Maharashtra

Dhule

CC/12/170

Smt. Shakuntala Jagnnath Wani - Complainant(s)

Versus

Sau.Pushpa Prakash Amrutkar,Chairman Matoshri Dwarkamai Mahila Sahkari Patsanstha Ltd. - Opp.Party(s)

Shri Sachin Shimpi

30 Aug 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/170
 
1. Smt. Shakuntala Jagnnath Wani
R/o H/No. 1233,Gali No. 4 &5 Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sau.Pushpa Prakash Amrutkar,Chairman Matoshri Dwarkamai Mahila Sahkari Patsanstha Ltd.
R/o 32 Tulshiramnager,Shreyes Colony Backside,near Bhushan Provision,Devpur,Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक –   १७०/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – ०४/१०/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – ३०/०८/२०१३


 

शकुंतला जगन्‍नाथ वाणी


 

उ.वय   वर्षे, धंदा – घरकाम


 

राहणार – घर नं.१२३३, गल्‍ली नं.४ व ५ ची बोळ, धुळे


 

ता.जि. धुळे                                      ................ तक्रारदार


 

        विरुध्‍द


 

मातोश्री द्वारकामाई महिला सहकारी पतसंस्‍था


 

मर्या., धुळे


 

(नोटीसीची बजावणी चेअरमन यांच्‍यावर व्‍हावी)


 

सौ.पुष्‍पा प्रकाश अमृतकर, - चेअरमन


 

रा.३२, तुळशिराम नगर, श्रेयस कॉलनीच्‍या मागे,


 

भुषण प्रोव्‍हीजन जवळ, देवपुर, धुळे                 ............ जाबदेणार


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

(मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)


 

(सामनेवाले तर्फे – गैरहजर)


 

 


 

निकालपत्र


 


 (दवाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस. जैन)


 

तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार  मातोश्री द्वारकामाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती. त्‍याचा तपशील खालील प्रमाणे आहे.


 

 


 

 


 












































































पावती क्रं.

ठेव दिनांक

देय दिनांक

व्‍याज

ठेव

रक्‍कम

देय क्‍कम

३६७३

२०.०६.०८

२०.०७.०९

१०%

२०,०००

२०,००० + व्‍याज

३२०८

०३.०१.०७

०३.०२.०८

१२%

१२,०००

१२,००० + व्‍याज

३०९८

१०.१०.०६

१०.११.०७

१२%

२७,५००

२७,०० + व्‍याज

२२२३

२८.०९.०५

२८.०३.०६

१३%

१२,०००

१२,००० + व्‍याज

३१८१

०९.१२.०६

०९.०१.०८

१२%

२३,३१४

२३,३१४ + व्‍याज

३१९१

१८.१२.०६

१८.०६.०८

१२%

३०,०००

३०,००० + व्‍याज

२२२४

२८.०९.०५

२८.०३.०६

१३%

३६,०००

३६,००० + व्‍याज

३२२८

२०.०१.०७

२०.०२.०८

१२%

,०००

 ९,००० + व्‍याज

१८१३

१२.०३.०५

१२.०४.०६

१३%

२०,३००

२०,०० + व्‍याज

     एकूण रक्‍कम रूपये

,९०,११४/-


 

 


 

२.   तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार  यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडून मुदत ठेव पावतींमधील एकूण रक्‍कम रू.१,९०,११४/- व त्‍यावर रक्‍क्‍म मिळेपर्यंत द.सा.द..शे. १३% व्‍याज देण्‍याचा आदेश व्‍हावा. तसेच शारिरिक व मानसिक त्रासापोटी रू.१०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५,०००/- जाबदेणार यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 


 

 


 

     तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ मुदत ठेव पावत्‍यांच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत.


 

३.   जाबदेणार  यांनी नोटीस स्‍वीकारण्‍यास नकार दिल्‍यामुळे जाबदेणार विरूध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला आहे.


 

४.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विदवान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे जाबदेणार  यांचे ग्राहक आहेत काय ?                होय


 

२.     जाबदेणार  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   होय


 

३.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

४.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून मानसिक


 

त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन


 

मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

५.     अंतिम आदेश ?                                 आदेशाप्रमाणे


 

 


 

विवेचन


 

५.   मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांनी मुदत  ठेव  पावत्‍यांच्‍या  छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहेत. जाबदेणार  यांनी तक्रारदार यांच्‍या  मुदत ठेव पावत्‍यांमधील रक्‍कमा नाकारलेल्‍या नाही. मुदत ठेव पावत्‍यांमधील असलेली रक्‍कम याचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार  यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा क्र.१  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

६.   मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार  यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही जाबदेणार  यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे  उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार चेअरमन मातोश्री द्वारकामाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्‍च न्‍यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढील प्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.


 

 


 

        As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra              Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of   co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.


 

 


 

     वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना रक्‍कम देण्‍यासाठी  वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे जाबदेणार  पतसंस्‍थेचे चेअरमन यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्‍था श्री मातोश्री द्वारकामाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावत्‍यांमधील एकूण  रक्‍कम रू.१,९०,११४/- सदर  आदेश  तारखे  पासून  रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के दरा प्रमाणे व्‍याजासह, अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.३ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावत्‍यांमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार  यांच्‍याकडुन परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्‍था मातोश्री द्वारकामाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुदद क्रं.४ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

. मुद्दा क्र.५- वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

 


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.  जाबदेणार मातोश्री द्वारकामाई महिला सहकारी पतसंस्‍था मर्या., धुळे यांनी सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(१) मुदत ठेव पावतींमध्‍ये असलेली एकूण देय रक्‍कम  रू.१,९०,११४/- (अक्षरी रूपये एक लाख नव्‍वद हजार एकशे चौदा मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.


 

(२) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व


 

 अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.


 

 


 

३.  वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी करावी.  तसेचक्र.मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास, त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

धुळे


 

दि.३०/०८/२०१३


 

          (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                 सदस्‍य           सदस्‍या           अध्‍यक्षा


 

                  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.