जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे
मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी
मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी
-
ग्राहक तक्रार क्रमांक – ११/२०१३
तक्रार दाखल दिनांक – ०७/०३/२०१३
तक्रार निकाली दिनांक – ३०/०१/२०१५
अण्णा शंकर गठरी (गवळी)
उ.व.ः- ४३ वर्षे धंदाः- शेती
रा.दिवाणमाळा ता.जि.धुळे
मो.नं.९३७०५९९६८६ . तक्रारदार
विरुध्द
बजाज अलायन्स जनरल इंशुरन्स
कंपनी लिमीटेड
मो.नं.९४२२२८६५२५
सतिष एस.संचेती
३. बाफना माकेर्ट, नगर पालीके समोर, धुळे ता.जि. धुळे . सामनेवाला
निशाणी नं.१ वरील आदेश
(१) सामनेवाले विमा कंपनीकडून उर्वरित वाहन नुकसानीची रक्कम रूपये ८६,५२०/- मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार हे तक्रार दाखल केल्यापासून सतत गैरहजर आहे. तक्रारदार यांचे वकील दि.१९/०६/२०१४ व दि.०३/०७/२०१४ रोजी हजर होते. मात्र त्यांनी कोणतीही स्टेप घेतली नाही. यावरून तक्रारदार यांना तक्रार चालवण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सदर तक्रार अंतिमरित्या निकाली काढण्यात यावी, असे मंचाचे मत बनले आहे. सबब आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : ३०/०१/२०१५
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.