::: नि का ल प ञ :::
मंचाचे निर्णयान्वये किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
१. गैरअर्जदार यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार यांनी त्यांच्या स्वयंरोजगार असलेल्या रक्तपेढीकरीता ४ ते ६ डिग्री सेल्सीअस तापमान ठेवणारे ब्लड बॅंक फ्रिज खरेदी करावयाचे असल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराशी संपर्क साधला असता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पुर्णपणे स्टेनलेस स्टिलमध्ये बनविलेले ब्लड बॅंक फ्रिज रु. ६५,०००/- चे मोबदल्यात बनवुन देण्याची तयार दर्शवुन तसे अंदाजपत्रक गैरअर्जदारांनी अर्जदारासदिले. अर्जदारांनी दिनांक २०.१०.२०१७ रोजी गैरअर्जदारास रक्कम रु. १०,०००/- अॅडव्हान्स दिला. सदर ब्लड बॅंक फ्रिज गैरअर्जदाराने १० ते १५ दिवसांत देण्याचे कबुल केले व वाहतुकीचा खर्च अर्जदाराने करावे असे ठरवुन सदर ब्लड बॅंक फ्रिज चंद्रपुरला तंत्रज्ञ पाठवुन त्यांचे विमोचन करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार याची होती. त्यानंर गैरअर्जदाराचे मागणीनुसार दिनांक १३.१२.२०१६ रोजी पंजाब नॅशनल बॅंक चंद्रपुर चा धनादेश क्र. ४४११२६ अन्वये Neft व्दारा रक्कम रु.५५,०००/- गैरअर्जदारास दिले व त्यानंतर रक्कम रु. ४,०००/- ब्लड बॅंक फ्रिज चा परिवहनाचा खर्च खर्चम्हणुन गैरअर्जदारास वेगळे दिले. त्यानंतर गैरअर्जदाराने जानेवारी २०१७ मध्ये फ्रिज पाठविला तेव्हा असे लक्षात आले कि, सदर फ्रिज हा साधारण फ्रिज असुन तो ब्लड बॅंके करीता अनुकूल पध्दतीचा नाही ही त्यांनी आलेल्या तंत्रज्ञाच्या लक्षात आणुन दिले व ते त्यांनी मान्य केले. गैरअर्जदाराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी लवकरच नविन फ्रिज पाठविण्याचे कबुल केले. परंतु दिनांक २४.०७.२०१७ पावेतो गैरअर्जदाराने अर्जदारास फ्रिज बदलवुन दिला नाही. अर्जदाराने पत्राव्दारे गैरअर्जदारास पत्र पाठवुन अडचण कळवुन फ्रिजसाठी दिलेली रक्कम परत करण्यास विनंती करुन सुध्दा रक्कम किंवा फ्रिज बदलवुन दिली नाही. त्यामुळे गरजु रुग्णांना रक्त पुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक २६.०९.२०१७ रोजी पंजीबध्द डाकेने पत्र पाठविले असता गैरअर्जदाराने पत्र घेण्यास टाळाटाळ केल्याने पत्र परत आले. रक्तपेढीचे काम फ्रिज अभावी थांबले असल्याले शेवटी अर्जदाराला दिनांक ०२.१०.२०१७ रोजी लॅब केअर, मुंबई यांचेकडुन रक्कम रु. ८५,०००/- मोबदलादेवुन दुसरा फ्रिजखरेदी करावा लागला. गैरअर्जदाराला फ्रिजचा पुर्ण मोबदला देवुन सुध्दा त्यानी फ्रिज चा पुरवठा केला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारा प्रती अवलंबलेली अनुचित व्यापारी पदध्ती असुन अर्जदारास न्युनतापुर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे अर्जदारास नाईलाजास्तव विद्यमान न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात असल्याने अर्जदारांनी गैरअर्जदारा विरुद्ध मंचात तक्रार दाखल केली.
३. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदाराला नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार सदर प्रकरणात उपस्थित न झाल्याने मंचाने दिनांक २२.०१.२०१८ रोजी सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत केले
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा
दिली आहे काय ? होय
२. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दतीचा
अवलंब केला आहे काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :
५. रक्तपेढीकरीता ४ ते ६ डिग्री सेल्सीअस तापमान ठेवणारे ब्लड बॅंक फ्रिज खरेदी करावयाचे असल्याने अर्जदाराने गैरअर्जदाराशी संपर्क साधला असता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पुर्णपणे स्टेनलेस स्टिलमध्ये बनविलेले ब्लड बॅंक फ्रिज रु. ६५,०००/- चे मोबदल्यात बनवुन देण्याची तयार दर्शवुन तसे अंदाजपत्रक गैरअर्जदारांनी अर्जदारासदिले. अर्जदारांनी दिनांक २०.१०.२०१७ रोजी गैरअर्जदारास रक्कम रु. १०,०००/- अॅडव्हान्स दिला. सदर ब्लड बॅंक फ्रिज गैरअर्जदाराने १० ते १५ दिवसांत देण्याचे कबुल केले व वाहतुकीचा खर्च अर्जदाराने करावे असे ठरवुन सदर ब्लड बॅंक फ्रिज चंद्रपुरला तंत्रज्ञ पाठवुन त्यांचे विमोचन करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार याची होती. त्यानंर गैरअर्जदाराचे मागणीनुसार दिनांक १३.१२.२०१६ रोजी पंजाब नॅशनल बॅंक चंद्रपुर चा धनादेश क्र. ४४११२६ अन्वये Neft व्दारा रक्कम रु.५५,०००/- गैरअर्जदारास दिले व त्यानंतर रक्कम रु. ४,०००/- ब्लड बॅंक फ्रिज चा परिवहनाचा खर्च खर्चम्हणुन गैरअर्जदारास वेगळे दिले. त्यानंतर गैरअर्जदाराने जानेवारी २०१७ मध्ये फ्रिज पाठविला तेव्हा असे लक्षात आले कि, सदर फ्रिज हा साधारण फ्रिज असुन तो ब्लड बॅंके करीता अनुकूल पध्दतीचा नाही ही त्यांनी आलेल्या तंत्रज्ञाच्या लक्षात आणुन दिले व ते त्यांनी मान्य केले. गैरअर्जदाराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी लवकरच नविन फ्रिज पाठविण्याचे कबुल केले. परंतु दिनांक २४.०७.२०१७ पावेतो गैरअर्जदाराने अर्जदारास फ्रिज बदलवुन दिला नाही. गैरअर्जदाराने अर्जदारा प्रती अवलंबलेली अनुचित व्यापारी पदध्ती असुन अर्जदारास न्युनतापुर्ण सेवा दिलेली आहे. असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १७४/२०१७ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास फ्रिज खरेदी करण्याकरीता मोबदला म्हणुन दिलेली
रक्कम रु. ६५,०००/- दिनांक २०.१०.२०१७ पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. १०%
व्याजासह अर्जदार यांना अदा करावी.
३. गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवासुविधा पुरविण्यात कसूर करुन तक्रारदार यांना
मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.
३५,०००/- या आदेशप्राप्ती दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.
४. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)