जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 467/2010. तक्रार दाखल दिनांक : 04/08/2010. तक्रार आदेश दिनांक : 20/04/2011. उर्मिला सुब्राव गवळी, वय 35 वर्षे, व्यवसाय : शेती व घरकाम, रा. गवळेवाडी, पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर तर्फे प्रशासक. 2. सौ. मनिषा रामेश्वर लोंढे, वय सज्ञान, चेअरमन, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. चौधरी प्लॉट, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. श्री. शिवाजी महादेव भोसले, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 4. श्री. अदिनाथ रावसाहेब मोरे, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, मु.पो. चिंचगाव, ता. माढा, जि. सोलापूर. 5. श्री. प्रल्हाद राघु मोरे, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. श्री. संदिपान लक्ष्मण बागल, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. एस.टी. स्टॅन्डच्या मागे, मु.पो. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 7. श्री. राजाराम तुकाराम उबाळे, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, मु.पो. भोसरे, भांबुरे वस्ती, ता. माढा, जि. सोलापूर. 8. श्री. भानुदास मारुती निळ, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, मु.पो. निमगांव (के.), ता. करमाळा, जि. सोलापूर. 9. श्री. नागन्नाथ संदिपान नवले, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 10. श्री. आदिनाथ धर्मा लाडे, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर. 11. श्री. मच्छिंद्र भगवान शिंदे, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. कव्हे (रो), ता. माढा, जि. सोलापूर. 12. श्री. अ.मजीद अ. कादर बागवान, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. पटेल चौक, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 13. श्री. श्रीमंत विश्वनाथ बेडकुते, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. वरकुटे, ता. माढा, जि. सोलापूर. 14. श्री. लक्ष्मण दिगंबर करंडे, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. सासुरे, ता. माढा, जि. सोलापूर. 15. सौ. यमुना नागन्नाथ जाधव, वय सज्ञान, संचालक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रा. मु.पो. भांबुरे वस्ती, भोसरे, ता. माढा, जि. सोलापूर. 16. व्यवस्थापक, संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, शाखा कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : आर.एफ. सोनमिंडे आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये नमूद विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी दि.18/8/2008 ते 18/9/2009 कालावधीसाठी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावती क्र.889 द्वारे रु.53,000/- गुंतवणूक केले आहेत. मुदत पूर्ण झाल्यानंतर मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत केलेली नाही. विरुध्द पक्ष हे ठेव रक्कम परत करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे प्रस्तुत तक्रारीद्वारे तक्रारदार यांनी ठेव रक्कम रु.53,000/- व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च रु.2,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून वसूल होऊन मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष 2, 3, 5, 6, 8 ते 13 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते सन 2004 ते 2009 पर्यंत पतसंस्थेचे संचालक होते आणि संस्थेचा कार्यभार व्यवस्थित चालत असताना सन 2008 पासून सर्वच ठेविदारांनी एकाचवेळी मुदतपूर्व ठेवींची मागणी केल्यामुळे पतसंस्थेचे परिस्थिती नाजूक बनली. त्यामुळे ठेवीचे पैसे परत करता आले नाहीत. त्यांनी कर्ज वसुली करुन ठेवी परत केल्या आहेत. तत्पुर्वी दि.6/10/2009 रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांनी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकांची नेमणूक केली आहे. तेव्हांपासून त्यांना संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेता आलेला नाही आणि ठेवीबाबत माहिती नाही. त्यांना ठेवीकरिता जबाबदार धरु नये आणि तक्रार रद्द करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. 3. उर्वरीत विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊन त्यांनी म्हणणे दाखल केले नाही आणि ते मंचासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संत रोहिदास ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., बारलोणी या पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये मुदत ठेव पावती क्र.889 द्वारे रु.53,000/-/- गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावतीवरुन निदर्शनास येते. पावतीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्द पक्ष यांच्याकडून रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 6. विरुध्द पक्ष 2, 3, 5, 6, 8 ते 13 यांच्या म्हणण्यानुसार सन 2008 पासून सर्वच ठेविदारांनी एकाचवेळी मुदतपूर्व ठेवींची मागणी केल्यामुळे ठेवीचे पैसे परत करता आले नाहीत आणि पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकांची नेमणूक केल्यापासून संस्थेच्या कामकाजामध्ये भाग घेता आला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 7. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली असून त्याप्रमाणे त्यांना तक्रारीत विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये मुदत ठेव पावतीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे मुदत ठेव पावतीची रक्कम व्याजासह मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. 8. विरुध्द पक्ष क्र.16 हे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलेले आहेत. ठेव रक्कम परत करण्याबाबत त्यांची जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांना जबाबदार धरता येणार नाही. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मुदत ठेव रक्कम रु.53,000/- दि.18/8/2008 पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/18411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |