Maharashtra

Chandrapur

CC/14/24

Rajendrasigh ramsingh Tomar - Complainant(s)

Versus

Sau.Suman V. Pandey - Opp.Party(s)

N.R.Khobragade

21 Jan 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/14/24
 
1. Rajendrasigh ramsingh Tomar
shakti Nagar Durgapur
Chandrapur
Maharshtra
...........Complainant(s)
Versus
1. Sau.Suman V. Pandey
Near Zila Parishad School WCL Colony Shaktinagar Durgapur
Chandrapur
Maharshtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vijay C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. Kalpana Jangade MEMBER
 HON'BLE MRS. Kirti Gadgil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये, कल्‍पना जांगडे (कुटे)मा.सदस्‍या)

(पारीत दिनांक :- 21/01/2015 )

 

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

 

1.    अर्जदाराने आपल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार यांचेकडून निवासी वापराकरीता मौजा.मोहबाळा, त.सा.क्रं.31 सुमठाणा, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर येथील सर्व्‍हे नं.45 ले-आऊट मधील प्‍लॉट क्र.20 आराजी 1937 चौ.फु. प्‍लॉट खरेदी करण्‍याकरीता बुक केला होता.  अर्जदाराने दि.01.03.1995 रोजी रक्‍कम रुपये 2000/- गैरअर्जदार यांना दिले त्‍यानंतर अर्जदाराने प्रतिमहा रु. 300/- प्रमाणे प्‍लॉट बुक केला. त्‍यानंतर अर्जदाराने उर्वरीत रक्‍कम किस्‍ती प्रमाणे वेळोवेळी दि.14.4.95 ते 18.12.1996 पर्यंत एकूण रुपये 8,300/- गैरअर्जदाराला दिले आहे. अर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, उर्वरित प्‍लॉटची किस्‍त देण्‍यासाठी अर्जदार हे गैरअर्जदाराकडे गेले असता प्‍लॉटचे अकृषक झाल्‍यानंतर रक्‍कम घेण्‍यात येईल तसेच प्‍लॉटचे विक्री संबधीचे कागदपञ तयार व्‍हायचे आहे ते तयार झाल्‍यावर आपल्‍याला लेखीपञ देण्‍यात येईल असे सांगितले होते परंतु गैरअर्जदाराने प्‍लॉट विक्री करुन देण्‍याची तारीख अर्जदारास कधीही सांगितली नाही. अर्जदाराने प्‍लॉटची विक्री करुन देण्‍यास विनंती केली परंतु गैरअर्जदार विक्री करुन देण्‍यास टाळाटाळ करीत आहे. त्‍यामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिक ञास झाला.  गैरअर्जदार यांनी अर्जदाराला सदर प्‍लॉटची विक्री वेळेवर करुन न दिल्‍याने अर्जदारासोबत अनुचित व्‍यवहार पध्‍दती अवलंबीली तसेच सेवेमध्‍ये न्‍युनता निर्माण केली.  त्‍यामुळे, अर्जदाराने तक्रार दाखल करुन गैरअर्जदार यांनी त्‍याच ले-आऊट मधील दुसरा प्‍लॉट आराजी 1937 चौ.फु. ची विक्री करुन देण्‍याचे किंवा वादातील प्‍लॉटची बाजार मुल्‍याप्रमाणे रक्‍कम अर्जदारास देण्‍याचा आदेश व्‍हावे.  तसेच गैरअर्जदाराने, अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रक्‍कम रुपये 1,00,000/- व तक्रार खर्च रुपये 10,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी मागणी केली.   

 

 

2.          अर्जदाराने नि.क्र.5 नुसार 11 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्‍द नोटीस काढण्‍यात आले. गैरअर्जदाराने नि.क्र.09 नुसार लेखीउत्‍तर, नि.क्र.10 नुसार 5 दस्‍ताऐवज दाखल केले.

 

 

3.    गैरअर्जदाराने अर्जदाराची तक्रार नाकबूल केली आहे.  गैरअर्जदाराने लेखी बयाणातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदाराने सर्व्‍हे नं. 45 चा ले-आऊट तयार केला नाही तसेच अर्जदारासोबत गैरअर्जदाराने किंवा तिच्‍या तर्फे तिच्‍या पतीने प्‍लॉट विकण्‍यासंबंधी कोणताही व्‍यवहार केलेला नाही. प्‍लॉट क्रं. 20 हा गैरअर्जदाराच्‍या मालकीचा कधीच नव्‍हता व आजही नाही. अर्जदाराने नमुद केलेल्‍या प्‍लॉट क्रं.20 बाबतचे वर्णन खोटे आहे व गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदाराने दि. 24.1.1994 च्‍या विक्रीपञान्‍वये स.नं.45 मधील परावर्तीत लेआऊट प्‍लॉट क्र.3, 7, 9, 10 ते 17, 22, 23 आणि 26 ते 28 हे प्‍लॉट विकत घेतले. अर्जदाराने गैरअर्जदाराला ञास देण्‍याकरीता सदर तक्रार दाखल केली आहे त्‍यामुळे सदर तक्रार खर्चासहीत खारीज होण्‍यास पाञ आहे.

 

 

4.          अर्जदाराने नि.क्र.11 नुसार शपथपञ, नि.क्र.12 नुसार साक्षीदाराचे शपथपञ, नि.क्र.11- अ नुसार 1 दस्‍ताऐवज, नि.क्र.14 लेखी युक्‍तीवाद दाखल केले. गैरअर्जदाराने नि.क्र.13 नुसार रिजॉईन्‍डर शपथपञ व नि.क्र.16 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केलेला आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

           

मुद्दे                                             :  निष्‍कर्ष

 

(1)   अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ?                   :       होय.

 

(2)   सदर तक्रार मुदतीत दाखल केली आहे काय ?                :      नाही.

 

(3)   अंतिम आदेश काय ?                               : अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                         कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

 

5.          अर्जदाराने, गैरअर्जदार यांचेकडे निवासी वापराकरीता मौजा.मोहबाळा, त.सा.कं.31 सुमठाणा, ता.भद्रावती, जि. चंद्रपूर येथील सर्व्‍हे नं.45 मधील ले-आऊट प्‍लॉट क्र.20 आराजी 1937 चौ.फु.खरेदी करण्‍याकरीता बुक केला होता.  अर्जदाराने दि.01.03.1995 रोजी रक्‍कम रुपये 2000/- गैरअर्जदार यांना देवून किस्‍तीप्रमाणे प्‍लॉट बुक केला. त्‍यानंतर अर्जदाराने उर्वरीत रक्‍कम किस्‍ती प्रमाणे वेळोवेळी दि.14.04.1995 ते 18.12.1996 पर्यंत एकूण रुपये 8,300/- गैरअर्जदाराला दिले आहे, ही बाब अर्जदाराने नि.क्र.5 वर दाखल केलेले दस्‍त क्र.अ-1 ते अ-8 पावत्‍या तसेच नि. क्रं.11 अ नुसार दाखल केलेली पावती वरुन स्‍पष्‍ट होते.  म्‍हणून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब  मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

 

 

मुद्दा क्रं. 2 बाबत ः-

 

6.          अर्जदाराने गैरअर्जदाराला शेवटची किस्‍त दि.18.12.1996 रोजी दिली होती.  त्‍यानंतर गैरअर्जदाराने सदर प्‍लॉटची विक्री करुन देण्‍यास टाळाटाळ केली.  सबब, मंचाच्‍या मताप्रमाणे सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण 1996 मध्‍ये झाले.  अर्जदाराने सदर तक्रार दाखल करतांना तक्रारीसोबत कोणताही विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही.  सदर तक्रार दि.27.1.2014 रोजी मंचात दाखल करण्‍यात आली.  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24-अ (1)व (2) नुसार सदर तक्रार मुदतीत दाखल करण्‍यात आलेली नाही.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येत आहे.   

 

मुद्दा क्रं. 3 बाबत ः- 

 

7.    मुद्दा क्रं. 1 व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

अंतीम आदेश

 

            (1)   अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.

(2)   उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.

            (3)   उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

चंद्रपूर

दिनांक -   21/01/2015

 
 
[HON'BLE MR. Vijay C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kirti Gadgil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.