::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये, मिलिंद बी. पवार (हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 22/04/2013)
अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. या तक्रारीचा आशय थोडक्यात खालिलप्रमाणे.
अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असुन पान मटेरीयलचा धंदा करतो. यातील गैरअर्जदारास आर्थिक अडचण असल्याने अर्जदारास, गैरअर्जदाराने दिनांक 19.3.2012, च्या विक्रीपञान्वये त्याचे स्वतःचे मालकीची टाटा इंडिका कार क्र. एम एच 34 के 4187, रुपये 45000/- ला विकत दिली. व सोबत सदरची गाडी आरटीओ कार्यालयात अर्जदाराचे नावाने ट्रान्सफर करण्यासाठी आर सी बुक व ट्रान्सफर फार्मवर सहया दिल्या. विक्रीपञाचे अटी व शर्तीनुसार गैरअर्जदाराने सदर गाडी आयसीआयसीआय बॅंक, चंद्रपूर चे फायनान्सवर विकत घेतली असल्याने सदर बॅंकेची थकीत असलेली रक्कम फेड करुन सदर बॅंक कडुन ना हरकत प्रमाणपञ मिळवुन ते विक्रीपञानुसार 15 दिवसाचे आत अर्जदाराचे सुपूर्द करण्याचे ठरलेले होते व तसे ते गैरअर्जदारावर बंधनकारक होते. त्यानुसार गैरअर्जदाराने बॅंकेच्या फायनान्सची थकीत रक्कम फेड न केल्याने त्याला बॅंकेने ना हरकत प्रमाणपञ दिले नाही व त्यामुळे सदर ना हरकत प्रमाणपञ अभावी सदरची गाडी अर्जदाराचे नावे आरटीओ कार्यालयात ट्रान्सफर होऊ शकली नाही त्यामुळे अर्जदाराने सदर ना हरकत प्रमाणपञ मिळण्याकरीता संबंधीत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जाचे पृष्ठार्थ निशानी 5(1) कडे गाडीच्या विक्रीपञाची झेरॉक्स व निशानी 13(1) सदरचे मुळ विक्रीपञ दाखल केले आहे तसेच निशानी 5(1) कडे गाडीचे आर सी बुक चे झेरॉक्स दाखल केले आहे. निशानी 5(3) ते 5(7) कडे गाडी दुरुस्तीचे खर्चाच्या बिलांची झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहे तर त्यांचे मुळ बिले निशानी 13 सोबत अ.क्र. 3 ते 7 कडे दाखल केलेले आहे. निशानी 5(8) कडे गैरअर्जदारास वकीलामार्फत नोटीस व निशानी 10 कडे सदर नोटीस अर्जासोबत पोहचलेल्या पोष्टाचा दाखला, दाखल केला आहे. निशानी 13(2) कडे गाडीच्या ट्रान्सफरचे फार्म हजर केलेले आहेत.
गैरअर्जदार यांना तक्रार नोंदनी करुन नोटीस काढण्यात आले. सदरची नोटीस बजावणी झालेली आहे व ती निशानी 6 वर दाखल आहे तरीही गै.अ. मे. मंचासमक्ष हजर झालेले नाही त्यामुळे सदर प्रकरण गै.अ. विरुद्ध एकतर्फा चालविण्यात यावा असा आदेश निशानी 1 वर पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार यांचे विरुद्ध निशानी 1 वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश असल्यामुळे उपलब्ध रेकॉर्ड, अर्जदाराचे शपथपञ व वकीलांचा युक्तीवाद ऐकुण सदर प्रकरण अंतिम आदेश काढण्याकरीता ठेवण्यात आले.
अर्जदाराने दाखल केलेले दस्तऐवज, निशानी 11 वरील अर्जदाराचे शपथपञ व अर्जदार वकीलांचा तोंडी युक्तीवाद वरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
अर्जदाराने निशानी 11 नुसार प्रतिज्ञापञावर पुरावा दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश असल्याने त्यांना अर्जदाराचे तक्रारविषयक मुद्दे मान्य असल्याचे समजण्यात येते. अर्जदारनुसार दिनांक 19/03/2012 रोजीची गाडीचे विक्रीपञाची निशानी 5(1) कडे झेरॉक्स प्रत आणि निशानी 13(1) वर मुळ दाखल केले आहे त्यावरुन गैरअर्जदार यांचे मालकीची एम.एम. 34 के 4187, इंजिन नं. पी.48676 व चेसिस नंबर पी. 48328 ची 2000 सालाचे टाटा इंडिका मॉडेल कार चे विक्रीचा व्यवहार अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये रुपये 45000/- झालेला दिसुन येते. व सदर व्यवहार प्रमाणे अर्जदार संपूर्ण रक्कम गैरअर्जदार यांना दिलेले आहे व गाडीचा ताबा घेतलेला आहे. परंतु सदर गाडीवर आयसीआयसीआय बॅंकेचा बोजा असल्याने सदर अर्जदाराने दिलेल्या पैशातुन गाडीवरील बोजा भागवुन आय सी आय सी आय बॅकेची एनओसी आणण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांची होती. सदर एनओसी 15 दिवसात आणुन देणेची मुदत उभयंतामध्ये ठरलेली होती. या सर्व गोष्टी गैरअर्जदार याने गाडीचे विक्रीपञात साक्षीदारासमक्ष कबुल केल्या होत्या व सदर करारपञ दिनांक 19/03/2012 केले होते व सदर करारपञ नोटरी केल्याचे दिसुन येते.
त्यानंतर 15 दिवसानी मुदत संपल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास एनओसी ची मागणी केली त्यावेळी गैरअर्जदार यांनी एनओसी देण्यास टाळाटाळ केली. ‘ मी फायनान्स कंपनीचे उर्वरीत कर्ज भरणार नाही व एनओसी ही देणार नाही असे अर्जदाराला सांगु लागला. अनेकवेळा सांगुनही गैरअर्जदार हा ऐकत नव्हता हे दिसुन येते. दरम्यानचे काळात गाडीचे किरकोळ दुरुस्तीसाठी अर्जदाराने रुपये 32075/- एवढा खर्च केलेला आहे हे निशानी 5(3) ते 5(7) वरील दुरुस्ती बिलाची झेरॉक्स प्रती व निशानी 13(3) ते 13(7) कडील मुळ बिले यावरुन स्पष्ट दिसुन येते.
बराच कालावधी होऊन ही गैरअर्जदार यांनी गाडीचे विक्रीपञाप्रमाणे एनओसी देण्यास टाळाटाळा करीत आहे म्हणुन अर्जदाराने निशानी 5(8) नुसार दिनांक 13/04/2012 रोजी गैरअर्जदारास वकील मार्फत नोटीस पाठविली. सदरची नोटीस गैरअर्जदार यांनी मिळाली आहे हे निशानी 10 वरुन दिसुन येते तरीही गैरअर्जदार यांनी कोणतीही पुर्तता केली नाही. यावरुन गैरअर्जदार यांची नकारात्मक मानसिकता असल्याचे सिद्ध होते.
वरील विवेचणावरुन निशानी 5(1) व 13(1) वरील गाडीचे विक्रीपञाप्रमाणे गैरअर्जदार हे अर्जदारास एनओसी आणुन देण्यास नकार देत आहे हे स्पष्ट दिसुन येते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी त्वरीत एनओसी ( ना हरकत प्रमाणपञ) आणुन दयावे किंवा अर्जदारास विक्रीपञाप्रमाणे त्यांनी घेतलेल्या गाडीचा दुरुस्ती खर्च रुपये ३२०७५/- व गाडीची किंमत रुपये 45000/- एकुण रुपये 77075/- अर्जदार यांना देऊन आपली गाडी परत घेऊन जावी असा आदेश आलेल्या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
तसेच गैरअर्जदार यांचे वर्तणामुळे अर्जदारावर झालेला मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये 10000/- व तक्रारीवर झालेला खर्च रुपये 5000/- अर्जदाराने मागितलेली आहे. गैरअर्जदार यांचे न्युनतापुर्ण सेवेमुळे अर्जदार यांना झालेला मानसिक व शारीरिक ञासापोटी व रुपये 45000/- व गाडी दुरुस्ती खर्च करुन त्यांना त्यांचे पुर्ण उपभोगापासुन वंचित राहावे लागल्याने झालेला मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये 4000/- व तक्रार खर्च रुपये 2000/- मंजुर करणे असे मंचाला वाटते.
एकंदरीत वरील कारणे व निष्कर्षावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यास न्युनता केली आहे या निर्णयाप्रत हे न्यायमंच आलेला असल्याने खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
1. अर्जदाराचा प्रस्तुत अर्ज अंशतःहा मंजुर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यानी एम एच 34 के 4187, या गाडीचे ना हरकत प्रमाणपञ अर्जदार यांना आणुन दयावे किंवा ते शक्य नसल्यास, गाडी विक्रीची घेतलेली रक्कम रुपये 45000/- अधिक गाडी दुरुस्ती खर्च 32075/- एकुण रुपये 77075/- गैरअर्जदार यांनी अर्जदाराला परत करावे व गाडी परत घेऊन जावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 4000/- व तक्रार खर्च रुपये 2000 दयावे.
4. वरील आदेशाची पुर्तता 30 दिवसांचे आत करावी अन्यथा गैरअर्जदार वर नमुद देय रक्कम रुपये 77075/- वर गाडीचे विक्रीपञ दिनांक 19/03/2012 पासुन सर्व रक्कम हाती येईपर्यंत द.शा.द.शे. 10 टक्के दराने अर्जदाराला व्याज द्यावे.
5. उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 22/04/2013