नि. ११
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३१/२०११
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३१/१/२०११
तक्रार दाखल तारीख : २/२/२०११
निकाल तारीख : १९/११/२०११
----------------------------------------------------------------
श्री मधुसूदन शंकरलाल सोमाणी
वय ६३ वर्षे, व्यवसाय – व्यापार,
रा.वात्सल्यपुरम अपार्टमेंट, आदिनाथनगर,
रतनशीनगर, सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
श्री सारंग एंटरप्राइझेस तर्फे
प्रोप्रा. विजय पाटील, व.व. सज्ञान,
व्यवसाय – व्यापार
रा.ए.जी.हाईट्स, कलानगर,
सांगली-माधवनगर रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री हणमंत पाटील, दिपक कदम
जाबदार : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
जाबदार यांचा किचन ट्रॉली करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना त्यांच्या घरामध्ये किचन ट्रॉली करण्यासाठी ऑर्डर दिली. सदर किचन ट्रॉली करण्यासाठी रक्कम रु.४०,०००/- इतका खर्च येईल असे जाबदार यांनी तक्रारदार यांना सांगितले. काम घेतेवेळी जाबदार यांनी तक्रारदार यांना +ìडव्हान्स मिळालेपासून ३० दिवसांचे आत किचन ट्रॉलीज बनवून देतो असे सांगितले. तक्रारदार यांनी जाबदार यांना +ìडव्हान्स म्हणून दि.१७/५/२०१० रोजीचा हुतात्मा सहकारी बॅंक वाळवा शाखा सांगली यावरील चेक नंबर १५५३५२ द्वारे रक्कम रु.१५,०००/- अदा केले. सदरचा चेक वटला असून जाबदार यांना रक्कम पोहोच झाली आहे. जाबदार यांनी किचन ट्रॉली बनविण्याचे काम एकदम धीम्या गतीने चालू केले. किचन ट्रॉली बनविण्याचे थोडे साहित्य तक्रारदार यांच्या घरी आणून ठेवले. जाबदार यांनी ट्रॉली फिटींग व शटरचे फिटींगचे काम आजतागायत पूर्ण केले नाही. ठरल्याप्रमाणे सदरचे काम दि.१६/६/२०१० पर्यंत करणे गरजेचे असताना जाबदार यांनी आजपर्यंत काम पूर्ण करुन दिले नाही. त्याबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांची वारंवार भेट घेतली असता जाबदार यांनी काम करण्यास पूर्ण टाळाटाळ केली त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून काम पूर्ण करणेबाबत कळविले तथापि नोटीस मिळूनही जाबदार यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्ज शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.८ ला सरतपासाचे शपथपत्र दाखल केले आहे.
३. जाबदार यांना रजि.पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली होती. सदरची नोटीस Not Claimed असा शेरा मारुन परत आली आहे, त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला.
४. तक्रारदार यांनी नि.९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे व नि.१० ला तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना किचन ट्रॉली बनविणेसाठी ऑर्डर दिली होती हे तक्रारदार यांच्या शपथपत्रावरील कथनावरुन सिध्द होते. सदर किचन ट्रॉली करण्याबाबत जाबदार यांना रक्कम रु.१५,०००/- चेकने अदा केले आहेत. सदर चेक क्र.१५५३५२ तक्रारदार यांच्या खात्यावरुन वटला असल्याबाबत खातेउतारा तक्रारदार यांनी नि.३/३ वर दाखल केला आहे. यावरुन तक्रारदार यांनी जाबदार यांना किचन ट्रॉली बनविण्याकरिता रक्कम स्वीकारली आहे ही बाब स्पष्ट होते. जाबदार यांनी सदरचे काम अपूर्ण ठेवले आहे ते अद्याप पूर्ण केले नाही व सदरचे काम पूर्ण करावे म्हणून तक्रारदार यांनी जाबदार यांना रजि.पोस्टाने नोटीस पाठविली आहे ती नोटीसची स्थळप्रत व पोहोचपावती नि.३/५ वर दाखल आहे. जाबदार यांना नोटीस मिळूनही जाबदार यांनी अद्याप काम पूर्ण केलेले नाही. तसेच प्रस्तुत तक्रारअर्जाच्या कामी जाबदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे जाबदार विरुध्द प्रतिकूल निष्कर्ष काढून जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. त्यामुळे तक्रारदार यांची स्वीकारलेली रक्कम रु.१५,०००/- तक्रारअर्ज दाखल तारखेपासून ९ टक्के व्याजासह परत करण्याबाबत आदेश करणे योग्य ठरेल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
५. तक्रारदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. जाबदार यांनी किचन ट्रॉली बनवून न दिलेने तक्रारदार यांना या न्याय मंचात तक्रार अर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता सदरची मागणी अंशत: मंजूर करणे योग्य ठरेल असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येत आहेत.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम रुपये १५,०००/-(अक्षरी रुपये पंधरा हजार माञ)
दि.३१/१/२०११ पासून द.सा.द.शे.९% दराने व्याजासह अदा करावेत असा जाबदार यांना
आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना जाबदार यांनी शारीरिक मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रार
अर्जाचा खर्च म्हणून रुपये १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार माञ) अदा करावेत असा
जाबदार यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पुर्तता जाबदार यांनी दिनांक ४/१/२०१२ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १९/११/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११