:::निकालपञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा.सौ.किर्ती वैदय (गाडगीळ) )
(पारीत दिनांक :-10/07/2020)
ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत अर्जदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे,
१) गैरअर्जदार क्रमांक एक ही कंपनी कायद्यानुसार नोंदवली असून त्याचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स वापराच्या वस्तू तयार करणे व विकण्याचा आहे. गैरअर्जदार क्र.२ हे त्यांचे अधिकृत सर्व्हिस स्टेशन असून गैरअर्जदार क्रमांक ३ हा गैरअर्जदार क्रमांक १ चे इलेक्ट्रॉनिक्स वापराच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात.गैरअर्जदार क्र. ३ कडून अर्जदाराने एक भिंतीवरचा एल.ई.डी.व्ही विकत घेतला.तो टीव्ही गैरअर्जदार क्र. १ ने निर्मित केलेला आहे. सदर टीव्ही आयटम नेम एसएएन यूएचडीटीव्ही ४२ इंच स्मार्ट असे नमूद केलेले असून त्याची किंमत रुपये 42,०००/- होती व ती अर्जदाराने दिनांक 13/11/2015 रोजी नमूद रक्कम अदा करून विकत घेतला आहे. सदर टीव्ही वर एक वर्षांची वॉरंटी होती व दोन वर्षाची वाढीव वररांटी होती. त्याप्रमाणे सदर टीव्हीवर एकूण तीन वर्षाची वारांटी होती जी दिनांक 13/11/2018 पर्यंत लागू होती। गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 चे म्हणणे आहे ऑगस्ट 2018 मध्ये सदर टीव्ही हा चालू बंद होणे हा दोष चालू झाला त्यामुळे अर्जदार सदर टीव्हीच वापर करू शकत नव्हते करीत अर्जदाराने गैरअर्जदाराला त्याबदल माहिती दिली. गैरअर्जदार क्रमांक दोन हा अधिकृत सर्व्हिस स्टेशन असल्याने त्याच्याकडे सदर टीव्ही घेऊन जाण्याची सूचना गैरअर्जदार क्र. ३ अर्जदाराला दिली त्याप्रमाणे अर्जदाराने सदर टीव्ही दिनांक 4/8/2018 रोजी गैरअर्जदार क्र. २ कडे दिला आणि त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. २ जॉब शीट तयार केली व दोन दिवसात सदरचा दोष निवारण करून परत करतो असे सांगितले परंतु जेव्हा अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ ला दोन दिवसांनी भेटले असता गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराला सांगितले की दोन दिवसात सदर टीव्ही मधील काही आवश्यक वस्तू बदलण्याची गरज असल्याने त्यातील दोष दूर करता आला नाही तसेच सदरच्या वस्तू बोलण्याकरता पंधरा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल असे गैरअर्जदार क्र. २ ने अर्जदारला सांगितले. अर्जदाराने पंधरा दिवसांनंतर पुन्हा गैरअर्जदार क्र.२ ला भेटला असता गैरअर्जदार क्र.२ ने सांगितले कि आवश्यक वस्तू कुठेही उपलब्ध नसल्याने अर्जदाराचा टीव्ही गैरअर्जदार क्रमांक तीन मार्फत निर्मिती कंपनी म्हणजेच गैरअर्जदार क्र.१ कडे पाठवण्यात आलेला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.२ ने अर्जदारास असेही सांगितले की गैरअर्जदार क्र.१ ची चांगली योजना आहे त्या योजने बाबत विचारणा केली तेव्हा गैरअर्जदार क्र.३ ने सांगितले की गैरअर्जदार क्रमांक तीन हा अर्जदाराचा एक दुसऱ्या टीव्ही त्याच किमतीच्या वारांटी शिवाय देतील परंतु त्याची अर्धी किंमत अदा करावी लागेल तेव्हा अर्जदाराने सदर दुसरें टीव्ही चे निर्माता कोण आहे असे विचारले असता,सदर टीव्ही चे निर्मिती बंद झाले असल्याने त्यावर वॉरंटी होणार नाही त्यामुळे अर्जदाराने सदरची योजना स्वीकारली नाही तसेच त्यांच्या टीव्ही शक्य तेवढ्या लवकर दुरुस्त करून देण्याची मागणी केली परंतु १५ दिवसापेक्षा जास्त काळापर्यंत वाट पाहूनही अर्जदाराचा टीवी अर्जदाराला आवश्यक दुरुस्तीसह परत मिळाला नाही त्याउलट गैरअर्जदार क्रमांक दोन वतीने अर्जदाराला वर नमूद केलेली योजना स्वीकारण्याची व अर्जदाराने रुपये 21,000/- देण्याची गळ घातली. अर्जदार या योजनेस तयार नव्हता त्यामुळे अर्जदारांनी गैरअर्जदार क्रमांक एकचे ग्राहक तक्रार कक्षाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा कोणताही फायदा झाला नाही। गैरअर्जदाराच्या वरील वागणुकीमुळे अर्जदाराला शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदार यांना कायदेशीर नोटीस दिनांक 20/10/2018 पाठवला या नोटीसमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार टीव्ही संच दुरुस्त करून 50,000/-चे शारीरिक व मानसिक त्रासा पोटी नुकसान भरपाई मागितली सदर नोटीस गैरअर्जदार क्र. १ ,२ व ३ ला प्राप्त होऊनही नोटीसला कोणतेही उत्तर दिलेले नाही. अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदारची तक्रार मंजूर करून गैरअर्जदाराने टीव्ही दुरुस्त करून द्यावा किवा त्याचा मोबद्ला रक्कम रुपये ४२,000/-अर्जदाराला द्यावा तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराला मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये ५०,०००/- नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावे. गैरअर्जदाराने अर्जदाराला नोटीस पाठवण्यात आलेला खर्चा रूपय २,५००/- अर्जदाराला देण्याचे निर्देश द्यावे.या तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 10,000/- गैरअर्जदारवर लादून तो अर्जदारस देण्याचे निर्देश घ्यावे.
२) अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्रमांक 1 2 व 3 यांना नोटीस काढण्यात आल
मांच्यातर्फे गैरअर्जदार क्रमांक 1, 2 यांना नोटीस प्राप्त होऊन सुद्धा ते उपस्थित न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध दिनांक 19/6/19 रोजी प्रकरण एकतर्फा चालवण्याचे आदेश पारित करण्यात आले.
३) गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल करीत तक्रारी दाखल केलेले कथन नाकबूल करत गैरअर्जदार क्रमांक एक ही कंपनी कायद्यानुसार नोंदलेली असून त्याचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक वापराच्या वस्तू तयार करणे व विकण्याचा आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 हा गैरअर्जदार क्रमांक एकचे इलेक्ट्रॉनिक वापराच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात गैरअर्जदार क्रमांक तीन कडून अर्जदाराने एक भिंतीवर लावण्याचा टीव्ही गैरअर्जदार क्रमांक एक ने तयार केलेला आहे तसेच सदर टीव्हीवर आईटम नेम वर नमूद केल्याप्रमाणे असून त्याची किंमत रुपये 42,000/- होती व ती अर्जदाराने दिनांक 13/11/2015 रोजी देऊन उपरोक्त टीव्ही खरेदी केला सदर टीव्हीवर एक वर्षाची साधारण नियमित वॉरंटी होती ती दिनांक 13/11/2018 पर्यंत लागू होते. वास्तविक अर्जदाराने स्वतः मान्य केले आहे की गैर अर्जदार क्रमांक तीन कडून टिव्ही विकत घेते वेळी अर्जदाराला फक्त एका वर्षाची वॉरंटी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिली होती॰ त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी कोणतीही वाढ केलेली नाही सबब गैरअर्जदार क्रमांक तीन तर्फे कोणतीही वॉरंटी न दिल्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदार क्रमांक तीन विरुद्ध तक्रार दाखल करण्याचा कोणताच अधिकार नाही. वास्तविक अर्जदाराच्या वाद् पत्राचे अवलोकन केले असता स्पष्ट होते की गैरअर्जदार क्रमांक तीन यांना कोणतेही कारण नसताना विरुद्ध पक्ष बनवण्यात आलेले आहे. अर्जदाराने हेतुपुरस्पर दस्त क्रमांक 1 मधील तारीख मध्ये नमूद महिन्याच्या ठिकाणी खोडतोड केलेली आहे। सदरील दस्तऐवजाचा गैरअर्जदार क्रमांक तीन सोबत कोणताही संबंध नाही तसेच सदर दस्तावेज मधील तारखे झालेल्या खोडतोड मुळे सदरील दस्त विश्वास ठेवण्यासारखी नाही अशा परिस्थितीत उपरोक्त दस्त च्या आधारे अर्जदाराने केलेली मागणी मान्य होऊ शकत नाही करिता अर्जदारची तक्रार गैर अर्जदार क्रमक 3 विरुद्ध खारीज करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दस्ताऐवज, शपथपत्र, तसेच गैरअर्जदाराचे लेखी उत्तर, दस्तशपथपत्र, उभय पक्षांचा लेखी व तोंडी युक्तीवाद आणि परस्परविरोधी अभिकथन यांचे अवलोकन केले असता तक्रार निकालकामी कारणमीमांसा व त्यावरील निष्कर्ष खलील प्रमाणे आहेत.
कारण मीमांसा
४ अर्जदार यांनी दिनांक 13/11/2015 रोजी गैरअर्जदार क्रमांक १ तक्रारीत उल्लेख असलेला नमूद टीव्ही संच रुपये 42,000/- ला गैरअर्जदार क्रमांक 3 कडून विकत घेतला त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये सदर टीव्ही चे डिस्प्ले चालू बंद झाल्याने त्याबद्दल तक्रार अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक तीन कडे दिली. अर्जदाराला गैरअर्जदार क्रमांक दोन हे गैरअर्जदार क्रमांक एक चे सर्विस सेंटर असल्याने त्यांच्याकडे टीव्ही देण्यास सांगितले त्याप्रमाणे अर्जदार यांनी टीव्ही गैरअर्जदार क्रमांक दोन कडे दिला असता गैरअर्जदार क्रमांक दोन यांनी सर्विस सेंटर यांनी दोन दिवसात टीव्ही दुरुस्त करून पाहिला परंतु त्यानंतर अर्जदार त्यांच्याकडे विचारणा करायला गेला असता टीव्हीचे काही पार्ट्स उपलब्ध नसल्याने सदर टीव्ही निर्माता गैरअर्जदार क्रमांक एक कडे पाठवला असे सांगितले त्यानंतर अर्जदाराने वेळोवेळी विचारणा केल्यावर ही गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी अर्जदारच्या टीव्हीची नियमित वॉरंटी एक वर्षाची व दोन वर्षाची वाढीव वारंटी असूनही दुरुस्त करून देण्याची जबाबदारी असतानाही सेवा देण्यास कमतरता केली आहे, असे अर्जदारांनी शपथेवर कथन केले आहे. गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी अर्जदाराची तक्रार आव्हानीत केली नाही परिणामी गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांना अर्जदाराचे वरील कथन मान्य असल्याच्या प्रतिकूल निष्कर्ष काढण्यास वाव आहे. गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी सदर प्रकरणात हजर होऊन त्यांची अर्जदाराचे कथनाला नाकबूल करीत त्यांनी अर्जदाराला कोणतीही वाढीव वारांटी दिली नव्हती, त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदार क्रमांक तीन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही असे नमूद करून त्यांना या प्रकरणात कोणतेही कारण नसताना पक्ष बनवलेले असल्यामुळे त्यांचे विरुद्ध सदर तक्रार खारीज करावी अशी विनंती केली. अर्जदाराचे तक्रारीतीत गैरअर्जदार क्रमांक तीन यांनी दिलेले उपरोक्त नमूद टीव्ही चे बिल दाखल केले असून दिनांक 14/01/2020 रोजी दाखल केलेल्या कागद्पात्राचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक एक निर्माता कंपनी यांना नादुरुस्त टीव्ही बदलून देण्याबाबत व सदर टीव्ही ची वाढीव वारांटी नोव्हेंबर 2018 पर्यंत असून नवीन टीव्ही देण्याबाबत मेल पाठवला असून त्यावर गैरअर्जदार क्रमांक १ यांनी NRN approval details या दस्ताचे अवलोकन केले असता त्यामध्ये गैरअर्जदार यांनी सदर टीव्ही मध्ये कलर प्रॉब्लेम तसेच निगेटिव्ह पिक्चर हा दोष असून टीव्ही संच बदलून देणे गरजेचे आहे असे नमूद करून पुढे तक्रारीतिल टीव्हीला वाढीव वारंटी आहे असेही नमूद केलेले आहे. अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे अर्जदाराच्या वरील कथानस पृप्ष्टी देणारे आहे. परिणामी गैरअर्जदार क्रमांक 1 ने यांनी वाढीव वॉरंटी काळात अर्जदार यांच्या नादुरुस्त टीव्ही दुरुस्त करून देण्याची जबाबदारी पार न पडून सेवा देण्यात कमतरता केली आहे असे मंचाचे मत आहेत. अर्जदाराने त्यांच्या तक्रारीतील मागणी टीव्ही दुरुस्त करून द्यावा किंवा त्याचा मोबदला रुपये 42,000/- ची मागणी केलेली आहे परंतु सदर टीव्ही हा दोषयुक्त असल्यामुळे तक्रारीतील टीव्हीच्या मूल्याचे म्हणजेच 42,000/- चा दुसरा टीव्ही संच नवीन गॅरंटी वॉरंटी सह घेण्यास अर्जदार पात्र आहे तसेच शारीरिक मानसिक त्रासामुळे व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळण्यास अर्जदार पात्र आहेत. गैरअर्जदार क्रमांक दोन हे सर्विस सेंटर व गैरअर्जदार क्रमांक तीन हे विक्रेता असल्यामुळे सेवेच्या कामतरते पोटी त्यांना जबाबदार धरणे न्याययोचित होणार नाही यास्तव वरील निष्कर्ष सह खालील आदेश पारित करीत आहे
अंतिम आदेश
१. अर्जदाराची तक्रार क्रमाक 19/23 अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२ .गैरअर्जदार क्रमाक 1 यांना आदेशित करण्यात येत आहे की त्यांनी अर्जदारास रुपये 42,000/- किमतीचा नवीन टीव्ही संच नवीन वारांटी गॅरंटी सह द्यावा.
३. तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/-गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी द्यावे.
३. गैरअर्जदार क्रमांक दोन व तीन विरुद्ध कोणताही आदेश नाही.
४. आदेशाची प्रत उभयतांना विनामूल्य देण्यात यावी.
( अधि.कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती वैदय(गाडगीळ) ) ( श्री अतुल आळशी )
मा.सदस्या. मा.सदस्या. मा. अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.