ग्राहक तक्रार क्र. 32/2013
अर्ज दाखल तारीख : 08/02/2013
अर्ज निकाल तारीख: 12/05/2015
कालावधी: 02 वर्षे 03 महिने 04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) श्रीमती ललीता बाळासाहेब शिंदे,
वय - 27 वर्ष, धंदा – घरकाम,
रा. गोवर्धनवाडी, ता.जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) व्यवस्थापक,
सौरभ दिपक अजमेरा,
प्रतिभा मोटार्स, राजीव गांधी नगर, उस्मानाबाद,
ता.जि.उस्मानाबाद.
2) शाखाधिकारी,
श्री. शिवाजी वि. ज्ञानु कारंडे वय सज्ञान धंदा नौकरी,
नॅशनल इन्शुरन्स कं. लि. नवी दिल्ली.
मार्फत , व्यवस्थापक,
नॅशनल इन्शुरन्स कं. लि. शुभरॉय टॉवर,
दत्त चौक, सोलापूर ता. जि. सोलापूर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.डी.मोरे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.पी. डी. देशमूख.
विरुध्द पक्षकारा क्र.2 तर्फ विधीज्ञ : श्री. एस.पी. दानवे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1) अर्जदार (तक) ही बाळासाहेब हरीभाऊ शिंदे रा. मौज गोवर्धनवाडी ता. जि.उस्मानाबाद यांची पत्नी आहे. अर्जदार चे पतीने दि.26/09/2011 रोजी हिरो कंपनीची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल जिचा इंजिन क्र.HA10EFBHJ49355 व चेसीस क्र.MBLHA10 क्र.EZBHJ56019 हि विरुध्द पक्षकार (विप) क्र. 1 कडून विकत घेतली व विप क्र.2 कडून विप क्र. 1 च्या मार्फत ‘’हिरो गुड लाईफ’ ही रु.1,00,000/- ग्रु्प वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतली होती. सदर पॉलिसीचा नंबर 351, 804/42/09/820000002 असून तीचा कालावधी दि.26/09/2011 ते 25/09/2014 असा आहे. अर्जदार चे पती दि.26/10/2011 रोजी वर नमूद हिरो कंपनीची स्प्लेन्डर प्लस कास्ट हिच्यावर ढोकी येथून गोवर्धनवाडीकडे रत्याच्या डाव्या बाजूने सावकाश जात असतांना समोरुन भरधाव वेगात असलेली टमटम क्र.25 एन 454 च्या चालकाने अर्जदाराचे पतीच्या मोटार सायकलाला जोराची धडक दिली. सदर अपघाताची पोलिस स्टेशन ढोकी येथे टमटम चालकाविरुध्द गु.र.नं.149/11 कलम 279, 337, 338 भा.दं.वि. प्रमाणे दि.27/10/2011 रोजी गुन्हा नोंद झाला डॉक्टरांच्या सल्लयानुसार पुढील उपचारासाठी सोलापूर येथील बेनीत हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान अर्जदाराच्या पतीचा दि.27/10/2012 रोजी मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांनी टमटम चालकाविरुध्द 304 (अ) भा.दं.वि. प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले.
2) तक ने दि.28/02/2012 रोजी क्लेम फॉर्म देऊन व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करुन विमा रकमेची मागणी केली. परंतू विमा रक्कम मिळण्यासाठी वेळोवेळी विनंती करुनही विप क्र. 1 व 2 यांनी काहीही कार्यवाही केली नाही म्हणून दि.15/01/2013 रोजी विप क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवून विमा रक्कम रु.1,00,00/- 15 दिवसात देण्याची विनंती केली तसेच अर्जदाराने नोटीससोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे विप क्र.1 व 2 यांच्याकडे दाखल केली तरी देखील विप क्र.1 व 2 यांनी आजतागायत काहीही कळविले नाही म्हणून ही तक्रार दाखल केली असून विमा रक्कम रु.1,00,000/- दि.27/10/2011 पासून 12 टक्के व्याजाने विप क्र.1 व 2 यांनी एकत्रित व संयुक्तरित्या, अर्जदारास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/-, अर्जदाराच्या सेवेतील त्रुटीपोटी रु.20,000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु.10,000/- विप क्र. 1 व 2 यांनी एकत्रित व संयुक्तरित्या देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणात विप क्र. 1 यांना मंचामार्फत नोटीस काढण्यात आल्या असता त्यांनी आपले म्हणणे दि.01/03/2013 रोजी मंचात दाखल केले ते खालीलप्रमाणे.
अर्जदार हे विप क्र. 1 चे बेनिफिशिअरी व ग्राहक नाहीत अर्जदाराने आपले म्हणणे कागदोपत्री पुराव्यासह सिध्द करावे. अर्जदाराने आजतागायत विप क्र.1 यास तक कडून नोटीस व कागदपत्रे मिळालेली नाहीत. नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विप क्र.1 वर नसून सदर तक्रार विप क्र. 1 यांना अमान्य आहे असे नमूद केले आहे.
क) सदर प्रकरणात विप क्र. 2 यांना मंचामार्फत नोटीस काढण्यात आल्या असता त्यांनी आपले म्हणणे दि.15/04/2013 रोजी मंचात दाखल केले ते खालीलप्रमाणे.
तक्रारदाराने सदर इंजिन व चेसीस क्रमांकाची मोटरसायकल दि.26/09/2011 रोजी खरेदी केली परंतु आर.टी.ओ. कार्यालयाकडे कायद्यानुसार नोंदणी करणे आवश्यक असतांना नोंदणी दि.26/10/2011 रोजी पर्यंत केलेली नव्हती. तक्रारदाराचे पती सदर मोटारसायकल बेकायदेशीपणे चालवित होते व कथीत अपघात झाला. तक्रारदाराने विप कडे विमा दावा आवश्यक कागदपत्रासह दाखल केला नसून नोटीस सोबतही विमा दावा आवश्यक कागदपत्रासह दाखल केला नाही म्हणून सदर तक्रार रद्द करण्यात यावी असे म्हणणे दिले आहे.
तक्रारदाराची तक्रार त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, विप यांचे म्हणणे त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे व उभयतांचा युक्तिवाद यांचा विचार केला असता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खालील कारणांसाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) अर्जदार विप क्र. 1 व2 चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विप ने तक च्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? विप क्र.1 पुरते होय.
3) तक अनुतोषास पात्र आहे काय ? विप क्र.1 पुरते होय.
5) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
ई) 1) मुद्दा क्र.1 : अर्जदाराच्या पतीचा मृत्यू मोटारसायकल अपघातात झाला असून त्यांनी गुडलाईफ कार्ड या योजनेव्दारे विप क्र.1 प्रतिभा मोटार्स यांचेकडून मोटारसायकल खरेदी केली तशी कागदपत्रे प्राप्त केली आहेत व त्याव्दारे ''हिरो मोटर स्प्लेन्डर कास्ट'' म्हणजे विप क्र.1 उत्पादक कंपनी व विप क्र.2 म्हणजे इन्शुरंन्स कंपनी यांचेमध्ये करार झालेला असून त्याव्दारे विप क्र.2 (विमा कंपनी) यांनी अपघातात व मोटारसायकलीच्या मालकाचा मृत्यू झाल्यास त्यांना 1 लक्ष रुपयाचा विमा कव्हरेज प्राप्त आहे व हे असतांना तक ने योग्य कागदपत्रे दाखल करुनही त्याला विम्यादाव्याचा लाभ मिळू शकला नाही म्हणून विप क्र.1 व विप क्र.2 यांनी सेवेत त्रुटी केलेबाबत हया मंचात दावा दाखल केला आहे.
2) तक च्या दाव्या संदर्भात दाखल कागदपत्रानुसार पोलीस हा पंचनाम्यानुसार दि.26/10/2011 रोजी तक च्या पतीचा मृत्यृ मोटारसायकल व टमटमच्या धडकेत ढोकी येथे झाल्याचे निश्चीत होते तसेच दि.29/10/2011 रोजीचे मृत्यूप्रमाणपत्रही दिसुन येते. पावती क्र.9771 ने तक च्या पतीने विप क्र.1 कडून वाहन खरेदी केल्याचे आढळून येते. सदरचा व्यवहार दि.26/09/2011 रोजीचा आहे त्याच सोबत दि.26/09/2011 रोजी customer No.2997 पान क्र.49 वर एक फार्म भरलेला दिसून येतो त्यामध्ये वाहनाच्या Accessories बाबत व वाहनाच्या Engine Number, Chassis Number सह काही अटींचा उल्लेख आहे त्यामध्ये मी वाहन पासिंग नसलेल्या अवस्थेत घेतले असून या कालावधीत अपघात झाल्याची मी स्वत: जबाबदार राहील असे निवेदन आहे हयावर तक च्या पतीची सही दिसून येते.
3) त्याचसोबत पान क्र.51 वर Certificate of insurance National Ins. Co. असलेले DAB Br. Manager ची सही असलेले प्रमाणपत्र दिसून येते त्यावर Membership क्रमांक तसेच नाव दोन्हीही आढळून येत नाही.
4) पान क्र.53 वर Hero good life card असून कालावधी दि.26/09/2011 ते 25/09/2014 असा असून बाळासाहेब हरीभाऊ ही अशी नावे दिसुन येते.
5) यावरुन तक च्या पतीचा मृत्यू हा योजनेच्या कालावधीत होता हे स्पष्ट होते याच सोबत सदरची योजना ही विप क्र.1 व विप क्र.2 यांनी ग्राहकाच्या हितासाठी काढलेली असून त्याचा प्रिमीयम ग्राहकाकडून घेतला जातो हे ही स्पष्ट होते त्यामुळे तक हा विप क्र. 1 व विप क्र.2 चा ग्राहक होतो हे स्पष्ट होते. याच सोबत विप क्र.2 म्हणजे (विमा) कंपनीने म्हणणे युक्तिवाद पाहीले असता त्यांचा मुख्य आक्षेप दि.26/10/2011 रोजी मोटारसायकल नोंदणी केलेली नव्हती व वाहन कायदा 39 चा भंग केला आहे त्याच सोबत क्लेमफॉर्म योग्य ती कागदपत्रे व वाहन चालकाचा वैध परवाना यांचेसह दाखल नाही त्यामुळे अटी व शर्तीचा भंग यासाठी हा दावा अमान्य करण्यात येतो व म्हणून बेकादेशीर दावा किंवा अयोग्य दावा नामंजूर करणे ही सेवेतील त्रुटी होत नाही याच सोबत विप ने मा. वरीष्ठ न्यायालयाचा न्यायनिवाडा दिला आहे.
6) विप च्या आक्षेपाच्या अनुषंगाने कागदपत्राची पडताळणी केली असता claim form अथवा policy कोठेही दिसून आली नाही वाहन परवाना दि.08/07/2014 रोजी मा. न्यायमंचाच्या परवानगीने नंतर दाखल केलली दिसून येतो परंतू वाहन नोंदणीकृत असल्याचे नोंदणी प्रमाणपत्र (आर.टी.ओ. कडील) दिसून आले नाही व ही बाब तक ची निश्चीत गंभीर चूक असल्याचे हे मंच मान्य करत असून हा करारभंग आहे. ही अट सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रासह कागदपत्रेही आहे. अशाच स्वरुपाचे मत विप ने जोडलेल्या न्यायीक दाखल्यात रि.पी.क्र.3394/2011, निशा विरुध्द आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शूरंन्स कं. असल्याने मा. वरीष्ठ न्यायालयाच्या निर्णयास सहमती दर्शवत तक ची तक्रार विप क्र.2 विरध्द फेटाळण्यात येते तथापि विप क्र.1 हा वाहन विक्रेता असून त्याचे मार्फत हे कार्ड व पॉलिसी डॉक्यूमेंट वितरीत होणे आवश्यक आहे तसेच कार्डवरील नोंदीनुसारही कागदपत्रे जवळच्या Dealer कडे जमा करणे अपेक्षीत आहे व त्याने ती विप क्र. 2 कडे म्हणजे विमा कंपनीकडे पाठवणे अपेक्षीत आहे त्यापैकी कोणतीही कृती केल्याचे विप च्या म्हणण्यात दिसुन येत नाही तसेच दिलेल्या कार्डवर विकेत्याचा / तक चे नाव नंबर नाही अशी संपूर्ण कागदपत्राची देवाण घेवाण करणे ही विप क्र.1 ची सेवेतील अंशत: त्रुटी आहे कारण विक्री वृध्दीसाठी त्याने ही योजना राबवली असल्याने या योजनेतून ज्या विक्रीची वाढ होईल त्याचा तो लाभार्थी आहे म्हणून त्याचे लाभ घेताना जबाबदारीचे दायीत्व तो टाळू शकत नाही म्हणून रु.5,000/- तक्रारीचा खर्च हा विप क्र.1 ने द्यावा.
आदेश
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप क्र. 1 ने तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) दयावे.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.