निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 999/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः - 11/08/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 18.09.2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/07/2009
डॉ.श्री.श्यामराव राजाराम महाजन,
उ.व. सज्ञान, धंदाः पेन्शनर,
रा.व्दारा ः चिन्मय हॉस्पिटल, 13 औंकार नगर,
जिल्हापेठे, जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत,जळगांव
जी-2, पहीला मजला, गोलाणी मार्केट, जळगांव.
2. श्री. नरेश पंढरीनाथ चौधरी, अध्यक्ष,
रा.60, शिवकॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव.
3. श्री.बाळकृष्ण विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष
रा.78, शिवकॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव.
4. श्री.गजानन दत्तात्रय पाटील, व्यवस्थापक,
सरदार वल्लभभाई पटेल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,
जी-2, पहीला मजला, गोलाणी मार्केट, जळगांव.
5. श्री.भरत मुरलीधर गुजर, संचालक
रा.खोटे नगर, जळगांव, ता.जि.जळगांव.
6. श्री.विजय पंढरीनाथ चौधरी, संचालक,
रा.160, शिवकॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव.
7. श्री.दत्तात्राय नथ्थु बडगुजर, संचालक,
रा.गणेश कॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव.
8. श्री.ज्ञानेश्वर नारायण चौधरी, संचालक,
रा.गुजराल पंपामागे, जळगांव, ता.जि. जळगांव.
9. श्री.संजय बाबुलाल पवार, संचालक,
रा.16, शिवकॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव.
10. सौ.विमल रंगराव बडगुजर, संचालक,
रा.बेंडाळे स्टॉप जवळ, जळगांव, ता.जि.जळगांव.
11. सौ.वभिावरी राधेश्याम पाटील, संचालक,
रा.पिंप्राळा, ता.जि. जळगांव.
12. श्री.शिवाजी रामसिंग पाटील, संचालक,
रा.दादावाडी, जळगांव, ता.जि.जळगांव.
13. श्री.उमेश दत्तात्राय पाटील, संचालक,
रा.मुक्ताईनगर, जळगांव, ता.जि.जळगांव.
14. श्री.जयंत प्रभाकर नेवे, संचालक,
रा.महाबळ कॉलनी, जळगांव, ता.जि.जळगांव.
15. श्री.भगवान पंढरीनाथ सोनवणे, संचालक,
रा.शिवाजी नगर, जळगांव, ता.जि.जळगांव. ......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/07/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदारा तर्फे श्री.योगेश श.महाजन वकील हजर
सामनेवाला क्र. 2,3,5 ते 11 व 14 तर्फे श्री.विरेंद्र एम.पाटील वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 0 | 15.04.2007 | 53,101/- | 15.05.2008 |
2 | 2013 | 15.03.2005 | 1,09,831/- | 15.05.2008 |
3 | 6852 | 23.02.2008 | 26,040/- | 31.05.2008 |
4 | 8269 | 03.07.2006 | 56,500/- | 31.05.2008 |
5 | 0107 | 10.03.2008 | 52,086/- | 10.06.2008 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रमांक 2,3,5 ते 11 व 14 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते वकीलामार्फत हजर झाले.
3. प्रस्तुत तक्रारीकामी सामनेवाला क्रमांक 1 यांनी सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात तक्रारदार यांनी ठेवलेल्या ठेवीबाबत कबूल केलेले आहे परंतु तक्रारदार यांनी केलेले इतर कथन फेटाळलेले आहे. सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यास सामनेवाला यांनी ब-याच वेळेस सदरची रक्कम हप्त्याहप्त्याने घेऊन जाणेविषयी सांगितले तरीही तक्रारदार तयार नव्हता, सामनेवाला हे तक्रारदार यास सदरील रक्कम हप्त्याहप्त्याने देण्यास आजही तयार आहेत.
सामनेवाला पतसंस्थेने एकूण ठेवीच्या रक्कमेची कर्ज वाटप केलेली आहे. सदर कर्ज वसूल झालेवर पतसंस्था ठेवीदारांची रक्कम देण्यास आजही तयार आहे. सहकारी पतसंस्थाची परिस्थिती अफवांमुळे गंभीर झालेली आहे. ठेवीदारांनी एकत्र संपूर्ण ठेवींच्या रक्कमेंची मागणी केल्यामुळे आज तरी सदरील रक्कम देता येत नाही. सबब सामनेवाला यांनी त्यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती त्यांनी आपल्या खुलाश्यात केलेली आहे.
4. सामनेवाला क्रमांक 2 ते 15 यांनी वकीलामार्फत दि.22/1/2009 रोजी हजर होऊन सामनेवाला क्रमांक 1 यांनी दि.4/12/2008 रोजी उपरोक्त तक्रारीत दिलेले लेखी म्हणणे हे त्यांचेसाठी देखील वाचण्यात यावे अशी विनंती पुरसीस दाखल केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्कम सामनेवाला यांचे पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
6. मुद्या क्रमांक 2 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. म्हणून तक्रारदार ठेवीची रक्कम व्यावरील व्याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 13/07/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव