अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नागपूर
पुनरावलोकन अर्ज दाखल दिनांक : 07/09/2022
निकाल पारीत दिनांक : 30/09/2024
पुनरावलोकन अर्ज क्रमांक : RA/11/2022
अर्जदार : 1. संजय ज्वेलर्स तर्फे प्रोप्रा., अजय फकीरचंद गुरव,
वय अंदाजेः 47 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. सराफा ओळ, कामठी, जि. नागपूर.
2. अजय फकीरचंद गुरव, प्रोप्रा.,
संजय ज्वेलर्स,
वय अंदाजेः 47 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. 50, बांते ले-आऊट, उज्वल नगरसमोर,
वर्धा रोड, जि. नागपूर.
- वि रु ध्द –
गैरअर्जदार : 1. सरोज नरेश चौकसे,
वय अंदाजेः 57 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मादी पडाव, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
2. निलम नरेश चौकसे,
वय अंदाजेः 57 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मादी पडाव, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
3. आरुष अंकित जैस्वाल, अज्ञान तर्फे
पालनकर्ता अंकित अनिल जैस्वाल,
वय अंदाजेः 32 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. गांधी चौक, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
4. राजेश चैतराम चौकसे,
वय अंदाजेः 60 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मादी पडाव, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
5. माधुरी रविंद्र उमाठे,
वय अंदाजेः 47 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. गांधी चौक, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
6. यश रविंद्र उमाठे,
वय अंदाजेः 21 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. गांधी चौक, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
7. राशी राजेश राय,
वय अंदाजेः 20 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मच्छीपूल, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
8. सीमा राजेश राय,
वय अंदाजेः 48 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मच्छीपूल, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
9. अंश राजेश राय, अज्ञान तर्फे
पालनकर्ता राजेश राय,
वय अंदाजेः 5 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मच्छीपूल, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
10. हेमंत कांचनलाल राय,
वय अंदाजेः 44 वर्षे, व्यवसायः व्यापार,
राह. मच्छीपूल, कामठी, तह. कामठी,
जि., नागपूर.
गणपूर्ती : श्री. सतिश सप्रे, मा. अध्यक्ष. श्री. मिलींद केदार, मा. सदस्य.
श्रीमती शितल अ. पेटकर, मा. सदस्या.
अर्जदारातर्फे : अधि. ए. डी. भावे.
गैरअर्जदारातर्फे : अधि. प्रेमचंद मिश्रीकोटकर.
- // पुनरावलोकन अर्जावरील आदेश // -
(पारित दिनांकः 30/09/2024)
श्रीमती शितल अ. पेटकर, मा. सदस्या यांचे आदेशान्वये.
1. अर्जदाराने सदर पुनरावलोकन अर्ज दाखल करुन आयोगाने दि.04.05.2022 रोजी दिलेल्या आदेश हा ‘एकतर्फी’ दिला असुन अर्जदार यांच्यावर सदर प्रकरणामध्ये आयोगाची नोटीसची बजावणी योग्यप्रकारे झाली नव्हती. सबब प्रकरणामध्ये दि.28.10.2021 रोजी झालेला एकतर्फी आदेश, तसेच दि.04.05.2022 रोजी झालेला अंतिम आदेश (Set aside) बाजूला ठेऊन प्रकरण पुन्हा चालवावे याबाबत विनंती केलेली आहे.
2. सदर पुनरावलोकन अर्जाची नोटीस गैरअर्जदारांना पाठवण्यात आली, त्याप्रमाणे सदर प्रकरणात गैरअर्जदार हजर होऊन त्यांनी आपले म्हणणे अभिलेखावर दाखल केले. त्यांचे म्हणण्याप्रमाणे ग्राहक तक्रार क्रमांक 21/186 हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 म्हणजेच जुन्या कायद्याप्रमाणे दाखल केलेली आहे. सबब मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे सदर प्रकरणातील संपूर्ण कारवाई ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदीं नुसारच करण्यांत यावी. तसेच जुन्या कायद्यामध्ये पुनरावलोकनची तरतुद नसल्यामुळे सदर अर्ज हा चालू शकत नाही. सबब सदर अर्ज खर्चासह खारीज करण्यांत यावा असे म्हणणे पुरसीसव्दारे गैरअर्जदारांनी दाखल केले.
3. गैरअर्जदारांचा युक्तिवाद ऐकण्यांत आला, अर्जदार यांना वारंवार संधी देऊनसुध्दा ते सदर अर्जाचे सुनावणीकरीता हजर राहीले नाही. सबब सदर अर्जावर आदेश पारीत करण्यांत आला.
4. दि.04.05.2022 रोजी पारीत केलेला आदेश हा नविन कायदा अस्तित्वात आल्यानंतर अंतिम निकाल पारीत करण्यांत आलेला आहे. तसेच त्यामध्ये तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षांना तामील होऊनही विरुध्द पक्ष आयोगासमक्ष हजर झाले नाही किंवा तक्रारीत लेखीउत्तर दाखल न केल्यामुळे आयोगाने त्यांचे विरुध्द प्रकरण ‘एकतर्फी’ चालविण्याचा आदेश पारीत केला असे नमुद आहे. यावरुन सदर तक्रार ही तक्रारीच्या गुणवत्तेवर निकाली काढण्यांत आली असे दिसते. तसेच ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 40 प्रमाणे सदर प्रकरणात Error apparent on the face of the record असल्याचे निदर्शनास येत नाही. सबब सदर पुनरावलोकन अर्ज चालविण्याजोगा नाही, या कारणास्तव सदरचा अर्ज खारीज करण्यांत येतो.
वरील निष्कर्षांच्या आधारे आयोग खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. अर्जदारातर्फे दाखल पुनरावलोकन अर्ज खारीज करण्यात येतो.
2. खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
3. सदर आदेशाची प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
4. अर्जदाराला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.