Maharashtra

Satara

CC/10/227

Shri Mahadev Ramchandr Misal - Complainant(s)

Versus

Santisagar Na. Sah. Patsanstha Chairman Mahadev Balaku Bhosale - Opp.Party(s)

A.Kadam

11 Feb 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 227
1. Shri Mahadev Ramchandr MisalA/p Kushi {Savargahr} Tal Pathan Dist satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. Santisagar Na. Sah. Patsanstha Chairman Mahadev Balaku BhosaleKhanbale Tal Kadegaon dist sangalisangali2. Chairman Mahadev BhosaleKanbale Sangali3. V. Chairman Mansing Janakar MandhareKhanbale sangali4. Sanchalk . Shrirang JhadhavKhanbalesangali5. Sanchalk . Shankar KanaseKhabalesangli6. Sanchalk . Dinakar KharadeKhanbalesangali7. uattam BhosaleKhanbalesangli8. Adhikrao Aabaji BhosleKhanbalesangali9. Sanchalk . Shamrao BhosaleKhanbaleSangli10. Sanchalk . Prabhakar KashidKhanbalesangli11. Sanchalk . shshikant DodhkeKhanbalesangli12. Sanchalk .Govind KuradeKhanbalesangli13. Manager . Andrao NnavareKhanbalesangli14. B.Manager. Balasaheb shetheKhanbalesangli ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 11 Feb 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.28
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 227/2010
                                          नोंदणी तारीख – 29/9/2010
                                          निकाल तारीख – 11/2/2011
                                          निकाल कालावधी – 132 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
1. श्री महादेव रामचंद्र मिसाळ
2. सौ पार्वती महादेव मिसाळ
3. श्री ब्रम्‍हदेव महादेव मिसाळ
सर्व रा. कुशी (सावरघर),
ता. पाटण जि.सातारा                                 ----- अर्जदार
                                             (अभियोक्‍ता श्री आनंद कदम)
 
      विरुध्‍द
 
1. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    चेअरमन महादेव बाळकू भोसले
    रा.खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली  
2. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    चेअरमन महादेव बाळकू भोसले
3. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    व्‍हा.चेअरमन मानसिंग जानकर मांढरे
4. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक श्रीरंग पांडुरंग जाधव
5. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक शंकर कृष्‍णा कणसे
6. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    दिनकर कृष्‍णा खराडे
7. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक उत्‍तम यशवंत भोसले
8. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक अधिकराव आबाजी भोसले
9. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक शामराव शंकर भोसले
10. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक प्रभाकर रामचंद्र काशीद
11. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक शशिकांत रामचंद्र दोडके
12. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    संचालक, गोविंद कंटयाप्‍पा कुराडे
13. शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), ता.कडेगाव जि.सांगली तर्फे
    व्‍यवस्‍थापक आनंदराव नाथा ननावरे
    नं.2 ते 13 रा. मु.पो.खंबाळे (औंध)
    ता.कडेगाव जि.सांगली
14. शाखाधिकारी, बाळासाहेब शेटे
    शांतीसागर नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.
    खंबाळे (औंध), शाखा तारळे जि.सातारा
    तारळे, ता.पाटण जि.सातारा                      ----- जाबदार
                                                    (एकतर्फा)
 
न्‍यायनिर्णय
 
1.     अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेत तीन वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्‍थेतील बचत खात्‍यामध्‍ये काही रक्‍कम शिल्‍लक आहेत. ठेवींची मुदत संपल्‍यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम परत दिली नाही. सबब ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी, बचत खात्‍यातील रक्‍कम मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्‍हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे.
2.    जाबदार क्र.1 ते 11 व 13 व 14 यांनी प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस स्‍वीकारली नाही. नोटीस न स्‍वीकारलेबाबतचे पोस्‍टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्‍तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 11 व 13 व 14 हे नेमलेल्‍या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. याकामी अर्जदार यांनी दाखल केलेले शपथपत्र नि. 28 पाहिले. सबब, 1 ते 11 व 13 व 14 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
3.    जाबदार क्र.12 यांना अर्जदारचे नि. 26 कडील अर्जावरील आदेशानुसार प्रस्‍तुत प्रकरणातून वगळण्‍यात आले.
4.    अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 7   सोबत नि.8 व 9 कडे ठेव पावत्‍यांच्‍या मूळ प्रती व बचत खात्‍याचे पासबुक दाखल केले आहे. प्रस्‍तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेत ठेव ठेवलेचे स्‍पष्‍ट होते. तसेच प्रस्‍तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्‍पष्‍ट दिसत आहे. तसेच नि. 9 कडील बचत खात्‍याचे पासबुकाचे अवलोकन केले असता त्‍या खात्‍यामध्‍येही रक्‍कम शिल्‍लक असल्‍याचे दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्‍पष्‍ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत‍ आहे. सबब जाबदारने अर्जदारच्‍या प्रस्‍तुत तक्रारीतील फेरिस्‍त नि.7 सोबतच्‍या नि. 8 व 9 कडील ठेवींच्‍या रकमा पावत्‍यांवरील नमूद व्‍याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने होणा-या व्‍याजासह द्याव्‍यात तसेच नि. 9 कडील बचत खात्‍यातील शिल्‍लक रक्‍कम व्‍याजासहित द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
5.    जाबदार क्र. 13 व 14 हे अनुक्रमे व्‍यवस्‍थापक व शाखाधिकारी असून संस्‍थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 13 व 14 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्‍थेसाठी त्‍यांना रक्‍कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 11 यांना स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार संस्‍थेतर्फे जाबदार क्र. 13 व 14 यांना अर्जदारच्‍या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे.
6.    सबब आदेश.
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. जाबदार क्र. 1 ते 11 यांनी स्‍वतंत्र व संयु‍क्‍तरित्‍या व जाबदार संस्‍थेतर्फे जाबदार
    क्र. 13 व 14 यांनी अर्जदार यांना त्‍यांची ठेव पावती क्र.22389, 22390 व
    22391 कडील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण
    रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह द्यावी.
3. बचत खाते क्र.322 कडील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे देय
    होणा-या व्‍याजासह द्यावी.           
4. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्‍कम
    रु. 5,000/- द्यावी.
5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्‍यांना या न्‍यायनिर्णयाची सत्‍यप्रत
    मिळाल्‍यापासून 30 दिवसात करावे.
6. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 11/2/2011
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER