(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीक रित्या अर्जदार यांना झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसानी पोटी रक्कम रु.4,00,000/- मिळावेत, मानसिक क्लेषापोटी रु.50,000/- मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.28 लगत लेखी म्हणणे, पान क्र.29 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. सामनेवाला क्र.1 हे मंचाची नोटीस मिळूनही गैरहजर राहीलेले आहेत यामुळे त्यांचेविरुध्द दि.25/07/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आलेला आहे.
अर्जदार व सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय.
तक्रार क्र.127/2011
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून झालेल्या नुकसानीची रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.डी.बी.इंगळे व सामनेवाला यांचे वतीने अँड.पी.पी.पवार यांनी तोंडी युक्तिवाद केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांच्या सर्व ग्राहकांचा विमा उतरवला असल्याची बाब सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.9 लगत गॅस सबस्क्रिप्शन व्हाऊचर, पान क्र.10 लगत गॅस रिफील पावती, पान क्र.11 लगत गॅस सिलेंडर घेतल्याची पावती हजर केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, तसेच सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, व पान क्र.9, पान क्र.10, पान क्र.11 ची कागदपत्रे यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सदरची विमा पॉलिसी ही सामनेवाला विमा कंपनीने सामनेवाला क्र.1 कडून त्यांचे प्रतिनिधी/नोकर यांचेकडून जर गॅस सिलेंडरची नळी जोडतांना(installation), जर दुर्घटना झाली तर त्याला नुकसान भरपाई देणेकामी आहे. सदर दुर्घटना ही तक्रारदाराचे मुलाकडून गॅस सिलेंडरची नळी जोडतांना झालेली आहे. सदरची दुर्घटना ही पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाही. सदर दुर्घटनेमध्ये सामनेवाला क्र.1 कडून वा त्याचे प्रतिनिधी/नोकर यांचा निष्काळजीपणा झालेला नव्हता. त्यामुळे सदर क्लेमबाबत नुकसान भरपाई देण्याचे सामनेवाला कंपनीचे कोणतेही उत्तरदायित्व नाही. तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
जरी सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये सामनेवाला क्र.1 किंवा त्यांचे प्रतिनीधी किंवा नोकर यांचेकडून दुर्घटना घडल्यास सामनेवाला नं.2 यांचेवर विमापॉलिसीचे उत्तरदायित्व आहे असा उल्लेख केलेला असला तरीसुध्दा विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये कोठेही तसा उल्लेख नाही. सामनेवाला क्र.1 किंवा त्यांचे नोकर व प्रतिनिधी यांनीच गॅस सिलेंडर जोडला पाहिजे व त्यांचेहातूनच दुर्घटना घडली तरच विमा पॉलिसीची रक्कम देण्यास सामनेवाला क्र.2 हे जबाबदार
तक्रार क्र.127/2011
आहेत, याचा कोणताही उल्लेख पान क्र.32 चे विमा पॉलिसीचे अटी व शतीमध्ये नाही. पान क्र.5, पान क्र.6, पान क्र.7, पान क्र.8 लगतचे पोलिसांचेकडील कागदपत्र पाहता गॅस सिलेंडर जोडतांना सिलेंडर लिकेज होवून स्फोट होवून आग लागल्यामुळे घराचे नुकसान झालेले आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे. पान क्र.32 चे विमा पॉलिसीचे अटी व शर्ती व पान क्र.5, पान क्र.6, पान क्र.7, पान क्र.8 लगतचे पोलिसांचेकडील कागदपत्रे याचा विचार होता सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम अयोग्य व चुकीचे कारण देवून नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.8 लगत महसुली विभागाचे तलाठी यांनी दि.05/05/2010 रोजी आग लागलेल्या घराचा जो पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याची प्रत हजर केलेली आहे. पान क्र.8 चा हा पंचनामा चुकीचा आहे किंवा योग्य व बरोबर नाही हे दर्शवण्याकरीता सामनेवाला क्र.1 व 2 यांनी कोणतीही योग्य ती कागदपत्रे सादर केलेली नाहीत. पान क्र.8 चे पंचनाम्यानुसार अर्जदार यांचे घर व त्यामधील सर्व वस्तु यांचे रु.2,67,000/- इतक्या रुपयांचे नुकसान झालेले आहे असे दिसून येत आहे. पान क्र.8 चे पंचनाम्याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तिकरित्या आर्थीक नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,67,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिक रित्या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
या कामी सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.36 लगत कंझुमर प्रोटेक्शन डायजेस्ट पान क्र.595 ची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे परंतु या पानावरती जे वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्र दर्शवलेले आहे, त्या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी
तक्रार क्र.127/2011
दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरिष्ठ कोर्टाचे निकालपत्र या कामी लागु होत नाही.
मंचाचे वतीने या कामी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
1) 3(2006) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 8. ए जी सत्यनारायण विरुध्द भारत पेट्रोलियम.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तिवाद, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तिवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तिकरित्या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,67,000/- द्यावेत
ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.