जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 50/2011 तक्रार दाखल तारीख –09/02/2011
अमोल पि.अर्जुनराव नवले
वय 26 वर्षे धंदा व्यापार .तक्रारदार
रा.लेदर फॅक्ट्रीजवळ, एम.आय.डी.सी.
पांडूरंग नगर, बीड ता.जि.बीड
विरुध्द
1. सान्या मोटार्स लि.
मार्फत व्यवस्थापक, गट नं61,
घोसापुरी, नामलगांव फाटयाजवळ,
जालना रोड, बीड. सामनेवाला
2. टाटा मोटार्स लि.
पॅसेंजर कार बिजनेस युनिट,
बी-4, तिसरा मजला, लक्ष्मी टॉवर,
सी-5, जी-ब्लॉक, आय.सी.आय.सी.आय बँक,
बांद्राच्या बाजूला, बांद्रा (पुवी) मुंबई-400 051.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.बी.धांडे
सामनेवाला 1 तर्फे :- अँड.पी.ए.भोसले
सामनेवाला 2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराचा दत्त बोअरवेल्स या नांवाने बोअरवेल्स ड्रीलिंग कॉन्ट्रक्टरचा व दत्त अर्थमुव्हर्सचा व्यवसाय बीड, जालना परभणी जिल्हात आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मालकीचा बोअरवेल्सचा मशीन जे.सी.बी. खरेदी केलेला आहे. सदर व्यवसाय दोन वर्षापासून तक्रारदार करीत आहेत. सदर व्यवसायासाठी त्यांना प्रवास करावा लागता त्यासाठी त्यांनी टाटा सुमो व्हीक्टा एक्स जिप खरेदी करण्याचे ठरविले.
दि.21.10.2010 रोजी सामनेवाला कडून टाटा कंपनीचे सुमो व्हीक्टा एक्स ज्यांचा रजिस्ट्रेशन नं.एम.एच.-23-ई-9395 असा आहे चेसीस नंबर एम ए टी 446244 ए 9 एच 25598 ज्यांचा इंजिन नंबर 497 एस पी टी सी 42 एच झेड वाय 635032 खरेदी केली. सदर जिप खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँक शाखा बीड यांचेकडून रक्कम रु.4,00,000/- कर्ज घेतले. स्वतः जवळील रक्कम रु.1,84,377/- भरले.
वाहन खरेदी केल्यानंतर वाहनाचे पासिंग व रोड टॅक्सकरिता रु.41,000/- व इन्शुरन्स करिता रु.23,915/- एवढा खर्च आला.
खरेदी केलेल्या जिपमध्ये दोष निर्माण झाल्याने सदरची जिप तक्रारदाराने दि.27.10.2010 रोजी सामनेवालाकडे दाखवण्यासाठी आणली. जिपमध्ये खालील प्रमाणे दोष असल्याचे सांगितले.
अ) जिप चालवताना अचानक बंद पडते.
ब) जिप चालवताना अचानक ब्रेक लागत नाही.
क) जिप चालवताना प्रति घंटा 60 च्या वेगाने चालवण्याचा प्रयत्न केल्यास ती व्हायब्रेट होते.
ड) जिप प्रति लिटर 5 ते 6 कि.मी. चे ऍव्हरेज देते.
ई) जिप चालवतांना स्टेअरिंग अचानक जाम होते.
त्यावर सामनेवाला यांनी सदर जिपची सव्हीसिंग न झाल्याने दोष निर्माण होऊ शकतात. सर्व्हीसिंग करुन घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवालाकडे जिप सव्हीसिंग करिता दि.27.10.2010 रोजी श्री. काळे यांचेकडे दिली. त्याच दिवशी जिपमधील सर्व दोष दूर झाले आहेत म्हणून जिप तक्रारदाराचे ताब्यात दिली.तक्रारदारांनी जिप घरी नेली त्यातील दोष पूर्णपणे बरे न झाल्याचे निर्दशनास आलयावर जिप पून्हा सामनेवालाकडे वरील दोष पून्हा घडत असल्याचे सांगून जिप त्यांचे ताब्यात दिली. सामनेवाला यांनी तक्रारदारास जिपचे जॉब कार्ड कोणतीही पावती न देता जिप 5-6 दिवसांनी म्हणजे दि.7.11.2010 रोजी ताब्यात दिली. पून्हा 5-6 दिवसांने जिपमध्ये पूर्वी सारखे दोष आल्याने त्या बाबत सामनेवालाकडे तक्रार करुन जिप दोष काढा अथवा जिप बदलून दया अशी मागणी केली असता दि.15.11.2010 रोजी जिप पून्हा दोष काढण्यासाठी घेतली व त्यांच दिवशी परत केली. परंतु तक्रारीत नमूद केलेले दोष न आढळून आल्याने दि.17.11.2010 रोजी सामनेवाला यांहचे ताब्यात जिप दिली व त्यांच दिवशी त्यांनी परत केली. जिपमध्ये पूर्वीसारखेच दोष आढळून येऊन लागल्याने दि.18..11.2010 रोजी जिप सामनेवालाकडे नेली असता त्यांनी जवळपास 20 दिवस दूरुस्तीसाठी म्हणून ताब्यात ठेवली त्या बाबत पावती दिली नाही. 20 दिवसानंतर जिप ताब्यात दिली. त्यावेळेस पूर्वीचेच दोष जिपमध्ये आढळून आल्याने जिप नेण्यास इन्कार केला असता सामनेवाला यांनी तक्रारदारांना तुमची जिप बाहेर दूरुस्त करुन घ्या असे सांगून जिप घेऊन जाण्यास सांगितले.
दि.17.12.2010 पर्यत जिप तक्रारदाराचे घरी बंद स्थितीत उभी होती. त्यानंतर दि.17.12.2010 रोजी फोन द्वारे तक्रारदारास बोलावून घेतले व जिप ताब्यात घेतली व त्यांच दिवशी परत दिली. दूसरे दिवशी जिप देण्याचे सांगितले. त्याप्रमाणे दि.18.12.2010 रोजी ते 21.12.2010 रोजी तसेच 23.1.2.2010 ते 28.12.2010 ते 5.1.2011 , 6.1.2011, 8.1.2011, या कालावधीत सामनेवाला यांचे सव्हीसिंग सेंटरला जिप सामनेवाला यांचे ताब्यात होती. परंतु जिपमधील दोष पूर्णतः दूरुस्त न झाल्याने दि.9.1.2011 रोजी जिप तक्रारदाराच्या ताबयात दिली. जिप बाहेर दूरुस्त करुन घ्या असे म्हणाले. तक्रारदाराने जिप नेण्यास इन्कार केला. सामनेवाला यांनी उध्दटपणाची भाषा वापरुन हाकलून देण्याचा प्रयत्न केला. जिप रस्त्यावर नेऊन उभी केली. तक्रारदाराने तशाच अवस्थेत जिप घरी नेऊन बंद अवस्थेत उभा केलेली आहे. त्यातील दोषाचे सामनेवाला यांनी निराकरण केले नाही.
प्रत्येकी वेळी सामनेवाला यांचे ताब्यात जिप देताना जिपमध्ये कमीत कमी रु.500/- चे डिझेल सामनेवाला टाकून घेत होते व प्रत्येक वेळेला सामनेवालेच्या टेस्ट ड्रायव्हींग मध्ये संपत असे, एकूण रु.8,000/- चे डिझेल जिप टेस्टींगसाठी संपलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रु.2597/- रोख घेतलेले आहेत. जिप जर व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगात आली असती तर प्रतिदिन रु.500/- ची बचत झाली असती. त्याप्रमाणे एकूण दि.21.10.2010 ते 08.01.2011 या काळात रु.30,000/- ची बचत झाली असती. जिप उपयोगात न आल्याने प्रतिदिन रु.500/- भाडयाने एकूण रु.30,000/- द्यावे लागले. रु.60,000/- चे नूकसान झाले त्यांस सर्वस्वी सामनेवाला जबाबदार आहेत. दोषयूक्त जिप सामनेवाला यांनी विक्री केल्याने नूकसान सामनेवाला क्र. 1 व 2 संयूक्तीकरित्या जबाबदार आहेत. तसेच जिप उपयोगात न आल्याने रक्कम रु.5,84,377/- + रु.64,915/- = रु.6,49,292/- निव्वळ जिपकरिता गेल्याने सदर रक्कमेचे पूर्णतः नूकसान झालेले आहे. तसेच डिझेलचे एकूण रु.8,000/- ऑईल बदलीची रक्कम रु.2597/- व जिपच्या कर्ज व्याजापोटी भरलेली एकूण रककम रु.3977/- असे एकूण रु.14,574/- चे निव्वळ नुकसान झालेले आहे. मानसिक आर्थिक हानी झाली त्यापोटी रु.10,000/- मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत.
विनंती की, सामनेवालाकडून तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रु.7,33,866/- त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याज संयूक्तीकरित्या देण्या बाबत आदेश व्हावेत. तक्रारदारास जिप दोषरहित करुन देण्याचे सामनेवाला यांना आदेश व्हावेत. सदोष जिप ऐवजी नवीन दोषरहीत जिप देण्याचे आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.5.7.2011 रोजी दाखल केला.खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. दि.27.10.2010 रोजी ही वाहनाची मोफत सव्हीसिंग ची दिनांक आहे. सदर दिनांकाला वाहन तक्रारदारानी शोरुम मध्ये आणले त्यावेळी तक्रारदारानी ज्या तक्रारीत सुचना दिल्या त्याप्रमाणे वाहनाची सव्हीसिंग करण्यात आली.तक्रारदाराचे समाधान करुनच वाहन ताब्यात देण्यात आले.
सव्हीसिंगच्या दिनांकापूर्वीच दि.23.10.2010 रोजी वाहनाचे वायफर जाम झाले त्यांने वाहन सामनेवाला कडे आणले वायफर वॉरंटीमध्ये बदलून देण्यात आले परंतु तक्रारदाराने हेतूतःही बाब नमूद केलेली नाही.
पहिल्या फ्रि सव्हीसिंग नंतर वाहन शोरुम मध्ये कधीही आणले गेले नाही. सदर वाहन दि.15.11.2011 रोजी आणले गेले. ज्यादिवशी असेंब्लिंग टयूब व्हॅक्युमिंग ब्रेकटयूब तक्रारीप्रमाणे लगेच अंडर वॉरंटी बदलून दिली. दि.17.11.2010 रोजी ही फ्रि सव्हीसिंगची तारीख आहे त्यावर तक्रारदाराने वाहन नियमाप्रमाणे शोरुमध्ये आणले पिकअपच्या तक्रारची ट्रायल दिली व त्याच दिवशी समाधान स्वरुप तक्रारदारास परत दिले. दि.18.12.2010 रोजीला शोरुम ला तक्रारदाराने वाहन आणले ते दि..21.12.2010 पर्यत शोरुम मध्ये होते परंतु या तिन दिवसांत वाहनात काय काय दूरुस्त्या केल्या हे नमूद करण्याचे टाळले. या तिन दिवसात टेल गेटमधील आवाजाची तक्रार व तक्रारदारास ट्रायल देऊन पिकअपची तक्रार दुर करुन वाहन तक्रारदाराचे ताब्यात दिले. दि.23.12.2010 रोजी फ्रि सव्हीसिंगची तारीख असल्याने वाहन शोरुममध्ये आणले, सव्हीसिंग नंतर परत केले. तक्रारदाराने हेतूतः नमूद केलेले नाही. फ्रि सव्हीसिंग मध्ये इंजिन ब्रॅकेंट वॉरंटीमध्ये बदलून दिले.
तक्रारदाराच्या सततच्या तक्रारीमूळे दि.28.12.2010 ते दि.1.5.2011 रोजी पर्यत वाहन शोरुमला एरोचेककअप करता ठेऊन घेण्यात आले. त्यावेळी सामनेवाला यांना आढळले की, इंजिनमध्ये कसलाही दोष नाही करिता डिझेल पाईप बदलला व तक्रारदारास दि.5.1.2011 रोजी वाहन ताब्यात दिले. दि..6.1.2011 रोजी तक्रारदाराने वाहन परत आणले व गाडी घाटात बंद पडते असे सांगितले. सदर वाहनाचे बनावटी प्रमाणे वाहनात डिझेल कमी असेल तर असे होऊ शकते व ही बाब तक्रारदारास समजावून दिली, तरी सामनेवाला क्र.1 चे मॅकेनिक यांनी व इतर यांनी स्वखर्चाने डिझेल टाकून तक्रारदारास वाहनाचे पिकअप काढून दिले. जे योग्य असल्याचे तक्रारदारानी मान्य केले. तक्रारीत वाहनाचे उपयोगाने किती बचत झाली असती ही हे म्हणणे काल्पनिक आहे. कसलाही त्या बाबत कागदपत्र किंवा तज्ञाचा अहवाल नाही.सामनेवाला कोणत्याही नूकसान भरपाई जबाबदार नाहीत. वाहनामध्ये ऑईल बदलले हा भाग फ्रि नसतो तो खर्च सर्व वाहनधारकाना दयावा लागतो. त्यांला नूकसान समजणे गैर आहे.
तक्रारदाराने वाहन खरेदी करतेवेळी त्यांचे सर्व नियम व अटी यांस बांधील राहील असे लिहून देऊन वाहन खरेदी केले. त्यामुळे वाहन बदलून देणे किंवा त्यांची किंमत देणे नियमामध्ये येत नाही. वाहन अंडर वॉरंटीत आहे, अंडर गँरटीत नाही. तक्रारदारांनी जी कागदपत्र दाखल केली त्यात किरकोळ दूरुस्तीचा संदर्भ नमूद आहे तो पाहिला तर कूठेही दिसून येत नाही. सामनेवाला यांचे रेकॉर्डप्रमाणे नमूद वाहन हे पूर्णतः निर्दोष आहे त्यात बनावटी दोष नाही. तक्रारदाराने कोणत्याही तज्ञाचा हवाला दिला नाही. ज्यातून वाहनातील दोष स्पष्ट झाले असते. तक्रारदाराचा सामनेवाला शोरुमला बदनाम करण्याचा उददेश दिसतो. तक्रार वगैरे केली म्हणजे काही ना काही मिळेल असा डाव दिसतो. त्यामुळे तक्रार ही पायाविरहीत आहे. ती फेटाळणे योग्य आहे. तक्रार नामंजूर करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 हे जिल्हा मंचात हजर झाले नाही व त्यांनी त्यांचा खुलासाही ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मूदतीत दाखल केला नाही म्हणून त्यांचे विरुध्द दि.6.5.2011 रोजी एकतर्फा चालविण्याचा निर्णय जिल्हा मंचाने घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 यांचा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.धांडे व सामनेवाला क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.पी.ए.भोसले यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कडून सामनेवाला क्र.2 या उत्पादक कंपनीचे वाहन सुमो व्हिक्टा एक्स मॉडेल दि.21.10.2010 रोजी विकत घेतले आहे. सदर वाहनाचा नोंदणी क्र.एम.एच.-23-ई-9395 आहे.
सदर वाहन खरेदी केल्यानंतर सदर वाहनात तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांना जे दोष आढळले, सदर दोषाचे संदर्भात तक्रारदारांनी सदरचे वाहन सामनेवाला क्र.1 यांचेकडे त्या बाबत तक्रारी केल्या व त्यांनी सदरच्या तक्रारीचे निराकरण करुन दिलेले आहे असे सामनेवाला यांचे खुलाशावरुन दिसते. तक्रारीत नमूद केलेल्या प्रत्येक दिनांका हया तक्रारदाराच्या वाहनाच्या फ्रि दिनांकाच्या आहेत व फ्रि सर्व्हीसिंगसाठी तक्रारदारांनी वाहन सामनेवाला क्र.1 यांचेकडे नेलेले आहे व त्यांनी त्यानुसार फ्रि सव्हीसिंग व तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण करुन तक्रारदाराचे ताब्यात वाहन दिल्याचे कागदपत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी देखील सामनेवाला क्र.1 ने वाहन दूरुस्तीसाठी टाकल्यानंतर ते दूरुस्त करुन दिल्याचे प्रत्येक दिनांकाच्या वेळी तक्रारीत नमूद केलेले आहे.
तक्रारदारांनी नमूद केलेल्या वाहनातील दोषा बाबत कोणत्याही तज्ञाचा पुरावा नाही. तक्रारदारांनी फ्रि सव्हींसिगला वाहन सामनेवाला क्र.1 कडे दिले म्हणजे वाहन दोषयूक्त होते असा अर्थ काढणे चूकीचे ठरेल. फ्रि सव्हीसिंगच्या वेळेत वाहनातील तक्रार तक्रारदाराने नमूद केल्यानंतर दूर करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सामनेवाला यांनीतक्रारदारांना दोषयूक्त वाहन दिल्या बाबत तक्रारदाराच्या शब्दा व्यतिरिक्त कोणताही स्पष्ट पुरावा नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी दोषयुक्त वाहन दिल्याचे किंवा विक्री नंतर सेवा न दिल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत केलेल्या मागण्या मंजूर करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड