Maharashtra

Nagpur

MA/11/42

Shri Nilkanth Raghobaji Gaidhane - Complainant(s)

Versus

Sarvoday Housing Agency, Through President - Shri Suresh Natthuji Sarode - Opp.Party(s)

Adv. M.A. Gadage

07 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/11/42
 
1. Shri Nilkanth Raghobaji Gaidhane
Plot No. 655, Surya Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. Sarvoday Housing Agency, Through President - Shri Suresh Natthuji Sarode
C-Block, Vyankatesh Nagar, 3rd fllor, NIT Qtrs., Nandanvan,
Nagpur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. M.A. Gadage, Advocate for the Appellant 1
 
ORDER

-आदेश-

(पारित दिनांक - 07.12.2011)

1. तक्रारकर्त्‍यांचे वकील हजर, त्‍यांचा युक्‍तीवाद ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी वेळोवेळी प्‍लॉटच्‍या किमतीपोटी रक्‍कम दिली. शेवटची रक्‍कम 06.01.2008 ला दिली. तेथून दोन वर्षाच्‍या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. मात्र तक्रारकर्ता गैरअर्जदारास वारंवार संपर्क ठेवून होता व गैरअर्जदार तक्रारकर्त्‍यास सद्या रजिस्‍ट्री बंद आहे असे सांगून वेळ वाढवित राहिले. यासंबंधी तगादा लावला असता चालढकल करीत राहीले व शेवटी पोलिस स्‍टेशनला यासंबंधी तक्रार केली. ही तक्रार तक्रारकर्त्‍याने 10.08.2011 रोजी दाखल केली.

2. गैरअर्जदारांना नोटीस दिला, ते हजर झाले आणि त्‍यांनी उत्‍तर दाखल करुन सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारकर्त्‍याने 02.08.2005 पर्यंत रु.60,000/- गैरअर्जदाराकडे जमा केले होते. कराराप्रमाणे सलग 3 महिने किस्‍त न आल्‍यास डिफॉल्‍टर म्‍हणून भुखंड नाकारल्‍या गेला. यामध्‍ये संपूर्ण दोष हा तक्रारकर्त्‍याचा आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार चुकीची आणि गैरकायदेशीर आहे व विलंबाने दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्त्‍यांच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद ऐकला. यातील संबंधित भुखंड अकृषक झालेला आहे किंवा काय यासंबंधी स्थिती स्‍पष्‍ट नाही. दुसरे असे की, तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे गैरअर्जदारांनी वेळोवेळी रक्‍कम स्विकारली आहे आणि तक्रारकर्त्‍यास रजिस्‍ट्री होत नाही असे कारण सांगून विक्रीपत्र करुन देण्‍यास टाळाटाळ केली. यामध्‍ये दोन्‍ही पक्षामधील करार हा उभय पक्षांनी दाखल केलेला नाही. तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवजामध्‍ये प्‍लॉट दर्शविला आहे, परंतू विक्रीपत्राची कोणतीही तारीख दर्शविली नाही, त्‍यामुळे वादाचे कारण हे संबंधितांनी नकार दिल्‍याचे नंतर घडते. तक्रारकर्त्‍याचे मते पोलिसात तक्रार नोंदविल्‍यानंतर त्‍यांना नकार दिला होता. त्‍यामुळे ही तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विलंब माफीच्‍या अर्जाचा विचार करुन तो मंच मंजूर करीत आहे. मुळ तक्रार नोंदवून गैरअर्जदारावर नोटीस काढावा.  

 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.