Maharashtra

Satara

CC/14/113

shri balvant shnkar more - Complainant(s)

Versus

santosh baban mane - Opp.Party(s)

kadam

08 Jun 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                               मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                           तक्रार क्र. 113/2014.

                            तक्रार दाखल दि.5-8-2014.

                                    तक्रार निकाली दि.8-6-2015. 

श्री.बळवंत शंकर मोरे,

रा.मु.पो.कवठे, ता.वाई, जि.सातारा.

हल्‍ली रा. बिल्डिंग नं.ई-1, 19,

रुम नं.सी-9, सेक्‍टर क्र.2, नेरुळ,

नवी मुंबई 706.                    ....  तक्रारदार

         विरुध्‍द

संतोष बबन माने,

रा.मु.पो.कवठे, ता.वाई, जि.सातारा.     ....  जाबदार

                 तक्रारदारातर्फे अँड.ए.आर.कदम. 

                 जाबदारातर्फे अँड.डी.एस.फडतरे.

                          न्‍यायनिर्णय

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.

     तक्रारदार हे मौ.कवठे, ता.वाई, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत, तसेच ते मुंबई येथे भारत संचार निगममध्‍ये सुपरवायझर म्‍हणून नोकरी करतात.  जाबदार हे मौ.कवठे परिसरात बिल्डिंग कॉंट्रॅक्‍टरचा व्‍यवसाय करतात.   तक्रारदार व जाबदार हे दोघेही एकाच गावातील असल्‍याने व शेजारी रहाणारे असलयाने तक्रारदार व जाबदार एकमेकांचे परिचयाचे आहेत.  मौ.कवठे येथील तक्रारदाराची मिळकत याचा सि.स.नं.698, गट क्र.370/23, क्षेत्र 1 आर या मिळकतीत तक्रारदाराने नवीन घर बांधणेचे ठरविले, त्‍याप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराबरोबर चर्चा करुन नवीन घराचे बांधकाम जाबदाराचे सांगण्‍याप्रमाणे करणेचे ठरवले व त्‍याप्रमाणे दि.2-1-2014 रोजी रक्‍कम रु.100/- चे स्‍टॅम्‍पपेपरवर जाबदाराचे हस्‍ताक्षरात जाबदारांनी बांधकाम करारनामा तक्रारदारास लिहून दिला, तसेच बांधकाम ठरलेप्रमाणे बांधकाम प्‍लॅन जाबदारांनी तक्रारदारास करुन दिला होता व आहे.  प्रस्‍तुत कराराप्रमाणे जाबदारांनी तक्रारदारांना घराचे बांधकाम करुन देणेचे जाबदारावर बंधनकारक होते व आहे.  सदर करारनाम्‍यातील बांधकामाचे स्‍वरुप व व्‍यवहाराचा तपशील जाबदारांनी त्‍यांचे हस्‍ताक्षरात तक्रारदार व जाबदार यांचेत ठरलेप्रमाणे करारात नमूद केलेला आहे. 

        सदर करारात ठरलेप्रमाणे जाबदारांनी तक्रारदाराना 22×22 आर.सी.सी.घराचे बांधकाम, संडास बाथरुमचे बांधकाम एकूण रक्‍कम रु.5,20,000/-(रु.पाच लाख वीस हजार मात्र) एवढया रकमेस करुन देणेचे मान्‍य व कबूल केले होते त्‍यामध्‍ये जाबदार हे बांधकामास लागणा-या मटेरियलचे खर्चासह व त्‍यांचे बांधकाम मजुरीसह करुन देणेचे मान्‍य व कबूल केले होते व तसा करार तक्रारदारास जाबदाराने लिहून दिला होता.  प्रस्‍तुत करारपत्रावर तक्रारदार व जादबारांनी साक्षीदारांसमक्ष सहया केल्‍या आहेत.   करारात ठरल्‍याप्रमाणे जाबदाराला तक्रारदाराने दि.7-2-2014 रोजी भारतीय स्‍टेट बँकेतील खात्‍यावरील चेक क्र.995005 ने रक्‍कम रु.2,00,000/-(रु.दोन लाख मात्र) अदा केले आहेत.  सदरची रक्‍कम जाबदारास मिळालेली आहे.  तसेच तक्रारदाराने दि.26-4-2014 रोजी त्‍यांचे भारतीय स्‍टेट बँक या खात्‍यावरील चेक क्र.995006 ने रक्‍कम रु.1,00,000/- (रु.एक लाख मात्र) अशी एकूण रक्‍कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) एवढी रक्‍कम जाबदारास अदा केली आहे.  जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम मार्च 2014 अखेर पूर्ण करुन देणेचे मान्‍य व कबूल केले होते, परंतु करारात ठरलेप्रमाणे बांधकाम न करता तक्रारदाराकडून आगाऊ रकमेची उसनवार मागणीचा तगादा लावला.  जाबदार जसजसे काम करेल त्‍याप्रमाणे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने तक्रारदार जाबदारास रक्कम देणेस तयार होते व आहेत.  दरम्‍यान जाबदाराने घराचे अर्धवट बांधकाम करुन तक्रारदाराना सर्वच्‍या सर्व रक्‍कम दया तरच मी घराचे बांधकाम करुन देईन असा दम देऊन मार्च 2014 मध्‍ये तक्रारदाराचे घराचे बांधकाम जाबदाराने अर्धवट सोडलेले आहे.  तरीही जाबदार रक्‍कम मिळालेवर बांधकाम चालू करल या हेतूने तक्रारदाराने दि.26-4-2014 रोजी रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) चेकने जाबदारास अदा केली आहे.  सदरची रक्‍कम जाबदारास मिळूनही जाबदाराने तक्रारदाराचे घराचे अर्धवट राहिलेले बांधकाम सुरु केलेले नाही.  तक्रारदाराने जाबदारास जवळजवळ रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) जादा अदा केले आहेत.  ब-याचदा तक्रारदाराने जाबदाराशी संपर्क साधून काम पूर्ण करुन देणेस सांगितले असता जाबदाराने संपूर्ण रक्‍कम देणेबाबत हट्ट केला व घराचे बांधकाम पूर्ण करुन दिलेले नाही.  तक्रारदार हे मुंबई येथे रहाणेस असतात.  जाबदाराचे या वागण्‍यामुळे वारंवार तक्रारदारास मुंबईवरुन रजा काढून गावी यावे लागते.  जाबदाराला खूपवेळा विनवण्‍या करुनही तक्रारदाराच्‍या घराचे बांधकाम पूर्ण करुन दिले नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने सरकारी सिव्‍हील इ‍ंजिनियर शशिकांत धुमाळ यांचेमार्फत अर्धवट बांधकामाचे व्‍हॅल्‍युएशन काढले असता श्री.धुमाळ यांना मजुरी मटेरियलसह रक्‍कम रु.1,95,000/-(रु.एक लाख पंचाण्‍णव हजार मात्र) चे बांधकाम जाबदाराने तक्रारदारास करुन दिले आहे असे व्‍हॅल्‍युएशन रिपोर्टवरुन दिसून येते.  तसेच उर्वरित रक्‍कम रु.1,05,000/- (रु.एक लाख पाच हजार मात्र) जाबदाराने तक्रारदाराकडून उचल स्‍वरुपात घेतली आहे.  सदरची रक्‍कम तक्रारदाराने जाबदाराकडे परत मागितली असता जाबदाराने स्‍पष्‍टपणे नकार दिला, तसेच उर्वरित बांधकाम करणेसही स्‍पष्‍टपणे नकार दिला आहे.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे.  तक्रारदारास आता बांधकाम करुन घेणेसाठी मटेरियल खरेदीस जास्‍त खर्च येणार व बांधकामास जास्‍त खर्च येणार आहे.  वादळ वारा, पावसाने अर्धवट बांधकामाचे नुकसान झाले आहे.  किचनमधील भिंत पडली आहे, जाबदाराने केलेल्‍या बांधकामासाठी अत्‍यंत हलक्‍या दर्जाचे मटेरियल वापरले आहे.  त्‍याचप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराकउून रक्‍कम रु.1,05,000/- उर्वरित जादा रक्‍कम तक्रारदाराने वेळोवेळी मागणी करुनही परत दिलेली नाही त्‍यामुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसानहोऊन त्‍यांना मानसिक त्रास सोसावा लागला आहे.  तक्रारदाराने दि.4-7-2014 रोजी प्रस्‍तुत जादा रक्‍कम रु.1,05,000/- जाबदाराकडून परत मिळावेत म्‍हणून वकीलामार्फत जाबदारास नोटीस पाठवली असता जाबदाराने दि.9-7-2014 रोजी सदर नोटीसीस खोटे उत्‍तर पाठवले आहे.   सदर उत्‍तरी नोटीसीमध्‍ये तक्रारदाराने जाबदाराकडून रक्‍कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) घेतलेचे मान्‍य व कबूल केले आहे, तसेच तक्रारदार व जाबदारांमध्‍ये झालेला करारनामाही मान्‍य केला आहे.  मात्र उर्वरित मजकूर जाबदाराने मान्‍य केलेला नाही.  जाबदाराचे या वागण्‍यामुळे तक्रारदारास भयंकर मानसिक त्रास सोसावा लागल्‍याने जाबदाराने बांधकाम अपुरे ठेवल्‍याने तक्रारदारास सदोष सेवा जाबदाराने पुरवलेने तक्रारदारानी जाबदारांकडून उर्वरित जादा रक्‍कम परत मिळणेसाठी व नुकसानभरपाई मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे. 

2.     सदर कामी तक्रारदारानी जाबदारांकडून तक्रारदाराने जाबदाराना जादा अदा केलेली रक्‍कम रु.1,05,000/-(रु.एक लाख पाच हजार मात्र) वसूल होऊन मिळावी, सदर रकमेवर दि.7-2-2014 पासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे.15टक्‍के  व्‍याज जाबदारांकडून तक्रारदाराना मिळावे, बांधकाम अर्धवट सोडलयाने तक्रारदाराच्‍या झालेल्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.2,50,000/-(रु.दोन लाख पन्‍नास हजार मात्र) जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व अर्जाचा खर्च म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे.

3.       सदर कामी तक्रारदारांनी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/11 कडे अनुक्रमे मौ.कवठे, ता.वाई येथील सि.स.नं.698 चा सिटी सर्व्‍हेचा उतारा, मौ.कवठे येथील गट क्र.370/23 चा 7/12 उतारा, बांधकाम करारनामा सत्‍यप्रत, बांधकाम प्‍लॅनची सत्‍यप्रत, तक्रारदाराने जाबदारास रक्‍कम दिलेबाबत बँक पासबुकची सत्‍यप्रत, तक्रारदाराने जादबारास पाठवलेल्‍या नोटीसची रजि.पोस्‍टाची पावती व पोस्‍टाची पोहोच पावती, रजि.नोटीसची स्‍थळप्रत, जाबदाराने तक्रारदारास दिलेले नोटीसचे उत्‍तर, सर्व्‍हेअर शशिकांत धुमाळ यांचा सर्व्‍हे रिपोर्ट, सर्व्‍हेअर यांचे प्रतिज्ञापत्र, घरमिळकतीचे फोटो, नि.14 कडे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, वगैरे कागदपत्रे मे.मंचात दाखल केली आहेत. 

4.     जाबदारानी नि.11 कडे म्‍हणणे दाखल केले आहे.  नि.12 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 चे कागदयादीसोबत नि.13/1 कडे साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.13/2 कडे व्‍हॅल्‍युएशन रिपोर्ट, नि.13/3 कडे प्‍लॅन नकाशा, नि.16 कडे तंटामुक्‍त समितीसमोर झालेला तडजोडनामा, नि.18 ते नि.25 कडे जाबदारातर्फे साक्षीदारांचे  पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.26 चे कागदयादीसोबत नि.26/1 कडे व नि.26/2 कडे तक्रारदाराचे घराचे फोटो, नि.31/1 व नि.31/2 क‍डे जाबदारातर्फे साक्षीदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.32 कडे जाबदाराने दिलेले म्‍हणणे, पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र हाच लेखी युक्‍तीवाद समजणेत यावा म्‍हणून दिलेली पुरसीस वगैरे कागदपत्रे जाबदाराने सदर कामी दाखल केली आहेत. 

         जाबदाराने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.   त्‍यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदवले आहेत. 

        तक्रारदारांचा अर्ज व त्‍यातील मजकूर खोटा व लबाडीचा आहे.  मान्‍य व कबूल नाही.  तक्रारदार व जाबदार तसेच तक्रारदाराचे जावई यांचेदरम्‍यान बांधकामाबाबत चर्चा होऊन तक्रारदारांचे 1075 स्‍क्‍वे.फुटाप्रमाणे बांधकाम करुन देणेचे ठरले होते.  करारात ठरलेप्रमाणे बांधकामापोटी रक्‍कम हप्‍त्‍याने देणेचे ठरले होते.   त्‍याप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांचेदरम्‍यान तक्रारदार कथन करतात त्‍याप्रमाणे करारपत्र झाले आहे.  करारपत्राशिवाय जादा काम तक्रारदाराचे मनाप्रमाणे केलेस जादा कामाचा मोबदला वेगळा देणेचे ठरले होते.  जाबदार हे प्रत्‍येकवेळी तक्रारदारास मटेरियल दाखवून बांधकाम करत होते.  तक्रारदारास दारुचे व्‍यसन आहे त्‍यामुळे ते प्रत्‍येक वेळी काहीतरी शंका काढून कामगारांना तसेच जाबदारास शिवीगाळ करुन मारहाण करीत होते.  तक्रारदाराचे जावई समजूत काढून कामगाराकडून काम करुन घेत होते. 14,15 मार्च रोजी तक्रारदार जाबदाराचे घरी रात्रौ. 9.00 वा. जाऊन दांडके घेऊन मारणेस गेला होता.  त्‍यामुळे जाबदारास काम करताना खूपच अडचणी येत होत्‍या.  वारंवारच्‍या या भांडणामुळे तक्रारदाराचे काम बंद पाडणे भाग पडल्‍याने काम बंद केले परंतु जाबदारास तक्रारदाराने रु.एक लाख दिले असल्‍याने ठरलेप्रमाणे काम करुन देणेस तक्रारदार आग्रह करु लागले.  तंटामुक्‍त समितीपुढे झालेल्‍या तडजोडीप्रमाणे तक्रारदार वागले नाहीत त्‍यामुळे जाबदाराने काम बंद ठेवले आहे.  तकारदार हे जाबदारास रक्‍कम रु.46,000/- देणे लागतात ते तक्रारदाराने दिलेले नाहीत म्‍हणून तक्रारदाराचे काम बंद ठेवले, तसेच तक्रारदाराने जाबदाराकडे जास्‍त रकमेची मागणी केली नसून जाबदारानी अक्षय कन्‍सल्‍टंसी यांचे आर्किटेक्‍चर इ.एस.महामुनी यांचेकडून व्‍हॅल्‍युएशन रिपोर्ट तयार करुन घेतला आहे.  सदर व्‍हॅल्‍युऐशन रिपोर्टप्रमाणे जाबदारानी रक्‍कम रु.3,46,000/-चे काम केलेले आहे.  सबब तक्रारदार हे जाबदाराना रक्‍कम रु.46,000/- देणे लागतात ती रक्‍कम तक्रारदाराने जाबदाराना अदा केली नाही, त्‍यामुळेच काम बंद ठेवले आहे.  याला तक्रारदारच जबाबदार आहेत, परंतु जाबदारांकडून जादा रक्‍कम वसूल करणेचे हेतूने तक्रारदारांनी सदर तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे.  वास्‍तविक तक्रारदाराचे चुकीच्‍या वागण्‍याने व चुकीमुळे बांधकाम बंद पडले आहे.  यास जाबदार हे जबाबदार नाहीत.  उलट तक्रारदारांनीच जाबदारांना मानसिक त्रास दिल्‍याने तक्रारदाराकडून जाबदारानांच मानसिक त्रासाबाबत रक्‍कम रु.25,000/- देणेचा आहेश व्‍हावा असे म्‍हणणे जाबदाराने याकामी दाखल केले आहे. 

5.       वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदारानी दाखल केलेले म्‍हणणे, सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे.मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.             मुद्दा                                           उत्‍तर

 1.  तक्रारदार व जाबदारांमध्‍ये ग्राहक व सेवादेणार असे नाते आहे काय?     होय.

 2.  जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेव पुरवली आहे काय?                होय.

 3.  अंतिम आदेश काय?                                 खाली नमूद केलेप्रमाणे. 

विवेचन-  

6.      वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 याचे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी जाबदारांबरोबर सि.स.नं.698, गट क्र.370/23 याचे क्षेत्र 1 आर या मिळकतीमध्‍ये तक्रारदारानी नवीन घरबांधणी करणेचे नियोजन करुन बांधकाम करारपत्र दि.2-1-2014 रोजी रक्‍कम रु.100/-चे स्‍टॅम्‍पपेपरवर केले होते, तसेच दि.7-2-2014 रोजी भारतीय स्‍टेट बँक या खात्‍यावरील चेक क्र.995005 ने रक्‍कम रु.2,00,000/-(रु.दोन लाख मात्र) तसेच दि.26-4-2014 रोजी भारतीय स्‍टेट बँकेचा चेक क्र.995006 ने रक्‍कम रु.1,00,000/-(रु.एक लाख मात्र) जाबदाराला अदा केला आहे.  सदर चेकच्‍या  रकमा जाबदारास मिळाल्‍या आहेत.  त्‍यामुळे तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान ग्राहक व सेवादेणार असे नाते असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  कारण जाबदाराने रक्‍कम मिळालेचे व करारपत्र केलेचे मान्‍य केले आहे.   तसेच प्रस्‍तुत कागदपत्रावरुन असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान बांधकाम करारपत्र झालेले होते व आहे.  सदर बांधकाम करारपत्रात ठरलेप्रमाणे रक्‍कम रु.5,20,000/- (रु.पाच लाख वीस हजार मात्र)या रकमेस मजुरी व मटेरियलसह बांधकाम करुन देणेचे ठरले होते.  सदर करारपत्र नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/3 कडे दाखल आहे.  तसेच घराच्‍या बांधकाम प्‍लॅनची प्रत नि.5/4 कडे आहे.  नि.5/5 कडे जाबदारांना एकूण रक्‍कम रु.5,20,000/- (रु.पाच लाख वीस हजार मात्र)पैकी रक्‍कम रु.3,00,000/- (रु.तीन लाख मात्र) अदा केलेचे तक्रारदाराचे बँकपासबुक दाखल आहे.  यावरुन तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान बांधकाम करारपत्र झालेचे व प्रस्‍तुत करारपत्रात ठरले रकमेपैकी रक्‍कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र)तक्रारदाराने जाबदाराला अदा केलेचे स्‍पष्‍ट दिसून येते. परंतु सदरची रक्‍कम जाबदारास मिळूनही जाबदारानी तक्रारदाराच्‍या घराचे बांधकाम अर्धवट सोडले आहे.  जाबदारांनी फक्‍त रक्‍कम रु.1,95,000/- (रु.एक लाख पंचाण्‍णव हजार मात्र)चे मजुरी व मटेरियलसह बांधकाम केलेले आहे. ही बाब तक्रारदाराने सरकारी सिव्‍हील इंजिनियर श्री.शशिकांत धुमाळ यांचेमार्फत जाबदाराने अर्धवट केलेल्‍या बांधकामाचे व्‍हॅल्‍युएशन काढले असता श्री.धुमाळ यांनी  रक्‍कम रु.1,95,000/-(मजुरी व मटेरियलसह) चे बांधकाम जाबदाराने करुन दिल्‍याचे सदर रिपोर्टवरुन स्‍पष्‍ट होते.  सदर व्‍हॅल्‍युएशन रिपोर्ट तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/9 कडे दाखल केला आहे.  तसेच सदर कामी जाबदाराने दाखल केलेले नि.13/2 कडील अक्षय कन्‍सल्‍टंट यांचे व्‍हॅल्‍युएशन रिपोर्टवरुन स्‍पष्‍ट होते की, अक्षय कन्‍सल्‍टंट पी.एस.महामुनी हे सरकारी व्‍हॅल्‍युऐटर नाहीत.  त्‍यामुळे त्‍यांना सदर व्‍हॅल्‍युएशन करणेचे अधिकार नाहीत तसेच सदरचा व्‍हॅल्‍युएशन रिपोर्ट मोघम असलेने विचारात घेता येत नाही आणि जाबदाराने दाखल केलेले साक्षीदारांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र विचारात घेतले तरीही तक्रारदाराना जाबदारानी करारात ठरलेप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन देणे हे जाबदारांवर बंधनकारक होते तरीही जाबदारांनी तक्रारदाराचे घराचे बांधकाम अर्धवट सोडलेचे दिसून येते.  त्‍यामुळे जाबदारांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवलेचे स्‍पष्‍ट होते.   तक्रारदारानी दाखल केलेल्‍या इमारतीचे फोटोवरुन बांधकाम अपूर्ण असलेचे दिसून येते त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.   सदर कामी तक्रारदाराचे घराचे बांधकाम हे निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याचे म्‍हणणे न्‍यायोचित होणार नाही कारण जाबदारांनी या कामी वेगवेगळया साक्षीदारांची पुराव्‍याची प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत त्‍यामध्‍ये स्‍पष्‍ट केले आहे की, तक्रारदाराने स्‍वतः लाथा मारुन भिंत पाडलेचे लक्षात येते.  सदर प्रतिज्ञापत्र नि.18 ते 24 कडे दाखल आहेत.  सदर प्रतिज्ञापत्रावरुन तक्रारदाराने स्‍वतः भिंत पाडलेचे स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे जाबदाराने केलेले बांधकाम निकृष्‍ट दर्जचे असलेमुळे भिंत पडली असे म्‍हणणे न्‍यायोचित होणार नाही आणि तसे आम्‍ही म्‍हणणार नाही, परंतु करारात ठरलेप्रमाणे ठरले किंमतीस जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम पूर्ण करुन देणे न्‍यायोचित होणार आहे.  सबब जाबदारांनी बांधकाम अर्धवट सोडून तक्रारदारास सदोष सेवा दिलेचे स्‍पष्‍ट होते, त्‍यामुळे जाबदारानी तक्रारदाराना तक्रारदाराचे झालेल्‍या बांधकामाचे व्‍हॅल्‍युएशन रिपोर्टप्रमाणे एकूण रक्‍कम रु.1,94,681/-(रु.एक लाख चौ-याण्‍णव हजार सहाशे एक्‍क्‍याऐंशी मात्र) चे बांधकाम केलेचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारदारानी जाबदाराना रक्‍कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख मात्र) अदा केलेचे स्‍पष्‍ट झाले आहे.  सबब जाबदाराकडे तक्रारदाराचे जादा रक्‍कम रु.1,05,000/- बांधकामासाठी दिलेले शिल्‍लक असून जाबदारानी सदरची रक्‍कम तक्रारदारास परत देणे न्‍यायोचित होणार आहे. 

7.     सबब सदर कामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-

                            आदेश

1.  तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदारानी तक्रारदाराना रक्‍कम रु.1,05,000/-(रु.एक लाख पाच हजार मात्र) तक्रारअर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने परत अदा करावी.

3.   तक्रारदारास जाबदाराने अर्धवट बांधकाम सोडलेने झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/-(रु.वीस हजार मात्र) अदा करावेत.

4.    तक्रारअर्जाचे खर्चापोटी जाबदारानी तक्रारदाराना रक्‍कम रु.5,000/- अदा करावेत.

5.  वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावे.

6.  वरील आदेशाचे पालन जाबदार यानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारास कलम 25 व 27 नुसार जाबदाराविरुध्‍द कारवाई करणेची मुभा राहील.

7.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

8.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि. 8-6-2015.

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.