.इब्राहीम रुस्तम पिंजारी, तक्रारदार
उ.व. सज्ञान, धंदा – मजूरी , (अॅड. आर.बी.कुलकर्णी)
2. सौ. सुफियाबी इब्राहीम पिंजारी,
उ.व. सज्ञान, धंदा – घरकाम,
रा. तांबेपुरा, अमळनेर,
ता. अमळनेर, जि. जळगांव.
विरुध्द
दि. सावदा मर्चंट को-ऑप केडीट सोसा.मर्या. सामनेवाला
सावदा, मुख्य कार्यालय, सावदा व इतर 6 (कोणीही नाही)
निशाणी क्र. 01 वरील आदेश
मिलींद.सा.सोनवणे, अध्यक्ष – प्रस्तुत केसचे रेकॉर्ड पाहाता असे दिसून येते की, तक्रारदार व त्यांचे वकील दि. 21/07/2011 पासून सातत्याने गैरहजर आहेत. तक्रारदाराने सामनेवाल्यांवर नोटीस बजावणी साठी स्टेप्स घेतलेल्या नाहीत. आज रोजी तक्रारदार व त्यांचे वकीलांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्यांची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी, तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 13 (2) (सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली काढण्यात येतो.
2. खर्चा बाबत कोणताही आदेश नाही.
दि. 24/01/2014 (श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव