(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 3/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून निवासाकरीता मौजा.मोहबाळा, त.सा.कं.31 सुमठाणा, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर येथील सर्व्हे नं.45 या ठिकाणी तयार केलेले ले-आऊट मधील प्लॉट क्र.10 आराजी 1681 चौ.फु. बुक केला होता. अर्जदाराने दि.20.7.1995 रोजी रक्कम रुपये 2000/- गैरअर्जदार यांना देवून प्लॉट बुक केला. त्यानंतर अर्जदाराने उर्वरीत किस्त प्रमाणे वेळोवेळी दि.5.8.95 ते 4.2.1997 पर्यंत एकूण रुपये 7500/- गैरअर्जदाराला दिले आहे. गैरअर्जदाराने प्लॉट विक्री करुन देण्याची तारीख अर्जदारास कधीही सांगितली नाही. अर्जदाराने दि.31.12.2012 ला सदर ले-आऊटचे प्लॉट संबंधाने 7/12 ची सत्यप्रत घेतली. त्यात अर्जदाराचा प्लॉट इतर सौ.मंजुळा प्रल्हाद पारशिवे यांना विक्री केल्याचे समजले. त्यामुळे अर्जदारास शारिरीकव मानसिक ञास झाला. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला सदर प्लॉटची विक्री वेळेवर करुन न दिल्याने सेवेमध्ये न्युनता निर्माण केली. त्यामुळे, गैरअर्जदार यांनी त्याचे ले-आऊट मधील दुसरा प्लॉट आराजी 2000 चौ.फु. ची विक्री करुन देण्याचे आदेश व्हावे किंवा प्लॉटची बाजार मुल्याप्रमाणे रक्कम अर्जदारास देण्याचा आदेश व्हावे. गैरअर्जदारास अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये 1,50,000/- व तक्रार खर्च रुपये 5000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली.
2. अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 7 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.10 नुसार लेखीउत्तर, नि.क्र.11 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार नाकबूल केली आहे. गैरअर्जदाराने लेखी बयाणातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदाराने दि.24.1.1994 च्या विक्रीपञान्वये स.नं.45 मधील परावर्तीत लेआऊट प्लॉट क्र.3, 7, 9, 10 ते 17, 22, 23 आणि 26 ते 28 हे प्लॉट विकत घेतले. दि.27.9.2001 पावेतो प्लॉटची विक्री केली. अर्जदाराने कराराचे पालन केले असते तर त्यास विक्री न करुन देण्यास कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खर्चासहीत खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार शपथपञ, नि.क्र.15 नुसार साक्षदाराचे शपथपञ, नि.क्र.16 नुसार 1 दस्ताऐवज, लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.18 नुसार रिजॉईन्डर शपथपञ व सोबत 1 दस्ताऐवज व नि.क्र.20 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
(2) सदर तक्रार कारण घडल्यास मुदतीत दाखल आहे काय ? : नाही.
(3) अंतिम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून निवासाकरीता मौजा.मोहबाळा, त.सा.कं.31 सुमठाणा, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर येथील सर्व्हे नं.45 या ठिकाणी तयार केलेले ले-आऊट मधील प्लॉट क्र.10 आराजी 1681 चौ.फु. बुक केला होता. अर्जदाराने दि.20.7.1995 रोजी रक्कम रुपये 2000/- गैरअर्जदार यांना देवून प्लॉट बुक केला. त्यानंतर अर्जदाराने उर्वरीत किस्त प्रमाणे वेळोवेळी दि.5.8.95 ते 4.2.1997 पर्यंत एकूण रुपये 7500/- गैरअर्जदाराला दिले आहे, ही बाब अर्जदाराने दाखल नि.क्र.5 वर दस्त क्र.अ-1 ते अ-16 रसीदांवरुन सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराला शेवटची किस्त दि.4.2.1997 रोजी दिली होती. त्यानंतर गैरअर्जदाराने सदर प्लॉटाची विक्री करुन देण्यास टाळाटाळ केली. सबब, मंचाच्या मताप्रमाणे सदर तक्रार दाखल करण्याचे कारण 1997 मध्ये झाले. सदर दाखल करीतावेळी अर्जदाराने कोणताही विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही. सदर तक्रार दि.25.4.2013 रोजी मंचात दाखल करण्यात आली. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24-अ (1 व 2) प्रमाणे सदर तक्रार मुदतीत दाखल करण्यात आली नाही. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 3/12/2014