आदेश (पारीत दिनांक : 27 फेब्रुवारी, 2012 ) श्री रामलाल भ.सोमाणी, मा.अध्यक्ष यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा,1986 चे कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. त.क. यांची प्रतिज्ञालेखावरील मुख्य तक्रार अशी आहे की, ते देवळी, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथे आपले कुटूंबियां समवेत राहतात. यातील वि.प.यांचा जमीनीचे ले आऊट पाडून भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे.
CC-101/2011 2. त.क.यांना भूखंड विकत घ्यावयाचा असल्याने त्यांनी वि.प.यांचेशी संपर्क साधला असता, देवळी रोड वरील सावंगी मेघे येथील ले आऊटमधील भूखंड क्रं 14 विकत घ्यावयाचा रुपये-1.00 लक्ष किंमतीचा सौद्या त.क.यांनी वि.प.यांचेशी केला. सदर भूखंड मौजा सावंगी मेघे, मौजा नं.138, शेत सर्व्हे क्रं 82/1 जुना (नविन क्रं 269 व 270) ता.जि.वर्धा मधील असून भूखंडाचे क्षेत्रफळ 1775.40 चौरसफूट असे होते.
3. सदर सौद्यापोटी त.क.यांनी दिनांक 27.01.2005 रोजी ईसारा दाखल भूखंडाची एकूण किंमत रुपये-1.00 लक्ष पैकी, नगदी रुपये-40,000/- वि.प.यांना दिले, त्यानुसार रुपये-20/- च्या स्टॅम्पपेपरवर साक्षदार समक्ष ईश्वरचिठठी वि.प.यांनी करुन दिली. त्यानंतर भूखंडाचे उर्वरीत रकमे पैकी रुपये-20,000/- त.क.यांना दिनांक 28.02.2005 पर्यंत व उर्वरीत रक्कम रुपये-20,000/- भूखंड खरेदीचे वेळी वि.प.यांना द्यावयाचे ठरले. खरेदीचा दिनांक 30.03.2005 रोजी किंवा सदर ले आऊटला अकृषक परवानगी मिळाल्या नंतर निश्चीत करण्यात आला. अशाप्रकारे त.क. हे वि.प.चे ग्राहक ठरतात. 4. भूखंडापोटीची उर्वरीत रक्कम त.क.यांनी दिनांक 12.03.2005 रोजी रुपये-40,000/- व दिनांक 10.08.2005 रोजी रुपये-20,000/- वि.प.यांचे मागणी नुसार दिली व वि.प.यांनी सदर रक्कम मिळाल्या बाबत ईसारचिठठीवर स्वतः लिहून दिले व स्वाक्षरी केली. त्यानंतर त.क.यांनी अकृषक परवानगी बाबत वि.प.यांना विचारणा केली असता, लवकरच तारीख कळवून विक्री करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही वेळोवेळी अशीच उत्तरे वि.प.यांनी दिलीत व केवळ वि.प.ने दिलेल्या आश्वासनांवर त.क.यांनी विश्वास ठेवला. परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे वि.प.यांना रजिस्टर नोटीस दिली असता, नोटीस मिळूनही वि.प.यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही.
5. त.क.यांचे असेही म्हणणे आहे की, संबधित ग्राहकांची रक्कम वि.प.व्यवसायात वापरतात. अशाप्रकारे आज पर्यंत वि.प.यांनी ईसारचिठठी नुसार भूखंडाची खरेदी त.क.चे नावे करुन न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. अशाप्रकारे जो पर्यंत वि.प.त.क.यांचे नावे भूखंडाची विक्री करुन देत नाही, तो पर्यंत प्रस्तुत तक्रारीचे कारण हे सदोदीत घडत आहे. CC-101/2011 6. त.क.यांनी वकिला मार्फत दिनांक 19.07.2011 रोजी वि.प.यांना रजिस्टर नोटीस पाठवून भूखंडाची विक्री करुन देण्याची मागणी केली परंतु योग्य कार्यवाही केली नाही वा उत्तरही दिले नाही. म्हणून शेवटी प्रस्तुत तक्रार वि.जिल्हा न्यायमंचात दाखल करावी लागल्याचे त.क.नमुद करतात. त.क.असेही नमुद करतात की, वि.प.यांनी वेळीच भूखंडाची विक्री करुन दिली असती तर त्यांना त्याच वेळी घर बांधता आले असते. आता बांधकाम साहित्याचे दर सुध्दा वाढलेले आहेत व त्यानुसार ते वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. 7. त.क.यांनी विनंती कलमा मध्ये, त.क.ला वि.प.यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. वि.प.यांनी इसारचिठठी नुसार मौजा सावंगी मेघे येथील भूखंड क्रं 14 ची रजिस्टर विक्री त.क.चे नावे करुन देउन, भूखंडाचा ताबा देण्याचे आदेशित व्हावे. त.क.यांना झालेल्या मानसिक, शारिरीक, आर्थिक व बांधकाम साहित्या मधील वाढीव किंमतीपोटी रक्कम रुपये-50,000/- नुकसान भरपाई वि.प.कडून देण्याचे आदेशीत व्हावे. तसेच उपरोक्त नमुद रकमेवर तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याज वि.प.कडून देण्याचे आदेशित व्हावे, अशी प्रार्थना केलेली आहे. 8. प्रस्तुत प्रकरणात वि.जिल्हा न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने यामधील वि.प.यांचे नाव व पत्त्यावर नोटीस पाठविली असता “ Unclaimed” या पोस्टाचे शे-यासह पॉकिट परत आले व ते अभिलेखावर दाखल आहे. म्हणून वि.प.विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.जिल्हा मंचाने प्रकरणात दिनांक 30.01.2012 रोजी पारीत केला. 9. त.क.यांनी तक्रारी सोबत पान क्रं 8 वरील यादी नुसार एकूण 04 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये इसारपत्राची प्रत, त.क.यांनी वि.प.यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोस्टाची पावती, पोच पावती अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. त.क.यांनी दिनांक 13.02.2012 रोजी न्यायमंचा समक्ष पुरसिस दाखल करुन नमुद केले की, त्यांना शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही, त्यांचे तक्रारीलाच शपथपत्र व लेखी युक्तीवाद समजण्यात यावे. CC-101/2011 10. त.क.यांची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज याचे सुक्ष्म वाचन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित होण्या करीता खालील मुद्ये उपस्थित होतात. अक्रं मुद्या उत्तर (1) त.क.यांना भूखंडाची विक्री करुन न देऊन वि.प.यांनी, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिली आहे काय? होय. (2) जर होय, तर, त.क. काय दाद मिळण्यास पात्र आहे? काय आदेश? अंतीम आदेशा नुसार :: कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 11. त.क. यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी वि.प.यांचेशी देवळी रोड वरील सावंगी मेघे येथील ले आऊटमधील भूखंड क्रं 14 रुपये-1.00 लक्ष किंमतीचा सौद्या केला. सदर भूखंड मौजा सावंगी मेघे, मौजा नं.138, शेत सर्व्हे क्रं 82/1 जुना (नविन क्रं 269 व 270) ता.जि.वर्धा मधील असून भूखंडाचे क्षेत्रफळ 1775.40 चौरसफूट असे होते.
12. सदर सौद्यापोटी त.क.यांनी दिनांक 27.01.2005 रोजी ईसारा दाखल नगदी रुपये-40,000/- वि.प.यांना दिले, त्यानुसार रुपये-20/- च्या स्टॅम्पपेपरवर साक्षदार समक्ष ईश्वरचिठठी वि.प.यांनी करुन दिली. त्यानंतर भूखंडापोटीची उर्वरीत रक्कम त.क.यांनी दिनांक 12.03.2005 रोजी रुपये-40,000/- व दिनांक 10.08.2005 रोजी रुपये-20,000/- वि.प.यांचे मागणी नुसार दिली व वि.प.यांनी सदर रक्कम मिळाल्या बाबत ईसारचिठठीवर स्वतः लिहून दिले व स्वाक्षरी केली. अशाप्रकारे त.क. हे वि.प.चे ग्राहक ठरतात. 13. त्यानंतर त.क.यांनी अकृषक परवानगी बाबत वि.प.यांना विचारणा केली असता, लवकरच तारीख कळवून विक्री करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही वेळोवेळी अशीच उत्तरे वि.प.यांनी दिलीत व केवळ वि.प.ने दिलेल्या आश्वासनांवर त.क.यांनी विश्वास ठेवला. परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे वि.प.यांना
CC-101/2011 रजिस्टर नोटीस दिली असता, नोटीस मिळूनही वि.प.यांनी योग्य ती कार्यवाही केली नाही. अशाप्रकारे आज पर्यंत वि.प.यांनी ईसारचिठठी नुसार भूखंडाची खरेदी त.क.चे नावे करुन न देऊन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त.क.यांनी वकिला मार्फत दिनांक 19.07.2011 रोजी वि.प.यांना रजिस्टर नोटीस पाठवून भूखंडाची विक्री करुन देण्याची मागणी केली परंतु योग्य कार्यवाही केली नाही वा उत्तरही दिले नाही. 14. म्हणून शेवटी प्रस्तुत तक्रार वि.जिल्हा न्यायमंचात दाखल करावी लागल्याचे त.क.नमुद करतात. अशाप्रकारे जो पर्यंत वि.प.त.क.यांचे नावे भूखंडाची विक्री करुन देत नाही, तो पर्यंत प्रस्तुत तक्रारीचे कारण हे सदोदीत घडत आहे. त.क.असेही नमुद करतात की, वि.प.यांनी वेळीच भूखंडाची विक्री करुन दिली असती तर त्यांना त्याच वेळी घर बांधता आले असते. आता बांधकाम साहित्याचे दर सुध्दा वाढलेले आहेत व त्यानुसार ते वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. 15. प्रस्तुत प्रकरणात वि.जिल्हा न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने यामधील वि.प.यांचे नाव व पत्त्यावर नोटीस पाठविली असता “ Unclaimed” या पोस्टाचे शे-यासह पॉकिट परत आले व ते अभिलेखावर दाखल आहे. म्हणून वि.प.विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश वि.जिल्हा मंचाने प्रकरणात दिनांक 30.01.2012 रोजी पारीत केला. 16. त.क.यांनी तक्रारी सोबत एकूण 04 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये इसारपत्राची प्रत, त.क.यांनी वि.प.यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, पोस्टाची पावती, पोच पावती अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. 17. त.क.यांनी पुराव्या दाखल अभिलेखातील पान क्रं 9 वर सौद्येपत्राची प्रत, ज्यामध्ये त.क.आणि वि.प.यांचेमध्ये मौजा सावंगी मेघे, मौजा नंबर 138, प.ह.नं.19, तालुका जिल्हा वर्धा कक्षेतील जुना शेत सर्व्हे नंबर 82/1, नविन 269 व 270 मधील ले आऊट नकाशा नुसार प्लॉट नंबर 14, क्षेत्रफळ 1775.40 चौरसफूट भूखंड खरेदीचा सौद्या एकूण रुपये-1.00 लक्ष किंमतीचा रुपये-20/- चे स्टॅम्पपेपरवर दोन साक्षीदारां समक्ष जानेवारी, 2005 मध्ये केल्याचे दिसून येते. सौद्येचे वेळी त.क.यांनी रुपये-40,000/- नगदी भरल्याचे नमुद आहे. तसेच सदर सौद्येपत्राचे आतील भागावर सदर भूखंडापोटीची उर्वरीत रक्कम त.क. यांनी दिनांक 12.03.2005 रोजी रुपये-40,000/- व दिनांक 10.08.2005 रोजी
CC-101/2011 रुपये-20,000/- वि.प.यांना मिळाल्या बाबत वि.प.यांनी लेखी ईसारचिठठीवर स्वतः लिहून दिलेले आहे व स्वाक्षरी केली असल्याचे त्यामध्ये स्पष्ट नमुद आहे. 18. त.क.यांचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारी नुसार सौद्येपत्रावरील सदर स्वाक्षरी ही वि.प.यांचीच आहे. अशाप्रकारे त.क.यांनी भूखंडा पोटी संपूर्ण रक्कम वि.प.यांना अदा केल्यामुळे त.क.हे वि.प.चे ग्राहक आहेत. परंतु अकृषक परवानगीचे कारण पुढे करुन वि.प.यांनी सदर भूखंडाची खरेदी त.क.चे नावे करुन देण्यास वि.प.यांनी टाळाटाळ केल्याचे त.क.नमुद करतात. 19. त.क.यांनी इसारचिठठीतील भूखंडाची खरेदी आपले नावाने करुन मिळावी, या संबधाने वि.प.यांना दिनांक 19.07.2011 रोजी दिलेल्या रजिस्टर नोटीसची प्रत, पोस्टाची पावती प्रत व पोच पावती प्रत प्रकरणातील पान क्रमांक 11 ते 13 वर दाखल केली. परंतु वि.प.यांनी त्यावर काहीही कार्यवाही केली नाही व नोटीसला उत्तरही दिले नाही. यावरुन ही बाब सिध्द होते की, वि.प.हे त.क.यांना सदर भूखंडाची खरेदी करुन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यानंतर प्रस्तुत प्रकरण वि.जिल्हा न्यायमंचात दाखल झाल्यानंतरही मंचाची नोटीस वि.प.यांनी न स्विकारता "अनक्लेम्ड" या पोस्टाचे शे-यासह परत आली. यावरुन असे सिध्द होते की, वि.प.हे सदर भूखंडाची टाळाटाळ करीत आहेत. 20. जो पर्यंत वि.प.सौद्ये चिठठीतील करारा नुसार त.क.ला भूखंडाची विक्री करुन देत नाही, तो पर्यंत प्रस्तुत तक्रारीचे कारण सदोदीत घडत आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. अशाप्रकारे वि.प.यांनी त.क.यांना सौद्ये पत्रातील करारा प्रमाणे भूखंडाची खरेदी करुन न देऊन, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
21. त.क.यांची तक्रार प्रतिज्ञालेखावर आहे. तसेच वि.प.यांना योग्य ती संधी देऊनही त्यांनी त्यांची बाजू न्यायमंचा समक्ष शेवट पर्यंत मांडलेली नाही. अशास्थितीत त.क.यांची तक्रार गुणवत्तेवर व त.क.यांनी प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन अंशतः मंजूर करणे क्रमप्राप्त आहे या निष्कर्षाप्रत वि.जिल्हा न्यायमंच आलेले आहे. 22. त.क.यांना, वि.प.यांनी वेळीच भूखंडाची खरेदी करुन दिली असती, तर त.क.यांना त्यावेळी भूखंड बांधण्यासाठी कमी खर्च आला असता, आता बांधकाम
CC-101/2011 साहित्याचे दर वाढलेले आहेत या त.क.यांचे म्हणण्यात तथ्य दिसून येते. त्यामुळे त.क. हे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतात. त.क.यांनी भूखंडाची संपूर्ण किंमत अदा करुनही वि.प.यांनी त्यांना भूखंडाची विक्री शेवट पर्यंत करुन दिली नाही वा त्यांना त्या संबधाने काहीही कळविले नाही . या सर्व प्रकारामध्ये त.क.यांना निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झाला व त्यामुळे ते वि.प.कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. तसेच प्रस्तुत तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 23. त.क.यांनी आपले तक्रारीचे विनंती कलमात सौद्येपत्रात विषय असलेल्या भूखंडाची खरेदी करुन द्यावी अशी मागणी केलेली आहे परंतु आजचे स्थितीत सदर भूखंडाची स्थिती काय आहे या विषयीची वस्तुस्थितीदर्शक दस्तऐवज न्यायमंचा समक्ष सादर केलेले नाहीत. जर सदर भूखंडाची विक्री वि.प.यांनी अन्य कोणास केली नसेल तर त.क.सदर भूखंडाची खरेदी करुन मिळण्यास पात्र आहेत. 24. सदर भूखंडाची सद्यस्थिती मंचा समक्ष आलेली नाही. तसेच त.क.ची इतर पर्यायी मागणी नाही, तरी देखील त.क.चे नावे नोंदणीकृत खरेदीखत नोंदवून देणे शक्य न झाल्यास, वि.प.ने, त.क.ला त्यांचे कडील भूखंडाचे मोबदल्यात मिळालेली रक्कम तक्रार दाखल दिनांका पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज दरासह परत करण्याचे आदेशित करणे कायदेशीर व न्यायोचित राहिल. तसेच सदर प्रकरणा पोटी त.क.ला वि.प.कडून नुकसान भरपाई पोटी मंजूर करणे कायदेशीर राहिल, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. 25. वरील सर्व विवेचना वरुन, वि.जिल्हा न्यायमंच, प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) त.क.ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) वि.प.यांनी, त.क.यांना सौद्येपत्रातील विषय असलेल्या भूखंडाची विक्री करुन न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते. 3) वि.प.यांनी, त.क.यांना दिनांक 27.01.2005 रोजीचे ईसारचिठठी नुसार देवळी रोड वरील मौजे सावंगी मेघे, मौजा नं.138, शेत सर्व्हे क्रं 82/1 जुना (नविन क्रं 269 व 270) ता.जि.वर्धा येथील ले आऊटमधील भूखंड क्रं 14, भूखंड क्षेत्रफळ 1775.40 चौरसफूट याची नोंदणीकृत खरेदी त.क.चे नावे सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत करुन द्यावे. CC-101/2011 4) जर वरील अक्रं-3 प्रमाणे भूखंडाची नोंदणीकृत खरेदी त.क.चे नावे करुन देणे, वि.प.ला काही कारणास्तव शक्य न झाल्यास भूखंडाची एकूण वसुल केलेली किंमत रुपये-1.00 लक्ष (अक्षरी रुपये एक लक्ष फक्त ) तक्रार दाखल दिनांक-05.10.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याजासह सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत त.क.ला अदा करावी. विहित मुदतीत वि.प.ने सदर रक्कम न दिल्यास, सदर रक्कम रुपये-1.00 तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12 टक्के दंडनीय दराने त.क.ला देण्यास वि.प.जबाबदार राहिल. 5) त.क.यांना बांधकामातील साहित्यातील वाढते दराचे नुकसान भरपाई पोटी वि.प.यांनी नुकसान भरपाई दाखल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अदा करावे. 6) त.क.यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त ) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-1000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्त ) वि.प.यांना त.क.यांना अदा करावे. 7) सदर आदेशाचे अनुपालन, वि.प.यांनी सदर निकालपत्र प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत करावे. 8) उभय पक्षांना सदर आदेशाची प्रमाणित प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी. 9) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात. (रामलाल भ. सोमाणी) | | (मिलींद रामराव केदार) | अध्यक्ष. | | सदस्य. | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वर्धा |
| [HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi] Member[HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani] PRESIDENT[HONABLE MR. Shri Milind R. Kedar] MEMBER | |