Maharashtra

Satara

CC/13/170

ASHAVINI AMOAD LELE - Complainant(s)

Versus

SATISH RANGANATH KULKARNI - Opp.Party(s)

11 Feb 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                            मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 170/2013.

                                                                                                         तक्रार दाखल दि.2-11-2013.

                                                                                                           तक्रार निकाली दि. 11-2-2015. 

 

कु.आदिती अमोद लेलेतर्फे अ.पा.क.

सौ.आश्विनी अमोद लेले,

रा.101 साई अँग्रीया, प्‍लॉट नं.92,

डॉ.गुरुनाथ स्‍ट्रीट, पानेरनगर,

होगापेन-ईस्‍ट, चेन्‍नई 600 037. 

तर्फे मुखत्‍यार श्री.अरविंद वासुदेव दिवेकर,

रा.28 गणेश कॉलनी, शाहूनगर, गोडोली,

सातारा.                                   ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. श्री.सतीश रंगनाथ कुलकर्णी, चेअरमन.

   रेणुकामाता ग्रा.बि.शे.सह.प.सं. मर्या.

   शाहूनगर, गोडोली, सातारा.

2. श्रीमती सुवर्णा पोतदार, प्रभारी व्‍यवस्‍थापक,

   रेणुकामाता ग्रा.बि.शे.सह.प.सं.

   शाहूनगर, गोडोली, सातारा.                ....  जाबदार

 

              तक्रारदारातर्फे अँड.विकास जगदाळे.

             जाबदारातर्फे अँड.एस.जे.सावंत/अँड.एस.एस.आंबेकर.

                                             न्‍यायनिर्णय  

सदर न्‍यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

 2.      तक्रारदार सौ.आश्विनी प्रमोद लेले या त्‍यांचे नोकरी करणा-या पतीसमवेत रहात असून त्‍या चेन्‍नई येथे रहातात.  त्‍यांनी जाबदारांचे पतसंस्‍थेत त्‍यांची मुलगी आदिती अमोद लेले या अल्‍पवनीय मुलीचे नाव जाबदारांचे लक्षाधीश योजनेत (7 व 9 महिने मुदतीची) दि.15-4-2004 रोजी रक्‍कम रु.40,000/- (रु.चाळीस हजार मात्र) ठेव म्‍हणून ठेवली होती.   सदर पावतीची मुदत दि.15-1-2012 रोजी संपली असून सदर ठेवीच्‍या रकमेची मागणी तक्रारदारांनी वारंवार जाबदाराकडे करुनही त्‍यानी तक्रारदाराना त्‍यांचे मुदतपूर्ण ठेवीचे पैसे जाबदारानी सव्‍याज परत केले नाहीत त्‍यामुळे तक्रारदारानी दि.31-8-2013 रोजी अँड.अनिल देशपांडे यांचेतर्फ रजि. नोटीसने जाबदारांकडे ठेव रकमेची मागणी केली परंतु जाबदारानी त्‍यास विषयाशी संबंधित नसलेले उत्‍तर देऊन तक्रारदारांची ठेव परत करणेस नकार देऊन सेवेत त्रुटी केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हिने जाबदाराविरुध्‍द मे.मंचात दाद मागून जाबदाराकडून दामदुप्‍पट ठेव रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र)व त्‍यावर मुदत संपले तारीख दि.16-1-2012 पासून द.सा.द.शे.18 टकके दराने व्‍याज, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, तक्रारअर्जाचाखर्च रु.10,000/- मिळणेबाबत विनंती मंचाला केली आहे.

3.     सदर तक्रारीच्‍या नोटीसा जाबदाराना मंचातर्फे रजि.पोस्‍टाने पाठवणेत आल्‍या.  सदर नोटीसा जाबदारांना मिळाल्‍या, त्‍याप्रमाणे जाबदार हे नि.6 कडे दाखल केलेल्‍या वकीलपत्राप्रमाणे त्‍यांचे वकील अँड.सतीश सावंत यांचेतर्फे हजर झाले.  त्‍यांचे वकीलांनी सदर कामी हजर होऊन नि.9 कडे म्‍हणणे, नि.12 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.11 कडे पुराव्‍याचे कागद, नि.16 कडे लेखी युक्‍तीवाद इ.कागदपत्रे दाखल केली असून जाबदारांचा तक्रारदारांचे तक्रारीस मुख्‍य आक्षेप हा की, तक्रारदारानी जाबदाराकडे लक्षाधीश ठेवीमध्‍ये रु.40,000/- गुंतवले हे खरे आहे परंतु तक्रारीतील तक्रारदारांचा मुखत्‍यार याने दि.13-4-06 रोजी रक्‍कम रु.2,86,000/- दि.3-4-05 रोजी 1,21,700/- दि.18-1-06 रोजी रु.1,82,000/- असे कर्ज घेतले होते व आहे.  याच कर्जातून रु.40,000/- रकमेची ठेव तक्रारदारांचे वडिलांनी तक्रारदाराचे नावे गुंतवली होती परंतु वरील कर्जाची फेड कर्जदाराने किंवा तक्रारदार हिचे वडिलांनी आजअखेर केली  नाही.  सदर ठेवपावती तक्रारदार हिचे मुखत्‍यार वडिलांनी वेळेत दाखल न केल्‍याने त्‍यावरील नमूद कर्जाचा बोजा चढवता आला नाही त्‍यामुळे तक्रारदार हिने विषयांकित दामदुप्‍पट पावती तक्रारदारांचे वडिलांनी जाबदाराकडे दाखल करावी ती तक्रारदाराना परत देता येणार नाही, सबब तक्रार खारिज करावी असे आक्षेप मुख्‍यत्‍वे तक्रारदाराविरुध्‍द नोंदलेले आहेत, त्‍यामुळे जाबदारांचे वरील आक्षेप तक्रारदारांचा तक्रारअर्ज, नि.1 सोबत पृष्‍टयर्थ दाखल केलेले प्रतिज्ञापत्र, नि.5 सोबत नि.5/1 ते 5/4 कडे दाखल केलेले पुराव्‍याचे कागद, नि.13 कडील पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.15 कडील युक्‍तीवाद, नि.18 कडील पुराव्‍याचे कागद यांचा विचार करता प्रस्‍तुत प्रकरणाचे निराकरणार्थ आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.        मुद्दा                                            निष्‍कर्ष

 1.  तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय?                     होय.

 2.  जाबदारानी तक्रारदारांची लक्षाधीश ठेवपावतीची रक्‍कम

     मुदतपूर्ण झालेनंतर तक्रारदारांनी वारंवार मागणी करुनही

     तक्रारदाराना सव्‍याज परत न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा

     दिली आहे काय?                                           होय.

  1. जाबदारानी मुखत्‍यार श्री.अरविंद दिवेकर यांचे कर्जाबाबत

    घेतलेले आक्षेप तक्रारीस बाधा आणतात काय?                   नाही.

4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर.

कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 4-

4.      सदरची तक्रार तक्रारदार हिने तिचे वडिलांना मुखत्‍यार नेमून मे.मंचात दाखल केली आहे.  त्‍याचे नोटरी रजि.मुखत्‍यारपत्र प्रकरणी नि.5/1 कडे दाखल असून सदर प्रकरणी मंचासमोरील तक्रार दाखल करणेपासून सर्व कामकाज पहाणे, रक्‍कम स्विकारणे याचे सर्व अधिकार मुखत्‍यारना दिले आहेत.  प्रस्‍तुत जाबदार ही पतसंस्‍था असून सदर पतसंस्‍था जनतेकडून ठेवी स्‍वरुपात रकमा स्विकारुन त्‍या मुदतपूर्ततेनंतर संबंधिताना सव्‍याज परत करणे हा जाबदारांचा व्‍यवसाय असलेने व तक्रारदार हिने जाबदार पतसंस्‍थेत लक्षाधीश ठेव योजनेत दि.15-4-2004 रोजी रु.40,000/- (रु.चाळीस हजार मात्र) ची ठेव ठेवली होती.  तिची मुदत दि.15-1-2012 पर्यंत होती.  मुदतपूर्तीनंतर तक्रारदाराना ठेवीची दामदुप्‍पट रक्कम रु.1,00,000/- (रु.एक लाख मात्र) तक्रारदाराना जाबदारानी देणेचे होते, हे नि.5/2 कडील मूळ ठेवपावतीवरुन दिसून येते.  या सर्व व्‍यवहारावरुन तक्रारदार ही जाबदारांची ग्राहक आहे हे निर्विवादरित्‍या शाबीत होते त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

4.1-    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदारानी नि.9 कडे म्‍हणणे दाखल करुन मुखत्‍यार म्‍हणवणारे तक्रारदाराचे वडिलांना ठेवीची रक्‍कम ही श्रीराम सदाशिव वालेकर यांचे नावे येणे असणारी रक्‍कम वसूल करणेसाठी त्‍याचे नावे कर्ज घेणेस भाग पाडले व त्‍याने घेतलेल्‍या कर्जातून आलेली रक्‍कम ठेव स्‍वरुपात ठेवली.  तक्रारदारांचे वडिलांनी सन 2006 साली रु.2,86,000/- दि.3-4-2005 रोजी रु.1,21,700/- व दि.18-1-2006 रोजी रु.1,82,000/- असे कर्ज घेतलेले होते.  वरील कर्जाची परतफेड त्‍यांनी आजअखेर केलेली नाही.  प्रस्‍तुत मुखत्‍यार याना जाबदारानी वारंवार ठेवपावतीची मागणी केली परंतु ती सापडत नाही, हरवली आहे, नंतर आणून देतो असे सांगितल्‍याने त्‍यांचेवर विश्‍वास ठेवून सदर पावतीवर बोजा चढवणेचे राहून गेले होते, त्‍याचा गैरफायदा घेऊन मुखत्‍यारने हा अर्ज मंचात दाखल केला आहे.  तो रद्द करावा असे आक्षेप प्रकरणी दाखल केले आहेत.  या आक्षेपाचा विचार करता जाबदारानी त्‍यांचे क‍थनात उल्‍लेख केलेल्‍या तथाकथित श्री.श्रीराम सदाशिव वालेकर बाबतीत व बर्जाचे बाबतीत जे कथन केले आहे ते अविश्‍वसनीय तद्दन खोटे वाटते कारण याबाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल करुन ते ठोस पुराव्‍याअभावी जाबदारानी शाबीत केलेले नाही.  त्‍याचप्रमाणे ठेवीदाराचे वडिलांनी दि.3-4-2005 रोजी कर्ज घेणेस सुरुवात केली व बाकीची कर्जे 2006 साली घेतलेचे दिसते परंतु त्‍याबाबतचा कोणताही ठोस पुरावा या मंचात जाबदारानी दाखल केलेला नाही की तक्रारदार/ठेवीदाराचे वडिल हे जाबदारांचे कर्जदार होते व सदर ठेवीमध्‍ये वरील ठेवीदारांचे वडिलांचे कर्जातून ठेवीस रक्‍कम गुंतवली होती हे सुध्‍दा ठोस पुराव्‍यानिशी जाबदारानी शाबीत केलेले नाही, केवळ जाबदारांचे कथनाशिवाय त्‍याच्‍या आक्षेपास कोणताही पुरावा मंचात जाबदारानी दाखल केलेला नाही.  वरील जाबदारांचे सर्व आक्षेप हे खोटे आहेत हे ठेवपावतीवरुनच शाबीत होते की जाबदारानी तथाकथित वालेकर यांचे कर्जापूर्वी म्‍हणजे दि.15-4-2004 पूर्वी ठेवीमध्‍ये आश्विनी अमोद लेले यानी त्‍यांच्‍या लहान मुलीचे  नावे आदितीचे नावे ठेवीत रक्‍कम गुंतवली होती हे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते व सदर ठेव रककम ही कु.आदितीची अ.पा.क.आश्विनी लेले यानाच मिळणेची आहे.  त्‍याचा अधिकार मुखत्‍यार याना नाही.  त्‍यामुळे जाबदाराचे सर्व आक्षेप हे बिनबुडाचे अत्‍यंत खोटे व तक्रारदार हिचे ठेवपावतीशी दुरान्‍वयानेही संबंधित नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे विषयांकित लक्षाधीश ठेव योजनेतील ठेव पावती क्र.0053 ही स्‍वतंत्र असून ती स्‍वतः अश्विनी लेले यानी त्‍यांचे मुलीचे नावे तिची अ.पा.क. म्‍हणून ठेवली होती हे निर्विवादरित्‍या शाबीत होते व जाबदारानी सदर ठेवीदाराच्‍या बदली तक्रारदारावर खोटया कारणानी तक्रारदार हिची लक्षाधीश ठेव योजनेची रक्‍कम दि.16-1-12 रोजी रु.एक लाख मुदतपूर्तीनंतर परत देणेचे वचन देऊनही जाबदारांनी ती तक्रारदाराना देणेचे नाकारुन तक्रारदाराना अत्‍यंत गंभीर सदोष सेवा दिली असल्‍याचे पूर्णतः शाबीत होते.  त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेस पात्र असून त्‍याना जाबदाराकडून ठेवीची रक्‍कम रु.एक लाख व त्‍यावर दि.16-1-2012 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने रक्‍कम पदरी पडेपर्यंतचे होणारे व्‍याजासह होणारी रक्‍कम व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/-, अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  त्‍यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देतो.

5.         वरील सर्व कारणमीमांसा व विवेचनास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-

                           आदेश

1.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.  जाबदारानी तक्रारदारांनी त्‍यांची लक्षाधीश ठेव योजनेची रक्‍कम रु.एक लाख मुदतपूर्तीनंतर तक्रारदारानी वारंवार मागणी करुनही परत न करता तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्‍याचे घोषित करणेत येते. 

3.   जाबदार क्र.1 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या व जाबदार क्र.2 यांनी संयुक्‍तीकरित्‍या लक्षाधीश ठेव योजनेतील ठेव पा.क्र.0053 ची रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र)त्‍यावर दि.16-1-2012 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंतचे होणारे व्‍याजासह आदेश प्राप्‍त झालेपासून चार आठवडयाचे आत सौ.अश्विनी अमोद लेले यांना अदा करावी.

4.   जाबदार क्र.1 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या व जाबबदार क्र.2 यांनी संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्‍त झालेपासून चार आठवडयाचे आत ठेवीदार सो.अश्विनी अमोद लेले यांना अदा करावी.

5.    जाबदारानी वरील आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील.

6.      सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

7.      सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.  

 

ठिकाण- सातारा.

दि.11-2-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.  

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.