Maharashtra

Jalgaon

CC/08/19

Shekh Gayas Shekh Abdual - Complainant(s)

Versus

Sau.Bharati L.Chaudhari And Others - Opp.Party(s)

Adv.Sukhala

19 Nov 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/08/19
 
1. Shekh Gayas Shekh Abdual
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Sau.Bharati L.Chaudhari And Others
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

अति. जिल्हा  ग्राहक तक्रार निवारण न्या(य मंच, जळगाव
       तक्रार क्रमांक  19/2008        तक्रार दाखल  तारीखः- 16/01/2008
          तक्रार निकाल तारीखः- 19/11/2013
        कालावधी 05 वर्ष 10 महिना 03 दिवस
     नि. 19

शेख गयास शेख अब्दुरल,
उ.व.सज्ञान, धंदा- शेती, रा.मु.पो.मेणगांव,घर क्र.145, ता. जामनेर, जि. जळगांव                    -----तक्रारदार                        (अॅड. विजय आर.शुक्ला )
विरुध्द 
सौ.भारती लक्ष्मी कांत चौधरी,
प्रो.प्रा. जळगांव एन्टचरप्रायजेस,
उ.व.सज्ञान, धंदा – व्याेपार,                      -----सामनेवाला
रा. 117/1-अ, जुना नशिराबाद रोड,            (अॅड. सुरजपाल यादव)  
      कालिकामाता मंदिराजवळ, जळगांव, ता.जि.जळगांव.
  नि का ल प त्र

श्री.चंद्रकांत एम.येशीराव, सदस्यःब प्रस्तु त तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला यांनी सदोष सेवा दिल्या च्याए कारणावरुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 नुसार, दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्या त अशी की, तक्रारदार शेतकरी आहे. शेतकामासाठी त्याआस ट्रॅक्टलरची आवश्यिकता होती. त्याअमुळे सामनेवाल्यादकडे ट्रॅक्ट-र खरेदी करण्यााबाबत विचारणा केली. सोनालिका, मॉडेल डी-1/745- III Solis हे ट्रॅक्टशर त्यांेनी सामनेवाल्यांसच्यार सल्यावरुन पसंद केले.  मात्र पुरेसे पैसे नसल्या‍मुळे ते ट्रॅक्ट्र एक दोन महिन्यां नी विकत घेईल, असे त्याीने सामनेवाल्यारस सांगितले असता, कर्ज प्रकरण करुन ट्रॅक्टिर खरेदी करता येईल असे त्याेस सुचविण्यायत आले.  सामनेवाल्यारने सांगितल्यायप्रमाणे कागदपत्रे जुळवून व कर्ज प्रकरण करुन तक्रारदाराने ते ट्रॅक्टगर खरेदी केले.  मात्र 10 ते 12 दिवसातच त्याजत बिघाड झाला.  तक्रार देवूनही सामनेवाल्यां कडून कोणीही दुरुस्ती्स आले नाही.  त्यागमुळे तक्रारदाराने ते ट्रॅक्टझर सामनेवाल्यां कडे सुपूर्द केले. सुमारे एक महिन्यांेनी ट्रॅक्टमर दुरुस्तम करुन मिळेल असे त्याटस सामनेवाल्यानने सांगितले.  तक्रारदाराने 10 ते 12 दिवसांनी ट्रॅक्ट‍रबाबत विचारणा करता  सामनेवाल्यााने त्यादस तुझे कर्ज प्रकरण नामंजूर झालेले आहे. तुला ट्रॅक्टॅर मिळणार नाही, असे सांगत अर्वाच्या भाषेत शिविगाळ करुन दुकानातून हाकलून दिले. 
3. तक्रारदाराचे असेही म्हवणणे आहे की, त्या स आजतागायत ट्रॅक्ट र मिळालेले नाही.  ते सामनेवाल्यारचे ताब्यामत आहे.  सामनेवाल्यााने त्याजच्या्कडून घेतलेल्यान सात को-या चेक्सव पैकी एका चेकमध्ये‍ टॅक्ट‍रची संपुर्ण किंमत टाकून तो अनादरीत करुन घेतलेला आहे.  त्याेबाबत जळगाव येथील न्या‍यदंडाधिकारी वर्ग-1 यांच्यादकडे खटला प्रलं‍बीत आहे. तक्रारदाराने दावा केला की, वरील सर्व बाबी सेवेतील कमतरता ठरतात.  सामनेवाल्यां नी त्या ची फसवणूक केलेली आहे.  त्यावमुळे त्या्ने सामनेवाल्यामस दिलेले सहा चेक्स्ा, रु.50/- चा कोरा स्टॅ्म्पय व ट्रॅक्टंर दुरुस्तीळसह परत मिळावा. तसेच शारिरीक आर्थीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्ज खर्चापोटी रु.5000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने मंचास केलेली आहे.
4. तक्रारदार यांनी आपल्याा मागणीच्यात पृष्ठमयर्थ नि.3 सोबत 9 दस्तर जोडलेले आहे.  नि.2 वर प्रतिज्ञापत्र, नि.12 वर पुराव्या‍चे प्रतिज्ञापत्र, नि.13 वर जळगांव कोर्टातील समरी खटला क्र.3975/06 यामधील नि.3 ची नक्काल दाखल केलेली आहे. नि.16 वर लेखी युक्तीटवाद इ. कागदपत्रे जोडलेली आहेत. तसेच नि.18 वर त्याेने दि.16/7/2006 रोजी शनिपेठ पोलिसांना दिलेला जबाब, सामनेवाले व तिचे पती लक्ष्मी1कांत याने त्यायच रोजी पोलिसांना दिलेले जबाब यांच्याज सत्यह प्रती दाखल केलेल्या1 आहेत.   
5. सामनेवाल्यां नी जबाब नि.14 दाखल करुन प्रस्तु त अर्जास विरोध केला.  त्यांलनी तक्रारदाराची सर्व विधाने नाकारली.  त्यां्च्याु मते तक्रारदाराने दि.2/3/2006 रोजी त्यांाच्यानकडे ट्रॅक्टार खरेदीसाठी चौकशी केली.  त्यांानी सोनालिका, मॉडेल डी-1/745- III Solis हे ट्रॅक्टटर पसंत केले. त्यारने मौजे आमखेडा ता.सोयगाव, जि.औरंगाबाद येथील गट क्र.60 चा 7/12 उतारा व तत्सकबंधीचे कागदपत्रे, मतदार ओळखपत्र, स्वनतःचे पासपोर्टसाईज फोटोग्राफ्स, जानेवारी 2006 चे टेलिफोन बिल, रेशनकार्ड इत्यामदी कागदपत्रे त्यां ना दिली.  त्याोच्यागकडे ट्रॅक्टतरची किंमत रु.4,61,000/- देण्यादसाठी रोख रक्कुम नसल्या ने त्याटने पाचोरा पिपल्सट को-ऑप.बँक लि., शेंदर्णी शाखेचा दि.5/6/2006 रोजीचा चेक त्यां ना‍ दिला.  तो चेक वटेल या अटीवर दि.2/6/2006 रोजीच तक्रारदारास त्यां/नी ट्रॅक्टार दिले.   ते ट्रॅक्टार तक्रारदाराने त्यांरच्या्कडे दुरुस्तीजस आणून दिले नाही.  त्याात कोणताही तांत्रीक बिघाड झालेला नाही.  मात्र केवळ त्यााने दिलेला दि.5/6/2006 रोजीचा रु.4,61,000/- चा चेक न वटल्याामुळे त्यानच्या वर करण्यातत आलेल्याा फौजदारी खटल्याोतून सुटका व्हाावी म्हाणून, तक्रारदाराने प्रस्तु्तचा खोटा अर्ज दाखल केलेला आहे.  तो फेटाळण्याटत यावा. तक्रारदाराने खोटा दावा केला म्हनणून रु.50,000/- नुकसान भरपाई व अर्जाचा खर्च रु.5000/-मिळावेत, अशी सामनेवाल्याघची मागणी आहे.  6. सामनेवाल्यााने जबाब नि.14 सह एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  त्यात तक्रारदाराने वेळोवेळी दिलेल्याब नोटीसा व त्यासस त्यांानी दिलेली उत्तकरे यांच्याा स्थ0ळ प्रती, दि.2/3/2006 चा कॅश/क्रेडीट मेमो, तसेच दि.5/6/2006 रोजीचा पाचोरा पिपल्स् को-ऑप. बँकेचा रु.4,61,000/- चेक क्र.073843 ची झेरॉक्सं प्रत, तसेच न्या्यदंडाधिकारी वर्ग-1 जळगाव यांच्या  न्याायालयात निगोशिएबल इन्स्ट्रु मेंट अॅक्ट  1882 च्यार कलम 138 अन्विये दाखल केलेली तक्रार नि.1 इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  
7. निष्क र्षासाठीचे मुदे व त्याकवरील आमचे निष्कअर्ष कारणांसहीत खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे निष्करर्ष
1. तक्रारदार हा  सामनेवाल्याुचा
ग्राहक आहे काय? होय
2. सामनेवाल्यााने तक्रारदारास सेवा   
पुरविण्यालत कमतरता केलेली आहे काय? नाही
3. आदेशाबाबत काय?             अंतिम आदेशाप्रमाणे        
का र ण मि मां सा
मुद्दा क्र. 1 बाबत 8. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या  कडून दि.02/03/2006 रोजी सोनालिका मॉडेल डी-1-745- III Solis हे ट्रॅक्ट्र विकत घेतले आहे. ट्रॅक्टसर विकत घेतल्याीबाबतचे कोटेशन, बिल व ताबा पावती  नि.3/1, 3/2, 3/3 वर दाखल केले आहे.  ट्रॅक्टकर घेतल्या5ची बाब सामनेवाला यांना मान्यप आहे. त्या3मुळे तक्रारदार ग्राहक आहे किंवा नाही हा मुद्दा विवादीत नाही. यास्ततव मुदा क्र. 1 चा निष्केर्ष आम्ही  होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत  9. सामनेवाल्या ने तक्रारदारास सेवा देतांना कमतरता केली किंवा नाही, हा आमच्यानसमोरचा प्रश्ना आहे.  तक्रारदार व सामनेवाले यांनी केलेले परस्पंरविरोधी दावे-प्रतीदावे वरील परिच्छेवदांमध्ये  नमूद आहेत.  त्याक पार्श्वहभुमीवर काही मुद्दे उपस्थित होतात.  त्यांपैकी पहिला मुद्दा असा की, तक्रारदाराने खरोखर कर्ज प्रकरण करुन ट्रॅक्टपरची किंमत रु.4,61,000/- अदा करावयाची होती की, त्यारपोटी त्याकने दि.5/6/2006 रोजीचा पोस्ट. डेटेड चेक चेक क्र.073843 सामनेवाल्यातस दिलेला होता?  तक्रारदाराचा असा दावा आहे की, त्याचने कर्ज प्रकरण करुन ते पैसे अदा करावयाचे होते.  मात्र कर्ज प्रकरण कोणत्याअ बँकेमार्फत अथवा वित्ती्य संस्थेरमार्फत केले जाणार होते, याचा तपशील तक्रारदाराने दिलेला नाही.  तसेच रु.4,61,000/- एवढया किंमतीच्या  ट्रॅक्ट रचे मोटार वाहन कायद्यान्व ये नोंदणी खर्च तसेच इन्शुारन्सन, रोड टॅक्सक किती होता व तो कोण अदा करणार होते किंवा केला? या बाबी तक्रारदाराने उघड केलेल्याश नाहीत.  याउलट सामनेवाल्यांकनी नि.14 बरोबर दाखल केलेला दि.2/3/2006 रोजीचा कॅश/क्रेडीट मेमो स्पलष्टा करतो की, रु.4,61,000/- पोटी तक्रारदाराने सामनेवाल्यां ना दि पाचोरा को-ऑप.बँक लि.चा दि.5/6/2006 रोजीचा चेक क्र.73843 दिलेला आहे.  त्याा मेमोवर तक्रारदाराची सही देखील आहे. परिणामी सादर पुरावा हे स्पकष्टर करतो की, ट्रॅक्टिरची किंमत कर्ज प्रकरणातून नव्हेय, तर  पोस्टआ डेटेड चेकने अदा करण्या बाबत उभय पक्षांमध्ये, सहमती झालेली होती. 
10. दोन्हीण बाजुने केलेल्याभ परस्प,र विरोधी दाव्याट-प्रतीदाव्यांेमधून दुसरा प्रश्न‍ उपस्थित होतो की, ट्रॅक्टसर मध्येय खरोखर तांत्रीक बिघाड झाला किंवा नाही?  तक्रारदाराने त्याेत बिघाड झाला असा दावा केलेला असला तरी, तो बिघाड नेमका काय होता? याबाबत काहीही सांगितलेले नाही. नाही म्ह टले तरी त्याजने नि.18 लगत दि.16/7/2006 रोजी शनि पेठ पोलिस ठाणे जळगाव यांच्याहसमक्ष सामनेवालीचा नोंदविण्याित आलेल्यां जबाबाची सत्यक प्रत दाखल केलेली आहे.  त्यांत सामनेवालीने असे नमूद केले आहे की, दि.2/3/2006 रोजी ट्रॅक्ट‍र नेल्याेनंतर तक्रारदाराने दिलेला चेक वटला नाही.  ट्रॅक्टीरची किंमत मागितली असता, सुमारे तीन महिने वापरलेले ट्रॅक्टरर परत करुन खरेदी न करण्यादचे सांगून तक्रारदाराने ट्रॅक्टगरचा घसारा केलेला आहे. त्यारचदिवशी तिचे पती लक्ष्मीेकांत याने पोलिसांना दिलेल्याद जबाबात असे नमूद केलेले आहे की, तक्रारदाराने ट्रॅक्टिरमध्येक डिझेल ऐवजी रॉकेल व अन्यि केमिकल टाकून चालविल्याेमुळे त्याीत तांत्रीक बिघाड झाला. त्या्ची वेळोवेळी दुरुस्तीक करुन देवूनही तक्रारदाराने ट्रॅक्टेरच्या  किंमतीपैकी कोणतीही रक्काम आजतागायत त्यां्ना अदा केलेली नाही.  उलट ट्रॅक्टमरचा घसारा करुन ते आमच्यात शो रुमबाहेर आम्हााला न सांगता सोडून देवून तक्रारदाराने त्यां ची फसवणूक केलेली आहे. 
11. सादर केलेला वरील पुरावा हे स्परष्ट‍ करतो की, तक्रारदाराने सामनेवाल्यांंविरुध्दत काहीही दावे केलेले असले तरी त्यारने कर्ज प्रकरण करुन किंवा दिलेला चेक वटवून सामनेवाल्यांाना ट्रॅक्टलरची किंमत अदा केलेली नाही.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज व पुराव्याेचे प्रतिज्ञापत्र यात त्याकने कुठेही तो त्याल ट्रॅक्टंरची किंमत अदा करणार आहे किंवा त्यााची तशी तयारी आहे याबाबत विधान केलेले नाही.  ट्रॅक्टमर विकत घेणा-या व्य क्तीाने त्याेची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे पंरतु दि.2/3/2006 रोजी ट्रॅक्टिर ताब्याात मिळून देखील जून 2006 पर्यंत तक्रारदाराने त्यानची नोंदणी परिवहन विभागाकडे केलेली नाही.  म्हाणजेच ट्रॅक्टिर ताब्यातत घेवूनही त्याकची किंमत अदा न करणे, कायदेशीर कारवाई करतांना देखील ती किंमत अदा करण्याॅची तयारी न दर्शविणे, ट्रॅक्टपर ताब्याशत ठेवूनही सुमारे तीन महिने विना नोंदणी ते ट्रॅक्टतर बेकायदेशीररित्याा वापरणे, अशा प्रकारची वर्तणूक तक्रारदाराने केलेली आहे.  सादर पुरावा या बाबी स्पीष्टरपणे अधोरेखीत करतो. आमच्याच मते तक्रारदाराची ही वर्तणूक कायद्यास धरुन नाही.  त्याटमुळे ती न्याणयसंगत होवु शकत नाही.  कायद्याची मदत मागणा-या व्याक्तीाने कायदेशीर बाबींचे पालन करणे किंवा तशी तयारी दर्शविणे, ही पुर्व अट असते. तक्रारदाराने त्याीचीच पुर्तता केलेली नाही.  परिणामी, सामनेवाल्यां नी तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केलेली नाही, असे आमचे मत आहे.  यास्त व मुद्दा क्र.2 चा निष्कार्ष आम्हीच नकारार्थी देत आहोत.  
मुद्दा क्र. 3 बाबत
12. मुद्दा क्र.1 चा निष्क र्ष होकारार्थी  व मुद्दा क्र.2 चा नकारार्थी दिलेला आहे,  ही बाब स्पाष्टह करते की, तक्रारदार व सामनेवाले यांच्या त जरी ट्रॅक्ट र खरेदी विक्रीच्यात संदर्भात व्यावहार झाला, तरी, तक्रारदाराने सामनेवाल्याेस ट्रॅक्टनरची किंमत अदा केलेली नाही  किंवा तशी तयारी आज देखील त्या ने दाखवलेली नाही. सुमारे तीन महिने ते ट्रॅक्टंर वापरून ते त्या ने सामनेवाल्यां्च्यााकडे सोडून दिलेले आहे.  तीन महिने त्यामची नोंदणीदेखील केलेली नाही.  आजदेखील कोणतेही पैसे न भरता त्याास ते ट्रॅक्ट र परत हवे आहे.  तक्रारदाराचा हा प्रवित्रा विधी व न्याीयसंगत नाही. सामनेवाल्यांनी तक्रारदारास सेवा देतांना कोणतीही कमतरता केलेली नाही, असे आमचे मत आहे. परिणामी तक्रारदाराची तक्रार फेटाळण्याेस पात्र आहे. प्रस्तुवत केसच्यास फॅक्ट.स् विचारात घेता उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसण्यारचा आदेश न्याेयोचित ठरेल. यास्ततव मुद्दा क्र.3 च्याट निष्कउर्षापोटी आम्ही् खालील आदेश देत आहोत.                                    आ  दे  श

1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज रदद् करण्यायत येत आहे.

2. उभयपक्षांनी आपआपला खर्च सोसावा.

3. निकालपत्राच्याआ प्रती उभय पक्षांस विनामुल्यत देण्यात याव्याचत.

 

 

                                                        (मिलिंद.सा.सोनवणे)
                                                         अध्येक्ष


                                                    (सी.एम.येशीराव)            
                                                        सदस्या
जळगाव
दिनांकः-19/11/2013
  

 

 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.