नि.25 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 109/2010 नोंदणी तारीख – 7/4/2010 निकाल तारीख – 8/7/2010 निकाल कालावधी – 91 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री मुक्तार इसाक खाटिक रा.150, मरीपेठ, महाबळेश्वर ता. महाबळेश्वर, जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री संग्राम मुंढेकर) विरुध्द 1. सप्तशिवालय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.तळदेव ता. महाबळेश्वर, जि. सातारा तर्फे व्यवस्थापक श्री सचिन वसंत जंगम रा. राममंदिर, साबणे रोड, ता. महाबळेश्वर जि.सातारा 2. चेअरमन, श्री उमेश दिलीप शिपटे रा. मरीपेठ, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर जि. सातारा 3. व्हा.चेअरमन, श्री सुधीर ज्ञानदेव आखाडे रा. कोळी आळी, महाबळेश्वर, ता. महाबळेश्वर जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री ए.ए.वारुणकर) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 व 3 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.1 व 3 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.18 कडे दाखल अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदारचे कथनानुसार जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाचे अर्जदार हे सदस्य होते व आजही आहेत. त्यामुळे अर्जदार हे ग्राहक होत नाहीत. तसेच अर्जदार यांनी सर्व संचालक मंडळाला याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. जाबदार संस्थेवर प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय मंडळासही पक्षकार म्हणून सामील करणे जरुरीचे आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांचे कथन आहे. 4. जाबदार क्र.2 यांनी नि. 18 कडे म्हणणे तसेच शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. सदर जाबदार यांनी अर्जदार हे सन 2002 पासून संचालक होते ही बाब मे. मंचापासून लपवून ठेवली आहे तसेच सध्या संचालक मंडळ बरखास्त असून प्रशासकीय मंडळ नेमलेले आहे, सबब सदर जाबदार रक्कम देणेस जबाबदार नाहीत, तक्रार फेटाळावी असे कथन केले आहे. 5. निर्विवादीतपणे सदर कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि.5 सोबत कागदपत्रे दाखल केली असून त्यांचे अवलोकन करता नि.25/1 कडे जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाचे नावांची यादीची सत्यप्रत दाखल केली असून त्यामध्येही अर्जदार खाटीक मुख्तार इसाक यांचे नाव समाविष्ट आहे असे दिसते. सबब अर्जदार जाबदार संस्थेचे संचालक आहेत हे स्पष्ट आहे. अर्जदारचे विधित्याने यादी कोणत्या सालाची आहे हे समजून येत नाही असा युक्तिवाद केला. परंतु अर्जदारही स्वच्छ हाताने स्वतः कोणत्या सालापासून कोणत्या सालापर्यंत संचालक होते हे मंचासमोर सांगत नाहीत. सबब अर्जदार संचालक होते हे शाबीत होत आहे व संस्था जर आर्थिक अडचणीत आली असेल तर इतर संचालकांबरोबर अर्जदारही जबाबदार आहेत हे स्पष्ट आहे. 6. नि.25/2 कडे प्रस्तुत जाबदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था, महाबळेश्वर यांच्या आदेशाची सत्यप्रत दाखल केली असून त्याचे अवलोकन करता सदर जाबदार संस्थेवरती सन 2009 सालचे आदेशानुसार अवसायक यांची नेमणूक झाली आहे हे स्पष्ट दिसते. निर्विवादीतपणे सदरचे आदेश अस्तित्वात नाही असे अर्जदारचे म्हणणे नाही, इतकेच नाही तर तक्रारअर्ज दाखल करणेपूर्वीच अवसायक यांची नेमणूक झाली आहे असे असतानाही अर्जदार यांनी मे. मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदार केवळ अशिक्षित ठेवीदार नसून संचालक आहेत, सबब त्यांना या बाबीचे ज्ञान आहे. अशा परिस्थितीत अर्जदार यांनी त्यांचे ठेव रकमेची मागणी अवसायक यांचेकडे करावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 8/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | HONABLE MR. Mr. S. K. Kapse, MEMBER | |