Maharashtra

Nagpur

CC/165/2019

SMT SHILPA SANDEEP DANDE - Complainant(s)

Versus

SAROJ DHANALAKSHMI NAGARI SAHAKARI SANSTHA MARYADIT - Opp.Party(s)

ADV UMESH CHANGANI

22 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/165/2019
( Date of Filing : 01 Mar 2019 )
 
1. SMT SHILPA SANDEEP DANDE
DANDE BHAWAN NEAR GOLIBAR SQUARE NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAROJ DHANALAKSHMI NAGARI SAHAKARI SANSTHA MARYADIT
OFFICE AT 1948, ANUPAM BUILDING, SHARDA CHOWK, BEHIND BHANDARA BANK JALALPURA CENTRAL AVENUE ROAD NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SAROJ DHANALAKSHMI NAGARI SAHAKARI SANSTHA MARYADIT THROUGH ITS PRESIDENT SH. RAMESH NAUKARKAR
PLOT NO 1, 1ST FLOOR, MANGALDEEP COLONY, NETAJI NAGAR, NEAR SAI MANDIR, BEHIND GOMATI HOTEL, PARDI NAGPUR 440008
NAGPUR
MAHARASHTRA
3. SMT SHOBHA RAMESH NAUKARKAR
PLOT NO 1, 1ST FLOOR, MANGALDEEP COLONY, NETAJI NAGAR, NEAR SAI MANDIR, BEHIND GOMATI HOTEL, PARDI NAGPUR 440008
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 22 Jun 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे बॅंकेत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३/बॅंकेचे ऐजंट मार्फत बचत खाते दिनांक ४/३/२०१६ रोजी उघडले. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे बॅंकेचे अध्‍यक्ष आहे व ते बॅंकेचे कारभाराकरीता जबाबदार आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे सर्व खातेदारांकडुन पैसे स्विकारुन संबंधीत खातेदाराचे बचत खात्‍यात जमा करीत असे. तक्रारकर्तीचा बचत खाता क्रमांक ८०९ असुन विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ तक्रारकर्तीकडुन दिनांक २०/०७/२०१६ पासुन दररोज रक्‍कम वसुल करुन विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे बॅंकेत असलेल्‍या बचत खात्‍यात जमा करीत होता. दिनांक १०/१२/२०१६ (चुकीने १०/१२/२०१७)  पर्यंत तक्रारकर्तीच्‍या बचत खात्‍यात रुपये ३,१०,२००/- इतकी रक्‍कम जमा झाली होती.
  2. तक्रारकर्तीला माहे जानेवारी २०१७ मध्‍ये अतीमहत्‍वाचे कामानिमीत्‍त रकमेची आवश्‍यकता भासली. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे बॅंकेत रक्‍कम काढण्‍याकरीता गेली असता तक्रारकर्तीला रक्‍कम देण्‍यास नकार दिला. तक्रारकर्तीने अनेकदा विरुध्‍द पक्ष क्रमांक १/बॅंकेला भेट दिली व रक्‍कम मिळण्‍याकरीता विनंती केली. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक २ मा. अध्‍यक्ष यांना भेटुन रक्‍कम मिळण्‍याबाबतची विनंती केली परंतु त्‍याचा उपयोग झाला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला दिनांक ७/९/२०१८ रोजी कायदेशीर नोटीस बजावली व ती विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त  होऊनही विरुध्‍द पक्षाने नोटीस  ची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्तीने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला तीच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम रुपये ३,१०,२००/- परत करावी.
  2. मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५,००,०००/- व नुकसान भरपाई करीता रुपये २५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १,००,०००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यावरही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी मुदतीपूर्वी आपला लेखी जबाब सादर न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्‍द प्रकरण बिना लेखी जबाब सादर चालविण्‍याचा आदेश दिनांक ४/१०/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2.  तक्रारकर्तीने मंचाचे अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                     उत्‍तर

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?          होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1.  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांचे बॅंकेत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे मार्फत बचत खाते उघडले  व तिचा बॅंकेतील बचत खाता क्रमांक ८०९ हा आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे बॅंकेत असलेल्‍या बचत खात्‍यामध्‍ये दैनंदिनी पद्धतीवर दिनांक १०/१२/२०१६ पर्यंत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ मार्फत एकूण रुपये ३,१०,२००/- जमा केले होते. तक्रारकर्तीने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. तक्रारकर्तीला पैशाची आवश्‍यकता असल्‍यामुळे तीने विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत जाऊन रकमेची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला तीच्‍या बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम रुपये ३,१०,२००/- देण्‍यास नकार दिला. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ती तीच्‍या बचत खात्‍यातील रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पाञ आहे. करीता खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला तीचे बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम रुपये ३,१०,२००/- अदा करावी व सदर रकमेवर दिनांक २०/०७/२०१६ पासुन द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्तीला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे.
  3.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक ञासाकरीता व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये ३०,०००/- अदा करावे व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.